सामना।
सामना।
सामना अगदी चुरसी चा रंगला होता.
प्रत्येक चेंडूसह, मैदानावर सामना बघणाऱ्या प्रेक्षकांचे श्वास क्षणीक आतच थांबले जात होते.
"इडिया, इंडिया" मैदानाच्या चारही भोवताल, हातात तिरंगे घेवून भारतीय युवाच काय तर खेळाचा प्रत्येक चाहता, जोर जोरात ओरडून, खेळणाऱ्या खेळाडूचे उत्साह वाढवत होता.
शेवटचा एकच चेंडू उरला होता, आणि धावा??
धावा 7
शक्यतर नव्हत हे पण अशक्यही आहे, असे माणायला एकही खेळाडू तयार नव्हता.
समोरून चेंडू आला. आला आणि फळीवरून हुकला तोच प्रेक्षकांनी
"नो...." करून दोन्ही हात झटकून हताश पणे बुड खाली टेकणार, तोच मैदानावर , "नो बाँल।" चा अम्पायर कडून इशारा झाला. आणि "यँ... हुर्रे .." जोशपूर्ण आवाजाने मैदान दुमदुमले.
ही सुवर्ण संधी होती भारतासाठी. आणि आता त्या संधीचे सोने करायचे तेवढे खेळाडूंच्या हाती होते.
परत एकदा, दोन्ही बँट्समनांनी स्वताची पोजीशन टिपली.
आणि परत समोरून एक बाँल, "धू...धू.." करीत येवून, बँट च्या पहिल्या टोकाला आदळला. व उंच उसडत स्टेडियमच्या बाहेर, प्रेक्षकामधे येवून पडला.
भारतीय संघाला हा सामना जिंकायला 7 धावा हव्या होत्या. आणि मिळाल्या सहा.
वेळ आणिबाणीची होती.
कारण अम्पायर ने निर्णय द्यायच्या आधी, हवेत चौकोनी आकाराची आकृती रेखाटली.
म्हणजे निर्णय सहज देणे सोपे नव्हते, याचाच अर्थ असा की, तिथ काही तरी अनपेक्षीत घटणार होते.
इलेक्ट्राँनिक स्क्रीन सुरू झाली. आणि थर्ड अम्पायरने निर्णय दिला
"व्हाइट बाँल।"
त्याच सोबत, भारतीय संघाचा धावांचा आकडा आला 147. जेव्हा की विरूध्द संघाने 146 धावा मिळवल्या होत्या.
आणि त्याच सरसी,संपूर्ण खेळाडूंसह , मैदानातील प्रेक्षकांसह, गल्लीत बोळीत टि.व्ही. समोर बसलेले प्रेक्षक नाचून उठले.