Gautam Jagtap

Others

4.0  

Gautam Jagtap

Others

आजचा युवक कसा असावा

आजचा युवक कसा असावा

3 mins
2K


आजचा युवक इतका पुढे गेला की भारतीय संस्कृती विसरूनचं गेला. म्हणजे युवकांची रहाणीमानचं बदलली नवीन फॅशन निघाली की युवकांची मनस्थिती बिघडत चालली आहे. आजचा यूवक भ्रमीत आवस्थेत जगत आहे.पुर्णपणे जागतिक दु:खात मुरला गेला आहे. आजची स्थिती काय तर देशाला प्रगति पथावर नेण्यासाठी खरी गरज युवकांची आहे. तरी आजुन पर्यन्त देशात दारिंद्र्य माजत आहे. कारण युवकांमध्ये बौध्दीक आणि आत्मिक जागृती नाही. म्हणून देशाची प्रगति स्थिरावली आहे.


आजचा युवक असावा अंग बांध्याने आणि मन बुध्दीने सुदृढ निरंतर चैतन्याचा गाभा त्याच्यात एकरूप व्हावा आणि राष्ट्राच्या घडणीसाठी अधि आजचा युवक घडावा या दृष्टीने मी चिंतन, मनन करून युवक चित्तवृत्तीचा सार मांडला की युवकांची चित्तवृत्ती कुठे लक्षकेंद्रीत होते. त्यांच्यावर काय परिणाम होतो. या आशेने त्यांच्या भवितव्याचा मानबिंदू लक्षात घेऊन मी काही परिवर्तणीय बाजू मांडल्या जणे करून युवकांना स्वत:ची विकसित बाजू कळावी म्हणुन दोन प्रश्न मी उपस्थितीत केले. जे युवकांशी पुर्ण समरस होतील,

*सर्व युवक सर्वशक्तिमान आहेत. तरी युवकांमधील संभ्रम का?*

*युवकांच्या नयनात नितळ तेज वाहत आहे. तरी राष्ट्राच्या कार्यासाठी आंधळ्या दृष्टीने बघण्याचं कारण काय?*


या दोन प्रश्नांचे मनन केल्यावर आपोआप आपल्याला जाणीव होऊ लागेल. की आपण राष्ट्रहितासाठी अजून पर्यंत काय केलं? 

सर्व युवक सर्वशक्तिमान आहेत. पण स्वतःचे धैर्य गमावून बसले आहेत. याचं कारण काय? ते संभ्रमित झाले आहेत स्वतःच्या विचारशक्तीला जागृत करण्याचं साफल्य मिळत नाही. आजचा युवक भ्रमित अवस्थे मधला जागृत पुतळा बनला आहे. हे म्हणण्यास मला वावगे ठरणार नाही. किंवा कोणाला पचणार नाही असं पण नाही आपण सर्व युवकांना अमृताचे पुत्र आहोत ही निसर्गदत्त उपाधी त्या भाग्यविधात्यानं दिली आहे. वायफळ गोष्टीकडे ती अशीच वाया घालवायचं नाही आपण अमृताचे पुत्र म्हणजे परमात्म्याचे लेकरं आहोत. राष्ट्र सेवेसाठी आपणास चिरंतर जागायचं आहे. निरंतर कार्य करायचे आहे. जोपर्यंत आपलं धैर्य गवसत नाही तोपर्यंत चिरायू आहोत, आपण जेव्हा धैर्य गवसले तेव्हा, खुशाल परमात्म्याच्या, सहवासत चीर मरण घेऊ ,शक्ती असूनही लुळे, पांगळे होऊन जगणं म्हणजे स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास गमावनं होय. जर स्वतःवर आत्मविश्वास नाहीतर आपण कधीच सफल होऊ शकत नाही. अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी स्वतःवर पहिले विश्वास ठेवावा लागेल आत्मविश्वास हा यशस्वी मार्ग पार करण्याचा एक दृढ ध्यास आहे. युवक वायफळ गोष्टींकडे जास्त वळण घेत आहे. आणि राष्ट्रहितासाठी मांगे सावरत आहे. याचं कारण काय तो पूर्णपणे भरकटलेल्या अवस्थेत जगत आहे. जिद्दीने राष्ट्राचं कार्य करायचं असेल तर समग्र शक्ती आपल्यात आहे. ह्या विचाराने सकारात्मक विचारांची भर आपल्या तनामनात रुजवायची आहे. तरच आपण आदर्श युवक ठरू, आणि आपलं जीवन संभ्रमित होऊन घालवत आहोत हे आजच्या युवकांच्या भवितव्याशी शोभा देत नाही. म्हणून जागेपणी स्वप्न भारताचे पहा विशाल असा पर्वत बनण्याची तुमच्यात असीम शक्ती आहे ह्या विश्वासाने जागृत व्हा!


*युवकांच्या नयनात नितळ तेज वहात आहे. तरी राष्ट्राच्या कार्यासाठी आंधळ्या दृष्टीने बघण्याचं कारण काय?* कारण आजच्या युवकांच्या नयनात चैनीच्या वस्तू साठा सामावला आहे. त्यादृष्टीने युवकांच्या मनात हव्यास जडला आहे. म्हणून तो राष्ट्राला आंधळ्या नजरेनं बघत आहे. जेव्हा त्याला विशाल असं समृद्धीने भरभराटलेलं राष्ट्र पारक म्हणून समजेल तेव्हा त्याच्या नयनातून साठवलेला उपभोग साठा विरगळीत होऊन जेव्हा धार धार वाहिल, तेव्हा त्याचे नयन निर्मळ होतील. आणि राष्ट्राची विशाल कार्य सीमा तो बघण्यास तत्पर होईल. आंधळ्या नजरेने जेव्हा युवक बघतो तेव्हा. तो विलक्षण चुका करून बसतो. म्हणून "नयनांपुढे विचारांच्या ज्योती पेटवा ,आणि या राष्ट्राचे संस्काराचे हिरे-मोती व्हा" ,असे मूल्यवान व्हा की जगालाही आपला आदर्श वाटला पाहिजे. शाहू, फुले ,आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे ज्वलंत विचार आपल्या रोमारोमात जागले पाहिजे, म्हणून त्या "जगद्गुरु, राष्ट्राला" आपणास हीरे मोती होऊन स्वतःला पूर्णपणे "समर्पित" करायचे आहे. राष्ट्राला आजचा युवक कसा असावा लख्ख चमकणारा तारा, ध्रुवा सारखं चिरंतर प्रकाश देत राहील, तसा युवक आपणास व्हायचं आहे.,


जागत्या स्वप्नात, तिमिर रातीला,

 जागवणार आम्ही तिमिराला

 उगवणार, दिन सुर्याचा

 आदर्श युवक, वाटेल जगाला


Rate this content
Log in