जगणे सोपे आहे...
जगणे सोपे आहे...
मरण सोपं नाही ,जगण्यापेक्षा,
वाटेल ते, काहीही करून जगता येतं
आंधळे, खुळे, पांगळे, महारोगी, वृध्द
जगतात सारेच सुख दुःखाचा विचार न करता...
भीक मागून, रस्त्यावर ही जगतात कित्येक
काहीही करून जगता येतं,
धुनी भांडी,मजूरी, भंगार जमा करून ही जगतात च ना.
काहीही करा,पोट भरा, संसार फुलवा.
मुलं,बाळं, कुटूंबाचा विचार करा,
दिवस राहत नसतात, कष्टाने जीवन फुलवता येतं.
दुःख, अपयशावर मात करता येते
आपलं समजून माणुसकी जपणारे, मदतीचा हात देणारे ही खूप आहेत.
धडपड ही करावीच लागते माणसाला.
माणूस उद्योगी हवा आळशी, ऐतखाऊ नसावा..
कष्टाने मरत नाही कोणीच.
कष्ट च माणसाला माणूस बनवतात .
कष्टाने च होतं सोनं जीवनाचं.
नव्या उमेदीने जगता येतं
दुःखाची पर्वा न करता.
स्वतःवर विश्वास ठेवून...
.
जन्म पुन्हा मिळणार नाही
जगणं मुळीच कठीण नाही
जगणाऱ्यास जगवणारेही खूप आहेत .जिवापेक्षा मोठं दुःख नसतं, संकट, दुःख येतात नी जातात, सर्वच संकटांना तोंड द्यावे लागते, दुःखावर मात करणं हिच आपली परीक्षा असते.माणूस तोच जो न डगमगता, हार न मानता वेळीच सावरतो..
मरण हा कुठल्याही समस्येला पर्याय नाही, हतबल होऊन, जीवन संपविण्यापेक्षा तुमचा आदर्श तुम्ही निर्माण करु शकता, सुख तुमच्या पायावर लोटांगण घालील.
कुठलं ही ऐसंकट, दुःख राहण्यासाठी येत नसतं.ते तुमची परीक्षा असते,तुमचा कस लागतो,मरण नैसर्गिक आहे ते यावं लागतं.चुकणार नाही, त्यावरही मात करता येतं,
स्वतः होऊन त्याला कवटाळू नका.जगा खुशाल जगा.. जगणं सोपं...सोपच आहे..
मरण नाही.. जन्म जगण्यासाठी आहे.. मरण्यासाठी नाही.. माणसानं जगलच पाहिजे.. जगणारा दुसऱ्याला जगवतो...तो आदर्श असतो..
जीवनाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या ला माणूस तरी कसं म्हणावं..
आत्महत्या करणाऱ्या ला मरताना जीवंतपणी च नरक यातना होतात..
त्यावेळी तो मरण नको म्हणून जगण्याचा धावा करतो पण वेळ निघून गेलेली असते.. जगणे सोपे आहे. खुशाल जगा.. काहीही न करता सुध्दा जगता येतं..
मरणापेक्षा जगणं सोपं च आहे... जन्म पुन्हा मिळणार नाही...
