Gauri Ekbote

Abstract Action Fantasy

3  

Gauri Ekbote

Abstract Action Fantasy

मंगळ मिशन

मंगळ मिशन

2 mins
312


नासा च्या हेड ऑफिस मध्ये फुल गोंधळ होता सगळे विचार करत होते

वेग वेगळे ऑपशन suggestion येत होते

मी आपलं उशीर झाला म्हणून धावत पळत ऑफिस नुकतच गाठलं होत

बॅग जागेवर ठेवली तेवढ्यात ऑफिसबॉय ने सांगितलं लगेच बोलावलं आहे साहेबानी

एवढं काय झालं असेल.... का सगळे जमा केले.... हा विचार करत मी साहेबांच्या केबिन कडे निघाले तस हि त्यांना माणसं गोळा करायची सवयच

आत्ता आज काय नवीन खुळ डोक्यात ह्या माणसाच्या म्हणून मी गेले आणि केबिन च दार उघडलं ..सगळे सायंटिस्ट तिथे गहन विचारात होते

काय चाललंय काहीच कळेना ... मग आमचे बॉस ,,, खर सांगायचं तर बॉस कमी friend जास्तच एक एक गोष्ट explain करायला लागले

तर झालं असं कि -

आम्ही गेले १० महिने मार्स म्हणजे मंगल ग्रह ह्या प्रोजेक्ट वर काम करत आहोत ,,, रोज वेग वेगळे फोटो येतात त्यावरून तिथल्या वातावरणाचा आमच्या टीम ला अभ्यास करायचं प्रोजेक्ट . तर कल रात्री आमच्या बॉस च्या असं लक्षात आलं कि मार्स वर गेले दोन तीन दिवस खूप मोठ्ठा ढग तयार झालाय , आणि आज तो इतका मोठ्ठा झालाय कि त्याने सगळा ग्रहच व्यापून टाकलाय , त्या ढगाचा नीट अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं कि तो जर आज पृथ्वी वर असता तर आपल्याला खूप त्या पासून फायदा झाला असता (तो काय हे काही माझ्या लक्षात येत नाही ) , तर खूप मोठ्ठा फायदा झाला असता, सगळी टीम असं ठरवते कि तो ढग पृथीवर आणायचा त्याला तिथून ढकलायचा आणि पृथीवर ओढून आणायचा . मग काय आम्ही सगळे कामाला लागतो

काही लोक पृथीवरच असतात तिथून त्या ढगांचं निरीक्षण करायला, काही अंतराळातुन निरीक्षण करतात आणि मी व माझी ५-६ लोकांची टीम मंगळावर आम्ही तो ढग तिथून खूप काही उपकरण वापरून ढकलतो अंतराळात आणि आमच्या यानात बसतो त्या ढगाचा पाठलाग करायला

पण जस आमचं यान मंगळ ग्रहावरून अंतराळात येते.... आम्ही जस काही खूप खोल समुद्रात उडी मारल्यावर नाही का आपण पहिले एकदम खाली जातो आणि मग परत डुबकी मारून परत वर येतो तसे वर आलो , खाली असताना माझ्या मनात एकच विचार ,,, साल त्या ढंगाचं लोकेशन तर आपण नाही सोडणार ना ......... पण अंतराळातील आमची टीम त्याच्या मागेच असते ,,, पृथ्वी वरून सुद्धा काही लोक त्याला वेग वेगळ्या उपकरणांनी ओढत असतात आणि शेवटी एकदाचा तो ढग आम्ही पृथ्वी वर आणतो , मध्ये खूप अडचणी येतात पण त्या नंतर कधी तरी सांगेल

तर तो ढग पृथ्वी वर येतो इतर सायंटिस्ट जे chemical चेक करतात ते त्या ढगांचं परीक्षण करतात .. सॅम्पल घेऊन...... आणि मी मात्र माझ्या घरी येते

खुप मोठ्ठं मिशन आज पूर्ण झालेलं असत आणि घरी येऊन मी मस्त सोफ्यावर झोपते आणि अचानक झोपेत मी खाली पडते

आणि जाग आली ते आज पहाटेचे ५:२५am झाले होते ... मग लक्षात आलं अरे स्वप्न होत तर .....


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract