रेशीमगाठी
रेशीमगाठी
शिरगाव, चैतन्य बंगलो...
सर्व वातावरण अतिशय प्रसन्न होते. पाहुण्यांची वर्दळ सुरु होती. राजेशरावांच्या मुलीच लग्न होत. सगळे खूप खुश होते. कारण त्यांच्या बालमित्र च्या मुला सोबत म्हणजेच रजत सोबत रागिणी च लग्न जमलं होत. सगळ सुरळीत चालू होते.' रागिणी' एक इनोसंट मुलगी. खेड्यातील पण शिकलेली.
तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला. लहानपणासूनच तो आवडायचा तिला... मुंबई मध्ये एका मल्टी नॅशनल कंपनी मध्ये चांगल्या पोस्ट वर जॉब ला होता. रजत अतिशय सालस मुलगा. वडिलांच्या कधीही शब्दाबाहेर नाही. तो १२ वर्षाचा असतांनाच आई देवाघरी गेली. त्यामुळे खूप लवकर समजदार आणि स्वावलंबी झालेला. पण वडिलांना खूप घबरायचा. त्यामुळे तो मुंबईत असतानाच त्याच लग्न परस्पर ठरवल.
रागिणी मॉडर्न असली तरीही तिच्यात तो पारंपरिक टच होता. तिला सलवार कमीज, साडी, घागरा.. असे ड्रेसेस प्रेफर करत. आणि आज तर तिने छान आंबा कलर ची नव्वारी नेसलेली. त्यावर मरून कलर चा शेला. अतिशय सुरेख मेक अप केलेला. तिचा तो ब्रायडल लूक खुलून दिसत होता. खूपच आनंदी होती रागिणी. सोबत तिच्या मैत्रिणी अन् एकुलती एक बहिण '. दोघीही बहिणी वडिलांचं काळीज होत्या.मंगलाष्टक झाले. सतजन्माच्या साथीचे पवित्र फेरे झाले. जेवणाची अंगतपंगत झाली. सगळेच खूप खुश होते. विहिनीचे खेळ... करवल्यांची मजाक मस्ती. छान पार पडले सगळे.
रागिणी ची पाठवणी झाली त्यावेळी रजत आणि त्याचे बाबा देखील हळवे झालेले. पण रजतचे बाबा सुनेच्या आगमनाने खूप खुश होते. आता त्यांना त्याच्या मुलाच्या भविष्याची काळजी राहिली नव्हती. कारण त्यांच्या मुलापेक्षा रागिणी वर त्यांचं विशेष प्रेम होत. आणि विश्वास देखील. मुंबई मध्ये त्यांना घर घेऊन दिले. तोपर्यंत रागिणी आईबाबा सोबत माहेरवाशीण म्हणून होती.
रजत ने ऑफिस जॉईन केले होते. बाबांनी त्याला रागिनीला बाहेर फिरायला. घेऊन जायला सांगितलं. परंतु ऑफिस च कारण सांगून त्याने ते टाळलं. आणि रागिणी ने मुंबईला यायची तयारी केली.
आईची सकाळ पासून धावपळ सुरू होती. बाबा भावूक झालेले की रागिणी यापूर्वी कधीही मुंबईला गेलेली नव्हती. त्यामुळे जरा काळजीत होते. निघण्याची वेळ झाली. सगळे तालुक्याच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन वर आले. रागिणी च्य अश्रूंना वाट सापडली आईचा चेहरा बघून. आणि मिलू पण रडू लागली.
बाबांची तर अवस्था अशी होती की पाणी डोळ्यांतून काढू शकत नव्हते आणि कंट्रोल पण करू शकत नव्हते. पण रागिणीचा सासऱ्यांचा आधार होता. तेही अर्थातच हळवे झालेले की त्यांना आता एकटच राहावं लागणार. पण त्यांना आनंद हा होता की त्यांच्या मुलाचा संसार मार्गी लागला होता. आणि ते राजेश रावांच सांत्वन करत होते. आणि ट्रेन प्लॅटफॉर्म वर आली. त्यांनी घाई केली की सगळ्या बॅग्स मध्ये घेऊन जाऊ लागले.
मिलु अजूनच गळ्यात पडून रडू लागली. आणि रागिणी ट्रेन मध्ये बसली सगळे डोळ्यात पाणी घेऊन बाय करत होते .. ती बसताना तिला माहित नव्हतं की पुढे काय वाढून ठेवलंय... ती खुश पण होती आणि सगळ्यापासून दूर जातेय त्यामुळे दुखी पण. पण तिला अस वाटत होत की हे सुखद दुःख आहे. आणि ती तर रोजच कॉल मेसेज करणार होतीच तसाही.
सुखी जीवनाची स्वप्न घेऊन स्वप्न नगरी ला निघाली होती. खिडकी तून बाहेर बघत सुखी संसाराच स्वप्न पाहत निघाली. तासाभरातच तीच स्टेशन येणार होते. रजत तिला घ्यायला स्टेशन ला येणार होता. आणि ट्रेन प्लॅटफॉर्म ६ नंबर ला आली.
रजत तिच्या बॅग्स घेऊन पुढे चालू लागला न तीही मागे मागे. जरा लाजत होती ती.
"अहो मी घेते ना, द्या" रागिणी लाजतच म्हणाली.
"असू दे मी पकडतो,गर्दी खुप आहे. तुला चालायला जमणार नाही. " रजत म्हणाला.
तिला खूप छान वाटत इतकं काळजी घेतात बघून.
ती पुन्हा तिच्या स्वप्नात रमली. आणि घर आल सुद्धा. इतकी मोठी मोठी बिल्डिंग बघून तिला खूप भारी वाटलं. ५ व्या मजल्यावर फ्लॅट होता. लिफ्ट ने वरती गेले. घर देखील खूप सुशोभित. आणि हे सगळं पहिल्यांदा प्रत्यक्षात बघत होती त्यामुळे खूप एक्साईट झालेली पण मूळचा शांत न सालस स्वभावामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद झलकत होता. रजत ने तिच्यासाठी पाणी आणलं.
" अहो मी करते ना. राहू द्या. तुम्ही घ्या पाणी थकले असाल ना. मी पाणी पण घेते आणि काहीतरी बनवते नाश्ता, किचन कुठंय? ," रागिणी.
रजत किचन च्या दिशेने बोट दाखवतो. आणि ती किचन च्या दिशेने जायला निघते.
" थांब रागिणी, मला तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचय." रजत चाचरत म्हणाला.
ती थांबते. सोफ्याकडे बोट करून तो म्हणाला. " बस तिथे"
ती ही निमूट बसते.
रजत ही समोर बसला आणि बोलू लागला.
" मला माहिती आहे रागिणी की तुज माझ्यावर प्रेम आहे लहानपणासूनच.. बाबा हि सांगता नेहमी. पण माझ तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं."
थोडावेळ कुणीच बोलत नाही.
" माझ माझ्या ऑफिस मधे निकिता सोबत अफेयर आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं होत. पण बाबांची भीती वाटते त्यामुळे तुझ्यासोबत लग्न केलं.तू हवं तर जितके दिवस राहायचं तितके दिवस रहा. नंतर रीतसर डिव्होर्स घेऊ आपण." रजत तिला म्हणाला.
रागिणी रडू लागली. तिच्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला. रजत तिच्यासाठी पाणी आणायला किचन मध्ये जातो तेवढ्यात ती निघून जाते. तिचे तुटके स्वप्न घेऊन. तो येऊन बघतो तर रागिणी हॉल मध्ये नसते. तिला कॉल करतो पण ती रिसिव्ह करत नाही.
ती बिचारी रस्त्यावर भटकत असते आणि ती रस्ता क्रॉस करत असताना चक्कर येऊन पडते एका कॅब समोर... एक सुंदर मुलगी .. मॉडर्न जीन्स वन टॉप .. कर्ली हेअर... फक्त एकच प्रॉब्लेम .. मुलींविषयी खूप प्रेम न मुलांविषयी भयंकर राग,.. स्ट्रेट फॉरवर्ड...
"मृण्मयी"... हरिनीची चाल... नजर... पण जिभेने मात्र टायगर.... बिनधास्त... आणि फायटर.... पार्ट टाईम मध्ये स्पोर्ट्स आणि जीम ट्रेनर असते... मार्शल आर्टचे स्पेशल ट्रेनिंग केलेलं. कारमधून उतरताच... ड्रायव्हर ची चूक नसते तरीही ती ड्रायव्हर सूनावते. आणि रागिणी ला मदत करते.
" उठ, उठ..लागलं का तुला."
"ड्रायव्हर पाणी घेऊन ये जा पटकन आणि कार साइडला पार्क कर." ड्रायव्हर पाणी घेऊन येतो.
रागिणी नॉर्मल होते. आणि हमसून हमसून रडू लागली. मृण्मयी तिला धीर देते.
" काय झालं, कुठे राहतेस, सोडू का तुला घरी? "
पण रागिणी फक्त रडत असते. मग जरा मृण्मयी चा आवाज वाढतो कारण तिला रडणारे लोक आवडत नाहीत.. तिच्यावर जोरात खेक्सते.. न रागिणी शांत होते.
"कुठे राहतेस, चल सोडते तुला घरी." मृण्मयी म्हणाली.
"इथेच जवळच" रागिणी तिला खोटाच पत्ता सांगते. आणि कार मध्ये बसते.
मृण्मयी तिला सोडून तिच्या जीमला निघून जाते. रागिणी च मुंबई मध्ये कुणीच नसतं. आणि रजत कडे तिला जायचं नसतं. आणि घरी जायची हिंमत होत नाही. ती तशीच रस्त्याच्या बाजूला बेंच वर बसते. रात्र होते. विचार करून थकते बिचारी.
रात्री मृण्मयी कॅब ने घरी जात असते. आणि तिला ही तिथेच बसलेली दिसतं. कार थांबवून ती घाईत उतरते आणि रागिणी जवळ येते.
"काय झालं.. घरी सोडलं ना दुपारी. मग आता बाहेर काय करतेय. रात्रीचे सव्वा दहा झालेत. तुला माहित नाही का इतक्या रात्री सेफ नसतं. त्यात तू अशी रडू बाई. काहीही विचारलं तरी रडतच असते. इतकं पाणी कुठून आंतेस ग...! आता इमांदरीत मला सगळं खरं खरं सांगायचं."
आता मात्र रागिणी घाबरते आणि मृण्मयी ल सगळं खरं सांगून देते. मृण्मयी ठरवते की आता हिला आपल्या घरी घेऊन जावं लागेल.
"उचल बॅग न बस कार मध्ये.." मृण्मयी तिची दुसरी बॅग उचलून डिकीत ठेवते. आणि घरी जायला निघतात.
क्रमशः
