रक्त भक्षक (भाग १)
रक्त भक्षक (भाग १)
त्या भयाणलेल्या रात्री रात्रकीड्याचा आवाज किर्रर्रर्रर्रर्रर्रर्र, करत होता.
आकाशात पोर्णिमेचा चंद्र भर-भर धावत होता. जणू काही तो
लपण्याचा प्रयत्न करत असावा. कधी या ढगात तर कधी त्या ढगात!
चंद्राच्या उजेडात झाडाच्या सावल्या पाठलाग करत होत्या.
माझी धाव चालू होती मला रस्त्यात भुर-भुर वाटत होतं.
थोडं रस्त्याने चालत गेल्यावर...
भले मोठ्ठे वडाचे झाड होते... अचानक झाडावर काही तरी
फडफडल्याचा आवाज आला. एखाद्या पक्ष्यावर हल्ला झाल्यासारखा तो आवाज एेकताच माझ्या चेहऱ्यावर घाम सुटला.
माझ्या पायातल्या चपलीचा पटपट असा आवाज येत होता...
माझ्या पावलांची गती वाढली होती माझे हृदय धडधड करत होते.....
एक किमी. चालत गेल्यावर मला रत्याच्या पलिकडे एक कौलारु घर दिसले. त्या घरातून लख्ख दिव्याचा प्रकाश बाहेर येत होता.
मलाही थोडा
आश्रय हवा होता म्हणून मी त्या घराकडे धाव घेतली...
त्या घराजवळ जाऊन,
जरा दीर्घ श्वास घेतला आणि मनात म्हटलं आपल्या थोडं पाणी मिळेल...
घराला एक लाकडाचा दरवाजा आतून बंद होता.
मी दरवाजाला लावलेली लोखंडी साखळी वाजवली. आतून कोणीच आले नाही.
बाहेर अंधारामुळे माझे हात थरथर कापत होते...
मी परत एकदा ती साखळी वाजवली. तरी पण घराबाहेर कुणीच
येत नव्हतं. मी त्या दरवाजाला ढकलले, तर दरवाजा उघडाच
होता. मी हळू-हळू आत शिरलो.
प्रकाश लख्ख झळकत होता,
त्यामुळे मला त्या घरातले सर्व कानाकोपरे स्पष्ट दिसत होते.
मी आतमध्ये आवाज दिला तर कुणीच प्रतिसाद देत नव्हतं.
मला वाटलं सर्व घरातील व्यक्ती झोपलेले असावेत म्हणून मी परत त्या घराच्या बाहेर निघायला सुरुवात केली तर...
अचानक...
क्रमश:...