रक्त भक्षक (भाग ३)
रक्त भक्षक (भाग ३)
मला काय कराव सुचत नव्हत कस बस गावत येऊन पोहचलो . रात्रीचे १ वाजले होते माझ्या घराजवळ येतात खुप कुत्रे भुकंत होते , खुप भयानक आवाज काढत होते जसे आज कोणि वर जानार . रात्रकिड्याचा आवाज सुध्दा कानात किंचाळत होता , मी घरात माझ्या बायकोला आवाज दिला...ति गाळ झोपेत होती मी परत आवाज दिला तेव्हा तीने दरवाजा ऊघडला . मला बघताच तिने मला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली मला काहीच कळत नव्हत ती अशी का करत असावी , म्हणुन मी तिला विचारले तर ति मला सांगत होती मी आज खुप भयानक स्वप्न बघीतले , त्या स्वप्नात तुम्ही मला किर्डीवर सजलेले दिसले ...
मला ऐकदम धक्काच बसला , मि म्हणालो अगं वेडे मी तर तुझ्या समोर आहे . मलाही भय वाटत होता आणि आता तर बायकोने पण जास्त घाबरुण दिले होते . मला काहीच सुचत नव्हत मी आत शिरलो पाणि पिलो आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त ऐकच चेहरा दिसत होता ....
त्या भयानक माणसाचा . कोण असावा तो , का माझ्या बायकोला येवढे भयानक स्वप्न पडावं विचार चालु होते माझ्या अंगाला शाहारे येत होते , अचानक बायको माझ्या जवळ येऊन...बसली आणि मला बिलगलि रात्रीचे दोन वाजले होते मला झोप कसलीच लागत नव्हती . मला माझ्या बायकोने विचारले ......."काय झालं झोपत का नाहीत तुम्ही.....? ,
तिला काय सांगु आधिच ति घाबरली होती त्या मुळे मी गप्पच बसलो...
ति रात्र कशी बशी ऊलटली पण डोळ्या स
मोरुन त्या माणसाचे चित्र जात नव्हते.........
दूसऱ्या दिवशी सकाळीच पाच वाजता फ्रेश झालो अंधार पडलेला होता.....,
तेव्हड्या कुणी तरी व्यक्ती माझ्या कडे धावत येतानां दिसला तर .........
तो शेजारच्या गल्लीतला गणोबा होता ....
त्याच्या चेहऱ्यावर भय दिसत होता शरीरावर पुर्ण घाम आणि त्याची बनियाण रक्ताने भरलेली होती मला तर फार भिती वाटायला लागली होती. काय झालं असाव .........?
गणोबा माझ्या जवळ येता बोलण्याचा प्रयत्न करत होता पण भयामुळे तो बोलु शकत नव्हता....डोळ्यातुन अश्रूच्या धारा चालुच होत्या....
त्याने माझा हात धरला आणि मला ओढत त्याच्या घराकडे घेऊन गेला मला काहीतरी समस्या नक्कीच आहे कळून चुकलं होतं पण ........
गणूने त्याच्या घराचा दरवाजा ऊघडला मी जसा आत पाय टाकला तर ..........
त्याच्या मुलाचा म्रृतदेह पडलेला होता........त्या मुलाला चेहऱ्यावर भरदार शत्राने वार केलेला पुर्ण रक्ताने माखलेला , पाय ऐका साईटला तुटून पडलेला , अंगावरचे करडे फाटलेले , त्याचा ऐक डोळा बाहेर आलेला होता ....., हे बघून मला चक्कर यायला लागली होती......तिकडे गणोबा मला आणखी काही तरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता........त्याचे बोट घराच्या बाहेर दिशेला स्मशानभुमी दर्शवत होते ...............माझ्या पुर्ण अंगावर काटे ऊभे झाले होते..............