अक्षता कुरडे

Horror


4.2  

अक्षता कुरडे

Horror


पच्छाताप

पच्छाताप

9 mins 1.4K 9 mins 1.4K

त्याने तोंडातल्या तोंडात काही मंत्र बोलताच ती बरणी हलू लागली. पण तितक्यात आई ने मला सात्या सोबत पाहिलं आणि जोरात ओरडली. तिच्या आवाजाने सात्या आणि मी दोघेही दचकलो. त्याला बरणीच झाकण बंद करावं लागलं. तशी बरणी हलायची बंद झाली. आई तिकडे येताच माझी कॉलर पकडली आणि सात्या कडे रागाने पाहू लागली.


"तुला किती येळा सांगितलं हाय रे.. गावात यायचं न्हाय. तरीबी अक्काल येत न्हाय तुला. दिऊ का आवाज गावातल्या लोकांना. खायचाय मार मागच्या येळे सारका"


सात्या त्याची बरणी आणि सोबत असलेलं गाठुड घेऊन पळून गेला. 


"आई अग तु हे काय केलंस. सात्या तुम्हाला वाटतो तसा नाहीये. त्याच्याकडे शक्त.." तो पुढे काही बोलणार तोच आईने त्याच्या कानाखाली वाजवली.


"एक सबुद बी न्हाय आईकायचा मला. तुला एक डाव सांगितलं व्हत ना, त्याच्या नादास्नी नाय लागायच. तरीबी तु आईकल न्हाय ना माज."


"आई मी काय बोलतो ते एकदा फक्त एकदा ऐकुन घे."


"मला काय बी नाय आईकायच. शालेत जातुया तर लई आकल आली हाय. सोताला लई मोठा माणूस समजतुया. चल घरला तुझ्या बापाला च सांगती आज." म्हणत दुर्गेश ला ओढून घरी घेऊन जाते. 


घरी आल्यावर दुर्गेश च्या वडिलांना कळल्यावर ते त्याला खुप ओरडतात. रागाच्या भरात हात उचलतात. मग राग निवळल्यानंतर प्रेमाने समजवतात. एकाच दोन होऊन गावभर बातमी पसरते की दुर्गेश सात्या सोबत गावाच्या वेशीवर जातो. त्यांच्या घरी कोणी येईनासे झाले. गावातल्या लोकांनी त्यांच्या मुलांना त्याच्यासोबत न राहण्याची सक्त ताकीद दिली तसे त्याचे मित्र त्याच्या पासून लांब राहू लागले. त्यामुळे तो एकाकी राहू लागला. वर्गात कोणी त्याच्या बाजूला बसेना. परिणामी त्याचे अभ्यासात लक्ष लागेना. नेहमी अव्वल येणारा दुर्गेश ह्या वर्षी नापास झाला. घरच्यांना आश्चर्य वाटलं. रागाच्या भरात त्याच्या वडिलांनी शाळेतून त्याच नाव काढून टाकल. आता तो घरीच राहू लागला. त्याला त्या दिवसापासून ते आतापर्यंत फक्त ती बरणी आठवत होती. कसं ही करून त्याला पुन्हा साक्या ला भेटायच होत पण आई ची चौफेर नजर हे शक्य होऊ देत नव्हती. घरात राहून राहून त्याला खुप एकटं वाटतं राही. त्याने रात्री जेवताना आई बाबांकडे गावात काहीतरी थोडा वेळ का होईना काम करण्याची इच्छा मांडली. त्याच्या पासून नाराज असलेले दोघेही यावर काहीच न बोलता गपचुप जेवण आटपून झोपी गेले. दुर्गेश ची ही शेवटची आशा होती पण त्यातही निराशा पदरी पडल्याने तो हताश झाला. 


पुढच्याच महिन्यात त्याचे बाबा जिथे कामाला होते तिथे बाजूला नवीन कंपनी उघडली होती. गावाबाहेर काम करत असल्याने त्यांना देखील यायला उशीर व्हायचा. पुन्हा तेच न व्हावं म्हणून ते त्याला गावाबाहेर काम करायला पाठवण्यास त्यांच मन नाही म्हणत होत. पण गावातल्या गावात कुठेही काम मिळणार नाही म्हणून त्यांनी मनावर दगड ठेवून तिथे चौकशी करून आपल्या मुलाला तिथे कामाला ठेवण्याची विनंती केली. आठवड्याभरात तो तिथे रुजू झाला. चहा देणे, कप धुणे, फाईल्स आणून देणे, स्टेशनरी, अशी छोटी मोठी कामे करण्यासाठी त्याला तिथे हेल्पर म्हणून ठेवलं. बाबांची ड्युटी त्याच्या पाऊण तास आधी संपायची तरीही ते त्याच्यासाठी बाजूच्या चहाच्या टपरीवर थांबून त्याची वाट बघत आणि त्याला सोबत घेऊन जात. एक दोन आठवडे ते थांबले पण त्यानंतर ते कधी कधी खुप थकले असले की निघून जात. मग तो घरी येईपर्यंत त्यांना धास्ती लागून राहत. पण जस जसे दिवस जात होते सात्या ला भेटण्याची ओढ अजूनही तीव्र होत होती. महिनाभर तो व्यवस्थित वागला. आता आई बाबांना देखील त्या गोष्टीचा विसर पडू लागला. दोघे निर्धास्त झाले आणि आता बाबा रोज एकटे घरी येऊ लागले.


याच गोष्टीचा फायदा घेऊन तो एकदा लवकर निघाला. गावातल्या पश्चिम दिशेच्या बाजूला घाट होता तिथल्या एका मोठ्या डोंगरातल्या गुहेत सात्या राहत होता. झटपट पाऊल टाकत तो तिथवर पोहचला. दिवस जरी असला तरी त्याबाजुच भयानक वातावरण पाहून त्याचा घसा कोरडा पडला. तो आत शिरणार च होता की त्याच्या खांद्यावर हात पडला. मोठ्ठी, काळी ओबडधोबड नख आणि लांब बोट पाहून त्याने हात झटकला आणि घाबरून खाली पडला. मान वर करून पाहिलं तर तो सात्या होता. त्याला पाहून त्याच्या जीवात जीव आला. सात्या ला त्याने त्या बरणीची आठवण करून त्याला ती देण्यासाठी विणवू लागला. तसा तो त्याला बघून जोरजोरात हसू लागला. हसत हसत तो गुहेच्या आत गेला. त्याच्या मागोमाग दुर्गेश सुद्धा निघाला. आत मध्ये येताच त्याला एका रिंगणात माणसाची खोपडी दिसली. जणू काही कोणाला आताच मारून त्याच शिर धडावेगळे केल होत तशी ती दिसत होती. ते पाहून त्याची भीतीने गाळण उडाली. त्याला तिथून पळून जावस वाटत होत की पण ती बरणी त्याला हवी होती. त्याच्या पासून तो त्याच्या साऱ्या इच्छा पूर्ण करणार होता म्हणून तो इतका वेळ तिथे उभा होता. सात्या ने त्याला खाली बसायला सांगितलं आणि स्वतः जाऊन रिंगणात बसला. अचानक गुहेत अंधार पसरला. त्याला काहीच दिसत नव्हत. समोर रिंगणात बसलेल्या सात्या ने त्याच्या समोरच्या कुंडात आग लावून पेटवल. तस दुर्गेश ला सात्या दिसला. त्याने तोंडात काही मंत्र पुटपुटले. आणि दुर्गेश वर मानवी रक्त शिंपडल. दुर्गेश समजताच त्याने जीव मुठीत घेऊन तो गुहेच्या बाहेर पडण्यासाठी धावू लागला. धावताना त्याच्या पाठीमागे कोणीतरी धावतंय असा भास होऊ लागला. तरीही तो मागे न वळता जिवाच्या आकांताने धावत सुटला. गावाची वेस ओलांडली तस त्याला हायसं वाटू लागलं. घरी येईपर्यंत त्याला चांगलीच धाप लागली होती. थोडावेळ तो बाहेर बसला मग स्वतःला शांत करून घाम पुसून घरात गेला. आई बाबा त्याची वाट बघून नुकतेच जेवायला बसले होते. त्याने त्याला भूक नाही असल्याचं सांगितलं आणि पाणी घेत एका दमात त्याने दोन पेले संपविले. मग अंथरूण टाकून स्वतःला झोकून दिलं. 


मध्येच रात्री बाईच विव्हळन ऐकुन त्याला जाग आली. घराच्या एका कोपऱ्यात ती बाई पाठमोरी बसून पुढे मागे पुढे मागे करत डोकं हलवत होती. तो तिथे तिला पाठमोरी पाहत स्तब्ध उभा होता. अचानक ती गप्प झाली. मग काही वेळाने तो हळु हळु तिच्या दिशेने जायला निघाला. मग खाली लक्ष जाताच दिसलं की ती पायावर बसली होती आणि तिचे पाय उलटे होते. तो घाबरून हळूच वळला आणि जायला निघाला. दोन पाऊल टाकताच त्याच्या पायापाशी तिचे हात आले आणि तिने गच्च धरून ती जवळ येऊ लागली. तिच्या तोंडावरचे केस बाजूला होताच त्याला तिचा आवसून बघणारा चेहरा दिसला. तिचा चेहरा अर्धा गळत होता. आणि त्याच्या पायावर तिची नख रुतत होती. तो पाठीमागे जात होता तशी ती सरपटत पुढे येत होती. पुढे सरकून ती त्याच्या पायाचा चावा घेणार च होती तितक्यात त्याने देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. तशी ती मागे झाली. पटकन उठून तो बाहेर जायला निघाला तितक्यात त्याचा पाय दारात अडखळला आणि खाली पडून तो बेशुद्ध झाला. 


चेहऱ्यावर खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या उजेडाने जाग आली. रात्री चा प्रकार डोळ्यासमोर आला त्याला स्वप्न समजून मी मनातून काढून टाकल. सुट्टी असल्याने आज निवांत होतो. पहिल्यांदा आईने मला दूध आणायला सांगितले. नाहीतर ती बाहेर कुठेच जाऊ द्यायची नाही. मी चप्पल घातली तशी मला पायाची जखम जाणवली त्याची सनक इतकी तीव्र होती की माझ्या डोक्यापर्यंत गेली आणि डोळ्यात पाणी जमा झाल. मी पायाला पाहिलं तर तिथे खोलवर नख रुतलेली होती. म्हणजे कालच स्वप्न हे स्वप्न नव्हत याची खात्री पटली. मी गावातल्या मारुती रायाच्या मंदिरात गेलो. तिकडे देवाला मला ह्या सर्वातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी विनवु लागलो. आज पहिल्यांदा मला आई बाबांच म्हणणं पटल होत. पुन्हा अशी मी चूक करणार नाही त्यांच नेहमी ऐकत जाईन म्हणून देवासमोर कान पकडले. मागून कोणाच्या तरी येण्याची जाणीव झाली तसा मी निघालो. त्यांनी मला थांबवलं. त्यांच्या कडे पाहिलं. ती व्यक्ती साधूच्या वेशात होती. चेहऱ्यावर सात्विक भाव आणि डोळ्यात वेगळीच चमक होती. त्यांना सगळ सांगावं म्हणून मी बोलणार होतो की त्यांनीच मला शांत राहण्यासाठी खुणावले. माझ्या हातात लाल दोरा बांधून त्यांनी मला एक नारळ गावच्या वेशीवर फोडायला सांगितला. तिथे मटणाचा नैवेदय दाखवून मागे न वळता घरी येऊन अंगावरून उतरवून काढण्यासाठी सांगितलं. त्यांना न सांगताच कसं सगळ कळलं याच आश्चर्य वाटत होत. पण वेळ खुप कमी असल्याचं त्यांनी सांगताच मी जास्त काही विचार न करता घरी आलो. आई बाबांना सगळ सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून रात्री जेवण झाल्या नंतर सार काही दोघांना सांगितलं. आई मोठ्याने रडू लागली. बाबा शांत होते त्यांनी तिला ही शांत केलं आणि ह्या सर्वातून आपल्या मुलाला बाहेर काढलं पाहिजे म्हणून तो सांगतोय तस करू पुढे देवाची इच्छा. त्यांनतर ते एक अवाक्षर ही न बोलता मी सांगितलं तसं सगळ सामान घेऊन आले. आईने सगळ साहित्य एका ताटात दिलं. जाताना मला बिलगली. तिच्या डोळ्यांत अश्रू आज केवळ माझ्या एका लालसेपोटी झालेल्या चुकीमुळे होते. मी देवाच्या पाया पडून घरातून निघालो. मध्यरात्र असल्याने देवचार (राखणदार) असणार हे पक्क माहीत होत. लहानपणी ज्या ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांपुढे येत होत्या. देवाचं नाव घेत चालत होतो. शेवटी घुंगराचा आवाज आला आणि इथे माझी धडकी भरली. कुठे लपण्याची जागा भेटेय का म्हणून पाहू लागलो. समोर गोठ्याच्या बाहेर एक मोठी टोपली दिसली. मी धाव घेत त्या टोपलीपाशी आलो. घुंगराचा आवाज जवळ जवळ येत होता. गोठा रस्त्यालगत असल्याने लपण्याची जागा नव्हती तसचं माझ्याकडे वेळ खुप कमी असल्याने ती टोपली जिथे होती तिथेच तिला अंगावर ओढून लपून बसलो. पुढच्याच क्षणी इतक्या निरव शांततेत घुंगरू असलेली काठी आपटत धोतर घातलेला धिप्पाड देहाचा माणूस येताना मी फटीतून पाहू लागलो. जसजसं त्याची पाऊले पुढे पडत होती तसा माझा श्वास वाढत होता. टोपली त्यांच्या जाण्याच्या वाटेच्या बाजूलाच होती. डोळे मिटून मी देवाचा धावा करत तसाच बसून होतो. हळूहळू करत आवाज यायचा बंद झाला तसा मी उठून पुढच्या दिशेने जायला निघालो. गावच्या वेशीवर जाणाऱ्या रस्त्यात स्मशान लागणार हे मला त्याक्षणी आठवलं. आता माझी ताकद संपत चालली असल्याची मला जाणवत होती पण आईचा चेहरा सारखा आठवत होता. तीच न ऐकल्याची शिक्षा आज मला मिळाली होती. मी झपाझप पावले टाकत आता ती वाट आली होती. स्मशानाच्या बाजूने जात असतानाच मला जाणवत होत की माझ्यावर भरपूर नजरा रोखून आहेत. तितक्यात शुक.. शुक..Ss asa आवाज माझ्या कानी पडला. तो आवाज पुरुष आणि स्त्री दोघांचा एकत्र होता. मी स्मशानाकडे न बघता पुढेच चालत होतो. गावाची वेस आली तशी हातातलं सामान खाली ठेवायला वाकलो. बाजूला कोणी माझ्या खुप जवळ असल्याचं मला जाणवलं. श्वास घेत ते घुरघुरत होते. मला आठवलं की बाबांनी जाताना सांगितलं होतं ताट खाली ठेवशील तेव्हा नजर उचलून पाहू नकोस आणि पाठी न बघताच घरी निघून ये. मला त्याक्षणी उठताच येत नव्हत. माझ्या शरीरतून त्राण गेल्यासारखे वाटत होते. नजर खालीच ठेवून मी पटकन वळलो आणि पटपट पाय उचलत होतो. मागून चित्रविचित्र आवाज येत होते. पुन्हा एकदा स्मशनाच्या बाजूच्या वाटेने जाव लागणार होत. दुसरी कोणती वाट नसल्याने मला तिथून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तिथून जाताना पुन्हा तोच आवाज पण ह्यावेळी सारखा येत होता. स्मशान पाठी जाताच मी डावीकडे जायला वळलो तर माझी बोबडीच वळली. समोरून एक व्यक्ती येताना दिसली. इतक्या रात्री तेही ह्या रस्त्यावर येण्याची हिम्मत गावातल कोणीच करणार नाही म्हणून मी त्याच कोपऱ्यात चिकटून उभा राहिलो. थोड्यावेळाने मी वाकुन पाहिले तर ती व्यक्ती मला दिसली. ते तर आमच्या गावचे मधुकाका होते. ज्यांना मरून खुप वर्ष झाली होती. मला अजूनही आठवत लहानपणी बाबा आणि मधूकाका चांगले मित्र होते पण अचानक एके दिवशी मला बाबांनी त्यांच्या घरातून रागात खेचून घरी आणलं होतं आणि यापुढे कधीही त्यांच्याकडे न जाण्याची सूचना केली. ते पुढे निघून जाताच मी आता माझ्यात होता नव्हता सगळा जीव एकवटून धावू लागलो. धावताना झाडावरून सरपटत जाण्याचा आवाज आला. मी तरीही न थांबता धावत सुटलो. बाबांनी बाहेरचा दिवा चालूच ठेवला होता तो दिसताच माझ्या जीवात जीव आला. मी दारात पोहचलो तसा जोरजोरात दार वाजवू लागलो. 


"बाबा.. बाबा.. दार उघडा..." 


बाबांनी दार उघडताच, आईने माझ्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. मी आत जाऊन कडी लावली आणि जमिनीवर कोसळलो. माझ अंग घामाने चिंब भिजल होत. थोड्या वेळात मी रिल्याक्स होताच आईने आणलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं. डोळ्यासमोर सारखं तेच येत होत. मी काही बोलणार इतक्यात बाबांना कसलातरी आवाज आला त्यांनी मला गप्प राहण्यासाठी सांगितलं. आम्ही तिघेही लक्ष देऊन तो आवाज कसला आहे ते पाहू लागलो. आमच्या दारावर जोरजोरात थाप पडू लागली. 


ठक ठकSss ठकSss


आवाज वाढतच चालला होता. आम्ही तिघेही कोपऱ्यात एकमेकांना बिलगून बसलो होतो. खुप वेळ दारावर थाप पडत होती. मध्येच गुरगुरण्याचा आवाज यायचा. माझा कधी डोळा लागला माहीत नाही उठलो तेव्हा पाहिलं घरात देवळातील पुजारी आले होते. बाबांना देवाचा अंगारा आणि प्रसाद देऊन काळजी न करण्याचं सांगून गेले. बाबांना कालचा सगळा प्रसंग सांगितला. तसेच मधुकाका दिसल्याच सुद्धा सांगितलं. बाबांचे डोळे पाणावले. ते सांगत होते. मधुकाका देखील सात्या च्या नादी लागले होते. किती वेळा समजावून सांगितलं पण तो ऐकत नव्हता. सात्या ने त्यांना देखील त्या बरिणीतून सोन्याची अंगठी काढून दाखवली होती. त्याच लालसेपोटी त्यांनी त्यांचा जीव गमावला. सात्या कित्येक लोकांना त्या बरणीमधून मौल्यवान वस्तू काढून दाखवायचा मग त्या गोष्टीचा फायदा घेऊन तो माणसांचा बळी देऊन त्याची शक्ती वाढवायचा. त्याची काळी सावली ज्याच्यावर पडलीय त्यातल कोणीही वाचलं नाहीये. तुझ नशीब चांगल म्हणून देवळात तुला देवाच्या रूपात येऊन त्यांनी योग्य उपाय सांगितला. आई बाबांची माफी मागून मी यापुढे कधीही अस वागणार नाही याचं वचन दोघांना देऊन त्यांच्या मिठीत शिरून रडत होतो. 


त्याच संध्याकाळी सात्या चा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असलेला मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याचा गावकऱ्यांनी पाहिलं. आम्हाला बातमी कळली तेव्हा आम्हाला धक्का बसला. कदाचित त्याच्यावर सगळ उलटल असेल म्हणून त्या पिश्चाछ्यांनी त्याची ही अवस्था केली असेल आणि काल रात्री दारावर तोच थाप मारत असेल. कित्येक रात्री सात्या दारावर येऊन थाप मारून जायचा. बाबांनी महिन्याभरात ओळखीने जागा पाहून आम्ही आमचं घर बदलून घेतलं. 


Rate this content
Log in

More marathi story from अक्षता कुरडे

Similar marathi story from Horror