मी व माझी कविता।
मी व माझी कविता।


मी व माझी कविता।
कवितेची व्याख्या काय करावी? असा जेव्हा प्रश्न पडतो, तेव्हा एक कवयित्री म्हणून,
"कवी मन रे माझे,
थोडे हळवे आहे
समजून घे."
मी असेच म्हणेन. होय,कविता व कवी मन हे एका नाण्याचे दोन रूप. माझ्या मते,
"असेल जे कवीच्या मनात,
दिसेल ते कवितेच्या रूपात."
कवीच मन हळवा असतो. म्हणूनच तो भावनांनी भरला असतो.
"कवी मन रे माझे,
भावनांनी भरले आहे,
समजून घे."
कवीचे हळवे, भावनांनी भरलेले मन कल्पनेत तरंगू लागते, आणि असे कल्पनेत तरंगणारे मन, स्वप्नाळू असते. त्याच्या या स्वप्नाळू पणाला , कधी कधी हा जग पागलपणा समजू लागतो. आणि म्हणून खुपदा "कवी, साहित्यिक पागल असतात." असे ऐकिवात येते.
"कवी मन रे माझे,
थोडे स्वप्नाळू आहे
समजून घे"
जगाच्या रहाट गाडग्यात अडकलेला कवी, पण एक वेगळे भावविश्व जपून ठेवणारा, हळव्या, भावनाशील मनाचा कवी, जेव्हा दुखावला जातो, तेव्हा नकळत त्याचा मन आतमधून रडत असतो. प्रत्येक वेळेस त्याचे हे दुख: स्वतचेच असेल असे नाही. तर भावनांच्या अतिरेकी पणामुळे तो कधी कधी, दुसऱ्यांच्या दुख:त वाहून जातो.
"कवी मन रे माझे,
थोडे रडवे आहे,
समजून घे।"
आणि असे हे कवीचे मन, भावनातिरेका मुळे, सभोवतालील सुख- दुख:त वाहून जात, त्या अनुभूतीला जेव्हा अवगत भाषेत व्यक्त करतो, तेव्हा कविता जन्माला येते. व त्या कवितेत फक्त शब्दांचे गुच्छेच राहत नाही, शब्दांचा माराच राहत नाही तर, भावनांचे प्रकटन होते.
कवीच्या मनाला एखाद्या विषयात बांधून ठेवून, अस्सल कवितेची निर्मीती करता येवू शकत नाही. तर तो केवळ शब्दांचा जाला गुंतला जावू शकतो.
कवीमन व कविता समजायला, व्यक्तीत थोडा व्यापक दृष्टीकोण असावा लागतो. तेव्हाच त्या कवितेच्या भावार्थाचे आस्वाद घेता येते.
"कवी मन रे माझे
जरा उघडून मन चक्षू,
समजून घे।
समजून घे।"