प्रेमी युगुल
प्रेमी युगुल


वडाळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं 2 वरती दोन-अडीचच्या दरम्यान दोन युवा प्रेमी जोडपे बाकड्यावर शेवटच्या टोकाला बसली होती. सहसा यावेळी प्लँटफॉर्मवर रहदारी कमी होती. प्लॅटफॉर्म सुन्न होता.
लेडीज डब्याजवळ हे प्रेमीयुगल बसले होते. बाकड्याचा एका टोकाला तो व एका टोकाला ती बसली होती. बाकड्याच्या खाली एक कुत्रं बसलं होतं. दोघेही मोबाईलवरुन विचारपूस करीत होती. तो तिच्या मोबाइलवर बोटाने खुणा करुन काहीतरी सांगत होता. तिला मग नाही समजल्यावर 'हे असं का?'...मध्येच असं बोलून दातांचे बत्तीस बाहेर काढत होती. त्या क्षणी ती एक हाताने ओढणीचा पदर तोंडावर घेवुन दात झाकण्याचा प्रयत्न करीत होती. हसताना तिच्या एका गालावर खळी पडत होती. चेहरा एक वेगळाच मोहक होत होता. एक वेगळेच आनंदी रुप धारण करीत होता. ती बाकावर पाय दुमडुन बसली होती. पाय एकमेकांत गुरफटून, एक सँडल पायाच्या एका अंकठ्यावर लोंबकळत होती. जणु काही तुटायला आलेली दिसत होती. कधीही पडेल.
तो काहीतरी बहाणा करुन तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होता. आता त्याने पाठीमागुन हात बेंचवर टाकला होता. आता तो आपली जागा सरकवत सरकवत पुढेपुढे जात होता. आता तो तिच्या खूपच जवळ आला होता. त्याचा हात तिच्या पाठीमागच्या बाकाकडून हळूवार टाकला. बाकाच्या कडेवर सरकत ठेवला. तो प्रतीक्षा करीत होती की, हा हात कधी तिच्या खांद्यावर टाकतो ते, कधी तिला हाताने स्पर्श करेल, त्याच्या हाताची बोटे आसुसली होती तिच्या केसांच्या अंबाड्यातून विहार करायला. स्वसंविहार करायला. अगदी याचवेळी तिच्या मागच्या बाकावर बसलेल्या एका लेडीज मोबाईलची रिंग वाजते. अगदी त्या दृष्याला साजेशी होती.
'ये रेशमी जुल्फे, ये शरबती ऑंखे, ईन्हे देखकर जी रहे है... या गाण्याच्या रिंगटोनने त्यांच्या प्रणयभावना आणखीनच उफाळून टाकल्या. नवीन घेतलेल्या मोबईलवर अँपमध्ये ती मश्गुल होती, की तिलाच आपण काय करीत आहोत माहीत नव्हते.
एकाला मोबाईलचे आश्चर्य वाटत होते, तर एकाला ज्या हाताचा तो पकडला आहे त्या हाताची उत्सुकता वाटत होती. आपण जर मोबाइल असतो, आता तिच्या हातात असतो, प्रत्येक वेळी मी तिचा जवळ असतो. तिला स्पर्श करीत असतो. ती मला बोटाने टाईप करताना मला गुदगुल्या वाटल्या असत्या. ती मला प्रेमाने कानात कुजबुजली असती. तिच्या केसांतुन ध्वनी बोलून विहार केला असता.
ते दोघेही आता चिकटून बसले होते. दोघेही मोबाईल्सच्या अँप्सवर बोलत होते. तो एका पायाने स्पर्श करु लागला. तो तिची सँडल आपल्या एका बोटाने हळुच पाडतो, त्या सरशी ती आपली बत्तीशी बाहेर काढून हसू लागते. तो हळूच आपला पाय तिच्या पायाला स्पर्श करु लागतो.
पायाच्या स्पर्शाने आता प्रेमाची भाषा सांगत होती. पायाची परिभाषा आता पायाखालुन सुरु झाली होती. कटबाहुलीचा खेळ सुरु झाला होता. तसाच स्पर्शखेळ चालू झाला होता. अंगठे आता बोलू सांगत होते. तो तिला आता हातानेही स्पर्श करु लागला होता. तो आपल्या पायाच्या अंगठ्याने तिच्या अंगठ्यावर हळुवार स्पर्श करीत होता. तेवढी ती पाय मागे खेचत होती. तेवढा तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होता. तो आता तिला हाताने दुसऱ्या पायावर पाय ठेवणार तेवढ्यातच जोराचा आवाज ऐकू आला.
'भू...भू... कुत्र्याचा आवाज ऐकून दुसरी कुत्री जमा झाली. त्या प्रेमी युगुलावर भुंकु लागली. त्यासरशी ती घाबरून लगेच त्याला बिलगते. ज्याची वाट कित्येक तासांपासून तो पाहात होता. ते काम एका कुत्र्याने भुंकुन केले होते. कित्येक मिनिटे एकमेकांच्या मिठीत आलिंगन देऊन होते.
त्याने तिचा पाय समजुन कुत्र्याच्या शेपटीवरच पाय ठेवल्याने कुत्रं चटसरसी अंगावर धावून आलं...