Asmita prashant Pushpanjali

Others

4.3  

Asmita prashant Pushpanjali

Others

लेखिकेची डायरी

लेखिकेची डायरी

15 mins
1.9K


दि ५/१०/२०१६---- ४:४५ पहाटेचे

तसे मला आज तर ३:३० च्या दरम्यानच जाग आली. कुसीवर कुस फेरूनही झोप नावाचे पाखरू जे उडाले, ते परत नेत्राच्या घरट्यात यायला तयारच नाही.

फेसबुक ओपन केला. एक फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली व वृशाली शिंदे ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. नंतर लेट नाईट वॉट्सपला आलेले मॅसेज चेक केले। जे वयक्तीक होते त्यांना रिप्लॉय दिला आणि गृपवरील क्लियर चॅट केले।

वाटले " साहेब। मी तुमची रामू" ला थोडे पुढे ढकलायचे. संदर्भासाठी उपयोगी पडणाऱ्या पुस्तका हातात घेतल्या, पण डोक काही पुढ जाईना।

आणि वॉट्सपला आलेला एक निसर्गरम्य देखाव्याचा चित्र पाहून, ती कविता आठवली जी दोन वर्षापुर्वी तयार केली होती। "सुत्रधार निसर्गाचा"

आणि ती कविता प्रथमता वाचणाऱ्याने प्रथमता माझ्या कवितेवर रिप्लाय देवून, "मी कवी आहे" याची मला जाणीव करून दिली।

आणि तिथूनच म्हणजे जुन - जुलै २०१४ पासुन माझा साहित्याचा प्रवास सुरू झाला।

तसे तर जवळ जवळ दहा बारा वर्षापासुन मी कविता रचित होते। डोक्यात कधी काही बाही विचार येवून जायचे परंतू मला कळत नव्हते हे काय सुचते मला। किती तरी वर्षे हे डोक्यात येणारे विचार असेच वाया जायचे। मी कधीच त्यांना शब्दाचे रूप देवून कागदावर उतरवले नाही।

डोक्यात विचार येण्याची सवय लहानपणापासुनच। मला आठवते मी सहाव्या वर्गात शिकत असतांना आम्हा एका दुसऱ्या वर्गाच्या मॅडम काही दिवस शिकवायला आल्या। मराठी व गणीत असे दोन्ही विषय त्या शिकवायच्या। त्या नउवारी लुगड नेसत। बहुतेक पांडे मॅडम त्या।

मी एकदा वर्गातच काही सुचले ते कागदावर उतरवले आणि त्यांना दाखवीले। ती बहुतेक पुर्ण कविता होती। नंतर कुठ ठेवली आठवत नाही पण काही ओळी नेहमी आठवतात। तेव्हा ही माझ्या डोळ्यासमोर खळखळ वाहत जाणारा पाणी रूपी झरा व अवती भवती हिरवे हिरवे गवत असे चित्र होते।

"झुळझुळ पाणी, गाते गाणी, गाते गाणी।

वारा वाहे रानो रानी,रानो रानी।" या ओळी होत्या त्या। पुढच्या ओळी मला आठवत नाही. मॅडमला दाखवील्या , त्यांना आवडल्या। पण नंतर मला कधी त्यांच्याकडून ना प्रोत्साहन मिळाले,ना मार्गदर्शन। आणि नाही त्यांनी कधी माझ्या या कलेची नोंद घेतली। जर तेव्हा त्यांनी नोंद घेतली असती, तर कदाचीत माझा साहित्याचा प्रवास खुप आधी सुरू झाला असता।

घरच्यांचा तर प्रश्नच नव्हता। त्यांच्या गावी तर साहित्याचे वारे ही दुर दुर कुठेच वाहत नव्हते। व आजही नाही।

दोन्ही परिवारात सारखीच स्थिती। " पुढे पाठ, मागे सपाट".

आज जेव्हा ही दोन वर्षा पुर्वी ची कविता वाचली, तर मन अस्वस्थ झाले। असे वाटून गेले की, मी माझ्या आयुष्याातून काही तरी वगळत आहे। काय??? काय वगळते आहे???।

विचारांती वाटले, की हेच, हेच वगळतीय, मी माझ्याच जिवनातील माझे लेखिकेच्या रूपातील स्थान वगळत आहे।

कथा, कादंबरी, कविता, ललित, वैचारिक इत्यादी च्या माध्यमातून विचारांचे प्रकटन करते ते इतरांसाठी।

पण माझ्या स्वताच्या लेखिकेच्या रूपातील अस्तित्वाचे काय?

आणि या विचारात सहज डोक्यात आले की, मी माझी दैनंदिनी लेखनास सुरवात करावी।

आणि ठरवल, "एस। आजपासुन मी दैनंदिनी सुरू करणार।पण कशी? कशी सुरू करायची।

कारण मी फक्त लेखिकाच नाही,

सर्वप्रथम एक स्री आहे, आई आहे, गृहिणी आहे, तसे नावाला पत्नीही आहे। कारण हल्ली काही महिण्यापांसुन, जवळजवळ चारेक महिण्यापासुन पतीला अपेक्षीत असलेले पत्नीचे कर्तव्य मी नाकारले आहे। होय, पत्नीचे कर्तव्य नाकारून मी त्यापासुन परावृत्त होवू पहात आहे.

हे एक बंधन, ओझ नकोय मला आता डोक्यावर।

हे झाल्यावर नंतर एक कर्मचारी ही आहे मी। सकाळी ९ वाजेपासून घरून निघणारी, ६ च्या नंतरच पण किती वाजे परतेल याची शास्वती नसणारी वर्कींग वुमन आणि नंतर थोडा तरी वेळ काढून दोन ओळी, चार ओळी, तर कधी कधी एक पानभर काही तरी लिहून काढणारी लेखिका।

अशा विवीध भुमीका जगतांना, आता मला पत्नीचे कर्तव्य पुर्ण करणे कठिण झालेय।

मी माझ्या साहित्याच्या जगातच खुश असते। साहित्याच्या दुनीयेत कल्पनेत मस्त रमते।

जरी माझी कवितांची दुनीया खुप जुणी असली, तरी कथा, कादंबरी, ललित व वैचारिकतेचा प्रवास केवळ दोन वर्षापासून ।

हा प्रवास कसा सुरू झाला। कुठून सुरू झाला हे ही माझ्या आयुष्याचे एक गुढच आहे.

माझा हा प्रवास झाला सामाजिक प्रसार माध्यमावरून म्हणजे फेसबुक वरून।

जुन २०१४ चा तो कालावधी। १ मे २०१४ ला लग्नाला १५ वर्षे पुर्ण होवून १० मे ला वयाला ३८ वर्षे पुर्ण झाली। आणि ईथूनच काही बाबी अशा घडत गेल्या की, मलाही कळले नाही माझ्यासोबत हे काय होत आहे।

सासरचे घर सोडून एक वर्ष पुर्ण झाले होते। लग्नाच्या १४ वर्षा पर्यंत त्या घरी संसार केला. संसाराचे रहाटगाडगे कुणाला चुकले आहे??? तेच रहाटगाडगे माझ्याही मागे होते।

१५ वर्षापासुन हा गाडा ओठून ओठून आता खूप थकले होते।

त्यात काही बाबी अशा ज्याने त्या कालावधीत डोक्यात अंधार पसरवीले होते। खूप अंधार, गळद अंधार। बघावे तिकडे जिवनात अंधारच अंधार।

आणि या अंधारात आतून एक हाक ऐकायला येत होती। "मी जी ही आहे, मी ही नाही। मी वेगळी आहे, मी आणखी दुसरी काहीतरी आहे। काय आहे मी? काय अस्तित्व आहे माझा? हाकेच्या रूपात येणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर मला गवसत नव्हते, सापडत नव्हते, सुचत नव्हते।

पण सोबतच खूप प्रकर्षाने मला हे ही जाणवत होते की, मी ही नाही. मी आणखी काही तरी आहे। शोध मात्र लागत नव्हता।

आणि अशाच त्या एका अंधारमई रात्री घरगुती वातावरणात अशी घटना घडली, की तीने माझ्या अंतरमनावर खूप खोलपर्यंत जखम केली. आणि त्या जखमेने मला स्वताला शोधण्याची औषध शोधावयास भाग पाडले।

शोशल मिडीया म्हणजे फेसबुक वर खूप कमी लोक माझ्या मैत्रीच्या यादीत। फक्त वीस ते पंचवीस असतील कदाचीत। भितीच खूप वाटायची, हल्ली महिलांसोबत काय काय होते हे रोजच वर्तमानपत्रात वाचण्यात येत होते।

पण जेवढे होते त्यात मात्र एक व्यक्ती वेगळी। ज्ञानवर्धक माहिती पुरवीणारी। बोलण कधी नाहीच, प्रोफाईल उघडून कधीच पाहिल नाही। चॅट म्हणजे काय समजत नव्हतेच पण समोरील व्यक्ती ऑनलाईन आहे हे कसे ओळखायचे या माहितीचा पत्ता तर दुर दुर गावकुसाबाहेरही नाही।

पण त्या व्यक्तीच्या शेयर केलेल्या पोस्ट वाचून, त्या वाचल्यानंतर डोक त्यावर काही काही विचार करू लागले। विचारांचे चक्र सुरू होवून अतीशय जलदगतीने ते चक्र फिरू लागे।

पूढे ती व्यक्ती कायमस्वरूपी डियॅक्टीव्ह झाली। आता नाव गाव काहीच आठवत नाही। पण "जीवन ही एक कला आहे आणि ते जगण्याचीही एक कला असते" हे मात्र शिकवून गेला।

नंतर कोणताही चित्र पाहिला की डोक्याचे विचार सुरू होवून, त्या चित्रावरील वर्णनात्मक चार ओळी तरी सुचायच्याच सुचायच्या। कधी पुर्ण कविता तयार होवून जायची।

हे असे का होते? हे आजकाल काय होत आहे मला, या विचाराने पुन्हा डोके चक्रावू लागत होते.

मनात खूप येत होते, खूप येते होते, हे बोलू की ते बोलू, पण मनात येणारे ते बोलने नेहमीचे सामान्य नसायचे। वेगळे असे ते। मग? कुणाशी बोलू? कुणाला सांगू?

घरी जर एक शब्द काढला, तर समोरच्या व्यक्तीला ना त्याचा अर्थ कळायचा, ना मतीतार्थ, ना भावार्थ। शुन्य डोकच ते। काहीच क्रिया,प्रतिक्रीया नाही। उलट ऐकून, दोघांनी चिंतन करून चर्चा करावी असे तर काही नाहीच, पण एक पोरकट व मुर्खपणाचे वाक्य असायचे, "तू न् भाषण दे।भाषण। १४ एप्रील ले कार्यक्रमात सांगजो हा भाषण।"नेहमीचे हे ऐकून डोक धरून बसायची।

कधी देणार भाषण? आज डोक्यात काही वळवळतेय, ते कुणी एेकत नाही, समझुन घेत नाही, मला काहीतरी होतेय। भावनांची, विचारांची घालमेल होतीय। मी आतमधल्या आतमधे घुसमटतेय. जे आतमधे खदखदत आहे मला ते आज आता बाहेर काढायचे आहे. पण ते जाणून घेणाराच माझ्या भोवती कुणी नाही। समजणारा कुणी नाही तर उलट मुर्ख व उर्मटपणाचा सल्ला।

अशा स्तीतीत त्या व्यक्तीसोबत बोलण्यापेक्षा मग शांत बसलेल बर।

आणि हळू हळू मन शांत होत गेल। मन व वाचा दोन्ही अबोल होत गेल्या पण डोका मात्र तसाच लिव लिव करू लागत होता।

आणि एके संध्याकाळी, फेसबुकवर

"सुत्रधार निसर्गाचा

असेल माझ्या भोवती।

गुरफटून धागे मैत्रीचे

होईल माझ्या पुढती।

आठवण मला येईल तुझी

कारण बंधनात तु ही सभोवती।"

या कवितेच्या ओळी पोस्ट केल्या, आणि कुणीतरी अनोळखी व्यक्तीने, व्यक्तीशा रिप्लाय दिला, कविता आवडल्याचा।

तेव्हापर्यतच्या आयुष्यातील ती प्रथम व एकमेव व्यक्ती होती, ज्यांनी, " अरे वॉ। खुप सुंदर। खुपच सुंदर।मॅडम खूप छान कविता। माझ्या मनाला भावली। तुम्ही कवी आहात?" संवाद साधला।

आणि माझा डोका ईथेच विचार करू लागला, " मी कवी आहे का???"

ही कल्पनाच सुखद वाटू लागली, " मी कवी आहे।"

तेव्हा पासुन जेव्हा जेव्हा डोक्यात काही वळवळू लागे तेव्हा मी काही तरी लिहून घ्यायची। आधी आधी फेसबुकलाच लिही, पण लगेच नंतर ओनली मी मधे ते लॉक करून घेई। आणि काही लिखान तर डिलीट मारून देई।

डोक यावरही थांबायला तयार कुठे! कविताने काय होते, मला याही पेक्षा जास्त काही तरी सांगायचे आहे, बोलायचे आहे, म्हणून डोका अख्खा रात्र रात्र झोपू देईना।

आणि अशाच एका रात्री वही व पेनसोबत घेवून झोपली। झोपेतच एक प्रसंग सुचला आणि तशाच अर्ध झोपेच्या अवस्थेत तो लिहून काढला। डोका थोडा बरा वाटू लागला। पण नंतर पुन्हा पुढचे विचार गुंजू लागले। मग हा नित्यक्रमच बनला। आणि अशी माझी पहिली कादंबरी , "दयाघना, जीवनाला एक वळण" जन्मास आली.

त्या पाठोपाठ कथा संग्रह जन्म घेवू लागला, ललीतही जन्माला येवू लागले आणि कविता मात्र काही केल्या थांबायला तयारच नाही। आज घडीला चार- पाचशेच्या वरून कवितांचा संच आहे माझ्या डायरीला।

आज भुतकाळातील त्या दोन वर्षापुर्वीच्या साहित्याच्या प्रवासाची सुरवात पाहिली फेसबुकवर म्हणजे स्वताचेच आश्चर्य वाटते।

तेव्हाची ती भिती आज कुठल्या कुठे पळून गेलीय। आजही त्या कालावधीत फेसबुकवर शेयर केलेल्या कविता ओनली मी मधे दडून असतील।

" दयाघना, जिवनाला एक वळण।" जन्माला आली त्या पाठोपाठ " सम्यक क्रांती-१" आणि काही ललीत संग्रह पण लगेच प्रसवला। कवितांचा तोटा नव्हताच। तीन- चारशे कविता लिहून तयार होत्या. पण संग्रहासाठी कशा निवडायच्या हा प्रश्न होता। मग शंभर कविता , वेगवेगळ्या विषयांवरील एकत्र करून, "शतकी" हा काव्यसंग्रह निवडला.

आणि जेव्हा या चारही पुस्तकाचे साहित्य हस्त लेखनात तयार झाले, तेव्हापासून म्हणजे ६ डिसेंबर २०१४ पासून एक लेखिका, कवयत्रि, साहित्तीक म्हणून माझ्या साहित्तीक प्रवासाच्या संघर्षाला सुरवात झाली।

तो संघर्ष आजही सुरू आहे, कारण आजही साहित्याच्या बाजारात "नवसाहित्तीक" हा ठप्पा माझ्या मस्तकी लागला आहे।

या कालावधीत साहित्य क्षेत्रातील अनेक रूप समोर येत आहेत. खुप विचीत्र, भयंकर, वेदना दायक.

एखादी कलाकृती वाचतांना, त्यात व्यक्ती जेव्हा रमून जातो, तेव्हा त्याला विचारही येत नसेल, की लेखकाला ती कृती निर्माण करतांना कशा कशा स्थितीला समोरे जावे लागले असेल.

सर्वप्रथम अशा काही घटना, गोस्टी निदर्शनास येतात, ज्या सामान्य माणसाच्या निदर्शनास येत नाही। व आले तरिही त्यावर त्याचे चिंतन विश्लेषण होत नाही. पण लेखक, कवीचे तसे नसते।

दुनीया दारीच्या रहाट गाळग्यात आधीच दबलेला पिचलेला व्यक्ती आणखी त्या विषयाच्या जवळ जवळ जातो व सोबतच आजुबाजूचे वातावरण ही सह्य करीत असतो, पण डोक्यात येणारे विचार, कल्पना, भावनांनी मन आतमधे धगधगत असते। चेतनेत काही तरी स्फुरत असते। आणि हे स्फुरन केव्हा एकांत साधून शब्दांच्या रूपात कागदावर उमटतात यासाठी तो तडफडत असतो।

त्या शब्दांना वाक्यात्मक रचनेत शब्दबध्द करतांना, त्याची लय जुडण्यासाठी। वाक्यात सुसुत्रता जोडण्यासाठी वारंवार वाचन, त्या सोबतच शब्दांचे अर्थ, आशय, मांडणी, भावार्थ, याचे ही भान ठेवून विषयान्तर तर होत नाही ना्। यासाठी जागृत रहावे लागते। सोबतच समाजाला काही उद्बोधन करता येईल का? त्याकडे ही लक्ष पुरवावे लागते। सोबतच ते लिखान सत्याधीस्ट, वैज्ञानीक व समाजास पोषक असे असावे हा ही उद्देश असतो।

अशा किती तरी बाबी चाचपुन चाचपुन एखादी कलाकृती तयार होते, तेव्हा मग आणखी मानसिक दृष्ट्या सजग व सक्षम होवून लेखकाला पुढच्या लढाईला सज्ज व्हावे लागते।आणि ती लढाई म्हणजे तयार कृती छपाईबध्द होवून पुस्तकाच्या रूपात, आपण ज्या वाचक समाजासाठी लिहीलीय , त्यांच्या पर्यंत ती पोहचावी।

आपले लिखान समाजाभीमुख व्हावे यासाठी पुन्हा लेखकाचे प्रयत्न व पायपीट सुरू होते।

प्रकाशनाच्या बाबतीत, मला प्रकाशकांकडून कटू व धोकाधडीचा अनुभव आलाय आतापर्यतच्या कालावधीत।

काही प्रकाशकांच्या बोलण्यावरून तर असे जाणवले की ते लेखकांना वेड्यात गीनतात । त्यांच्या संभाषणाने लेखकांना चिल्लर बनवून ठेवले आहे।

त्या सोबत स्री लेखिकेच्या बाबतीत तर फारच विचीत्र परिस्थिती। आणि जर आर्थीक सक्षम नसेल तर त्याहून वाईट अवस्था।

त्यातल्या त्यात जर तीला कुणी गॉडफादर, कौटूंबीक वारसा, मार्गदर्शक, सल्लागार, पाठिंब्या, किंवा इतर काही तरी नसेल तर -------- अबबा् तिची स्थिती विचारूच नये। तीच्या लेखनाचे वाभाडे व तीचे बाजार।

मी हे कुणाचे ऐकून कथन करीत नाही. तर माझे हे स्वताचे अनुभव आहेत। एक लेखिका म्हणून मी रोजच नवीन नवीन संघर्षास तोंड देते। अनुभवते।

मला वाटते भुतकाळ इथे मांडत थांबण्यापेक्षा रोजच्या दैनंदिन जीवनात पुढे जावे। व प्रत्येक टप्यावर भूतकाळाची त्या अमुल्य साठवणीचे गाठोडे उकलत जावे।

दि- ५/१०/२०१६

रात्री ८ वाजता

।आता कुठ डोक्याला थोडा निवांतपणा लाभतोय।' रमाई' आहे डोळ्यापुढे, पण हात आणि डोके दोघांनीही बंड पुकारलेय सध्या तिच्यावर लिखान करायला। लेखांचे काही विषय पण डोक्यात घुटमळतात आहेत, पण ते ही नको वाटतेय।

अस वाटत आहे काही दिवस कुठल्याच विषयावर चिंतन मनन करू नये।सरकवून द्यावे बाजूला।

केवळ शोध घेत रहावे। प्रकाशनाचे व पुस्तक विक्रेय करणाऱ्याचे।

साहित्य,लेख, कविता मासिक, साप्ताहिक, वर्तमान पत्रातून प्रकाशीत करणाऱ्याच्या शोधाच्या धडपडीत , मराठी अभीनेत्री हंसिनी उचीत जीच्यासोबत शिलूच्या माध्यमातून परिचय झाला होता ती फेसबुकला माझी फ्रेंड होती, तिच्याशी चर्चा झाली तर वाट्सपच्या एका गृपला मिळालेली मिडीया लेखीका मनस्विनी हिच्यासोबत ही चर्चा होवून या दोघींनी काही परिचीत कॉन्टॅक्ट दिले। आणि पुन्हा नवीन प्रयत्न सुरू झाले। ही गोस्ट वेगळी की त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट चा काहीच उपयोग झाला नाही।

आज आणखी एक नवीन प्रयोग करून बघितला। "इ बुक" पब्लीशींग संबंधीचा। त्याच्याशी संबंधीत असलेल्या महिलेशी बोलली। नाव इथे नमुद करीत नाही। तीने पन अनेक अडचणीचे पाढे गायले।

जेवढे प्रयत्न करित आहे, तेवढे सगळेच खूप अडचणी भासवतात आहेत।

खरे तर मला असे वाटते, की काही जास्त अडचणी नाहीत। फक्त बुध्दीचे व संकुचीत विचाराचे डोळे उघडून, एकदा साहित्य कृतीवर नजर टाकण्याची गरज आहे त्यांना। माझा दावा आहे, असे झाले तर सगळ्याच गोस्टी जुळून येतील।

पण तेच आहे ना्

इथे कुणीच जिवंत व्यक्तीकडे लक्ष दयायला, समजुन घ्यायला तयार नाही। तीच व्यक्ती मरू द्या, की लागले सगळेच हळहळ व्यक्त करायला। तर काही लोक आपला मोठेपणा मिरवायसाठी स्वताहून पुढे येवून, मग त्यांच्या कृतीची दखल घेण्याचा विचार प्रकट करतील। जिवंत असे पर्यंत मात्र "वनवन भटक बाबा।"

दोन चार दिवसापूर्वी एक प्रकाशक भेटून गेले। एका आर्टीकल संदर्भात। नकळत त्यांच्याकडून एक माहिती कळून गेली। " लेखकाचे साहित्य एकदा पब्लीश झाले की त्याचे कॉपी राईट हे ५० ते ६० वर्षापर्यंतच ग्राह्य असतात। नंतर ते संपुष्टात येतात। व तो पर्यंत संबंधीत लेखकही हे जग सोडून गेलेला असतो। मग पुढ आवृत्तीसाठी त्याच्या परवानगी ची आवश्यकता नसते।"

त्यांच्याकडून हा खुलासा होताच, प्रथमता डोक्यात आले, "म्हणूनच प्रकाशक लोक, चळवळीचे साहित्याच्या नावावर, जे लेखक हयातीत नाही। फार पुर्वी होवून गेलेत, त्यांचेच साहित्य, ज्यांच्या हाताला येईल तो वारंवार पब्लीश करीत असावे। कारण त्यांचे कॉपी राईट संपुस्टात आलेले। परवानगीची आवश्यकता नाही। व लेखक जिवंत नसल्यामुळे रॉयल्टी देण्याचा प्रश्नच येत नाही।

आणि आम्ही पण जीवंताला जीवंत मारून, मृत व्यक्तीलाच जीवंत करण्याच्या नादात असतो।"

हा कसा न का एक उलगडा माझ्या बुध्दीला झाला।

हा अनुभव माझा आहे। प्रत्येकालाच असा अनुभव आला असेल किंवा येईल असेही नाही। कारण प्रत्येकाच्या जिवनात आहे किंवा नाही आहे हे त्याच्या भोवती असलेल्या वातावरण, परिस्थीती, पारिवारीक लोक व अवती भवतीच्या लोकांवरही अवलंबून असते। तसेच जसे, "राजाराणिच्या वंशजाला पृथ्वीवर पाय ठेवताच वैभवाची प्राप्ती होते, तर दरिद्र्याच्या घरी जन्माला येणारॅ मुलाला दरिद्र दूर करण्यासाठी आजन्म धळपळ करावी लागते।

मला तर ही रात्र खुप प्रिय वाटते। एक काळ होता, सकाळी सुर्य निघाला की खुप छान वाटायचे। आणि रात्र झाली की, कसल्यातरी भितीचे सावट मनावर पसरायचे । पण आज तसे नाही। आता रात्रीची भिती वाटत नाही। रोजची ठरावीक कामे आटोपली व डोळ्यावर झापळ आली, की काही मिनीटे, तासाची झोप घेताच एका वेगळ्याच जगात प्रवेश करते मी।

थोडेफार सुचले की याच रात्रीच्या अंधाऱ्या समई कागदावर उतरवावेसे वाटते। माझी रात्र कधी सुरू होते व कधी संपते ते माझे मलाच कळत नाही। अशीच आज साडे दहाच्या सुमारास माझी झोपेची रात्र सुरू झाली। अधामधात जाग येतच ढगाच्या आड लपलेल्या चंद्राप्रमाणे वर वर डोकावून पळून जाते।

"काजव्याने लुकलुक करणारी।

ही रात्रच मला वाटते अधिक प्रिय।

नभी चमचमणाऱ्या ताऱ्याची

ही रात्रच मला वाटते अधिक प्रिय।"

६/१०/२०१६

खूप लवकर तर नाही पण ५ वाजे जाग आलीच असेल। आजचीही अवस्था तशीच। पुढे विषय आहेत , पण हात त्यांना शिवायला तयारच नाही।

पण असे असले तरी डोक मात्र गप बसणारा होय का?

वाट्सप सुरू करताच एक खुप छान सा पिक दिसला व सवयी प्रमाणे त्यावर काही ओळी ही सुचल्या। त्या काही फ्रेंड्सना तर काही गृपवर पोस्ट केल्या।

" त्या तीकडे दुर।

क्षितीजा पल्याड।

प्रभात कालच्या समयास।

स्वप्न नयन मनोहर।

उमलूनी हृदयात ।

गीत घरा ही गाती।

रूप गोजीरे लालतांबडे।

हिरवळीची चादर पांघरती।

नटती जशी नवतरूणी।

ही धरणी, ही धरणी।"

हे असेच होते। चित्रावरून वर्णन।

माझी जास्त ओळख नाही। त्यामागचे कारण असे की नोकरीमुळे बाहेर निघणे नाही, कुणाशी भेटी नाही की गाठी नाही।

सामाजीक प्रसार माध्यमातून ज्या ओळख्या पाळख्या झाल्या, तेवढेच काय ते परिचय।

दि- 5/3/2018

लेखिकेची डायरी लिहायला सुरवात केली होती, ५/१०/२०१६ ला । दि ६/१०/२०१६ पर्यंत म्हणजे फक्त दोन दिवसाची दैनंदिनी कशी तरी लिहू शकली।

आज दि 5/3/2018 मधातल्या या काळात खुप मोठा अंतर पडला दैनंदिनी लिखानाचा।

या कालावधीत जीवनात घडामोडीही खुप घडल्या।

येवढी मोठी गॅप का पडली, याचे नेमके कारण सांगता येणार नाही। खुप उथल पुथल झाली या दरम्यान आयुष्यात। वयक्तीक जीवन विस्कळीत झाले। आणि साहित्तीक स्तरावर काही चांगल्या गोस्टी ही झाल्या।

सगळ्या घटना आठवत नाही। पण मोजक्या ज्या आठवतात त्या मात्र नमुद करते।

जानेवारी २०१७ ला लातुर येथे "अस्मिता दर्श" च्या साहित्य सम्मेलनात निमंत्रीत कवी म्हणून सहभाग घेतला। तीथेच बुकस्टॉल वर, परभणी येथील "सारनाथ" प्रकाशन चे प्रकाशक डॉ- सारनाथ सौंदडकर यांच्याशी भेट झाली। आणि त्यांनी "साहेब मी तुमची रामू" व "राहूलमाता यशोधरा" या दोन्ही पुस्तका 100% वर प्रकाशीत करण्याची तयारी दर्शवीली।

दिलेला शब्द पाळत फरवरी 2017 मधे या दोन्ही कादंबऱ्याप्रकाशीत केल्या आणि त्याच सोबत माझ्या परिचयात ५ पुस्तका प्रकाशनाची यादी जुडली।

त्या आधी ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०१६ हे महिणे प्रकृती दुरूस्त होण्यात गेले।

१४/१५/१६ ऑक्टोंबर २०१६ ला मी औरंगाबाद येथे " बुध्दीस्ट फेस्टीवल" ला गेली होती। तेथे भंते सुदत्तबोधी व भंते धम्मानंद आंबेडकरवादी यांच्याशी वयक्तीक परिचय झाला। औरंगाबाद च्या या भेटीत "बाबा भांड" व " डॉ- गंगाधरजी पानतावणे" यांच्याशी भेट घेतली।

आणि तीथून परतिच्या प्रवासातच प्रकृती बिघडली। ट्रेनमधेच अंगात सणसण ताप चढले व सोबत कुणीही नाही। परंतू हिम्मतीने घरी परतली।

घरी येईपर्यंत स्वताला अलौकीक शक्तीने बांधून ठेवले होते। मात्र घरी येताच भुईसपाट अवस्था झाली।

पुढील औषधपाण्याच्या निदानात "टायफाइड" पॉझीटिव्ह निघाले। आणि दोन ते तीन महिणे त्यातच गेले।

अशाही अवस्थेत, "शिवस्पर्श" प्रकाशन पुणेच्या संपादिका शैलजा मोलक मॅम यांनी, या दरम्यान वर्तमान पत्रात प्रकाशीत झालेल्या आर्टीकल्स ला पुस्तकाच्या रूपात प्रकाशन करण्यासाठी साहित्य मागितले, त्याची जुळवाजुळव करावी लागली। ते साहित्य पाठवून दिले। परंतू अजुनही आज दि 5/3/18 पर्यंत ते अप्रकाशीत आहे।

डिसेंबर २०१६ व जानेवारी २०१७ "साहेब मी तुमची रामू " मधे गेले

आणि फरवरी मधे "सारनाथ" प्रकाशनाकडून एका वेळी दोन कादंबरॅ प्रकाशीत झाल्या। साहित्यातील "माय ट्विन्स बेबी" जन्माला आल्या।

मार्च २०१७ ला नाशिक येथे, "कलावंत मंच" संस्थेचे २०१७ चे कवयित्री म्हणून "कलावंत" हे पुरस्कार मिळाले।

मार्च महिण्या पर्यंत सुरळीत तर नाही म्हणता येणार, पण विस्कळीत ही नाही म्हणता येणार असे वयक्तीक आयुष्य चालले होते।

तसे जुन २०१६ पासुनच, घरगुती वाद- विवाद जास्त प्रमाणात नाही तर अती वाढले होते। येवढे की, सायंकाळी ऑफीस करून परततांना घरात पाय ठेवताच, पुन्हा त्या घरात पाय धरून बसावे वाटत नव्हते।"कुठ पळू, कुठ नाही" अशी मानसिक अवस्था होवून मन रिकामा कोपरा शोधत होता। आणि हा रिकामा कोपरा सापडला शेजारच्या भाड्याच्या खोलीत। कारण मुलाच्या ओढीने घरी येण्याशीवाय पर्यायही नव्हता।

घरी स्वयंपाक पानी झाल्यानंतर थांबणे नकोसे वाटत होते। आणि एकांत भेटावा म्हणून शेजारची खोली भाड्याने घेतली होती।

मधात प्रकूर्ती जास्त बिघडल्यामुळे, पुन्हा रात्रीचे बिराड घराकडे वळले. पण कुरबुरी मात्र कमी न होता वाढतच गेल्या.

मार्च 2017 च्या शेवटी शेवटी ह्या कुरबुरी कुरबुरी न राहता वाद टोकाच्या अवस्थेला पोहचला। ज्याचे फलीत "महिला समुपदेशन" केंद्रातील समोपदेशाकडे एका स्रीच्या रूपात लेखिकेचे पाऊल वळले।

एक आश्वासन मिळून, परत घराकडे वळले, परंतू नेहमी प्रमाणे ते आश्वासन खोटे व फोल ठरून, पून्हा तिच असह्य स्थिती निर्माण झाली।

१८ वर्षे जपुन ठेवलेले वैवाहिक संबंध संपुस्टात येवू लागले। विवाह मोडकळीस येवून ठेपला।

इथे कारणांचे विवेचन करणार नाही, कारण त्याची पाळेमुळे १८ वर्षाच्या भूतकालाच्या गर्भात खोल खोल, आतमधे रूजली आहेत।

एखादे मेले मुरदे खोदून काढावे व त्या कुजलेल्या देहाचा असह्य दर्प नाकामधे जावून, जीव मळमळ व्हावा, अशी ही भुतकालातील कथा। आणि ते कुजलेले नाते।

आता या कुजलेल्या नात्याचे भार वाहणे कठीण होवून बसले होते। परंतू तरिही १८ वर्षापासुन अंगवळणी पडलेली सवय व संधी--------- संधी--------- पुन्हा एकदा संधी म्हणून "संसाराचे रहाट गाडगे" अगदी काठावर वाहने सुरू होते।

याचे फलीत पुन्हा एकदा एकाच गावात, एकाच मोहल्यात "दोन घर, दोन चुली" एप्रील च्या मध्यान्न झाल्या।

स्थिती सुधारण्या ऐवजी आणखी बिघडू लागली, भावनीक व मानसिक स्तरावर संघर्ष निर्माण होवून, भावनीक व मानसिक स्तरावरील नाते लग्नाच्या १५ व्या पर्षापासुनच संपुस्टात आले होते। उरला होता तो केवळ अधामधात शारिरीक व्यवहार। ज्या व्यवहारात एकाची बळजबरी दुसरॅची लाचारी। एकाचा मानसिक विकार दुसरॅचे केवळ व्यवहारीक कर्तव्य। आणि अशा वातावरणात जुन २०१७ येवून ठेपला।

"शिवस्पर्श" च्या संपादिके सोबत चर्चा झाली। त्यांच्याकडे पाठवलेल्या साहित्याचे डि टी पी करून स्क्रीप्ट तयार झाली होती। त्याचे प्रुफ रिडींग करायचे होते। त्या संदर्भ पुण्याला जायचे होते। पुण्याला दोन दिवसाचा मुक्काम करून परत आली।

त्याच पाठोपाठ लिखाणात आणखी काही वेगळे करण्याची एक संधी चालून आली।

जुलै २०१७ लागला होता।

"बिम्ब क्रियेशन " द्वारा निर्माता, निर्देशक म्हणून मुंबईचे सुदाम वाघमारेंजींकडून "बुध्द और उनका धम्म" या ग्रथावर आधारीत हिंदी मालिकेसाठी संवाद लेखणासंबंधी विचारणा केली गेली।

मी भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणारी, एक छोटीशी, नवोदित लेखिका। माझ्यासाठी ही मोठी संधी होती। निदान नविन काहीतरी शिकण्याच्या बहाण्याने मला ती उपयुक्त होती.पण ..........

क्रमश.......

लेखिकेची डायरी ही एक,दोन, किंवा चार आठ पानाची पुस्तक नाही. जेव्हापासून लेखिकेची डायरी लिहायला सुरवात केली, कुठ सातत्य तर कुठ खंड पडून ती पुढ पुढ चालली आहे.

ज्यात माझ्या वयक्तीक जिवनाचे प्रसंग, घटना मागे पुढे मी अधोरेखीत करीत चालली आहे.

जेव्हा वेळ मिळेल व लिहन शक्य होइल तेव्हा व तसे.

एखाद्या पेज वर "लेखिकेची डायरी" सामावणारी नाही.


Rate this content
Log in