Gauri Ekbote

Fantasy

3  

Gauri Ekbote

Fantasy

एक स्वप्न

एक स्वप्न

3 mins
1.1K


असं म्हणतात आपण जे दिवसभर अनुभवतो, वाचतो, पाहतो तेच आपल्याला स्वप्नात दिसतं, पण काल हे मी चक्क अनुभवलं.

मयुची दुसऱ्या दिवशी SST ची म्हणजे इतिहासाची क्लास टेस्ट होती. so  आम्ही अभ्यास करत होतो, lesson म्हणजे धडा... तो  होता १८५७ चा उठाव,

तो का झाला, त्याची कारणं आणि तो कसा दाबला गेला किंवा पूर्णत्वाला कसा गेला नाही ह्याची कारण होती...  अभ्यास झाला, जेवण झालं आणि झोपलो.


अन जाग आली ती एका सैन्याच्या तुकडीतच... थोडं विचित्रच वाटलं... सगळीकडे बघितलं

आणि शेजारून जाणाऱ्या एकाला थांबवला आणि विचारलं कि आजची तारीख काय...

वेड्यातच काढलं त्याने...

परत त्याला दंडाला धरलं आणि हूल देत विचारलं मग तो बोलला कि २८ मार्च....

मी ओरडलोच... अरे पूर्ण सांग सालासकट...

मग  तो बोलला २८ मार्च १८५७...

मग लक्षात आलं अरे आपण इतिहासात जवळजवळ १६२ वर्षे मागे आलोय आणि हा १८५७ चा मार्च महिना आहे...


ओह्ह्ह्ह... थोडा वेळ हादरल्यासारखं झालं पण नंतर  भारीच वाटलं. आणि लक्षात आलं आपण आत्ताच जर मंगल पांडेला शोधलं आणि सगळं अगदी सगळं जे काल मयूकडून घोकून घेतलं ते त्यालाही सांगितलं तर... तर कदाचित इतिहास काहीतरी वेगळाच होईल... हे युद्ध देशभर होईल... आणि... आणि इथेच गोरा साहेब पळून जाईल आणि पुढची पिढी काहीतरी नवा अजून सुंदर इतिहास घडवे...

कसला भारावून गेलो होतो मी... आणि... तेवढ्यात कोणीतरी पाठीवर थाप मारली

मागे वळून बघितलं तर, एक उंचपुरा, पिळदार मिशीचा माणूस होता...

कोण रे तू? त्याला का अडवलं? आणि तारीख का विचारत होता त्याला?

मी घाबरतच बोललो मी... मी...

बस कळलं जास्त आवाज  नाही पाहिजे काय... आणि कापडं काय असे घातले ... कुठून आला रे? इथं काय करतोय? सायबानं काय हेरगिरी करायला पाठवलं की काय तुला?

...मी घाबरतच उत्तरलो मी... मी २०१९ मधून आलोय... माहित नाही कसा आलो...

आणि एकदमच एक हश्या झाला सगळीकडे....


तो बोलला भविष्यातून आलाय... हा हा... काय रे सकाळी सकाळी घेतली की... जास्त चढली...

मी बोललो, अहो नाही मलाच कळत नाही मी कसा आलो पण मी तुम्हाला काही आता घडणाऱ्या गोष्टी सांगू शकतो. बघा खऱ्या झाल्या तर ठेवा विश्वास... पण मी तुम्हाला खूप मदत करू शकेल, झाला तर फायदाच होईल तुम्हाला...

आणि एक विचारू का... तुम्ही... मी पुस्तकात बघितलेल्या फोटोप्रमाणे... तुम्ही मंगल पांडे... तेच का?

तो बोलला, "ए... जास्त बोलतो रे तू... ओळखतो कसा रे मला... मला तर नक्की तू हेरच वाटतो."

ह्यावरून माझ्या एक लक्षात आलं की मी ज्यांच्याशी बोलत होतो ते नक्की साक्षात मंगल पांडेच आहेत...

मग थोडी हिम्मत आली... आणि मग मात्र माझी देशभक्ती जागी झाली...


मी पण मग त्यांना सांगितलं, बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंग्रज सरकारने एक नवी बंदूक introduce केली आहे बरोबर... म्हणजे नवी बंदूक तुम्हाला सैन्याला दिली आहे चालवायला... पण त्यात भरावयाचे जे Cartridge... म्हणजे काडतूस आहे त्याला गायीच्या वा डुकराच्या चरबीत बुडवलेली आहेत.

हे ऐकून तो जाम चिडलाच आणि माझी कॉलरच धरली...

मी बोललो, अरे हो हे खरं आहे वाटलंच तर तू check कर... तपासून बघ...

''इथेच थांब... हालयच नाही... आलोच मी," असं बोलून तो गेला आणि मी तिथेच एका झाडाखाली बसलो...

जवळजवळ अर्ध्या तासाने  तो लांबून येताना दिसला आणि काहीतरी खूप कर्कश्श कानाजवळ वाजलं...

खडबडून जागाच झालो....

मग लक्षात आलं की हे एक स्वप्न होतं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy