भावड्या
भावड्या


एका ST बसमध्ये खेड्यातून आलेले एक गृहस्थ प्रवास करत होते
पुढच्या स्टॉपवर भावड्या गाडीत चढला
तो गृहस्थ खिडकी शेजारच्या सीटवर बसला होता
भावड्या त्या गृहस्थाच्या बाजूला जाऊन बसला
थोड्या वेळानंतर त्या गृहस्थाने खिशातून सिगारेट काढून पेटवले आणि धूर भावड्या कडे सोडला
भावड्या गप्प राहीला काहीच बोलला नाही
त्या गृहस्थाचे सिगारेट पिणे चालूच होते
अचानक खिडकीतून जोरात हवा आली त्यामुळे सिगारेटची एक ठिणगी भावड्याच्या शर्टवर पडली
नव्या कोऱ्या शर्टाला भोक पडले !!!!
तरीपण भावड्या गप्पच
त्या गृहस्थाच्या लक्षात आले की त्याचे चुकलेय
भावड्याच्या शर्टवर ठिणगी पडून भोक पडले तरी भावड्या गप्पच राहिला
भावड्याची सहनशक्ती पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली
त्याने भावड्याची माफी मागण्याचे ठरवले
त्यासाठी बोलणे सुरु करत भावड्याला म्हणाला -
"पाव्हणं कंच गाव म्हणायचं तुमचं?
"भावड्या आता काय माझं गाव पेटवून द्यायचा विचार आहे का तुमचा?