Gautam Jagtap

Abstract Classics Inspirational

4.7  

Gautam Jagtap

Abstract Classics Inspirational

रक्षाबंधन,भाऊ बहिणींचा जिव्हाळा

रक्षाबंधन,भाऊ बहिणींचा जिव्हाळा

2 mins
312


रक्षाबंधन या शब्दामध्ये बंध नात्यातला ओलावा म्हणजेच बहिण भावाच्या नात्यातला जिव्हाळा प्रतिदिन आपल्या भाऊरायाचा दिवस सुखा समाधानाने आणि सुरक्षित जावो. हि निस्सीम निष्ठा राखून राखी बांधणारी आपली लाडकी बहिण व तिच्या भाव श्रध्देनं बांधलेला सुरक्षेचा धागा म्हणजे एक अनमोल ठेवा आहे. अनेक संकटांशी लढण्यास बळ देणारा बहिणीचा आयुष्यवंत आशिर्वाद सदैव चिरायू असतो. भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानला जाणारा रक्षाबंधन हा सण कल्याणर्थी एक सुसंसकाराचा मंगल दिन आहे. "बहिणीची माया, एक प्रकारे आईचं स्वरूप आहे. 


       आला माझा भाऊराया 

       लाडक्या बहिणीची माया

       ओवाळी भाऊरायास 

       बंध नात्यातला हा दिस

चैतन्याची आरास आणि आत्मिकतेचा प्रकाश आपल्या अंतरकेंद्रात वसलेला एक महत्त्वाचा भाग आहे. बहिण ह्या नात्यातला प्रकाश सुख दु:खात उजेड देत असतो. अमाप संपत्ती असु द्या तुमच्याकडे परंतु बहिणींन शिवाय भरभराटीचा आनंदचं वाटणार नाही. बहिण या शब्दातली किमया काय? असु शकते. बहिण म्हणजे समृध्दीची बरकत देणारी कन्यारत्न आहे. बाहु मनगटातली ताकद आणि जगण्याला हिंम्मत देणारी बहिण आणि तिची माया तिची आपुलकी भाऊरायाचे एक अहोभाग्यचं समजा


      "जिथे बहिण नाही तिथे लागे सुनं सुनं घर"

      जिथे बहिण असे तिथे हर्ष आनंदाचं मंदिर


रक्षाबंधन ह्या दिनी आठवणींचा धागा उलगडताना आजची स्थिती आणि नव पिढीची बदलेली परंपरा या अतुट नात्यातून जरा मुक्तपणे वावरत आहे. सैरभैर धावणाऱ्या मनाची कुचंबणा कुठे सण उत्सवाची शोभा,कुठे असुरक्षिततेचा धोका शुल्क गोष्टीची किंमत करणारा आणि माणुसकीची किंमत नसणारा हा निष्काळजीचा व्यवहार आज मानवी जीवनात चालु आहे. 

आपुलकीचा आधार विसावला आहे की त्याला माणसाने वेगळा केला आहे. आशा, आकांक्षेतला प्रवाह निर्माण करा. जिथे आत्मिकता दाबली जात आहे. तिथे मुक्त संचार करत जा आपोआप मिटेल बोचट मनाची काळीमा,आणि पहा कशी शुध्द अंतःकरणातली भावना जागी होते की नाही. बंधु,भगिनींची प्रतिमा हृदयात स्थापणारा व्यक्ती व जगत जनाला बंधु, भगिनी म्हणुन हाक मारणारा जगविख्यात आदर्श पुरूष म्हणजेच स्वामी विवेकानंद होय. भाऊ आणि बहिण ह्या शब्दातली निर्मळता भारतीय संस्कृतीचा एक आधार स्तंभ आहे. 

भाऊ,बहिणींचा जिव्हाळा सदैव वृध्दिंगत राहो हिच सदिच्छा 

तृतास एवढेच...


        


       


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract