Gauri Ekbote

Tragedy

3  

Gauri Ekbote

Tragedy

संघर्ष

संघर्ष

5 mins
1.0K


काही स्त्रीयांच्या बाबतीत आयुष्य म्हणजे एक तपच असत , संघर्षमय जीवन काय ते ह्या मुलीन कडे पाहून कळत ... हो मुली च , जरी त्या वयाने मोठ्या झाल्या तरी, कारण एका तरुण रक्तासारख्या त्या कायम जोमाने, खंबीरतेने , न डगमगता आलेल्या परिस्थितीला, आव्हानाला समोर जातात , आणि कितीहि संकट आली तरी त्यातून मार्ग काढून बाहेर पडतात, सोशिकता, संयम, खंबीरता , दृढ विश्वास स्वतःवर आणि त्या विधात्यावर , हे देऊनच देव सर्वाना पृथ्वीवर पाठवतो, म्हणूनच त्या ह्या परिस्थिती ला हसत मुखाने हाताळतात आणि प्रत्येक स्त्री मध्ये हे सगळे गुणविशेष असतातच.

सरिता , नावा प्रमाणेच निर्मल, निखळ, सगळ्यांच होत तस हीच ही योग्य वयात लग्न झाल. आई वडील चांगला जावाई मिळाला म्हणून खुश होते . सुखी संसारची स्वप्न सरिता आणि सारंग ने पाहायला सुरुवात केली. सुरूवातीच वर्ष सणवार ह्यात संपल , नंतर ती दोघ खूप छान रमली संसारात . त्यांना एक सुन्दर , गोंडस मुलगी झाली , आणि तिच्यामुळे त्याचं घरच भरल , खूप छान चालल होत.

पण नियतीला हे मान्य नव्हत , आणि एक दिवस सारंग घरी येताना त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि काळाने घात केला सारंग जागीच गेला , सरिता साठी हे दुःख म्हणजे इतका मोठा धक्का होता कि ती मान्यच करायला तयार नव्हती कि सारंग नाही , पण मुलीकडे बघून ती सावरली , आता आपल्यालाच मुली कडे बघायचं , तिच्या भविष्याबद्दल आपण आणि सारंग ने जे स्वप्न बघितल होत आता ते आपणच पूर्ण करायचं खूप शिकवायचं होत सारंग ला तिला. तिला मोठ करायचं हे एकच उद्दिष्ट आता सरिता च होत . जेम तेंम ४ varsh मध्ये होती अवनी, सारंग वारला तेव्हा आणि तेव्हापासूनच सरिता तिच्या साठी तिचे बाबा आणि आई.


माधवी....बोलायला अतिशय मधाळ, गोड मुलगी. तिने तीच BSC computer मध्ये प्रथम श्रेणीत पूर्ण केला आणि MSC computer ला Admission घेतली . माधवीच्या आई वडिलांना तिचा खूप अभिमान होता . वडिलांची तर ती खूप लाडकी होती , त्यांना माधवी हि एकच आपत्य .हिलाच खूप शिकवायचं मोठ करायचं , तिच्या पायावर उभ करायचं हे येवढ त्या दोघांच स्वप्न . पहिल वर्ष खूप छान गेल पण दुसया वर्षी हार्ट attack ने तिचे वडील वारले .आई housewife. नातलगानी आता हि जवाबदारी आपल्यावर येईल म्हणून येण कमी केल , माधवीला जॉब शोधण अपरिहार्य होत , पण नशिबाची साथ तिला एका चांगल्या private कंपनी मध्ये नौकरी मिळाली शिवाय बाहेरून तिने पुढच्या शिक्षणा साठी फॉर्म भरला, तिने स्वतःला आणि आई ला ह्या धक्क्यातून सावरल. आणि खंबीरपणे जवाबदारी उचलली. आज तिने MSC computer पूर्ण केलय, आणि एका मोठ्या MNC मध्ये ती नौकरी करतीय .


मेघना लाघवी मुलगी ,नाईक कुटुंबात दोन मुलांन नंतर झालेली. एकुलती एक म्हणून खूप लाडात वाढलेली . तीच BA झाल आणि एक लांबच पण चांगल स्थळ आल. जवळच्याच एका ने सुचवलेल. भावांनी आणि वडिलांनी जाऊन शेजारी पाजारी चौकशी केली मुलगा माधव चांगला आहे म्हणून कळाल. भरपूर हुंडा देऊन आणि धूम धडाक्यात, सालंकृत लग्न लाऊन दिल . लग्ना नंतरचे सणावाराचे दिवस संपले आणि हळू हळू त्या मुलाचे आणि त्याच्या घरच्यांचे एक एक नखरे सुरु झाले .

माहेरी साधी भाजी चीराची सवय नसलेली मेघना रोज लवकर उठून सर्व झाड झुड आवरून सकाळचा नाश्ता, दुपारच जेवण , भांडी धुण, करू लागली , तिची नणंद गावातच राहत होती, ती ही रोज घरी येऊन राहू लागली , तिच्या बरोबर तिचा नवरा, दोन मुल पण असत , मेघना हे सुधा हसत करत होती पण त्या नंतर तिच्या सासरच्या कडून पैस्याची मागणी होऊ लागली. घरात वाशिंग मशीन घ्यायचं माहेरून पैसे आण, भाज्या खराब होतात, घरातल फ्रीज खराब झालय नवीन घ्यायच, देतील का तुझे भाऊ आणि वडील पैसे, अश्या प्रकारे तिचा छळ सुरु झाला .

मेघना आणि माधव कधी एकत्र आलेच नाही त्यांची मन कधी जुळलीच नाही . खरी परिस्थिती वेगळीच होती , माधवला दारूच व्यसन होत हे लग्ना नंतर थोड्याच दिवसात मेघनाला कळाल . पण ते तिने माहेरी नाही कळवलं , जेव्हा मेघनाचे भाऊ आणि वडील लग्ना आधी चौकशी साठी येणार होते तेव्हा आधीच माधवच्या आईने शेजारी सांगून ठेवल होत . काही दिवसात मेघनाला हे हि कळाल कि माधवच्या व्यसनाने आता त्याच शरीर पूर्ण खंगून टाकल आहे , एक दिवस त्याला दवाखान्यात admit कराव लागल आणि त्या नंतर तो घरी आलाच नाही .

जेम तें दीड वर्षाचा संसार त्या दोघांचा . नंतर मात्र मेघना च्या दोन्ही भावांनी तिला घरी आणल आणि परत त्या घरात कधी तिला नाही पाठवलं , तिच्या सासूने खूप फोन केले पण खरी परिस्थिती कळल्यामुळे त्यांनी तिला कधीच परत पाठवल नाही. त्यांनी तिला B.Ed केल आणि एका शाळेत आज मेघना शिक्षिका म्हणून आहे .  


नयना अतिशय सुंदर , ती १२ वी शिकत असतानाच तिची आई वारली. वडिलान साठी हा धक्का सहन करण्या सारखा नव्हता, त्यांना त्यात एक हार्ट attack येऊन गेला . कस तरी ते तिच्या साठी जॉब करत . त्यांनी नयनाला शिकवलं MCA केल. चागल्या कंपनी मध्ये तीला नौकरी मिळाली .

वडिलांनी तीच लग्न एका चागल्या घरात लाऊन दिल मुलगा समीर सुद्धा एक software developer चांगल्या कंपनी मध्ये नौकरीला . त्याच्या घरात आई वडील , मोठा भाऊ वाहिनी . कसलीच कमी नव्हती , पण नयना आणि समीर च्या लग्ना नंतर समीर च्या मोठ्या भावाने इस्टेटी साठी भांडण सुरु केल आणि घरात वाटणी मागू लागला येवढे दिवस प्रेमाने मोठ केलेलं घर आता वाटल जाईल , दोन तुकडे होतील , एकत्र कुटुंबच स्वप्न बघितलेले समीर चे आई वडील ह्या वागण्या मुळे धास्तावले , शेवटी भांडण खूप टोकाला गेल, वाहिनी वाटणी होत नाही म्हणून माहेरी निघून गेल्या आपल्या मुळे आपल्या मुलाचा संसार मोडू नये म्हणून त्यांच्या घराची वाटणी झाली, सर्व गोष्टी सम समान वाटल्या गेल्या मोठ्या भावाने आई वडिलांची जवाबदारी समीर वर टाकली आणि स्वतःच्यावाटेच सर्व विकून तो गाव सोडून निघून गेला , आई बाबांसाठी हा खूप मोठ्ठा धक्का होता, पण नयना ने त्यांना सावरल, सांभाळून घेतल. मला तुमची मुलगीच समजा म्हणून तिने त्यांना दोघांना आधार दिला, आज ती आई वडिलान प्रमाणे त्यांची काळजी घेते. मधून मधून तिचे वडील पण त्यांच्या कडे येतात . नयना आणि समीर ला दोन जुळी मुल आहे ते आजी आजोबा बरोबर खूप छान राहतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy