एक सत्य
एक सत्य


शाळेतील सरांनी बोर्ड वर लिहले.
9×1 =9
9×2 =18
9×3 =27
9×4 =36
9×5 =45
9×6 =54
9×7 =63
9×8 =72
9×9 =81
9×10=89
लिहल्यानंतर सरांनी मुलांकड़े पाहिलं, तर मूलं त्यांच्यावर हसत होती कारण शेवटची एक लाइन चुकली होती.
स्मितहास्य करत सरांनी मुलांकडे पाहिले आणि म्हणाले की, मी शेवटची लाईन मुद्दाम चूकीची लिहली आहे कारण तुम्हा सर्वांना खुप महत्वपूर्ण अशी शिकवण देऊ शकेन.
समाज तुमच्याशी असाच व्यवहार करेल.
तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्ष्यात येईल कि, बोर्ड वर मी नऊ वेळा बरोबर लिहलं आहे तरीसुद्धा माझ कोणीच कौतुक केले नाही.
माझ्या फक्त एका चुकीवर आपण सर्वजन हसलात आणि मला समजून घेतले नाही.
तात्पर्य*:
तुम्ही लाख चांगली कार्य केली तरी समाज कधी ही तुमच्या चांगल्या कार्याच कौतुक करणार नाही. पण तुमची एक जरी चुक झाली तर ते तुमच्यावर असच हसतील आणि ते तुम्हाला कधीच समजून घेणार नाही.