Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Manish Vasekar

Classics


4  

Manish Vasekar

Classics


पार्टी

पार्टी

3 mins 16.6K 3 mins 16.6K

हनुमानाच्या शेपटासारखी लांबवत-लांबवत सतीशला द्यावयाची पार्टी त्याने खूपच लांबवली होती. सहा महिन्यापूर्वीच त्याच्या ध्यानीमनी नसताना त्याला बढती मिळून तो त्याच्या मित्रमंडळीत सिनियर झाला होता, जसा बदकात राजहंस. त्यावेळी मित्रांनी पार्टी मागूनही त्या गोष्टीला आता सहा महिने झाले असावेत, तरीही त्याला ती देणे शक्य झाले नाही. या मधल्या काळात त्याच्या आयुष्यात तश्या पार्टी देण्यालायक आणखी दोन-तीन घटना घडल्या. एक तर त्याच्या बाबांनी त्याला भेट म्हणून दिलेली नवी कोरी बाईक आणि दुसरं म्हणजे त्याचं नुकतच जमलेलं लग्न. ह्या अशा डब्बल-टिबल धमाक्या मुळे सर्व मित्राना त्याची पेंडिंग पार्टी आता एकदम जंगी हवी होती. पण म्हणतात ना नकटीच्या लग्नला सत्राशेसाठ विघ्न. तस प्रत्येक ठरलेल्या पार्टीला काही ना काही विस्कटायचं आणि सतीशची पार्टी पुढे धक्कली जायची.

आजचा दिवस मात्र निराळा होता, त्याच्या ऑफिस-ग्रुप मधील सगळी चांडाळ-चोकडी आज ऑफिसात हजर होती. त्यांच्या ग्रुपमधला म्होरक्या सुमेध (सुम्या) आज फुल फॉर्मात होता. सकाळ पासूनच सुम्या ने पार्टीचं पालपूद सतीशच्या मागे लावलं होत. तसा आजचा वार हि चांगला, चवथा शुक्रवार, अगदी योग्य मुहूर्त. पण महिनाखेर असल्याने सतीशच्या पोटात गोळा आला. त्याने ताबडतोब मोबाइलवर बँक अकाउंट बघितलं, खात्यात फक्त ७० रुपये शिल्लक होते. क्रेडिट कार्ड तर केव्हाच त्याने वापरणे बंद केलं होत. पार्टी इतक्यावेळा पोस्टपोन झाली होती कि आता पुन्हा पुढ ढकलण्याच नाव जरी काढलं तरी सुम्याने सतीशला कच्च खाल्ल असत. सतीशचा चेहरा आक्रसून गेला होता, कपाळावरचा घाम पुसत पुसत तो कुठल्याश्या शून्यात नजर लावून बसला होता. सतीशच्या चेहऱ्यावरचा ताण आज्याने बरोबर हेरला, सतीशची आणि आज्याची जेव्हा नजरानजर झाली तेव्हा नजरेनेच आज्याने त्याला धीर दिला आणि "तू चल, मी आहे. बघतो काय ते बिलाच!" असा संकेत त्याने सतीशला दिला. सतीशचा जीव भांड्यात पडला, स्मित हास्याची एक लहर सतीशच्या चेहऱ्यावरून हळूच सरकली. सतीशने संध्याकाळी पार्टी देण्याचं कबूल केलं.

योग् हि असा होता कि बऱ्याच जणांचे बॉस नसल्याने पाच-सहा म्हणता म्हणता अक्खी क्रिकेट टीम पार्टीला लागलीच तयार झाली. रोजच जे ऑफिस सहा ला बंद होत होत ते पाचाच्या ठोक्याला जवळच्या बारमध्ये ठाण मांडून बसलं. मग टेबलाची लावालाव झाली, बारा जणांसाठी दोन मोठे टेबले जोडावे लागले. सतीशने आज्या जवळची जागा धरली. सराहीत पार्टीकारानी वेगवेगळ्या प्रकारची रंगबेरंगी पेय मागवली आणि सोबत व्हेज-नॉन व्हेज चकणा आणि स्टार्टर ऑर्डर केले. पार्टीने हळू-हळू रंग घेणे चालूं केलं, आणि फक्त जोश! जोश! जोश! पार्टी जोरोशोरोसे चालू होती. ग्लासचे आवाज, ज्यांना जास्त झाली त्यांची वायफळ बडबड आणि गीतगायन असल्या शोरसाराब्याने बार अगदी दुमदुमून गेला. जलपानानंतर, उदरम भरणं साठी पंजाबी - चायनीज अश्या कैक डिशेस मागवण्यात आल्या.

या धांदलीत एक गोष्ट राहिली. सतीश वॉशरूमला गेला असताना, आज्याला घरून फोने आला 'त्याच्या भावाला छोटा अपघात झाला होता अन्य त्याला ताबतोब घरी बोलवण्यात आल होत'. पण निघण्यापूर्वी आज्याने सतीशला व्हाट्सअप केला कि "मला ताबतोब घरी बोलवलं आहे पण मी मॅनेजरला सांगून जात आहे, तू काळजी करू नकोस. सॉरी यार."

बऱ्याच जणांना बऱ्यापैकी चढली होती. तळीराम अगदी टल्ली झाले होते. दोन चार जणांचे ओकून झाल्यावर पार्टीचा ऑफिशिअल समारोप झाल्याचं जाहीर झालं आणि मग बिल मागवण्यात आलं.

बिल आलं. ते एका कडून दुसऱ्याकडे फिरत होत, प्रत्येक जण त्यावर आपला एक्स्पर्ट कटाक्ष टाकत होत. आयटमवाईज बिल-चेकींग चालू होती. बिल चेक करताना प्रत्येकजण असा काही चेहरा करत होता कि त्यासमोर एखादा प्रोफेशनल ऑडिटर फिक्का पडेल. असं फिरत फिरत ते बिल सतीशकडे आल. आणि एवढी चेकिंग झाल्यावर सतीशला काय फक्त बिलाचा आकडा तर बघायचा होता.

सात हजार आठशे चाळीस!!! सतीशच्या हाताला घाम सुटला. घश्यात एकदम कोरड पडली. डोके अन डोळे गरगरायला लागला. बाकी सगळे नशेत असल्याने सतीशने टेबलाचा आधार घेत तोल सांभाळल्याच कुणाच्या लक्षातही आल नाही. सेफ ट्रान्झॅक्शनच्या नावावर सतीशने मॅनेजरला गाठले. पण त्यालाही कुणाचा फोन आला म्हणून सतीश त्याच्या समोर वाट बघत उभा टाकला. इतक्यात सतीशच्या फोनची मेसेज टोन खणखणली. फोन काढून बघतो तर काय, मेसेज बँकेचा होता ‘पगार जमा झाल्याचा’. सतीशने मनातंच आनंदून जात एक गिरकी घेतली. त्याच्या जीवात जीव आला. काही क्षणापुर्वी सश्यासारखा घाबराघुबरा होऊन फिरणारा सतीश वाघासारखी मिजास दाखवत त्याच डेबिट-कार्ड मॅनेजरसमोर नाचवून एकदम जोशात आला. आणि पार्टीचा शेवट खूपच गोड झाला या आनंदात, हॉटेलातून सगळ्यांसोबत सुखासुखी बाहेर पडला.


Rate this content
Log in

More marathi story from Manish Vasekar

Similar marathi story from Classics