Asmita prashant Pushpanjali

Tragedy

4.9  

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

वाट

वाट

7 mins
15.9K


आईच्या डोक्यावरील केस पाढरे शुभ्र झाले होते. दात पण बरीचशी पडली होती. हातात काठी आली होती. ती अजुनही पायी चालत, गावाबाहेरील मंदिराच्या मागील लिंबाच्या झाडाखाली असलेल्या मोठ्या दगडावर येवून बसने तिचा नित्यक्रमच होता.

दिवसभर एकटीच तिथ बसत असे. जणू कुणाचीतरी वाट बघतेय. पण ती ज्याची वाट बघत होती, तो तर कित्येक वर्षापासुन परतलाच नव्हता. असे नव्हते की तिला माहित नव्हते, तो जीथ गेलाय तिथून कधी परतणार नाही,पण शेवटी मायेची ममता ती. ती वेडी नव्हती की खुडी नव्हती. पण तिच्याजवळ वाट पाहत बसण्याशिवाय काही पर्याय ही नव्हता. "वाट" तेवढाच एक तिचा जिवन जगण्याचा आधार.

आई त्या दगडावर बसून , गावाबाहेरुन येणाऱ्या वाटेकडे डोळ्याची पापणी न हलविता बघत बसायची. आजही तसेच झाले. तिच्या डोळ्यासमोर एक मिल्ट्रीचा ट्रक येतांना दिसू लागला, छोट्या अरुंद गल्लीत प्रवेश करुन थांबला, मिल्ट्री पोशाखातील चार सहा जणांचे बुटातील पाय खाली उतरले, अगदी तसाच पोशाख व तसेच बुट जसा दिनेश घरी परतला की पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी असायचा. खांद्याला मोठी बँग असायची, आणि घरी मांजरचोर पाउलाने प्रवेश करीत आईला मागवून मिठी मारायचा, अगदी एक लेकराचा बाप होइस्तवर. पण आज आईला उतरणाऱ्या त्या मिल्ट्री जवानांमधे दिनेश दिसला नाही, ती "दिनू" म्हणत ओरडत त्या ट्रक कडे जाणार तोच, त्या चौघांनी तिरंग्यात गुंडाळलेली एक मोठी ट्रंक काढली. आणि काय होतेय हे कळायच्या आत आई तीथच अचेत होवून पडली.

जेव्हा आईने डोळे उघडले, ती गरगरत्या पंख्याखाली, दोन तीन महिलांच्या छातीशी व चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे होते. आणि समोर नजर पडताच, दोन्ही डोळे बंद केलेली व फक्त चेहरा उघडा ठेवून बाकी शरिर झाकलेला एक देह तिला निश्प्राण दिसला. डोळे भरून बघितले तीने, "दिनू" तीने हंबरडा फोडला. ती पुन्हा अचेत होते की काय, सर्वांना वाटले, पण ती पारड हरवील्या हरिणी प्रमाणे, कावरत दिनूच्या पार्थीवाकडे धावली. त्याच्या मुखाला गोंजारू लागली, "बाळा, उठ। उठ। आज नाही का चोरपावलाने यायच। आईला मिठी नाही का मारायची. " आणि धायमोकल होवून रडू लागलीजी अवस्था तिची होती, त्याच्यापेक्षा वेगळी स्थिती दिनेश च्या पत्नीची नव्हती. लग्नाला जेमतेम दोनच वर्षे झाली होती. आणि मुल तर अजुन दुधावरच होते. तीच्या डोळ्यातील पाणी आटले होते. ती बाजुलाच कोपऱ्यात मांडिवर दुधावरील मुलाला घेवून, भिंतीला टेकून शुन्यात नजर गडवून वर बघत बसली होती.

मागच्याच महिण्यात घरी आलेला दिनेश तिला आठवला. आठवड्याच्या सुट्टीवर आलेला दिनेश आई समोर व इतरांसमोरही मनसोक्त हसत खेळत होता. पल्लवीला पण अगदी परत जाण्याच्या एका दिवसाच्या आधीच्या रात्री पर्यंत दिनेश च्या मनात काय साचल आहे हे कळले नव्हते.नेहमी प्रमाणेच रात्रीचे जेवण् खावण् होवून आई सोबत काही गप्पा टप्पा मारतांना, दिनेश ने तीथेच आईच्या कुशीत लोळत घातली.

"काय झाल बाळ। धकलास का?"आई ने डोक्यावरुन हात फिरवत विचारते

"नाही ग। सहज। मी उद्या जाणार ना। आज तुझ्या कुशीत थोड पडाव वाटतय।" त्याने डोळे बंद करून म्हटले. काही क्षण दोघही माय लेक गप झाले. आत मधे पल्लवी खांद्यावर आपल्या बाळाला घेवून थोपटत काही तरी गुणगुणत झोपवीत होती. घरात फक्त पल्लवीच्या गुणगुणन्याचे आवाज येत होती. बाकी शांत.

आईने एक सुस्कारा सोडला, आणि तिला काही आठवले

"दिनू। तु पण येवढाच होता, जेव्हा तुझे बाबा गेले. त्यांनी तर तुला बघितले पण नव्हते. तुझ्या जन्माच्या वेळी त्यांना सिमेवर पाठविण्यात आले होते. खुप पेच प्रसंग होता तेव्हा . रात्र रात्रभर डोळ्यात अंजन घालून ते जागत असत. त्या सहा महिण्यात त्यांनी फक्त एकदाच सुट्टीचा अर्ज टाकला होता, तो मंजुर केला गेला नाही, हे म्हणून "क्या बच्चे का मुह देखना देश की रक्षा से ज्यादा जरूरी है। देश वासियोकी जान और माल की सुरक्षा से भी।" तेव्हा पासून तु सहा महिण्या झाला तरिही तुझ्या वडिलांनी पुन्हा कधी सुट्टी साठी अर्ज केला नाही. पण आमचे पत्रांद्वारे बोलणे व्हायचे. त्यांनी तुला न बघताच तुझ्यासाठी भविष्य रंगवीले होते.

मला एका पत्रात बोलले.

"कौसल, आपला दिनू आर्मीमँन म्हणूनच शोभेल बघ। धस्टपुस्ट शरिर. मोठा आँफिसर करेल मी त्याला मिल्ट्रीचा।" पण हे स्वप्न पुर्ण करायला ते राहिले नाही. तुला आँफीसर बनलेल ते पाहू शकले नाही." आणि तीच्या डोळ्याला धारा लागल्या. त्या गालावरून घरंगळत दिनेश च्या कपाळावर पडल्या. दिनेश चे बंद डोळे उघडले. त्याला ही कथा व आईची ही अवस्था नवीन नव्हती. बालपनापासून त्याने कितीदा तरी आईच्या आयुष्यातील ही घटना त्याने ऐकली होती. फक्त काळाप्रमाणे एक दोन वाक्याचे फरक राहाये. पुर्वी "तुझ्या बाबाच्या स्वप्नाप्रमाणे तुला मोठ आँफिसर व्हायच आहे." आणि नंतर "तुला आँफिसर झालेला पहायला ते नाहीत."

दिनेश ने दोन्ही हाताने आईचे अश्रू पुसले आणि तीच्या गळ्यात पडला. ती शांत झाली तेव्हा, "चल बर झोप तू। मीअ पण झोपते, मला उद्या जायच आहे. मी गेल्यावर परत अशी रडत बसू नको।" त्याने आईला बेडवर झोपवत म्हटले. "नाही रे। सहजच आठवल म्हूण। एरवी मी कुठ रडते." आई

दिनेश पल्लवी जवळ आला. बाळ झोपला होता पण अजून तिच्या खांद्यावर होता. दिनेश ने त्याला आपल्या कुशीत घेतले आणि कपाळावर एक हलकेसे चुंबन केले. आणि त्याला पाळण्यात झोपवले. पण त्या पुर्वी त्याला छातीशी घट्ट कवटाळून काही क्षण तसाच डोळे बंद करून राहिला. तेव्हा त्या चिमुरड्याने झोपेतच स्मित हास्य केले. आणि दिनेश च्या डोळ्यात पाणी तराळले.

बाळाला पाळण्यात ठेवून, पल्वीच्या खांद्यावर हात ठेवून तीला बेडवर घेवून आला. दिनेशच्या डोळ्यात पाणी पाहून, तिच्या काळजात गलबला सुरू झाला।

"काय झाल?अस का करतोयस? हे अश्रू का?" पण तो काही क्षण तो काही बोलला नाही.

त्याने पल्लीच्या हाताला घट्ट पकडून , दोन्ही हाताची मुठ आवळली, आणि तीच्या दोन्ही हाताचे चुंबन घेवू लागला. तीला माहित होत दिनेश जरी आर्मीत असला, पण हळव्या मनाचा होता. मात्र आज पर्यंत त्याच्या डोळ्यातं अश्रू तिने पाहिले नव्हते. तीने लगेच त्याला छातीशी कवटाळले.

"काय झाल? मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार।"

"मी अजुन घरी एक गोस्ट सांगितली नाही. " दिनेश

" अरे मग आता सांग न। अशी मनात साचवुन रडतोयस का?" पल्लवी

" इथून गेल्यावर, कदाचित मला एका मिशनवर जाव लागणार आहे. किती दिवस सांगता येत नाही. परिणाम काय होइल हे ही सांगता येत नाही..आमच्या काही गोस्टी खुप गुपीत असतात. घरी पण सांगू शकत नाही. "

तो थोडा थांबला।

"हे विशेष मोहिम आहे. म्हणून इथे समाविष्टांना स्पेशल आठ दिवसाची सुट्टी देवून, परिवाराशी भेटायची परवानगी मिळाली." दिनेश

"म्हणजे तु युध्दात जाणार आहेस." पल्लवीचा मन कापून उठले. स्थिती पाहून

"अस काही नाही की ते युध्दच.असेल। असे छोटे मोठे आँपरेशन नेहमीच होत असतात." दिनेश ने तीच्या मनाची समजुत काढली.

आता मात्र पल्लवीचा धिर कोसळणार होता. तिच्या पायापासून ते मस्तीक्षापर्यंत शिरशिरी उठली. तिने दिनेशला घट्ट मिठी मारली.

दिनेश तीला थोपटू लागला.

" पल्लू। तु अशा परिवाराची सदस्य आहेस, ज्या परिवारात जवानांच्या पिढ्या गेल्या. तुझे सासरे ही जवान होते. तुझ्या सासुचे सासरेही जवानच होते. आणि आता तुझा पतीही जवानच आहे. सैनीकी परंपरा आपल्या वंशाला आहे. पण आज मला तुला एक सांगायचे आहे. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मला काही होवू दे, मी तुला कोणत्याच शब्दात अडकविणार आहे. आपल्या बाळाचे संगोपण,शिक्षण तु कसे करावे हा फक्त तुझा निर्णय व अधिकार असेल. त्याने भवीष्यात काय बनावे, काय करियर कराव ही संपुर्ण इच्छा त्याची व तुझी असेल. मी त्याला नाही बंधनात अडकविणार, की त्याने सैन्यातच जावून वंशाचा वारसा चालवावा।" "दिनेश, प्लीज। अस काही बोलू नकोस। तुला काहीच होणार नाही।" आणि तीने त्याच्या मुखावर हात ठेवले.

तीच्या हाताला हातात घेवून त्याने एक पप्पी घेतली.

"अग वेडे। मी कुठ अस म्हणतोय की अस होणार आहे, मी बोलतोय, अस झाल तर।।।।"

" नाही। मी असा विचारही नाही करू शकत।" ती रडकुंडीला आली.

"शांत हो।" तो तीला थोपटवत शांत करीत होता.

पल्लवी अजुनही तशीच शुन्यात दिनेश ला बघत होती. डोळ्याच्या धारा मात्र आटल्या होत्या।

कुणी तरी आई ला बोलले.

"कौसल बाई सांभाळा स्वताला। बघा पल्लवीकडे. तीच्या डोळ्यात एक ही अश्रू नाही."

आई ने तीच्याकडे पाहिल. पल्लवीचा बाळ मांडिवरुन उतरून खाली खेळत होता, आणि ती मात्र तशीच।

आई, "मी माझा कुंकू गमावल्याचा दु:ख सोसल. पांढऱ्या कपाळावर आयुष्य काढल, पण तिला कशी म्हणू तीच्या कुंकवाला गमावल्याच दु:ख सोस।तीच्या कुंकवासोबत माझी कुस गेली. मी कुंकवाच दुख सोसल पण आता कुसीच दु:ख कशी सोसू।" आई व्यथा वेदना मांडून रडू लागली.

"सोसाव लागेल ताई. जवानांच घर आहे हे। आणि तुमची कुस गेली तिचा कुंकू गेला पण, त्याचा वारसा आहे तीच्या मांडिवर। त्याच्यासाठी तुम्हा दोघींना ही दिनेश मिशन मधे विरगती ला प्राप्त झाल्याचा हा धक्का सोसावा लागेल. सावराव लागेल." अगदी जवळची कुणी तरी आईला समजावीत होती.

येव्हाना मयत मशान घाटावर नेण्याची तयारी पुर्ण झाली होती.

सरण रचले होते. आणि सरणावर दिनेश चा तिरंग्याने झाकलेला मृतदेह ठेवण्याआधी तिरंगा काढण्यात आला.

घडी करून तो आईच्या हातात सोपवत, " आमचा आँफिसर लढवैया होता. विर होता. पराक्रमी होता. तो जिव वाचविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला शरण गेला नाही. शेवट पर्यंत लढत राहिला, आपल्या सहकार्यांना सोडले नाही. आपल्या प्राणाची आहूती दिली पण शत्रूला देशाचे घात करू दिले नाही. अगदी शेवटच्या क्षणी ही त्या डोळ्यात ज्वाला आणि मुखावर अभीमान होता. ती शेवटची गोळी जर कनपटाला छेदली नसती, तर हा विर योध्दा विजयी जवान होवून परतला असता. विजय तर आणला त्याने पण बलिदान देवून।

आम्हाला मात्र सार्थ अभिमान आहे, आमच्या विर शहिद जवानावर। आणि तुमच्यावर ही ज्यांनी असा विर जन्माला घालून घडवला।" त्या अधिकाऱ्याने आईला तिरंगा सोपवत सँलूट केला.

हवेत गोळी चालली. आणि दिनेश चा मृत देह चितेच्या अग्नीज्वालेत धू धू पेटून उठला. चितेतून उठनाऱ्या त्या धुव्याकडे संपूर्ण गाव अभिमान, दु:ख, शोक अशा काहिशा मिश्रीत भावाने बघत होता.

आई हातात तिरंगा घेवून पल्लवी जवळ आली. तीच्या हातात सोपवून, "ही तुझीच अमानत आहे. तुच सांभाळ." बोलली आताशा मात्र पल्लवीने पापणी हलवली आणि तीरंग्याला दोन्ही हातात घेत डोळे भरून पाहिले. दोन बुंद तीच्या डोळ्यातून बाहेर आली. पण तीने लगेच आवंढा गिळून घेतला. त्या तिरंग्याला कपाळी लावल, छातीशी लावल व

"नाही आई। हा तुमचाच ठेवा आहे. माझा ठेवा तो आहे." बाळाकडे मानेने इशारा करीत, तीरंगा आईला परत करीत बोलली.

आज या घटनेला वीस वर्ष होवून गेलीत. या विस वर्षात आईने रोज एक नित्य नेम आखला होता. गावाबाहेर दगडावर बसून जाणाऱ्याची वाट बघत बसायचा।

-------------

"आदर या ह्मदयी असावा सैनीक हो तुमच्यासाठी।

माथा हा असाच झुकावा सैनीक हो तुमच्यासाठी।

शत:शा सलाम अमुचे सैनीक हो तुमच्यासाठी।

आण बाण शान या देशाची सैनीक हो तुमच्यासाठी।"


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy