komal Dagade.

Romance Action Classics

4.0  

komal Dagade.

Romance Action Classics

फुलले नाते प्रेमाचे... भाग 2

फुलले नाते प्रेमाचे... भाग 2

5 mins
162


            " दुसऱ्यादिवशी पारूच्या मनमोहक भक्ती गीताने राकेशला जाग आली. आईबाबा ही त्यांचं आवरून हात जोडून पारुचे भक्तीगीत ऐकण्यात रममाण झाले. पारुने सर्वाना प्रसाद दिला. सासुसासऱ्यांच्या पाया पडून पारुने आशीर्वाद घेतला.


सुमतीताई म्हणाल्या, बाळ एवढ्या लवकर कशाला उठलीस...?


त्यावर पारू म्हणाली, आई मला सवय आहे लवकर उठण्याची.


"बसा मी आलेच दोघांना नाष्टा घेऊन...!


पारुने केशर, विलायची घालून तुपातला गोड शिरा बनवला होता. आज किचन मध्ये गोड बनवून तिने घरातील माणसांचा मन जिंकण्याचा पहिला प्रयत्न तिचा यशस्वी झाला होता.


राकेश आवरून बाहेर आला. त्याला ऑफिसला जायचं होत. त्याच्या समोर पारुने शिऱ्याची डिश धरली. तो सरळ मला नाही आवडत म्हणाला. त्याचे आईबाबा एकमेकांकडे बघत राहिले. त्यांनाही मुलाचं असं बोलणं खटकलं होत.


"पारू मला माझ्या मुलाच्या सगळ्या गोष्टी माहितेत,पण मला पूर्ण खात्री आहे तू त्याच मन जिंकशील. पारूला सासूचं बोलणं ऐकून खूप बरं वाटलं. जाताना पारुने भरलेला तीन कप्याचा डब्बा सुमतीताईकडे दिला, राकेशला देण्यासाठी. त्यांनी तो मुलाच्या हातात दिला.


राकेश ऑफिसला पोहचला. आज त्याच कशावरच लक्ष लागत नव्हतं. अर्चनाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. अर्चनाने ऑफिसमध्ये एन्ट्री केली. सगळे तिच्याकडे पाहत होतें. ऑफिसमधील अमोल गुडमॉर्निंग अर्चना म्हणाला. ऑफिसमधील स्टाफ च लक्ष केवळ अर्चनाकडे खिळल्या होत्या. दिसायला स्मार्ट आणि आकर्षक पर्सनॅलिटीमुळे तिच्याकडे बघतच बसावे अशीच होती अर्चना.


थेट राकेशजवळ येऊन बोलू लागली.


गुडमॉर्निंग राकेश,


राकेश तिला येताना एकटक तिच्याकडे पाहत होता. तिच्या मनमोहक अदा, गोरीपान, त्यात निळे घारे डोळे,मोकळे सोडलेले केस त्यावर लावलेला एक नाजूक क्लच, हलकसा मेकअप राकेशची नजर तिच्यावरून हलत नव्हती.


अर्चना,लग्नाच आमंत्रण तरी द्यायचं होत, राकेश.


ते मी सांगणारच होतो,पण एवढं सगळं घाईत झालं की सांगायचं विसरलो बघ.


आता पार्टी पाहिजे. कधी भेटवतोस तुझ्या वाइफला.


तिच्या बोलण्याने राकेशला गोंधळ्यासारखं झालं.


अर्चना,बाय द वे मी ही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतेय.


राकेशच्या हृदयाला चीर पडल्यासारखं झालं. तो शांत ऐकत होता.


अभिनंदन तरी म्हण, कोणत्या विचारात आहेस. मी बोलते त्याकडे लक्षच नाही तुझं...! अर्चना म्हणाली.


हो कॉंग्रॅज्युलेशन्स. कोण आहे तो...!

राकेशने विचारलं.


तो माझ्याच कॉलेजचा संदीप. आम्ही खूप छान मित्र होतो आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतोय.


चल बाय खूप कामं पेंडिंग पडलीत भेटू पुन्हा.... असं म्हणत अर्चना तिथून निघून गेली.


दुपारी जेवणाची सुट्टी झाली. राकेशच मात्र जेवणाकडे लक्ष लागेना. पारुने जेवणात पाचपकवाने दिले होती. त्याकडे त्याच लक्ष नव्हतं. संध्याकाळी तो ड्रिंक करूनच घरी आला .त्याची मात्र चिडचिड सुरु झाली. पारु चहा घेऊन आली सरळ तिच्यावर खेकसलाच, "किती वेळा सांगितलं तू माझ्यासाठी काही करत जाऊ नकोस म्हणून....? पारूला तर रडूच आले ऐकून...!


" पारू तिथून निघून गेल्यावर राकेशला त्याची आई म्हणाली, तू आज ड्रिंक करून आलास, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राकेश. मी सगळं पाहतेय तू कसं पारूला वागवतोस.


"पारु मध्ये काय कमी आहे. शोधून तरी सापडेल का रे आजच्या काळात अशी मुलगी....! तू घरी नसतोस पण तुझ्या आईवडिलांची ती स्वतःच्या आईबाबांसारखी काळजी घेते. तिच्या एवढं कोणीच करू शकत नाही, तू पण नाही करू शकत, "पोटचा मुलगा असलास तरी....! पण माझ्या हट्टामुळे एका पोरीचं आयुष्य उद्वस्थ झालं.त्याला कारणीभूत मी स्वतः आहे.


राकेशला आईच्या बोलण्याने काहीच फरक पडला नाही. तो सरळ तिथून त्याच्या रूम मध्ये निघून गेला.

आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतें.

पारू तिथं आली.आई तुम्हाला त्रास होईल. नका त्रास करून घेऊ स्वतःला....!सगळं होईल नीट...!


एवढी खंबीर कशी ग तू पारू....? मानलं तुला पोरी.


आई तुमच्यामुळेच मला बळ मिळतं. नाहीतर मी ही खचले असते. आई नक्कीच एक दिवस यांचे डोळे उघडतील. पारू तिच्या सासूबाईंना म्हणाली.


काही महिन्यातच अर्चनाचं लग्न झालं. राकेश सोडून सगळा स्टाफ तिच्या लग्नाला गेला होता.



पारू तिची घराप्रति असणारी कर्तव्य निभावत होती. सासू सासर्यांकडून तीला आईवडिलांचं प्रेम मिळतं होतं पण वर्ष होतं आले तरी नवऱ्याकडून अजून एक गोड शब्द तिच्यासाठी निघाला नव्हता.दोघांच्या लग्नाला वर्ष होतं आलं होतं.राकेशच मन संसारात काही केल्या रमत नव्हतं. पहिलं प्रेम त्याला पुढं जाऊ देत नव्हतं. पारू मात्र हे ही दिवस सरतील याच भरोशावर राहत होती.


सकाळी सकाळी आवरून राकेश ऑफिसला जायला निघाला. मन नेहमीप्रमाणेच अस्वस्थ होतं. बाईकवरून जाताना त्याच लक्ष एका फोर व्हिलर गाडी कडे गेलं. त्यात राकेशला अर्चनासारखीच मुलगी दिसली. गाडीचा वेग वाढवून तो त्या गाडीचा पाठलाग करू लागला. एका बंगल्यासमोर गाडी येऊन थांबली. पाठीमागे राकेशही येऊन थांबला. अर्चनाला ओळखून त्याने आवाज दिला. राकेशला पाहताच ती खूप खुश झाली. दोघं मिळून तिच्या घरात निघाले.


राकेशचे तिचा अवाढव्य बंगला पाहून डोळे दिप्त झाले. पण आतमध्ये शिरताच घरात इतरत्र पसारा पसरलेला दिसत होता. इतकं अस्वच्छ घर पाहून त्याला तर किळस वाटली. अर्चनाच्या सासूबाई येऊन म्हणाल्या, सुनबाई पाहुण्यांना चहा पाणी तरी दे ...!त्यांच्या बोलण्याने अर्चना रागातच सासूबाईंवर खेकसलीच, " सासूबाई दिसत नाही का तुम्हाला आम्ही बोलतोय....! तुम्ही घेऊन या एक चहा आणि माझ्यासाठी कॉफ़ी. तिच्या उद्धट बोलण्याने राकेश तिच्याकडे अवाक होऊनच पाहत होता.


आईने त्याच्या नकार का दर्शवला हे त्याच्या लक्षात आले....!


अर्चना पुढे बोलू लागली, तू नको याकडे लक्ष देऊस. तुला सांगते या दोघं म्हाताऱ्यानमुळे घरात प्रायवसी नाही बघ... तोपर्यत तिच्या सासूबाई चहा, कॉफ़ी घेऊन आल्या.


अर्चना म्हणाली ,सासूबाई स्वयंपाक झालंय ना.... राकेश जेवण करूनच जाईल. राकेशला आता त्याच्या आईच्या वयाच्या बाईचा असा अपमान केलेला पाहून राकेशला संताप येत होता. अर्चना जेवढी दिसायला सुंदर होती,तेवढी अहंकारी दुसऱ्याला तूच्छ लेखणारी होती. तिचा विचित्र स्वभाव पाहून त्याच प्रेम क्षणात नाहीस झालं. थोरा मोठ्यांचा आदर करणं तर लांबच साधं हिला बोलायलाही त्यांच्याशी नीट येत नव्हतं.कसल्या मुलीच्या प्रेमात पडलो याचा त्याला पच्छाताप ही झाला होता.


जेवण करून जा. अर्चना त्याला म्हणत होती. तो तिला पुन्हा कधीतरी येईन असं म्हणत तिच्या घरातून बाहेर पडला. आज त्याला पारुची आठवण येत होती. साधी राहणारी, दुसऱ्यांना आदर देणारी पारू तिच्याशी एकही प्रेमाचा शब्द न बोलणारा मी पण माझ्यासाठी रोज किती काय काय करतेय....! आठवून त्याला पच्छाताप होतं होता. तिचं निस्वार्थी प्रेम पाहून त्याला स्वतःची लाज वाटत होती .आपल्या आईवडिलांचा आदर काळजी करणारी पण मी मात्र तिचा पदोपदी अपमानच करत आलो. किती पटकन घराला, घरातील माणसाना आपलं केलं तिने हेही त्याला आठवतं होतं.आज तिची माफी मागणार असं तो मनोमन ठरवून घरी गेला. जाताना त्याने एक गुलाबाचं लाल फुल घेतले होतें.


किचनमध्ये पारूच कामच चाललं होतं. राकेश लवकर कसा आला याचा विचार करत ती त्याच्यासाठी थंड पाणी घेऊन आली. पाणी तिच्या हातातून घेत तो प्रेमाने तिच्याकडे पाहून हसत होता. तिला मात्र त्याच वेगळंच रुप दिसत होतं. पारू अग बसना त्याच्या असं बोलण्याच तिला मात्र आश्चर्य वाटतं होतं.

पारू त्याच बोलणं शांत ऐकत होती. पारू आज देवाने माझे डोळे उघडले. मी जिच्यावर प्रेम केलं ती माझ्या लायकीची नव्हती. मी तुझ्याशी खूप वाईट वागलो.त्यासाठी मला माफ कर. लग्नाला वर्ष झाले तरी तुला माझं बायको म्हणून प्रेम नाही देऊ शकलो, तरी माझ्या घरावर, माझ्या आईवडिलांवर निःस्वार्थ प्रेम केलेस. त्यांना आपलंस केलंस अशी सोन्यासारखी बायको मिळाली मला माझं भाग्य आहे.


त्यांन गुलाबाचं फुलं हातात धरून पारू आय लव्ह यु यापुढे तुझी साथ कधीच सोडणार नाही. आयुष्यभर तुला सुखी ठेवेन माझ्या या फुलाचा स्वीकार कर. पारूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतें. आज ती ज्या दिवसाची वाट पाहत होती, तो आला होता. तिने गुलाब स्वीकारलं आणि त्याच्या मिठीत जाऊन रडू लागली. त्याचे आईबाबा सगळं लांबून पाहत होतें. आता दोघांच्या सुखी संसाराची काळजी मिटली होती. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होतें.



*********समाप्त **********-



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance