Savita Tupe

Abstract Tragedy

3  

Savita Tupe

Abstract Tragedy

नियती !!

नियती !!

6 mins
240


 महेश माने .एक यशस्वी उद्योजक . 

 स्वकष्टाने , आत्मविश्वासाने प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेला .

  विवाहित आणि एका मुलाचा लाडका बाबा .सहचारिणी राधा . ती सुध्दा सुंदर , गृह कर्तव्यदक्ष आणि सोज्वळ ,अगदी त्याला साजेशी .

  १८ वर्षांचा सुखाचा , दृष्ट लागण्यासारखा संसार . प्रणव त्यांचा मुलगा . वय १४ . तोही आई वडीलांसारखा हुशार ,शांत आणि समंजस !

  महेशचे बालपण खुप गरिबीत गेले .

" नियती खरंच खुप क्रूर असते . "

  ज्या वयात वडिलांचा हात धरून चालायला शिकायचे त्या वयात वडिलांनाच सावरण्यासाठी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे व्हायला लागले त्याला !!   वडील दारू पिवून आईला आणि इतर दोन भावंडांना मारहाण करत .आई नोकरी करणारी .

  मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे लागतील म्हणून त्याची आई दर महिन्याला पगाराचे पैसे थोडेफार वाचवून , लपवून ठेवायची आणि आई कामावर गेली की वडील मात्र मुलांना मारून , धमकावून पैसे घेवून निघून जायचे .

 कळायला लागल्या पासून मग महेश लोकांच्या गाड्या धुणे ,पेपर टाकणे, कोणाची बारीक सारीक कामे करून पैसे मिळवत आईला थोडा फार हातभार लावत होता .मोठा भाऊ पण पैसे कमावण्यासाठी एका छोट्या टपरीवर एका माणसाला मदत करत होता , मोठ्याने शिक्षण सोडले होते , पण महेश आणि छोटा दिपक मात्र शाळेत जात होते .शिक्षणाची आवड महेशला जास्त होती . तो जिद्दीने शिकत राहिला .

   दारूच्या व्यसनामुळे वडील त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी हे जग सोडून गेले .आईला त्यानंतर मात्र फारसं सावरता आलं नाही गरिबीमुळे होणारी उपासमार , अति कष्ट आणि गुरासारखी होणारी मारहाण यामुळे २ वर्षातच तिनेही हा जीवनप्रवास आटोपता घेतला .   

  तिघे भाऊ मग आपापल्या पद्धतीने शिकत , सावरत हळूहळू स्थिरावले .

    परिस्थितीवर मात करत करत महेश एका छोट्याश्या कंपनीचा मालक झाला होता . स्वतःचा त्याने चांगला जम बसवला होता .मोठा रमेश त्या टपरीवरच्या मालकाच्या मुलीसोबत लग्न करून , सासऱ्याच्या मदतीने एक छोटेसे हॉटेल चालवत होता आणि छोटा दीपक मात्र लग्न न करता समाजसेवेचे व्रत घेवून गावोगावी फिरत असायचा .महेश त्याला लागेल तसे पैसे पुरवत असायचा .

  महेश मात्र स्वतःला बसलेले गरिबीचे चटके मुलाला बसू नये म्हणून सर्वतोपरी मुलाला जपत होता ,वडिलांची कमतरता काय असते याची जाणिव होती म्हणून मुलासोबत त्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण नाते होते . पण त्याचबरोबर मुलगा योग्य मार्गावर जातोय का नाही यावर सुध्दा तो आणि राधा लक्ष ठेवून असत .प्रणव सुध्दा आई वडील दोघांच्या संस्कारात आणि योग्य तालमीत व्यवस्थित घडत होता . तर असे हे सुखी संपन्न त्रिकोणी कुटुंब साऱ्यांसाठी आदर्शवत असेच होते .


  नियती त्यांच्यावर अगदी मनापासून प्रसन्न होती !!

 प्रणव जरी सगळ्यात हुशार होता तरी व्यवहार ज्ञानापासून महेशने त्याला जरा लांबच ठेवले होते .त्याला वाटायचं , अजून प्रणव लहान आहे ,त्याचे खेळण्या बागडण्याचे दिवस आहेत ,आत्तापासूनच त्याला जबाबदारी देवून का त्याचे निरागस बालपण हिरावून घ्यायचे ?आत्ताशी तो तारुण्यात प्रवेश करत होता . आणि त्याला पुढे जावून दुसरे वेगळे काही करायची गरज नव्हती . महेशची स्वतःची कंपनी तयार होती त्याच्या

 भविष्यासाठी ! 

  २० - २२ वर्षाचा झाला की मग सांभाळेल सारं जबाबदारीने .म्हणून मग तो प्रणवला ह्या व्यवहारी जगापासून जरा लांब ठेवत होता .

 २-३ वर्ष अशीच निघून गेली . 

    एकदा एका मीटिंग साठी महेशला दोन दिवसासाठी बाहेर गावी जावे लागणार होते .एकट्याने जायचे तर तिघेपण सोबत जावू म्हणून मग तो त्या दोघांना पण चला म्हणाला . असेही ते तिघे बऱ्याच वेळा जात असत .महेशचेही काम होत असे आणि नंतर मग तिथला परिसर बघून , एक छोटीशी ट्रीप पण होवून जाई तिघांची . 

  दुसऱ्या दिवशी निघायचे होते ,सगळी तयारी रात्रीच करून , ड्रायव्हरला लवकर यायला सांगून तिघेही लवकर झोपले . जरा उशिरा प्रणव च्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी , एका साईट वर व्हिजीट द्यायला जायचे आहे ,तू पण येणार का ? म्हणून विचारले . प्रणवला अश्या व्हिजीट खुप आवडतं होत्या ,हे त्याच्या मित्रांना माहीत होत म्हणून मग ते बऱ्याचदा त्याला चल म्हणायचे .तो पण जायचा.

  प्रणव आई बाबाला विचारून सांगतो म्हणाला . त्याने दोघांना विचारले ,त्याची आवड लक्षात घेवून त्यांनी पण त्याला परवानगी दिली आणि नंतर त्याला त्यांच्या सोबत यायला सांगितले .त्यानुसार मग दोघे सकाळी लवकर आवरून निघाले आणि प्रणवने संध्याकाळी ४ पर्यंत मी येतो म्हणून त्यांना निरोप दिला .

  ११ वाजता त्याला एका अनोळखी नंबर वरून फोन आला , पण त्याने कंपनीचा असेल म्हणून कट केला . परत एकदा त्याच नंबर वर फोन आला ,म्हणून मग त्याने फोन उचलला . फोनवर जे ऐकले त्यामुळे तो चक्कर येवून खाली पडला .बाजूच्या मित्राने त्याचा फोन घेतला ,चालू होता म्हणून तो बोलू 

लागला , तो सुध्दा घाबरून गेला . फोन ठेवून तो पहिलं प्रणवला सावरू लागला , तोपर्यंत बाकीचे मित्र गोळा झाले , त्यांनी विचारल्यावर मित्राने सांगितले की , प्रणवच्या आई वडिलांचा अपघात झाला आणि ते दोघे आणि ड्रायव्हर जागेवरच गेले .

   पुढे काय करावे कोणालाही कळेना , प्रणव तर बेशुद्ध पडला होता. त्यांनी त्याच्या काकाला फोन केला , सुदैवाने सध्या ते नगर मध्येच होते त्यामुळे ते पण लगेच आले ,त्यांनी आधी प्रणवला हॉस्पिटल मधे नेले ,तो शुध्दीवर 

आल्यावर ,त्याला सावरून ते लगेच घटनास्थळी गेले , तिन्ही प्रेत ताब्यात घेवून ते घरी आले .

  पुढचे सारे सोपस्कार बाकीच्या साऱ्या नातलगांनी पार पाडले .प्रणव तर त्याची शुद्धच हरपून बसला होता . समोरचा जे सांगेल तस यंत्रवत वागत होता .त्याला कसे सावरावे कोणालाच कळत नव्हते .


**नियतीचा खेळ कधी कळला का कुणाला?**


  दहा दिवस झाले , सारे विधी पण पार पडले , जवळचे - लांबचे नातलग प्रणवला सावरायला सांगून निघून गेले .फक्त त्याचा छोटा काका त्याच्या जवळ थांबला . इतर नातलगांपेक्षा हा छोटा काकाच त्यांच्या घरी बऱ्याचदा येत जात होता . त्याचे आणि प्रणवचे छान जमायचे , आत्ता सुध्दा तो एकटाच थांबला होता प्रणवच्या काळजीने .

  प्रणव पार भांबावून गेला होता या प्रकाराने . कोवळे वय , नुकताच तर तारुण्यात प्रवेश केला होता प्रणवने . आई बाबाच्या सुरक्षित कवचामधून अजून तो बाहेर पण पडला नव्हता तोच असा भीषण प्रसंग त्याच्या पुढे उभारला होता .काय घडतंय याची त्याला जाणीव होत होती पण मन मात्र स्वीकारायला धजावत नव्हतं . काकालाही काही कळत नव्हते प्रणवला कसे सावरावे ? प्रणव सारखा शून्यात नजर लावून एकटक बघत बसायचा .स्वतःहून उठून काही करणं नाही की बोलणं नाही ! काका पण हतबल झाला होता पण त्याला प्रणवला एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं .खुप जीव होता त्याचा प्रणववर..

  एका सकाळी काका प्रणव अजून कसा उठला नाही म्हणून त्याच्या रूम मधे गेला ,दरवाजा नुसताच लावलेला होता .असेही हल्ली प्रणवला कशाचेच भान रहात नव्हते .यंत्रवत झालं होत त्याच जगणं .. 

   दार उघडून काका आत गेला आणि समोरचे दृश्य पाहून जोरात ओरडला , घरातले इतर नोकर रूम कडे धावले ,तेही घाबरले , प्रणवने पंख्याला गळफास लावून घेतला होता . काकाने त्याच्या पायाला धरून ठेवले ,थोडीशी धकधक जाणवत होती प्रणवच्या शरीरात .काकांनी नोकरांच्या मदतीने त्याला खाली घेतले , फॅमिली डॉक्टरला फोन करून सांगितले आणि लगेच त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले .तत्परतेने सगळ्या हालचाली केल्यामुळे प्रणव वाचला होता .त्याने नुकताच फास घेतला होता आणि थोड्याच वेळात काका आत आले होते .


   *** नियतीने पुन्हा एकदा सिद्ध केले , तिच्या मर्जीविन न जगणे , न मरणे ! ***


  १० दिवसांनी प्रणव घरी आला ,समोर आई बाबाच्या हार घातलेल्या फोटोला बघून त्याने जोरात हंबरडा फोडला . सारे नोकर आणि काका अगदी हेलावून गेले ,सगळे रडले .

  काका प्रणवला हळुवार थोपटत राहिला ,त्याला मनसोक्त रडू दिले . आज पूर्ण एक महिन्याने प्रणव ह्या परिस्थितीचा सामना करत होता . 

       " सत्य पचवणे अवघड असते ...

      पण ...

          कधी ना कधी त्याला ,

            सामोरे जावेच लागते !...."


 किती वेळ गेला कळलेच नाही .पण प्रणव आता बऱ्यापैकी सावरला होता .


     *** नियतीचा स्वीकार करणं एवढंच मानवाच्या हातात असतं ! ***


 काका त्याला त्याच्या रूम मधे घेवून गेला ,थोडेसे पाणी प्यायला सांगून त्याला झोपायला लावले .काका त्याला झोपवून माघारी फिरतच होता , तोच प्रणवने काकाचा हात पकडला आणि म्हणाला , " काका मला एकटं सोडून जावू नकोस ,मला ह्या एकटेपणाची खुप भीती वाटते रे ! "

काकाला गहिवरून आले ," तू झोप शांत , मी नाही जाणार कुठे तुला सोडून ." त्याला थोपटत मग काका त्याच्या उशाशेजारी , तिथेच बसून राहिला ..मनात म्हणाला , " तुला मी कधीच अंतर नाही देणार , सावली सारखा सोबत राहीन ! "...


  ***नियती एक मार्ग बंद करते पण ,

त्याचसोबत दुसरा मार्ग पुढे उभा करते ! " ***


   हसवते , रडवते न जाणे ,

  कोणकोणते खेळ खेळते !

   ही नियती मानवाला,

   आपल्या तालावर नाचवते !!

          कधी पंखांना भरारी , 

          कधी बुडत्याला आधार !

          सारीपाटाच्या डावामधली ,

          प्यादी देते राजाला मात !!


  माणूस कठपुतलीच आहे त्या विध्यात्याच्या हातातली .जन्म मृत्यू ती त्याचीच तर योजना असते .प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे सुख - दुःखाची वाटणी करून सारी कर्मे घडवून आणतो आणि फेडूनही घेतो !


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract