STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

4  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

पुन्हा किणकिणल्या बांगड्या

पुन्हा किणकिणल्या बांगड्या

4 mins
365

              अचलपूर, चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाच्या पायथ्याशी असलेले हे छोटे तालुकावजा शहर. जुने आणि नवे यांचा अनोखा संगम या गावात पाहायला मिळायचा. हिंदू आणि मुस्लिम अशी दोन्ही धर्माची लोकं अतिशय सौहार्दाने इथे राहायची.


सगळीकडे कालबाह्य झालेला टांगा नव्वद च्या दशकातही इथे ऑटो च्या बरोबरीने चालायचा. इथली अजून एक खासियत म्हणजे इथली कासार आळी किंवा कासार पुरा.हे म्हणजे इथले वैशिष्टय च जणू!सुंदर रंगीबेरंगी काचेच्या बंगड्यांसोबतच अगदी माप घेऊन हव्या त्या डिझाईन च्या लाखेच्या बांगड्या सुद्धा बनवून देणे हे ही इथले एक खास वैशिष्टय च!


            अशा या कासारपुरा मधे इस्माईल शेख नामक एक बांगड्यांचे व्यावसायिक होते. कासारपुरतील इतर सगळ्यांप्रमाणेच त्यांचा सुद्धा काचेच्या आणि लाखेच्या बांगड्यांचा व्यवसाय होता. इतरांपेक्षा त्यांच्या हातच्या बांगड्यांची बनावट अतिशय सुबक असल्याने अंत्यंत दूरवर त्यांच्या बांगड्यांची ख्याती होती.


            इस्माईल भाई त्यांची पत्नी मुमताज मुलगा असलम आणि मुलगी अस्मा असे हे चौकोनी कुटुंब. दोघेही नवराबायको नेकिने राबून धंद्यात यश मिळवत होते.मुलं शाळेत शिकायची. इस्माईल चे शिक्षणात फारसे लक्ष नव्हतेच त्यामुळे पुरेसे शिक्षण झाले की त्याला धंद्यात घालायचा विचार इस्माईल भाई करत होते. मुलगी अस्मा मात्र मन लावून अभ्यास करणारी आणि जात्याच हुशार.


             त्याच शहरात सवाई पुऱ्यात इंगळे गुरुजी राहायचे. तिथल्याच एका ख्यातनाम शाळेत ते प्राचार्य होते. इंगळे गुरुजी अतिशय सज्जन अन् पापभिरू वृत्तीचे. आशाताई या त्यांच्या पत्नी आणि दीपाली आणि प्रणाली या दोघी मुली.दोघीही मुली अत्यंत हुशार.दोघींचाही वर्गात नेहमीच प्रथम क्रमांक ठरलेलाच! मोठी दीपाली आणि लहान प्रणाली अत्यंत समंजस आणि सालस इंगळे सरांच्या शिस्तीमध्ये वाढलेल्या.


             योगायोगाने प्रणाली आणि अस्मा एकाच वर्गात होत्या. लहानपणापासून च दोघींचीही घनिष्ठ मैत्री.प्रणालीच्या ओढीने अस्मा सुद्धा अभ्यास करायचीअन् वर्गात अगदी तिच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असायची.


           मैत्रीच्या नात्याने दोघींचे ही एकमेकींकडे जाणे येणे होतेच. त्यातच अस्मा ची हुशारी बघून इंगळे सर प्रणाली सोबतच अस्माला सुद्धा घरी शिकवायचे.प्रणालीला अस्माच्या घरच्या रंगीबेरंगी बांगड्या खूपच आवडायच्या.त्यामुळे ती अस्मा च्या अम्मी अन् अब्बू सोबत खूप गप्पा मारत बसायची.अशा सगळ्या गोष्टींमुळे दोन्ही कुटुंबा मधे आपुलकीचे आणि सौहार्दाचे वातावरण होते. पुढे पुढे भाऊ नसल्याने अस्मा असलम भैय्या ला राखी सुद्धा बांधू लागली.राखीचे गिफ्ट म्हणून तिला तिच्या आवडीच्या बांगड्या मिळायच्या अन् ती फार आवडीने घालायची.


          दिवस पुढे जात गेले दोंघिंमधले मैत्रीचे बंध ही घट्ट होत गेले.दोन्ही कुटुंबातला जिव्हाळा वाढत गेला. बारावी नंतर असलम याच व्यवसायात लक्ष घालू लागला. अस्मा हुशार असल्याने इंगळे सरांनी मागे लागून तिला बारावी नंतर निदान DEd करून घ्यायला लावले .इकडे दीपाली आणि प्रणाली दोघीही शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षित होऊन इंजिनिअर बनल्या. अस्मा चे लग्न झाले.चांगल्या कुटुंबात गेल्याने घरच्या लोकांनी नोकरी करायची परवानगी दिली अन् ती शिक्षिका बनली.


            दीपाली पुण्यात अन् प्रणाली मुंबईत नोकरी ला लागली.पुढे दोघींचीही लग्न झाली. दोघींनाही त्याचं ठिकाणचे वरही मिळाले अन् दोघीही तिथेच स्थायिक सुद्धा झाल्या. आणि दोघींच्या ही लग्नाचा चुडा मात्र इस्माईल चाचानी च भरला बरं का!


           सगळेच नंतर आपापल्या व्यापात इतके गुंतले की खूप दिवसात त्यांची भेटच झाली नाही.कधीतरी मधात अस्मा शी प्रणाली चे बोलणे व्हायचे. बाकी आई कडूनच प्रणालीला चाचा चाची ची खबरबात मिळायची. असलम भैय्या चे सुद्धा लग्न झाल्याचे तिने संगितले.तसेच चुडी च्या धंद्याची काळानुरूप मागणी घटल्याने त्यांनी सोबतच नवीन उद्योग सुरू केल्याचेही आई ने सांगितले. एक मात्र होते प्रत्येक राखीला प्रणाली असलम भैय्या ला न चुकता राखी पाठवत होती.कित्येक वर्षात दोघीही बहिणी गावाला गेल्या नव्हत्या. अधामधात आई बाबांना मात्र त्या बोलवून घेत.



            यावेळी मात्र लॉक डाऊन आणि वर्क फ्रॉम होम चे निमित्त साधून दोघीही बहिणींनी चक्क आपल्या माहेरची वाट धरली.मौका साधून दोघी बहिणी त्यांचे कुटुंब ,मुलं सगळे अचलपूर ला आले. घर भरल्या गोकुळा सारखे भासू लागले. त्याचं काळात अस्मा सुद्धा माहेरी आल्याचे कळले.वापस जायच्या एक दिवस आधी सर्व सुरक्षितता पाळून एक दिवस प्रणाली असलम च्या घरी गेली. तिला इतक्या वर्षांनंतर बघून सगळ्यांना खूपच आनंद झाला पण हे काय? प्रणाली च्या हातात फक्त एक कडेच! हो ना नोकरीच्या व्यापात बांगड्या ना तिलांजली च दिलेली.

निघतांना असलम च्या पत्नीने प्रणालीला मधे एक लाखाचे सुंदर कडे अन् अतिशय सुंदर सुबक बांगड्यांचा चुडा बळेच भरून दिला.अन् सोबत कित्येक वर्षांच्या राहिलेल्या गिफ्ट च्या बांगड्यांचे पुडके. प्रणाली ला ते प्रेम बघून खूप भरून आले. मैत्रिणी साठी सुद्धा तीने खूप बांगड्या खरेदी केल्या अन् एकमेकींच्या गळ्यात पडत अस्मा आणि तिने साश्रू नेत्रांनी एकमेकिंचा

.निरोप घेतला.


           घरी आल्यावरही प्रणाली त्या हातभर बांगड्याना निरखून खूप खुश होत होती. त्यांची गोड किणकिण पुन्हा अनुभवत होती.पण त्यांच्या ममा ला अशी न पाहिलेली मुलं" ममा काढ ग ते,it's so irritating!" म्हणून ओरडत होती.

" तुम्ही कितीही ओरडलात तरी हा चुडा मी काही काढणार नाही.कारण यातला मैत्रीचा धागा यातलं भाईजान चे बहीण म्हणून असलेले प्रेम सगळे सगळे आहे त्या चुड्यामध्ये " ती निक्षून त्यांना सांगत होती अन् त्याची मधुर किणकिण अनुभवत होती.


          दुसऱ्या दिवशी आपापल्या जागी परतली सारी. अन् मग ऑफिस !तिच्या बांगड्यांची किणकिण सगळ्या केबिन भर भरली होती. न राहवून सख्या बघायला आल्याच...

स्त्रीसुलभ सगळ्याच ..!

"कसला ग भारी चुडा अन् काय ती किणकिण.मस्त ग!" त्यातली एक म्हणाली च.

अन् अगदी surprise द्यावं तसं तिनं त्यांच्या साठीचे गिफ्ट त्यांना दिले.सगळ्यांनी अगदी आवडीने हातात चढवले अन् पुन्हा त्या बागड्यांची अद्भुत किणकिण सगळी कडे गुंजत राहिली....

अगदी भारावल्यागत.....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics