akshata alias shubhada Tirodkar

Thriller Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Thriller Others

फ्लॅट नंबर भाग ९

फ्लॅट नंबर भाग ९

2 mins
149


इन्स्पेक्टर मोहित च्या सांगण्यानुसार हवालदार शिंदे आपली नजर सोसायटी च्या प्रत्येक जणांवर ठेवली होती अधून मधून कोण संशयित दिसला तर त्याची हि चौकशी केली जात होती अधून मधून वॉचमन ला हि प्रश्नाची उत्तरे दयावी लागत होती तिथे मोहित हि ह्या केस ची पूर्ण माहिती करत होता. 


हवालदार शिंदे असेच बिल्डिंग मध्ये फेरफटका मारताना त्याच्या नजरेस सोसायटी चे सुर्वे अमित आणि अवनीशी बोलताना दिसले शिंदे नि हळूच भिंतीला कान लावला. 


"पाहिलात देवधर ह्या साठी मी सांगत होतो तुम्ही त्या बाईच्या भानगडीत पडू नका. आता पहा सगळ्यांना तिनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे हिच्या अश्या स्वभावामुळे कोणी तरी हल्ला केला असेल पण ताप मात्र आपल्या डोक्याला "?


"पण सुर्वे तुम्हला काय वाटत कोण करू शकतो "?


"ते मात्र मला माहित नाही तिच्या विचित्र स्वभावामुळे तिनी किती दुश्मन उभे केले असतील देव जाणे.. चला येतो मी देवधर "


आणि सुर्वे गेले तसे अवनी आणि अमित हि आपल्या फ्लॅट मध्ये शिरले. 


सोसायटीच्या लोकांबरोबर मोहित ने कांचन च्या त्या शहरात राहत असलेल्या नातेवाईकांना हि चौकशी बोलावले. 


"इन्स्पेक्टर साहेब मान्य आहे आम्ही तिचे नातेवाईक आहोत पण आमचे हि तिच्याशी पटत नाही त्यामुळे आमचे तिच्या घरी येणेच होत नाही आणि आम्हला तिच्यावर हल्ला करून काय मिळणार मी तर काका काकू म्हणजे कांचन चे आई वडील असताना तिथे गेलो होतो आज तर ७ वर्ष झाली मी तिथे फिरकलो हि नाही "


अशीच काहींची उत्तरे आली कोणीच तिच्या संपर्कात नव्हते पण तिच्या नसण्याने फायदा मात्र सगळयांना होणार होता सोसायटी वाल्याना तिच्या विचित्र स्वभावातून तर नातेवाइकांना तिच्या संपत्तीतून कारण कांचन हि एकुलती एक होती त्यात ती अविवाहित आई बाबा आणि कांचन नंतर संपत्ती नातेवाईकडेच जाणार होती 


मोहित च्या नजरेत सगळेच संशियत होते पण कोण तिला मारू शकतो हे कोडे मात्र सुटत नव्हते ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller