Gauri Ekbote

Inspirational

3  

Gauri Ekbote

Inspirational

नंद यशोदा

नंद यशोदा

1 min
182


गेली १०१ वर्ष आज पूर्ण झाली ऋषी द्रोण आणि त्यांची पत्नी धारा ह्यांच्या तपश्चर्येला , भगवंताने फक्त एकदा दर्शन द्यावं एवढीच इच्छा

त्या दर्शनाने सगळी पाप , सगळे जन्म उजळून जातील , त्याची भक्ती अशीच सतत मनात राहू दे आणि ती अशीच वृद्धिगत होऊ दे हेच मागणे

ह्या साठीच हि दोघे गेली १०० वर्ष त्या परमात्म्याची मनोभावे पूजा अर्चा तपश्चर्या करत होते

आणि आज तो सोनिया चा दिवस उगवला , त्या दोघांच्या त्या कठोर व्रताला त्या तपश्चयेला आज फळ आलं आज जीवन सार्थकी लागलं , साक्षात ब्रह्म देव ह्या दोघांपुढे प्रगट झाले , दोघांनीही त्यांचे मनोभावे पूजा केली, नाना विविध फुलांचे हार त्यांना वाहिले , त्यांची यथासांग पूजा अर्चा करून नैवेद्य दिला. त्यांच्या भक्तीला आज फळ आलं होत देवानं विचारलं " काय वर देऊ मी तुम्हाला " . दोघे हि बोलले - "हे परमात्मा परमेश्वर आपले दर्शन झाले हेच आमचे अहो भाग्य, आमचे एकच मागणे आहे जेव्हा भगवान विष्णू स्वःतः ह्या पृथ्वीवर जन्म घेतील , तेव्हा हे भगवन , त्या जगदीश्वरची सेवा करण्याचे , त्याच्या त्या लीला बघण्याचे , आम्हाला भाग्य लाभो , आमच्या हृदयात त्या भगवंताची प्रेममयी भक्ती त्या वेळेस राहो हेच आमचे मागणे" ब्रम्हदेव " तथास्तु " म्हणून अदृश्य झाले .

आणि ऋषी द्रोण , माता धारा ह्यांचा हा जन्म सार्थकी लागला . पुढच्या जन्मात ऋषी द्रोण वृंदावनवासी नंद म्हणून जन्माला आले आणि त्यांची पत्नी धारा माता यशोदा . 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational