STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Drama Action Others

2  

Anjali Bhalshankar

Drama Action Others

मुखवटे..सौजन्याने

मुखवटे..सौजन्याने

5 mins
63

रोजच्या जगण्यात असंख्य प्रकारची माणसे भेटतात अनेक त्यांचे विचार एकत्रीत पणे आपलयाकडे येतात पंरतु त्यातले चांगले घेण वाइट बाजुला करण जे दुरूपयोगी आहे टाकाऊ विघातक आहे आणि जे आप लयासाठी आपल्या कुटुंब व समाजासाठी हिताचे आहे ते घेणे म्हणजेच सदविवेक बुद्धीचा वापर करणे होय. काय चांगले आहे काय वाईट वा काय खरे आहे आणि खोटे कोणते?हे काही लोकांना पक्के माहित असते याऊलट काही लोकांना आपल हित कशात आहे हेच मुळात समजत नसते अथवा कळले तरी फिकीर नसते समाजात अशा काही विचारसरणी आहेत ज्यांना हे पक्के माहित असते.याऊलट काही लोक असतात ज्यांना ठाऊक असत मानसानं मानसाशी कितपत,व कसे वागले असता तो स्व:ता सुखी होइल वा इतरांच्या दुःखाला कारणीभूत होणार नाही.उलट बुदधाचे वचन माणूस जन्मान एक वा नीच ठरत नाही कर्म व चारित्र्याने ठरतो.असाच एक अनुभव काही दिवसांपूर्वी आला जो जसाच्या तसा मांडत आहे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही पंरतु जे वाटले ते विनम्रपणे मांडले.काही दिवसांपूर्वी एक पीएचडी झालेले व देशविदेशातुन भटकून आलेले विचारवंत व अभ्यासक त्यांना भेटण्यासाठी आळखीतलया एका सरांनी निमंत्रण दिले.चला चार ज्ञानाच्या गोष्टी कानावर पडतील म्हणून मी गेले.तिथे साधारण पंधरावीस पूरूषमंडळी आधीपासून चर्चा करीत बसलेली.मी आत प्रवेश केला मुख्य हाॅल मध्ये लगेच एकजण खुर्चीवरून ऊठून खाली बसले व मला जागा करून दिली. मी इकडे तिकडे पहात, पुन्हा पुन्हा आतल्या खोलीत डोकावत होते की कुणी महीला आहे की नाही इथ. दहापंधरा मिनिट गेली तरीही आतुन कुणीही स्री बाहेर आली नाही.आता मात्र मला फारच अवघडलया सारखे झाल अगदी धरून आणलेल्या लहान मुलासारखी माझी अवस्था झाली.कधी ऊठून मी बाहेर पडतेय असे झाले होते.पंरतु सांगणार कोणाला ज्यांच्या सांगण्यावरून मी आले होते त्यांनी फोनवर सांगितलेले की घरी तुम्हाला व्यवस्थित बोलता येइल चार पाच मोजकीच माणसं असतील आता घरी म्हणलयावर सहाजिकच कुटुंब व ओघाने एकाद दुसरी महीला असणार हा माझा समज की गैरसमज झाला आणि तीच माझी चुक झाली आणि मी तिथे गेले.आता शांतपणे जे काय सुरू आहे ते ऐंकणयाशिवाय पर्याय नव्हता बर ज्या सरांनी मला बोलावले त्यांनाही कल्पना नसावी की माझ्याव्यतिरिक्त आणखी दोनतीन जणींना बोलावलेय त्या ऐनवेळी येणार नाहीत म्हणून.मी खाली मान घालून अत्यंत अवघडून कधी एकदाची ही चर्चा थांबतेय नी मी बाहेर पडेन या विचारात नीमुट बसले जे कुणी पीएचडी केलेले व परदेशात भेटी देऊन आलेले ग्रहस्थ होते ते सोफ्यावर बसले होते आणि त्यांच्या पायाजवळ एक बॅग होती ज्यात कदाचित महाप्रयासान कुठुन कुठुन शोधुन काढलेली छोटी छोटी ठराविक पुस्तक होती. डाॅकटर भीमराव रामजी आंबेडकर स्वामी विवेकानंद सावरकर आणि वेगवेगळया लोकांची पुस्तकातलं ठराविक पान ऊघडून त्यातली एखाददुसरी ओळ ते वाचुन दाखवित होते.मग मधुनच सावरकर व आंबेडकर यांचे हिंदू धर्म विषयीचे विचार किती जुळत होते मग आंबेडकर आमचे नाहीत का?असा प्रशन विचारत होते बाकीची मंडळी आपाआपले विचार मांडत होती काहीजण अंतर जातीय विवाहाविषयी तर काही जण बौध भिककुनी देवळात जाऊन बुद्ध वंदना घ्यावी व लोकांनी बुद्ध विहारात येऊन पुजा करावी असले बालीश विचार मांडले जे ऐकुन हसाव की रडावं समजेना ऐकदोघेजण म्हणले एकमेकांच्या घरी जाव विचारांची देवान घेवान करावी हे जरा बर होत मी ही कदाचित् त्यासाठीच इथवर आले होते.पीएच डी वालया ग्रहस्थानी हिंदू कोडं बील या डाॅकटर भीमराव रामजी आबेडकर यांच्याविषयी चागंदेव खैरमोडे लीखीत पुसतकातलया प्रस्तावणेत खैरमोडे यांच्या पत्नी श्रीमती द्वारका खैरमोडे यांनी लिहीलेल्या मोजक्या दोन ओळी वाचुन दाखवल्या त्या पुढिल प्रमाणे सारयां हिंदू समाजाला चिरकाल जगता यावे भारताचे स्वतंत्र अबाधित रहावे यासाठी धडपडणारया व भारताला मानाचे स्थान मिळवून देणारया डाॅकटर भीमराव रामजी अंबेडकर यांना अपमानित होऊन लोकसभेतून बाहेर पडावे लागले हा केवढा दैवदुर्विलास! पंरतु अजुन कीतीतरी महत्त्वाचे मुददे व की जी स्थिती शूद्र, दलीतांची होती तीच किंबहुना त्याहुनही वरचढ स्रीयांची होती हि स्थिती नष्ट होऊन स्रीयांना समान पातळीवर आणण्यासाठी हिंदू कोड बीलाची रचना करणे अत्यंत आवश्यक होते हे तत्व पुरोगामी विचारसरणी असलेलया सनातानी लोकांना पटले नाही एकंदर हिंदू सनातानयांना व प्रस्थापितांना डाॅकटर अंबेडकरांसारखया एक शूद्राकडून हे बील संहित करून घेणे म्हणजेच अधर्म म्हणून अयोग्य वाटत होते.ज्या लोकांनी भीमराव रामजी अंबेडकर हे घटनेचे शिल्पकार म्हणून स्तुती सुमने ऊधळली तेच काँग्रेसचे जातीवादी सदस्य आता आंबेडकरांचा विरोध करू लागली . सनातानयांमुळे अं आंबेडकराना झेलावा लागलेले मनस्ताप व मग राजीनामा स्त्रीयांचे हक्क त्याविषयी मांडलेले अभ्यास पुर्ण विवेचन खरंतर हिदू कोड बील हे संपुर्ण पणे स्रींयासाठी तयार केले गेले होते ते पास करण्यासाठी हजारो विरोधकांशी चर्चा करून त्यांची बाजू कशी चुकीची व समाजाला हानीकारक आहे हे पठवून देण्यासाठी कीती धडपडत होते राज्य घटना व हिंदू कायदा हि दोन बहुमुल्य व चिरंजीव देणी आपण भारताला देत आहोत ही जाणीव भीमराव अंबेडकराना कार्य प्रवृत्तीचे बळ देत होती हिंदू स्रीया विषयीचे कायदा सर्वश्रेष्ठ व्हावा म्हणुन प्रत्येक कलम पुन्हा पुन्हा तपासत होते लाहुन काढीत होते इतके परीश्रम घेऊनही सनातानी विचारांनी त्यांना इतक छळल की शेवटी व्यथित होऊन अंबेडकर यांनी मंत्रीपदाचा त्याग केला.यासारखे कितीतरी मुददे होते पंरतु पीएच डी केलेल्या त्या ग्रहस्थांनी आपली हजारो वर्ष चालत आलेली परंपरा अजिबात ढळू दिली नाही आणि त्यांना हवे तेच अभ्यासले?व चर्चेत विचार मांडले व आम्हाला जे हवय ते आम्ही गरळ ओकणार लोकांना पटवून त्यांच्या मनावर ठासणार सत्य लपविणार असत्य किंवा इतिहासांतले ओघवते एखादे वाक्याचा धागा पकडून सुतावरून स्वर्ग गाठणार हि वृत्ती दाखवून दिली .त्याःना दोन ओळीच महत्वाच्या वाटल्या.आणि hindu code bill better than constitution असेही जाहीर केले एकेक शब्द ऐकून डोक बधीर होत होत आणि डोळे स्थिरावले होते पुस्तकांनी भरलेलया त्यांच्या पायाखालच्या पीशवीवर हो!!!ज्या ठराविक पुस्तकातली,ठराविक अगोदरच घोकुन आलेली वचन ते आमच्यासमोर घोकत होते त्याच पुस्तकांच्या पिशवीवर ते चकक अधुनमधुन पाय ठेवत होते. आता मात्र कहर झाला होता मला पटकन सांगाव वाटल त्यांना अहो पुस्तक आहेत ती विद्या आहे तुमच्याच भाषेत सांगायचं तर सरस्वती आहे.ज्या पुस्तकातलं ज्ञान आम्हाला सांगताय त्यावरच पाय काय ठेवताय!!मला तर राग आला होता पंरतु माझा आग्रेसिव स्वभावाची कल्पना आहे मला ऊगिच एखाद दुसरा शब्द खरा असेल परंतु चुकीच्या पद्धतीने जाइल म्हणून मी शांत बसले शेवटी काहीतरी बोला मत व्यकत करा अशा आग्रह आल्याने मी कशीबशी दोनचार वाकय बोलले. काय बोलत होते माझे मलाच आठवत नाही चर्चा सत्र थांबल आणि मी तिथून धुम ठोकली सरळ घरी येऊन मोकळा श्वास घेतला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama