Gautam Jagtap

Abstract Inspirational

3.5  

Gautam Jagtap

Abstract Inspirational

महिला तिथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

महिला तिथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

2 mins
141


प्रत्येक दुर्बल महिला सक्षम होणार, विस्कळीत जीवनाला सावरून पुन्हा आपल्या जीवनाचा सुखाचा शुभारंभ करणार... अनेक दुर्गम भागातील महिलांची ओढातान बघुन आपल्या डोळ्यासमोर एक असाह्य चित्र दिसते.वाईट परिस्थितीने माजलेला अंधकार त्या महिलांना असाह्य करून सोडतो प्रत्येक दुर्बल महिला आपलं फाटकं नशिब घेऊन जन्माला आलेली नसते. तिचीही एक आशा,उमेद असते ज्यात ती आपल्या स्वप्नांना उजाळा देण्यास सतत झटत असते.अठरा विश्व दारिंद्र्यात जरी मुलीने जन्म घेतला तरी ती एक भाग्याची पणती आहे अठारा विश्व दारिंद्र्यातील माजलेल्या काळ्याभोर अंधाराला ती दिपज्वलीत करून सोडते प्रत्येक मुली भाग्याचा कल आहे.त्या दुर्भाग्याला ही हसत मुखाने मान्य करतात. असाह्य जीवन काय असतं? ह्या प्रश्नाचं उत्तर हर एक दुर्गम भागातील महिलांकडे असतं जे दैनंदिन जीवनात त्या महिला अनुभवत असतात. उपभोगत असतात


प्रत्येक महिला जाणते आपलं आयुष्य सुखकर व्हाव पण ह्या दु:ख दारिंद्र्यातून आपण कसे मुक्त होऊ शकतो,भविष्यात आपली प्रगती होईल का? असे अनेक भवितव्याचे प्रश्न महिलांच्या आशादायी स्वप्नाशी भिरक्या घेत रहातात. हर एक दुर्गम भागातील दुर्बल महिला सक्षम झाल्या पाहिजे स्वत:च्या पायावर उभे राहुन कार्य प्रगती केली पाहिजे ह्या साठी महिलांना त्यांच्या कार्यानुसार हवं ते गरजे नुसार पाठबळ मिळावे. ह्या हेतूने डोनेट एड सोसायटीला मी सुचवलेल्या नावीन्य असा उपक्रम *"महिला तिथे सक्षम प्रगतिच्या पाऊल खुणा''* हा उपक्रम राबविण्याची एक दिशा दर्शक सज्ञा मांडली जेणेकरून दुर्गम भागातील महिला असो किंवा इतर गरजु महिला जे वाईट परिस्थितीने पुर्णपणे जखडल्या आहेत.त्यांना आपल्या कार्यातून सक्षमरित्या प्रगतिपथा पर्यंत कसं पोहचवायचं हा हेतू लक्षात घेऊन महिला सक्षमीकरणासाठी हा उपक्रम म्हणजेचं, महिला तिथे सक्षम प्रगतिच्या पाऊल खुणा, आजच्या परिस्थितीला विचारात घेता खरोखर काही महिलांची स्थिती परिस्थिती खूप दयनीय व असाह्य आहे. जे नित्य दु:खात लोळण घेत आहे.त्यांच्या दुर्बल आयुष्याला कोणीतरी साथ द्यावं,दुर्बल वाईट परिस्थितीवर मात करत त्या महिलांचा दृढ विश्वास कसा जागृत करता येईल. त्यांच्यातला उत्साह आनंद आपणास बघायचा आहे. या दृष्टिकोनातून माझी संकल्पना खरोखर आज अनेक दुर्बल महिलांसाठी सक्षम प्रगतिच्या मार्गावर तत्पर करेल.


महिलांमध्ये जेव्हा कार्यकौशलतेचा सुसंवाद वाढेल तेव्हा महिला प्रगतिपथावर स्वार होण्यास आरंभ होईल. दयनीय अवस्था बदलावी आणि सुखाने जीवन जगावे असे प्रत्येक महिलेला वाटतं पण सुखाची भ्रांती कशामुळे तयार होते हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजची महिला सुखाने आणि समाधानाने नांदावी म्हणून महिला तिथे सक्षम प्रगतिच्या पाऊल खुणा जपत जाणे गरजेचे आहे.       


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract