Gautam Jagtap

Drama Romance

4.0  

Gautam Jagtap

Drama Romance

ती आली होती

ती आली होती

4 mins
322


माझा जिगरी मित्र हृषीकेश खैरनार याच्या आयुष्यात घडलेली ही कथा आहे.


दि. २७ मे २०१५ वेळ-संध्याकाळी ६ वाजत होते. तेव्हा मी घरातून नटुनथटून बाहेर मित्रांसोबत जाण्यास निघालो. एक वेगळीच आयुष्याला सुखकर व त्रासावून काढणारी हृदयातली माझी गोष्ट...!


जेव्हा मी संध्याकाळी घरातून मित्रांकडे जाण्यास निघालो तेव्हा अचानक माझ्या समोरून ती आली आणि तिने माझ्याकडे बघितलं. मी तिच्याकडे बघतच राहिलो. ती माझ्या गावी आली होती. तिला बघताच क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. तिचे ते रूप, तिची अदा... मुख्यतः तिचे डोळे खूप बोलके होते आणि त्यादिवशी मला खूप आनंद झाला होता की, ती आली होती.


मुख्यतः सर्वात आनंदाची बातमी ही होती की माझ्या शेजारी काकांच्या घरात ती आली होती. म्हणजे त्यांच्या इथे पाहुणी म्हणून आली होती. मग काय जसे एखादी हिंदी फिल्म स्टोरी असते तसे माझ्या आयुष्यात घडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिला बघण्यासाठी माझ्या घराच्या पुढच्या ओट्यावर तासंतास बसून राहत होतो. अचानक ती बाहेर आल्यावर माझं मन एकदम भारावून प्रसन्न व्हायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सुद्धा माझ्याकडे बघत असायची. तेव्हा सकाळी असंच एकदा त्यांच्या घरासमोर बसलो असताना तिची आणि माझी नजर भिडली. मी पूर्णपणे सुन्न होऊन गेलो होतो.


शेवटी मी आकस्मात ती माझ्यासवे जसे चकोरला चांदण्यांची ओढ असते तसा भास असण्यासारखे दृश्य निर्माण झाले होते. त्याच दिवशी माझा मित्र देवेश मालेगाव होऊन त्याच्याच मामाच्या गावी म्हणजे अर्थात माझ्या गावी आला होता. तो माझा खूप जिगरी मित्र होता. मे महिना चालू होता. जबरदस्त ऊन पडत होते. उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने आमच्या गल्लीसमोर निंबाचं भलंमोठं झाड होतं. तिथे आम्ही मित्र बसत असताना आमच्या उजव्या साईडला ती देखील बसलेली होती.


मग आम्ही मोबाईलने गाणे लावले ते गाणे एवढे जबरदस्त म्हणजे अर्थातच प्रेमाचे होते की, ते ऐकताना ती इंप्रेस झाली व एक गोड हास्य देऊ लागली. खूप बरं वाटलं की गाणे लावण्याचा खूप फायदा झाला होता. मग शनिवारी 30 मे या दिवशी तालुक्याच्या गावी कार्यक्रम असल्याने मला जावं लागत होतं. माझ्या गावातील मित्रसुद्धा येत होता मला नेण्यासाठी. पण कसल्या कुठं माझं मन जाण्यास नकार देत होतं. कारण त्यावेळी तिला सोडून कुठे जाण्यास माझं मन लागत नव्हतं. पण शेवटी मित्राला शब्द दिल्याकारणाने व तो कार्यक्रम खूप महत्त्वाचा असल्याने जाण्यास निर्णय घेतला.


अर्थातच तो कार्यक्रम म्हणजे व्यक्तिमत्व विकास या कार्यक्रमाचे शिबिर होते. तसेच हे शिबिर 24 तासांचं होतं. एक दिवसाचा प्रश्न होता. पण शेवटी मित्रांसोबत संध्याकाळी पाच वाजता निघालो. जाताना मी तिला काही सांगितले नसल्याकारणाने कुतूहलाने बघत होती. 20 किलोमीटर अंतर होते, मळगाव ते तालुक्याच्या गावी जाणयास. निघालो. शेवटी तिने माझ्या भावाकडून माझी चौकशी केली होती. त्याच वर्षी मी दहावीची बोर्डाची परीक्षा दिली होती. मग दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी घरी पोहोचलो. पाच वाजत होते. मी सर्वत्र तिचा शोध घेतला. ती नाही दिसली.


नंतर माझा मित्र देवेशला विचारलं, ती कुठं गेली असेल का रे... एक प्रकारे मी हे विचारत असताना माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मग तो सांगू लागला, अजून नाही रे नाही गेली. ते ऐकून मनाला बरं वाटलं होतं. संध्याकाळी बघितल्यावर आम्हाला खूप चांगलं वाटलं होतं. हळूहळू मला समजायला लागलं की, ती सुद्धा माझ्यावर प्रेम करत होती. आमच्या गावात एक भल्ला मोठा आड होता. तिथे संध्याकाळी पाणी भरायला बरीच गर्दी जमायची. असंच पाणी भरता भरता तिला पाहून मीसुद्धा पाणी भरायला निघालो. मला पाहून ती जाम खुश झाली. माझ्याशी बिनधास्त बोलू लागली, हसू लागली. काही तिच्याबद्दल गोष्टी शेअर करू लागली.


असंच तिने मला सांगितलं की गावातली काही मुलं मला त्रास देतात. ते ऐकून मला त्यांच्यावर खूप राग आला. त्यांच्याशी भांडण्यासाठी निघालो असताना तिने मला अडवले. ती म्हणाली, जाऊ दे उगाच कशाला त्यांच्या तोंडी लागतो. ही बातमी घरापर्यंत जाऊ शकते व मी स्वतःला आवरलं व ती मला म्हणाली, मी उद्या जाणार आहे मावशीच्या घरी. मी लगेच तिला विचारलं, परत केव्हा येशील. ती म्हणाली थोड्या दिवसानंतर परत येणार आहे.


मग दुसऱ्या दिवशी निघून गेली. मन अस्वस्थ वाटत होते. करमत नव्हतं. काय करावं सूचत नव्हते. मनात विचार केला की ती आता आल्यावर आपल्या मनातलं सगळं काही तिला सांगूया. माझा मित्रसुद्धा त्याच्या गावी निघून गेला होता. तो मला सतत सांगत होता की, प्रपोज वगैरे मारून टाक. पण हिंमत होत नव्हती. काही दिवसानंतर वापस आली व तिला पुढच्या दिवशी तिच्या स्वतःच्या गावी कायमचे जावे लागणार होते. पण ती आजच्या दिवशी आमच्या गावात शेवटचा मुक्काम करत होती.


तिच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी स्पष्ट प्रेम दिसत होते पण काही कारणास्तव मी माझ्या मनातलं सांगू शकलो नाही. मी तिच्याशी बोललोसुद्धा नव्हतो. ती रागाच्या भरात तिच्या गावी निघून गेली. मी माझ्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट हरवून बसलो होतो. असे मला ती निघून गेल्यावर समजत होतं. ती गेल्यावर आता अजिबात करमत नव्हतं. 24 तास तिचाच विचार चालू असायचा. मग काही दिवसानंतर समजलं की तिचं लग्न ठरलं होतं. खूप वाईट वाटत होतं. पण मी आता काहीच करू शकत नव्हतो. मग एक दिवशी तिला कॉल केला व मी म्हणालो ओळखलं की नाही तिकडून एक सौम्य प्रेम भाषेत उत्तर आले की तू जरी मला विसरलास तरी पण मी तुला विसरू शकत नाही. हे ऐकून मी सुन्न होऊन गेलो. ती आली होती आणि आयुष्यातून निघून गेली...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama