Prem Gaikwad

Abstract Action

3.5  

Prem Gaikwad

Abstract Action

देव माणूस...

देव माणूस...

3 mins
102


: मेजर म्हणून केलेली सेवा,साहस, हिंमत, धाडस नी, अंगभूत वृत्ती, आदर्श, प्रेरणादायी, कार्य नी तळमळ समाज नी सामाजिकतेची जाण , परिवर्तन हे बोलण्यातून नव्हे आचरणातून दाखवून देणारे आमचे खरे वाघ, नव्हे वाघमारे हे आडनाव सार्थकी लावणारे या नगरीचे भूमिपुत्र, रत्न यादवराव जी वाघमारे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, जन्मदिन नी सेवावृत्तीच्या निमित्ताने आपल्या जन्म भूमीत हा जो अविस्मरणीय आनंद सोहळा त्यांनी आयोजित केला, या सोहळ्याच्या प्रसंगी त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंतःकरणाने आपण उपस्थित झालात हे आजचं परमं भाग्यच म्हणावे लागेल...


वाघमारे साहेबाबद्दल बोलायचं च म्हटलं तर त्यांचं कार्य हिच त्यांची ओळख.. 

माणूस मोठा होतो तो त्यांच्या कार्याने ,म्हणून च आम्हाला ते त्यांच्या परिवर्तनवादी, महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणारे, सामाजिक जाण, तळमळ नी चळवळ जिवंत राहावी समाज पुढे जावा, प्रगती परीवर्तनाची कास धरून शिक्षण, संघटन नी संघर्षातून नवी दिशा मिळावी यासाठी बोलणारे नाही तर कृतिशील विचारवंत म्हणणार नाही पण आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते खरोखरच महान आहेत..

    महापुरुषांच्या विचारांचा नुसता वारसा जपणे हे त्यांना मान्य नाही तर ह्या मागास समाजासाठी खरं कार्य त्यांना अपेक्षित आहे..ती खरी तळमळ त्यांच्या विचार, वागण्या, बोलण्यातून, कार्य नी आचरणातून दिसून येते..

    आपल्या जन्मगावी, जन्मभूमी त हा ठेवलेला कार्यक्रम म्हणजे त्यांची इथल्या माणसासाठी असलेली अंतःकरणातील तळमळ सर्वांबद्दल चं प्रेम होय..

   ते नांदेड ला राहतात, कदाचित मोठ्या राजकारण्यांसारखं एखाद्या मोठ्या हाँटेलमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करून, मित्र, कार्यकर्ते यांचा मोठा मेळावा जमा करता आला असता पण गाव म्हणून गावावरचं एवढं प्रेम तिथं दिसून आले नसते..

   मित्र, समाज, गाव, नातीगोती, यांच्या साठी त्यांचं योगदान नी कार्य निश्चितच कौतुकास्पद नी अभिमानास्पद आहे..

    त्याची प्रेरणा आपण घेऊ, त्यांच्या पाठीशी राहू नी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान, कौतुक करू व या पुढे नव्या जोमाने, सर्वांच्या सहकार्याने त्यांनी आदर्श कामगिरी करावी यासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ची आशिर्वादाची साथ त्यांना लाभो 

त्यांचं कौटुंबिक आयुष्य सुख, संपन्न, उज्ज्वल, निरोगी, प्रेरणादायी असो अशी मी शुभकामना व्यक्त करतो...


शब्दात काय वर्णवू

तुमची महती, किर्ती

जगी मानसन्मान

मिळे आम्हा स्फुर्ती..


जगा वाटावा हेवा

असे तुमचे मोठेपण,

शुद्ध आचार विचार

आम्हा वाटे अभिमान..


अंगीकारुनी तुम्ही

महात्म्याचे विचार,

जगलात खरं 

हे जीवन सारं.


निश्चितच आम्ही

तुमचा आदर्श, प्रेरणा घेऊ,

तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या

आम्ही शुभेच्छा तुम्हाला देवू...


लाख लाख तुम्हा

आम्ही देतो शुभेच्छा,

व्हावे जीवनाचे सोने

हीच आमची इच्छा...


यशवंत,किर्तीवंत

व्हा आदर्श तुम्ही

या सोनियांच्या दिनी

देतो शुभेच्छा आम्ही..

    वेळ आणि काळ आला की प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे , सर्वोतोपरी मदत करणारे स्वतःला आर्थिक झळ बसली तरी तमा न बाळगणारे वाघमारे साहेब हे अनेकांच्या हृदयात आहेत हे च त्यांचं खरं मोठेपण म्हणावं लागेल...

    वसमतला जयंतीच्या निमित्ताने अंधारात रात्री पडत्या पावसात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बॅनर लावायचे होते

  अगदी बसस्थानकाजवळ लोखंडी पोलवर खाली दोघा तिघांना उभं करून त्यांच्या डोक्यावर, खांद्यावर उभे राहून पावसात भिजत बॅनर लावण्याच काम एक पोलिस कर्मचारी करु शकतो यापेक्षा अजून काय मोठेपण सांगावे...

   कुणावर कसलं जरी संकट आले तरी साहेब सांगायचे मी आहे घाबरायचे नाही.. अजून काय हवं... म्हणून मी म्हणतो माणूस मोठा होतो तो गुणाने नी कार्याने.  हा माणूस सर्वच गोष्टींनी मोठा आहे...

मी नेहमी म्हणतो.. साहेबांच शिक्षण कमी म्हणून त्यांना पोलीस नी आर्मीत नोकरी केली... शेवटी देशसेवा नी खरी लोकसेवा च केली... परंतु उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी झाले असते तर यापेक्षा अजून कितीतरी पटीने जास्त त्यांनी समाजसेवा केली असती.   ते त्यांचं स्वप्न त्यांच्या मुलांनी पूर्ण करावं यासाठी आपल्या सर्वांचा आशिर्वाद नी शुभेच्छा आपण त्यांना देऊया...

   मी साहेबांना मित्र , दोस्त, नातेवाईक मानत नाही तर संकटकाळी धावून येणारा खरा मोठा भाऊ मानतो..


संकटकाळी धावून येणारे

जीवाला जीव देणारे ,

असावे आपले कोणी

ओठांवर पहिलं नाव येणारे


यादवराव वाघमारे

हे असं एक नाव आहे,

गरज पडली तर 

हा अनेकांचा देव आहे..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract