परिवर्तन हवे
परिवर्तन हवे
मानवतेपेक्षा कोणत्याही धर्म मोठा नाही, 'माणूस' हीच जात नी 'मानवता 'हाच धर्म हेच आपले ब्रिद असायला हवे.परंतु समाजात जे काही पहायला मिळतं ते उलट आहे.प्रश्न आहे ज्यासाठी महामानवानी आपले सर्व आयुष्य वेचले त्या सामाजिक परिवर्तनाचा नी प्रगतीचा म्हणून मी स्पष्टपणे म्हणतो.आपण या जात,पात, धर्म, भेदभावाला मुठमाती देवून उदात्ततेचा विचार स्विकारला पाहिजे.मातंग समाजाच्या बाबतीत ह्या दशकात जे घडत आहे ते सारं विचीत्रच.म्हणून मी म्हणतो...
धर्मांतराचा मुद्दा घेऊन मातंग समाजाची दिशाभूल करणारे सर्व ते कोणी विचारवंत नाहीत तर तो केवळ त्यांचा स्वार्थ नी स्वार्थच होय....
ही या दलालांची शुद्ध दलाली होय...
आज जे लोक धर्म नी धर्मांतरावर बोलत आहेत तो केवळ मातंग समाजाची दिशाभूल करण्याचा कुटील डाव आहे, शुध्द दलाली होय, एक कुटनिती आहे...
या दलालांना ना धर्म कळतो ना धर्मांतर.. हे सर्व दलाल आहेत यांना ओळखले पाहिजे.. आपण आपला समाज या दलालांपासून वाचवला पाहिजे, टिकवला पाहिजे.. आपणाला धर्मांतराच्या खाईत घालणारे हरामखोर कसाई हे काही कोणी, येशू ख्रिस्त, गुरू नानक, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, बाबासाहेब नाहीत...
मातंग समाजाच्या धर्मांतराची कुटनीती आखणारे बेईमान, दलाल,कसाई जे कोणी आहेत त्यांनी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगती, परीवर्तन, समाजाच्या न्याय, हक्कासाठी, उद्योजकता, तरुणांसाठी, शिक्षणासाठी, अन्याय निवारण करण्यासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी काय केले आहे? ते त्यांनी दाखवून दिले पाहिजे.आजही अस्पृश्यतेच्या आधारावर मातंग समाजावर दररोजच घोर अन्याय होताना दिसून येतो.जो अतिशय लाजीरवाणी व दखलपात्र आहे परंतु इतर समाजाकडून या बद्दल कधीच न्याय झालेला दिसत नाही..
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी आपले योगदान काय आहे ते त्यांनी दाखवून द्यायचे.. मातंग समाज संघटित करून,तो टिकला पाहिजे, त्यांच्या अस्तित्वाचा मार्ग काय या साठी तुम्ही काय प्रयत्न केले?
मातंग समाजाच्या अस्तित्वाची जाणीव असणाऱ्यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी , संघटना साठी, शैक्षणिक, औद्योगिक,अशी कोणती भूमिका, कामगिरी केली किंवा योजना आखली ते सांगावे..
संबंध ना धर्माचा.ना जातीचा मोठा प्रश्न आहे तो सामाजिक उन्नती, प्रगती, परिवर्तनाचा.शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,हाच मुलमंत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास दिला आहे..
धर्मांतरावर बोलणाऱ्या नी मागील विस वर्षात ज्यांनी धर्मांतर केले, करून घेतले त्यांना कुठे वाऱ्यावर सोडून दिले? त्यांचे अस्तित्वच उरले नाही हे का ते सांगावे...
अस्तित्वासाठी धर्मांतर नाही.. धर्मांतरावर बोलणारे कोणी हे धर्म संस्थापक नव्हेत...ही दलाली, कुटील डाव ओळखून वेळीच सावध होणे हेच शहाणपणाचे, अस्तित्वाचे पाऊल आहे..
धर्मांतर हा डाव आहे अस्तित्व संपविण्याचा.. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धर्मांतराचा पुळका असणाऱ्यांना आपल्या अस्तित्वासाठी आपल्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, गरीबी, बेकारी, निर्मूलनासाठी, उद्योग, नौकरी, शिक्षणासाठी मदत मागा...
मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी त्याग,नी योगदान हवे धर्मांतर नको...
धर्मांतर केले ते ना घर का ना घाट का.. अनेक मातंग बांधवांना भुलथापा,लालाच दाखवून त्यांचे धर्मांतर घडवून आणलेली कितीतरी उदाहरणे असून, त्यांच्या रोटी बेटीचा फार मोठा प्रश्न समाजापुढे असून ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊन रस्त्यावर उतरले आहेत.हे धर्मांतर म्हणजे परिवर्तन नव्हे.धर्म आणि अधर्म हेच लोकांना कळत नाही.जो धर्म इतर धर्मीयांचा आदर करतो तोच खरा धर्म.मुळात धर्माचे आचरण इथे होतच नाही.
धर्मांतर केले त्यांचे अस्तित्वच चिंतेचा विषय बनला आहे... अगोदर त्यांना न्याय देऊन त्यांचे अस्तित्व निर्माण करावे...
मातंगांचे अस्तित्व टिकवण्यासाठी धर्म, धर्मांतराची गरजच नाही..
नियोजन, संघटन, शिक्षण,नी उपाययोजना हवी..गरज आहे ती सामाजिक परिवर्तनाची, प्रगती नी परिवर्तनाची .
जाती,धर्म हे विचार डोक्यातून काढून टाका...स्वताचा नी समाजाचा खरा विकास व्हावा हे महत्त्वाचे... समाजाच्या भल्यासाठी जरुर योगदान दया...संघटन, प्रबोधन, लढा,चालू ठेवा...अन्याय होता कामा नये..
उच्च शिक्षण, नोकरी,प्रगती आवश्यक आहे...धर्म डोक्यातून पूर्ण पणे काढून टाकून फक्त नी फक्त विकास,प्रगती , परीवर्तन, हक्क,न्याय, संघटन नी लढा..
यासाठी महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करावा...
लोक तुमचे गुणगान गातील...आदर सत्कार करतील तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील एवढं महान कर्तृत्व करून मोठे व्हा...
धर्म नी धर्मांतराचे विष डोक्यातून काढून टाका...ते समाजामध्ये पेरू नका...बुध्दीभ्रष्ट बनुन समाजाला दिशाभूल करू नका...
आंबेडकर ह्रदयात हवा,रक्तात, हवा.. त्यासाठी धर्मांतराची आवश्यकता नाही... महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करा...धर्मांध बनू नका...
अलीकडे धर्मांतर नाही.. धर्मांतराचे नाटकं सुरू झाले आहेत.. धर्मांतर करणारे प्रेरीत होऊन उद्दात भावनेने धर्मांतर करत नाहीत तर समाजाची दिशाभूल करणे... राजकारण,नी स्वताची पोळी भाजणे... फक्त नी फक्त स्वार्थ साधण्यासाठी धर्मांतराचे नाटकं सुरू आहेत...ज्याला धर्म म्हणजे काय ते कळतच नाही ते कोणत्याही धर्माचे असून फायदा नाही...ज्याला कर्तृत्व नी जबाबदारी कळत नाही.. त्यांनी धर्माबद्दल अजीबात बोलू नये..
धर्मांतर कुणासाठी करताय ?? स्वतासाठी की समाजासाठी ...? धर्मांतराची गरचच काय ??
बाबासाहेब बाबासाहेब च होते... बाबासाहेब कोणी बनू शकत नाही... धर्मांतर करून कोणी बाबासाहेब बनू शकत नाही...
बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केले ती एक क्रांती होय, परीवर्तन होय..
आजचं धर्मांतर त्या धर्मांतराचा भाग नाही . ही बुद्धी प्रगल्भता नाही... ही बुद्धी भ्रष्टता आहे..सोंग,ढोंग , नाटकं सुरू आहेत.. शुद्ध दिशाभूल,ठेकेदारी, धंदा नी फक्त नी फक्त स्वार्थ आहे..
आपणास जात, धर्म धरुन बसायचे नाही...
विचार अंगीकार करा..प्रगती, परीवर्तन, विकासाची कास धरा.. शिक्षण, नोकरी, संघटन नी परीवर्तन हवं... कर्तृत्व जाणा..धर्मांध बनू नका.. दिशाभूल करू नका.. सदसद्विवेकबुद्धी हवी..
परीवर्तन हवं...
" धर्मांतर नको, परीवर्तन हवे
कर्तृत्वाने आपल्या, समाजाला पुढे न्यावे."
" जात, धर्म सोडा, कर्तृत्व जाणा
मानवता श्रेष्ठ, माणूस आधी बना
"
अंधार व्हावा दूर, उध्दार दिनाचा व्हावा,
विकास प्रगतीचा ध्यास नित्य हवा..
समाजासाठी कुणा आले जरी मरण
समाजॠण ते मोठे,व्हावे त्यांचे स्मरण.
ज्ञानवंत, गुणवंत,कीर्तीवंत व्हा
आदर्श ठेवा महान, यशवंत व्हा..
