Jyoti gosavi

Thriller

3  

Jyoti gosavi

Thriller

नागराज आला पाहुणा

नागराज आला पाहुणा

4 mins
266


सकाळी सकाळी दरवाजावरती थाप पडली, कोणा असावं ?असा विचार करत मी दार उघडलं. दारामध्ये एक अनोळखी माणूस होता .

थोडासा उभट चेहऱ्याचा, किडकिडीत अंगाचा असा तो होता

 येऊ का घरात? त्याने हसत विचारले, 

मी चाचरत या! या! असे म्हटले, पण माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तो हसला, आणि म्हणाला

अहो ओळखलं नाही मला? अहो दरवर्षी मला बोलावता होता की तुम्ही, आणि वर्षातून एकदा येतो ना मी तुमच्या घरी, पाहुणा म्हणून. 

मी त्याला बसा म्हणून अंगुलिनिर्देश केला. अजून मनामध्ये विचारत चालला होता, 


कोण माणूस हा? 

हा कशाला येतो आपल्या घरी, ते पण दरवर्षी? आणि तरी पण मी ओळखत नाही. 

असेल बायकोच्या माहेरचा कोणीतरी! 

असा विचार मी केला,


बसल्यावर त्याला विचारलं, 


पाणी आणू? 


त्यावर तो म्हणाला नाही, पाणी नको, दूध द्या ,लाह्या आणल्या तरी चालतील सोबतीला. 


त्याचं हे बोलणं ऐकून मी बुचकळ्यात पडलो, 


अरे हा असा काय मागतो, आणि लोकांच्या घरी जाऊन कोणी डायरेक्ट दूध मागत का? वर लाह्या द्या पण म्हणतो. मधेच बोलताना तो फिस् फिस् आवाज करत होता. आणि आपली जीभ सारखी बाहेर काढत होता. 

जिभल्या दाखवत होता, एकदा मी बारकाईने बघितले तर त्याच्या जिभेला दोन फाटे फुटलेले मला दिसले. 

सौ काही बाहेर येईना, तिला वाटले माझाच कोणीतरी माणूस आहे. सकाळी सकाळी कशाला आलाय? आणि मी का त्याची सरबराई करू? बघू दे यांचं यांना, नको नको ती माणसं बोलावून ठेवतात, म्हणून ती बेडरूममध्ये निवांत लोळत राहिली. 

मी किचन मध्ये आलो, फ्रीजमधलं थंडगार दूध बाहेर काढलं, थोडं कोमट केलं आणि अचानक माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला,


  आज नागपंचमी! हा माणूस दूध मागतो, लाह्या मागतो ,हा कोण असेल? इच्छाधारी नाग तर नसेल? 

आणि खरंच सांगतो मंडळी, माझी बोबडीच वळली. 

मी हातात दुधाचा ग्लास घेऊन घाबरत घाबरत बाहेर आलो, त्या माणसाच्या हातात दिला .

पाहुणा हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन उगाच,चवी चवीने कमीत कमी  थोडा थोडा घोट घेत होता. तेवढ्यात आमच्या घरामध्ये एक उंदीर इकडून तिकडे पळाला, त्याबरोबर त्याने हातातला दुधाचा ग्लास टाकून उंदराच्या मागे धावला .

मी त्याच्याकडे बघतच राहिलो, 


अरेच्या ! हा उंदराला एवढा   घाबरत असता तर, सोफ्यावर जागच्या जागी उभा राहिला असता, पण तो तर उंदराच्या मागे पळत होता. 

शिवाय आमच्या घरातील सर्वांची फ्रेंडली असणारी मनी, त्याच्यावर सारखी फिस् फिस् करत फिस् कारत  होती. मग त्याने खाली टाकलेला दुधाचा ग्लास मी उचलला आणि आत नेऊन ठेवला, 

आता तर मला खूप राग आला.

 एक तर ते दूध पुसत बसावे लागणार होते. 

एरवी असे खाली पडलेले दूध आमची मनीमाऊ लगेच चाटून साफ करते. पण आज काय ती जागेवरची हालत नव्हती. 


अरेच्या! या मनीला काय झालं ?म्हणून मी कपडा घेऊन बाहेर दूध पुसायला आलो. 

बघतो तर तो माणूस जागेवरच  नव्हता .

आता होता, कुठे गेला? आणि सोफ्या कडे बघितले, तर सोफ्या वरती कुंडली घालून बसलेला अजस्त्र नागोबा फणा काढून बसला होता. 

अरे बापरे! माझी बोबडीच वळली माझ्या हात पाय लटलट कापायला लागले. शब्द देखील तोंडातून येईना. 

साप साप साप असे म्हणता म्हणता ते पसा पसा पसा असे शब्द तोंडातून येऊ लागले. आणि तेवढ्यात तिथून, नागोबा बसला होता त्या कोपऱ्यातून एक मानवी आवाज आला, 


अरे घाबरतोस काय ?मी तुझा मित्र आहे ना ? आणि आज तर नागपंचमी!तुम्ही आम्हाला घरी यायचे आमंत्रण देतात, आमची पूजा करता .नको असले तरी जबरदस्तीने दूध पाजता आणि आज मी स्वतःहून चालून आलो आहे, तर तू मला घाबरतोस? ये जवळ ये मी तुला काही करणार नाही,घाबरू नको. 


त्याबरोबर मी घाबरत घाबरत जवळ गेलो, आणि नागोबाने फिस् असा आवाज करत, आपला फणा उभा केला. त्याबरोबर मी एकदम घाबरून मागे पळालो. अरे गंमत केली तुझी, इकडे ये! मी काही करणार नाही. ये माझ्या फणी ला हात लाव.  मी जवळ जाऊन त्याच्या सुपा एवढ्या फण्याला हात लावला .बघ! बघ ! माझ्या शेजारी बसून बघ! दाबून बघ , तुला येथे कुठला मणी हाताला लागतो का? 


नाही! मी मान हलवली आता माझी भीती मोडलेली होती . मी त्याचा फणा दाबून- दाबून पाहिला, पण तेथे कोठेही मणी नव्हता, 


अरे बाबांनो! मी असा विचार केला, तुम्ही आमच्या पूजेसाठी आम्हाला कुठेकुठे शोधत फिरणार,गारुडी येणार आम्हाला पकडणार, आमचे दात काढणार, आमचा छळ छळ करणार, वरुन जबरदस्तीने दूध पाजायला लावणार, त्यापेक्षा आपण स्वतः जाऊन तुम्हाला एकदा खऱ्या खोट्या गोष्टी सांगाव्या, मग तुम्हाला पण इकडे तिकडे शोधायला नको .


पण माणसा लक्षात ठेव मला दूध आवडत नाही मी ते पाणी म्हणून पितो. अति दुध प्याल्याने मला त्रास होतो, मला अपचन होते, व माझा मृत्यु देखील होतो. माझे खाद्य बेडूक आणि उंदीर आहे त्यामुळे मी तुमचा मित्र आहे. माझ्याकडे नागमणी नसतो. मी इच्छाधारी नाही.


  मला कान नसतात मला ऐकू येत नाही मी त्या पुंगीला एखादे भक्ष समजून त्याच्या रोखणे आपला फणा डोलवत असतो. मी कोणत्याही गुप्तधनावर बसत नाही. माझ्या अंगावर केस नसतात, माझ्या डोक्यात मणीच नसतो ,तर प्रकाश कुठून पडणार? डुख धरण, आमच्या स्वभावात बसत नाही. माणसांएवढा पाताळयंत्री मेंदू,आमच्याकडे नसतो. 


आमचे सगळेच भाऊबंद विषारी नसतात, आणि शिवाय जोपर्यंत तुम्ही आम्हाला काही त्रास देत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या वाटेला जात नाही. आम्हीदेखील आमच्या जीवाला घाबरत असतो. हां! आता तुमच्या पुराणात ज्या काही कथा लिहिल्या, त्या नागांचे/सापांचे जतन करण्यासाठी लिहल्या. जेणेकरून माणसाने उठसूट आमच्या मागे लागू नये, आणि आम्हाला मारून टाकू नये. कारण कोणत्याही गोष्टीला धर्माचे अधिष्ठान लावल्याशिवाय, लोकांना ती गोष्ट पटली नसती. 


हा! जसा तुमचा मनुष्य लोक आहे, तसा पाताळात आमचा देखील एखादा नाग लोक असेल, जर तुम्ही परग्रहावरील एलियन वर विश्वास ठेवू शकता, त्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करता, तर तसा मानवी रूप धारण करणारा एखादा नाग लोक देखील असेल. भविष्यात कधी तरी कोणाला तो सापडेल. जशी पृथ्वी आहे ,तशीच खाली सप्तपाताळे आहेत ,आणि त्या शेवटच्या पातळ्या मध्ये नागलोक आहे. आता पुराणातील बऱ्याच गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर खर्‍या उतरु लागलेल्या आहेत, तर भविष्यात कदाचित आम्हाला देखील आमचे असे नागलोक असणारे भाऊबंद भेटतील. 


तोपर्यंत तुम्ही माणसं आणि आम्ही नाग /साप सरपटणारे जीव, या सृष्टी वर एकोप्याने नांदू या ! जशी तुमची सृष्टी आहे ना! तशीच ती आमची देखील आहे. तेव्हा मनुष्यप्राण्यांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो, की दिसला नाग की काठी घेऊन पाठी लाग हे आता सोडून द्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller