परीसदारची झुळक
परीसदारची झुळक


गच्चीत खेळत असनारी आभा अचानक जोरात किंचाळली. परसदारावर बसलेली म्हातारी दात करकर वाजवत हाताची बोटं मोडत शिव्यांची लाखोली वाहायला लागली होती. म्हातारीकडे फारसे लक्ष न देता, रमाने गच्चीवरून
केविलवाणी व भितीग्रस्त होऊन गच्चीतून खाली उतरलेल्या आभाला पाहिलं. शून्यात नजर हरवून मटकन खाली बसलेल्या आभाला पाहताना रमाच्या छातीत धस्स झालं. एका अज्ञात भीतीने रमाला घेरलेलं पाहताना जवळच बसलेल्या शंकराच्या काळजाचा ठाव चुकल्यासारखा झाला. शंकरला मात्र पूर्व परस्थितीची जाणीव असावी.. तो हळूच बसल्या जाग्यावरून उठला. तरतर जिना चढून गच्चीवर येत म्हणाला..
"झालं तुझं समाधान! की अजून काही बाकी आहे. तू कुणाचं ऐकायचंच नाही असं ठरवलं असेल तर सांग म्हणजे मी जीव देतो.."
त्याच्या या बोलण्याने कदाचित तिथे वावरत असनाऱ्या अतृप्त आत्म्यावर परिणाम झाल्याचं दिसून आलं.. कारण काही क्षणात तिथलं वातावरण मात्र बऱ्या पैकी निवळलेलं पाहून शंकरने मनोमन सुटकेचा मोकळा श्वास घेतला. परंतु, त्याला माहीत होत हे तिचं नाटक काही वेळापुरतं आहे. पुन्हा कुणी दुपारचं गच्चीत गेलं की हीची हजेरी लागलेली असेल. पुन्हा हीला समजावयाला गच्चीत यावं लागेल. हे एकदाच नाही पण अलीकडे बऱ्याच वेळा घडतंय. यावर तोडगा काही काढावाच लागेल पण काय तोडगा काढायचा विचार करून शंकरला पुरतं वेड लागण्याची पाळी आली होती...
ही वेळ वेडं होण्याची नाही हे मनाला समजवत तो झरझर गच्चीतून खाली उतरला. माजघरात अजूनही आभा केविलवाणी पाहत असल्याचं पाहून तो तिच्यापाशी गेला. तिच्या गालावरून हात फिरवताना त्याने आभाला हाक मारली...
"आभा, ये आभा काय होतंय, तू घाबरली का सोने..."
आभा पुरती सावरली नसल्याने उत्तर देत नव्हती. दारावर बसलेली म्हातारी मात्र करकर बोटं मोडत म्हणाली, "मेली मसनात गेली तरी पाट सोडत नाही.. शंकऱ्या तू पोरीकडं बघ मी हीला काही आज सोडत नाही. आज पोर्णिमा आहे ना हीचा नाच आज परसदारी असणार. आज ही आली की विचारीन बाई तू मला त्रास दे पण कोणा दुसऱ्याला सतवू नको. काय म्हणून तू त्यांना छळतेस! तुझं असं काय घोडं मारलं! माझ्या नातीसारख्या मुलीला का छळत बसलीस..."
"आई तू गप राहा. आज मीच ईच्यारीन तिला पाहीन काय म्हणते ते..."
"मी म्हणते ही आहे कोण? आम्हाला त्रास देणारी ते काही नाही आज हीचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा..."
"रमा तू आपल्या पोराकडं बघ, मी पाहतो तिचं काय करायचं ते..."
"अहो हे घर आपण किती आवडीनं घेतलं, त्या वेळी पुसटशी कल्पना जरी असती तर..."
"कसली कल्पना रमा..."
"इथं हीचं राज्य असल्याची..."
"रमा तू शांत हो, मी पाहतो ना..."
"तुमच्याकडून तेच ऐकत आले आजवर..."
"सूनबाई माझं ऐकशील..."
"काय ऐकू तूम्ही पण आई आम्हाला अंधारातच ठेवलं..."
"नाही पोरी असं बोलू नको गं..."
"मग काय करू तुमचा मुलगा बोलला घर कमी पैशात देतो, परंतू आमच्या आईला तूम्हाला संभाळावं लागेल..."
"तूम्ही त्याचं ऐकलं, मी बोलू पाहत होती तेव्हा नाही ऐकलंत..."
"तीच चुकी झाली आमची..."
"पण आता तरी या घरात काय घडतंय ते तुम्हाला माहीत असेल तर सांगा..."
"रमन तुला कितींदा सांगू तू त्यांना काही बोलू नको, अगं वयस्कर आहेत त्या..."
"हो का मग आभा किंचाळली तेव्हा या शिव्या कुणाला घालत होत्या... जेव्हा जेव्हा या घरात अमंगल घडतं तेव्हा या कुणाचा तळतळाट करत असतात..."
रमाच्या या प्रश्नावर शंकरदेखील निरूत्तर झाला. रमन अगदीच खोटं बोलत नव्हती, त्याने म्हातारीकडे मोठ्या आशेनं पाहीलं. त्याच्या डोळ्यात अगणित प्रश्न पाहून म्हातारीनं त्याला खुणेनं गच्चीवर बोलवलं आणि ती हळूहळू जिना चढत वर जाताना पाहून शंकरही मागून आज्ञाधारकाप्रमाणे गेला.. म्हातारी कठड्याचा आधार घेऊन उभी होती... तो तिच्या जवळ गेला..
"बोला आई तुम्ही मला का बोलवलं..."
"लेका तुला मी तेव्हा दबक्या आवाजात सांगितलं की घर घेऊ नको.."
"हो पण एवढं स्वस्त घर मला या शहरात मिळालं नसतं..."
"अरे माझा मुलगा असला म्हणून काय झालं त्याने पळ काढला..."
"आणि तुमची जबाबदारीही नाकारली..."
"तसंच काही नाही, मीच नकार दिला त्याला..."
"का..."
"सांगते ऐक" आणि म्हातारी आपली कहाणी सांगत अगदी भूतकाळात अडकली...
ट्रींग...ट्रींग..दरावरची डोअर बेल वाजली तशी निर्मला काकूनी दार उघडलं. समोर सतरा ते अठरा वर्षाची युवती उभी पाहून विचारलं,
"कोण पाहीजे..."
"तुम्ही निर्मला बर्वे ना..."
"हो परंतु..."
"काकी तुम्ही एक रूम भाड्याने देणार हे समजलं म्हणून आले..."
"हो परंतु, तू कोण आणि एकटीच..."
"मी विशाखा सामंत, मी 12वीची विद्यार्थीनी आहे... शिक्षणासाठी रायगडहून आली आहे.. मला तुमची रूम द्याल का..."
"मी काय विचारलं तू एकटीच आहे का..."
"सध्या तरी एकटीला हवी, पुढच्या महिन्यात माझी दुसरी मैत्रीण येईल..."
"नक्की ना यावर कुणी नाही ना आताच सांग..."
"नाही..."
विशाखाला रूम देऊन निर्मला फार खुश होती. तिला विशाखाच बोलणं वागणं सर्व काही आवडत होतं.. आपली सून विशाखा झाली तर??
तिच्या मनात विचार घोळत राहिला.. तिने भावनावश होऊन आपला विचार विशाखाला बोलून दाखवला... परंतु, निर्मलाच्या मुलाला विशाखाने पाहील नसल्याने ती नंतर पाहू असा वेळ मारून नेई...
हा म्हणता दोन वर्ष संपली विशाखाचं लास्ट वर्ष असल्याने अभ्यासात गर्क होती..
निर्मला तिला हवं नको ते पाही... अगदी लळा लागलेल्या निर्मला नेहमी विशाखाला सुनेच्या रूपात पाही..
एक दिवस समोर अंगणात विशाखा बसली असता एक पंचवीस वर्षाचा युवक हाती दोन गच्च भरलेल्या बॅगासहीत अवतरलेला पाहून विशाखा समोर येत म्हणाली, "कोण हवं तुम्हाला..."
"कोण म्हणजे..."
"तेच विचारते कोण हवं..."
"बर्वे इथंच राहतात ना..."
"हो..."
"थँक्स मला वाटलं घर विकून गेल्या की काय..."
"अरे अवी तू केव्हा आलास..."
"आई या कोण..."
"विशाखा आमच्या घरी राहते..."
"असं होय कसला घाबरलो मी..."
"का रे काय केल तिने..."
"कोण हवं तुम्हाला असं म्हणाली ती मला, आई तू नसती तर हीने मला घरात घेतलं नसतं..."
"साॅरी मला माहीत नव्हतं..."
"ओके अहो मस्करी केली मी..."
"बरं आई खूप भूक लागली, काही खायला दे..."
"इथंच! घरात तरी ये..."
अवीची व विशाखाची दोस्ती जमायला फार वेळ लागला नाही.. कालांतराने दोस्ती प्रेमात बदलली. निर्मला आधीच विशाखाला सून मानून बसलेली. तिला तर आभाळ ठेंगणे वाटायला लागले..
विशाखाच्या घरचेही राजी झाले. मुलगा बाहेरगावी शिक्षण घेऊन आलेला. शिवाय एकुलता एक... कुणाला काही प्राॅब्लेम नव्हता..
अवी-विशाखाच लग्न झालं... नवलाईचे चार दिवस संपलेही. दोघं सर्व्हिस करत होते.. एक दिवस विशाखा आई होण्याची गोड बातमीही मिळाली.. सारंच कस गोविंद वाटावं असं घडत गेलं... आणि विषाखा पाच महिन्ची गरोदर असताना जिन्यावरून पडली आणि आई होण्याचं सुख तिचं हिरावलं गेलं... नाराज असलेली विशाखा कधी खुश झालीच नाही... परिणामी तिची तब्येत ढासळत गेली आणि एक दिवस ती पंचत्वात विलीन झाली... निर्मलाने अवीला पुन्हा लग्नाचा घाट घालायला सांगितला परंतु विशाखावर जीवापाड प्रेम करणारा अवी नाही म्हणाला... त्याने कायमस्वरूपी बाहेरगावी सेटल होण्याचा निर्णय घेतला. आईलाही ये म्हणत होता. निर्मलाने ऐकलं नाही. तेव्हा आईच्या सोबतीकरता हे घर शंकरला कमी भावात फक्त आईची काळजी घेण्यासाठी विकलं होतं...
म्हातारीनं एवढं कथन करून भरलेले डोळे पुसत म्हणाली.. "शंकरा केवळ अवीनं लग्न करून आपलं घर उभारावं म्हणून ती येत असते.."
"पण आता..."
"तिला फक्त अवीचा संसार पाहायचा..."
"हो पण तुमचा मुलगा असताना तिनं असं काही केलं नाही का..."
"तिचं रोज येणं परसदारी पारीजातकाचं गंधात वाढ होणं अवीभोवती घुटमळणं, या गोष्टीला कंटाळून तो निघाला..."
"मग हे बंद कसं होणार..."
"नाही होणार जोवर अवी तिची समजूत काढत नाही, तोवर ती येतच राहणार... कधी गच्चीत वाऱ्यासोबत पिंगा घालत तर कधी परसदारी हवेची गंधयुक्त झुळूक बनून..."
"मग माझी आभा..."
"आभाला काही होणार नाही. ती काही करणार नाही..."
"तिच येणं वाढलंय..."
"ती आभाला पाहून येत असेल..."
म्हातारी बोलायला आणि पुन्हा वाऱ्याने पिंगा घालायला सुरुवात केली. संध्याकाळची वेळ असल्याने पारीजातकाचाही गंध सोबतीला घेऊन ती बेफान धळत होती. अचानक म्हातारी कडाडली...
"तू गेलीस! आता काय या पोरीला नेणार का..."
म्हातारीच्या शब्दाने जादू केली होती शांतता क्षणात नांदायला लागली.. आणि शब्द घुमले, "अवीचा संसार पाहायचा तेव्हाच मुक्ती लाभेल मला..."
"पण तो ऐकत नाही प्रयत्न केले ना..."
"तरीही..."
"अगं तो तुझ्यावर असलेल्या प्रेमात आंधळा झालाय..."
"नाही..."
"एक मिनिट मी शंकर आभाचे वडील तुला वचन देतो अवीला लग्नासाठी तयार करीन तोवर तरी गप राहा..."
आणि जादू व्हावी तशी झुळूक संपली..
आभाही सावरली. अवीलाही बोलवण करून शंकरने बरीच मनधरणी करत लग्नाला तयार केला. लग्न साधंसुधं करून अवी त्याची बायको घरात आली.
आणि परसादारची झुळूक पुन्हा अंगणी खेळून हळूहळू कायमस्वरूपी लुप्त झाली..
समाप्त..