नोबेल मिळायला हवे
नोबेल मिळायला हवे
अण्णा भाऊ साठे म्हणजे जगातील आठवं आश्चर्यच होय...
दिड दिवस शाळा शिकलेले अण्णा भाऊ वाटेगाव ते मुंबई हे अंतर पायी चालत जातात..खाण कामगार,मिल कामगार,बाग कामगार म्हणून पोटाचा नी भाकरीचा प्रश्न सोडवत असताना ,जे डोळ्यांनी पाहिले, अनुभवलं, भोगलं ते लिहिताना ते जगप्रसिद्ध साहित्य रत्न झाले.. अन्याय अत्याचाराला वाचा फोडता फोडता, उपेक्षित,दीन दलितांच्या व्यथा मांडता मांडता त्यांच्या लेखनीला तलवारी ची धार आली . त्यांनी अनिष्टतेवर वार, प्रहार केला.. फकिरा,सतु भोसले सारखे नायक नी महान नायीका जगाला दिल्या.
अण्णा भाऊंच्या लेखणीला तलवारी ची धार असून, त्यांचं साहित्य माणसाला माणूस बनवणारे नी माणूस म्हणून जगणारे आहे... अण्णा भाऊ साठे हे केवळ कथाकार, कादंबरी कार, नाटककार,गीतकार,शाहिर च नव्हे तर तमाशा ला लोक नाट्यात रुपांतरीत करणारे लोककलावंत, प्रबोधन कार, अभिनेता,निर्माता, दिग्दर्शक, ज्यांच्या साहित्यावर चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यांच्या साहित्याचा अनुवाद सत्तावीस पेक्षा जास्त परकीय भाषेत केल्या गेला, अनेक विद्यापीठांत जे साहित्य नुसते अभ्यासले जात नाही तर लोक ज्या साहित्यावर पि.एच.डी.करुन डॉक्टरेट पदवी मिळवतात अशें ते जगविख्यात साहित्यिक होते अण्णा भाऊंनी , कथासंग्रह, नाटकं, प्रवासवर्णन, पोवाडे, गितं, लावण्या,छक्कड... असं प्रचंड लिखाण केले..
साहित्यिक, कामगार नेते ही अण्णा भाऊंची ओळख नसुन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती चळवळ, चलेजाव चळवळ यात सक्रिय सहभाग असलेले ते एक स्वतंत्र सेनानी होते.. त्यामुळे त्यांना तुरुंगवास ही भोगावा लागला..
व्यथा, वेदना मांडणारे अण्णा भाऊ,पायी मुंबई ला जाणारे अण्णा भाऊ चितोड की राणी या विमानातून रशियात गेले तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायन करुन भारतचे नाव उंचावले..कॉंम्रेड अण्णा भाऊ भारताचे मॅग्झीन गॉर्की म्हणून ओळखले जावू लागले..लालबावटा कलापथक स्थापून प्रबोधन व संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोराने उभी केली... फकिरा,सते भोसले हे नायक जगाला देऊन भारताचा नवा इतिहास त्यांनी रचला..
अठराविश्वे दारीद्रये असलेल्या कुटुंबात,जातीत जन्माला आलेल्या अण्णा भाऊंचे केवळ भारतावर नवे तर जगावर अनंत उपकार आहेत.. म्हणून मी म्हणतो.. अण्णा भाऊ साठे म्हणजे जगातील आठवं आश्चर्य असून अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न नव्हे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळायला हवे..
दिड दिवस शाळा शिकलेले अण्णा भाऊ साठे म्हणजे साहित्यविश्र्वात चमत्कार नव्हे अवतार होय...!
जय लहुजी ! जय अण्णा !जय हिंद !
