मी आनंद देईन
मी आनंद देईन
होय मी आनंद च देईन
मी आनंद देईन...
मला आनंद झाला.. खरं तर स्टोरी मिररने आमची परीक्षाच घेतली..महा परीक्षा..ही परीक्षा होती आमच्या प्रेमाची.. आम्हाला सिद्ध करायचे होते की आमच्या वर किती लोकं प्रेम करतात.. मलाच प्रश्न पडला की लोकांनी प्रेम करावे एवढे आपल्यात आहे तरी काय ?
लोक फक्त नी फक्त राजकारण्यांवर प्रेम करतात..त्याचे बॅनर्स लावतात,हार घालतात,पेढे वाटतात,.. तेवढं प्रेम जन्म दात्या आई-बाबा वर जाऊ द्या सख्या बायको मुलांवर ही कोणी करत नाही..
म्हणून नच की काय स्टोरी मिररने आम्हालाही ओटींग मागायला भाग पाडले.. मला प्रश्नच पडला राजकारणी आश्वासनं देतात, तसं आपण काय द्यायचं...
पण थोडं उशिरा समजलं ओटिंग साठी देणं घेणं चालतं.. आमचं ओटिंग नव्हते..क्लॅपिंग होते.. त्याबद्दल स्टोरी मिररचे मनापासून आभार.. इथं देणं घेण्याचा प्रश्नच नाही.. क्लॅपिंग मध्ये क्लॅपरची खुशी, आनंद असतो.क्लॅपिंग खुशी, आनंदातच असते.. पण खरं सांगू का.. माणसाला देणं माहितच नाही.. इथे जो तो घ्यायलाच बसलाय.. मला प्रत्येक जण म्हणत होता.. क्लॅपिंग केल्यावर आम्हाला काय देणार..? मी त्यांना आता सांगतो बाबांनो सौदा नको.दलाली नको.क्लॅपिंग खुशीत करायची असते... खुशीचा मोबदला नको..तुमची खुशी,तुमचा आनंद हा माझा आनंद असेल.. आनंद देऊन आनंद घ्यावा.. तुम्ही जो आनंद मला दिला त्याच्या बदल्यात आधीकचा आनंद मी तुम्हाला देईन..तुमचा आनंद तो माझा आनंद आणि माझा आनंद तो तुमचा आनंद असला पाहिजे..
आई जन्म देताना मोबदला ठरवत नाही, सौदा करत नाही.तिला केवढा आनंद होतो.जन्म देऊन दुनिया दाखवणाऱ्या आई-वडीलांना आपण किती काय दिले ते ज्याचं त्यालाच ठाऊक... पण तरीही सांगतो .
त्यांना आनंद द्या.. मोबदला नको..
माणूस किती स्वार्थी ? मी तर म्हणतो . माणूस माणूस च असला पाहिजे.. स्वार्थ आला की माणूस संपला.. तुमच्या क्लॅपिंग चा मला आनंद असेल, माझ्याकडे आनंद असेल तरच मी तुम्हाला आनंद देईन..अर्थातच तुम्ही मला आनंद दिलात म्हणजे मी तुम्हाला आनंद च देईन..तो आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा निश्चितच कितीतरी अधीक असेल.. कारण ती आनंदाची उधळण असेल..तो आनंद आम्हाला काय देणार ?असे विचारणाऱ्या साठी निश्चित च नसेल कारण मोबदला देणे घेणे यापेक्षा आनंद देऊ, घेऊ हे च मला मान्य आहे..तेच माझ्या रक्तात आहे..
शेवटी जे क्लॅपिंग मला मिळाले ते तर माझ्यासाठी अनमोल आहे..पण सत्य हे आहे की क्लॅपिंग ही मलाच माझ्या हाताने घ्यायला लावले.. कारण तो त्रासही तुम्ही घेतला नाही.. कारण ते फार अवघड गेलं.. इथे कुणासाठी कोण का म्हणून त्रास घ्यायचा हा ही मोठा प्रश्न च आहे.. तरी पण डाटा गेला,ॲप इन्सटाॅल केलं.. सारं काही अवघड च होतं.. पण एक सांगू का आपल्या माणसांसाठी अवघड काहीच नसतं.. किती दूध पाजलं ह्याचा हिशोब कधीच कोणती आई ठेवत नसते
मला जेवढे क्लॅप मिळाले त्यापेक्षा कितीतरी विनंती, विनवणी मला करावी लागली म्हणून च माझ्या पेक्षा ज्यांनी जास्त क्लॅपिंग ज्यांनी मिळवले त्यांच्या बद्दल नुसता आनंद नाही तर अभिमान मला आहे.त्यांचं अभिनंदन करुन त्यांच्या विजयासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.. एक नाही दोन,दोन क्लॅपिंग माझं त्यांना आहे..ते ही कुणाचा परिचय नसताना. त्यांना सर्वांना शुभेच्छा आहेत..
ज्यांनी क्लॅपिंग केलंय त्याचे नुसते आभार नाही तर ॠणीच आहे... आपण मला खरंच आनंद दिलाय.. आता प्रश्न मोठा आहे मी तुम्हाला काय द्यावं...!!