Gautam Jagtap

Abstract Action Inspirational

4.4  

Gautam Jagtap

Abstract Action Inspirational

आदिवासी क्रांती दिवस

आदिवासी क्रांती दिवस

3 mins
211


अधिकाळा पासून तु टिकला, नाही सोडला निसर्गाला तू|

परंपराला नाही भुललास,तु भोळा राहुन जगलास||

तुझी भक्ती निसर्गावरती,पुजला तू खरा देवता|

नाईक राजा आदिमानवा,ह्या दिनी तुझी सांगता||

आज ९ आगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी क्रांती दिवस म्हणुन ओळखला जातो. संयुक्त राष्ट्र संघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने ह्या विश्वात आदिपासुन वास्तव्य करणारे मुळनिवासीना जागतिक आदिवासी समुदायाचा अधिकाराच्या रक्षणार्थ सन १९९३-९४ मध्ये हे जागतिक आदिवासी वर्ष घोषीत केले ९ आॅगस्ट हा दिवस आदिवासींच्या हिताचे स्वरंक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या विषयी माझे मत...

डोंगर दऱ्या नदी खोऱ्यातील राना वनात आपलं घर थाटणारा व आदिकाळापासून जन्मलेला समुदाय म्हणजे आदिवासी होय. निसर्गाच्या कुशीत वाढणारी ही आदिवासी जमात अनेक विधी कला संस्कृतीची जपणूक करत आला आहे. अजुनही टिकुन असलेली संस्कृती खरोखर अजरामर आहे. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गता आदिवासी आहे.आदिवासींची,लोककला,चित्रकला, नृत्य,वादन,गायन,शिल्पकला,दगडी हत्यारे बणवण्याची कला,लाकडी आंकुची दार तिर कामठ बणवणे याला तोड नाही आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणाऱ्या रांनमेव्यावर करीत आहे. आदिवासी लोकगीतेतून दु:खी मानसालाही आनंदाची चव कळते जणुकाही निसर्गाचे स्वरूप त्या लोकगीतेत वसले असावे आदिवासींचा सन उत्सव साजरा करण्याची पध्दत किती ऊर्जात्मक असते. होळी असो दिवाळी, नागपंचमी,नवरात्र उत्सव, रक्षाबंधन, गणेश उत्सव असे विविध सन उत्सव सर्व आदिवासी बांधव समुह मिळुन मनवतात... हे आदि बांधव तु अज्ञानाच्या अंधारात जरी कोंडला अशील तरी निसर्गाच्या सान्निध्यात तुझा उगम होणे एक स्वर्ग तुला प्राप्त आहे अज्ञान ही फिके पडले असा निसर्गराजाचा दिव्य प्रकाश तुझ्या पाठी मागे आहे. तुझा वावर उघडा, नागडा, साधा भोळा आणि रूबाब मायुळु आहे. अनेक अन्याय सहन करून तु निसर्गाला कधी सोडला नाही. निसर्गावर किती नीस्सीम श्रध्दा तुझी डोंगऱ्या देवाची पूजा करून सुखा समाधानाची व भरभराटीची विनवणी करणारी हि जमात शेवरी माऊलीची मिरवणूक गावोगावी आदिवासी समुदाय मिळुन करतात तारपा,पावरी, ढोल,मादळ हे वाद्य वाजवून आपल्या परंपरेला आदिवासी आजही पुन:रूजीवीत ठेवत आहे. आदिवासी वाद्य यंत्रातला स्वर अंतरआत्म्याला मंत्र मुग्ध करत असतो. माझ्या माहितीप्रमाणे वाद्य मादळ,तारपा,भेर,सुंद्री,घांगळी,सुरथाळ,ढोल या वाद्यातून मादळ या वाद्याच्या साथीने व या वाद्यालाचं देवता मानून मादळ नाट्यप्रकार सादर होतो. तसेच मादळ किंवा मांदळ ही संज्ञा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात आहे. (१३२ ओवी)

खास करून महाराष्ट्रात आदिवासी जमाती गोंड,कातकरी,कोकणा,माडिया गोंड,कोरकू,कोलाम,आंध,भिल्ल,ठाकर,महादेव कोळी,वारली हि जमात आज प्रगती पथावर अग्रेसर झाली आहे.

आदिवासींच्या भाषा सर्वेक्षणात भारतात आर्यपुर्व काळात अस्तित्वात बोलल्या जाणाऱ्या अनेक मूळ आणि अतिप्राचीन बोली भाषा आढळल्या त्या बोलीभाषा म्हणजे ढोरी,टोकरे,कोळी,कोरकू,कोलामी,खारिया, गोंडी,गोरमाटी,ठाकरी,वाघरी,वाघरामी,पारधी,देहवाली,दो,परधानी,पावरी,भिलोरी,भिलाव,भूमिज,माडिया,मुंडारी,संथाली,सावरा,हलबी,मावळी,वैगरे यातील बहुतेकांना लिपी नाही आदिवासी समूहाकडून त्या फक्त बोलल्या जातात.परंतु त्या बोलणाऱ्यांची संख्या थोडी आहे.

जगातील १९५ देशांमध्ये ९० देशात ५००० आदिवासी समुदाय आहे. ज्याची संख्या ३६ करोड आहे. त्यांची ७००० भाषा आहेत...

भारतातील विविध राज्यातील आदिवासी लोकसंख्येत महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे.महाराष्ट्रातील आदिवासींची लोकसंख्या ८५.७७ लक्ष आहे... विकसित हस्तकलाची व आदिवासी साहित्य संस्कृतीची जपणूक आणि संवर्धनासाठी व अतिप्राचीन कलागुणांची माहिती व्हावी यासाठी उचललेले पाऊल म्हणजेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे अधिनस्त आदिवासी सांस्कृतीक संग्रहालयाची स्थापना सन १९६५ मध्ये करण्यात आली तिथे एकुण १३५९ आदिवासी कलावस्तू प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. आजच्या स्थितीत कालबाह्य होत चाललेली हस्तकला आणि आदिवासीचे जीवनमानातल्या गोष्टी व साहित्य संशोधनासाठी उपयोजित कला आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय पुणे यांनी प्रयत्नपुर्ण विकसित करून ठेवले आहे.

आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय प्रमुख पाच विभागात प्रदर्शित केले आहे.

१) संग्रहालय दृष्टीक्षेप (कै.डाॅ.गोविंद गारे कला दालन)

२) आदिवासी साहित्य संस्कृती

३) आदिवासी कलादालन,बोहाड्याचे मुखवटे व बांबू कामाच्या वस्तू दालन

४) आदिवासी दागदागिने व देवदेवता

५) मोकळ्या आवारातील आदिवासी झोपड्यांच्या प्रतिकृती

६) आदिवासी हस्तकलांची झलक

लाकडापासून व बांबूपासून तयार केलेल्या कला वस्तू, धातूपासून तयार केलेल्या कला वस्तू ,मूखवटे, संगीत वाद्ये

हे सर्व आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय पुणे येथे बघायला मिळेल.

आदिवासी क्रांतीचा इतिहास खूप सखोल आहे. त्या विषयी अनेक ग्रंथ साधना निर्माण झाली आहे. आणि आदिवासी क्रांतीकारकांचा लढा भारत देशाप्रती समर्पित आहे.

९ आॅगस्ट या दिनाला आदिवासी बांधवांची संस्कृती कायम दैदिप्यमान राहो.‌..तृतास एवढे     


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract