फियर अँन्ड फायर
फियर अँन्ड फायर


"फियर अँन्ड फायर"
रोजचीच सवय होती त्या चार मित्रांना, रात्री जेवन आटोपले की, चौघेही मंदिरा मागील एका खोलीत जमत व तिथेच झोपी जात.
हे ते सगळे या साठी करायचे की , त्यांना पहाटे लवकर जाग यावी, व सकाळी पाच कि.मी. पर्यंत रनिंगला जाता याव्.
तशी त्यांना थोडी उशीराच झोपायची सवय होती, त्यामुळे घरी झोपल्याने, घरचे लोक त्यांना सकाळी काही उठवायचे नाही व उशीरा झोपल्यामुळे त्यांना स्वताहून जाग यायचे नाही. मग हे सगळे खोलीवर एकत्र झोपले की, पहाटेस एक मेकांना उठवीत असत आणि सोबतच रनिंग ला एकत्र जात असत.
सचिन, प्रकाश, संतोष, मिलींद अशी ही चौघांची चांबारचौकटी.
चार वेगवेगळ्या परिवारातील, वेगळ्या परिस्थितीतील, चौघांचेही स्वभावगुण वेगळे, चौघांचे व्यवसाय वेगळे.
सचिन पार्ट टाइम जाँब करून शिक्षण घेणारा मुलगा.
प्रकाश अँटो चालवून घरातील आर्थीक बाजू पेलवत होता.
पण या चौहांमधे मिलींद मात्र खुप भित्रा, भेकड, अंध्दश्रध्दा व भुता खुताच्या गोस्टीवर विश्वास ठेवणारा.
त्याच्या परिवारात नेहमी गंडे दोरे, देव दुप, भुत पिशाच्छ, हे विषय चालायचे, व याचाच परिणाम म्हणून, तो भुत पिशाच्छ च्या बाधेने झपाटला होता.
तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. प्रकाश ला सोडून तिघही मित्र खोलीवर आले होते. घड्याळीत दहा च्या वरून झाले पण, पण प्रकाश चा मात्र खोलीवर पत्ता नव्हता. घडीचा काटा पुढ पुढ सरकत साडे अकरावर आला,पण प्रकाश मात्र यायलाच होता.
तो येइल म्हणून तिघांनी खोलीचा दार खुलाच ठेवला, आणि झोपी गेले.
थोड्याच वेळात प्रकाश आला. त्याला खोलितील लाइट बंद दिसली , पण त्याला हे माहित होत की, खोलीचा दार उघडा असतो.
तो नेहमीच्या अंदाजाने मिलींद च्या शेजारी असलेल्या त्याच्या बिछान्याकडे, बेता बेताने सरकू लागला. आणि अचूक अंदाज बांधत बिछान्या शेजारी पोहचून, अंथूरणावर पाय टाकून खाली बसला, तोच अंधारात त्याच्या एका हाताचा स्पर्श मिलींद ला होवून, मिलींद
"भ... भ....भुत।।।।।।। भुत।।।।।।" करून ओरडत उठला.
त्याचे ओरडने ऐकून सगळे जागे झाले.
एक जण त्याचाच सोबती निघून, "भुत...." असा आरडा ओरडा करीत बाहेर धुम ढोकत पळाला. सचिन ने मात्र शहानपण दाखवत, नेहमीच्या सरावाने अंधारातच, भिंतीवरील बल्पाची बटन दाबली, व लाइट सुरू केला.
या सगळ्या घडामोडी दरम्यान, प्रकाश मात्र बसल्या जागीच बसून होता. लाइट सुरू होवून खोलीत उजेड झाला.
"अरे प्रकाश तू..." सचिन जेव्हा त्याच्याकडे पाहून आश्चर्य व्यक्त करू लागला, तेव्हा प्रकाश बसल्या जागीच बिछान्यावर बसलेला असून, त्याने दोन्ही हाताने मिलींद ला घट्ट पकडून ठेवले होते.
"अरे अस् का पकडून ठेवलस त्याला." सचिन ने प्रश्न विचारल.
"हा ओरडत होता न, भुत भुत, म्हणून.
मला वाटल तुम्ही सगळे अंधारात मला चोर समजून बदडता की काय। म्हणून मी याचे हात पकडून ठेवले" प्रकाश ने सफाई दिली.
खोलितील गलका शांत झालेला पाहून, बाहेर पडालेला सोबती, खोलीत परत येत,
"बे लेका, प्रकाश तू..काय रे । किती उशीर"
"अरे झाल यार थोड उशीर, जुने मित्र मिळाले, बसलो गप्पा हानत.
पण काय हा मिलींद. किती भित्रा रे. काय रे साल्या, तुला माणसाचा हात आणि भुताचा हात ओळखायला येत नाही?"
प्रकाश मिलींद चा हात सोडत, त्याच्या डोक्यावर चापट मारीत बोलला.
"आणि काय रे, काय भुत खेत करीत असतोस. अस काही राहत नाही.मुर्ख कुठला." प्रकाश परत त्याला दटावत बोलला.
त्या रात्री आला प्रसंग निभावला. त्या प्रसंगाचे कुणी बाऊ केले नाही.
उन्हाळा संपला होता. पावसाळी रात्र ती. त्यांचा मात्र नित्याचा क्रम तसाच सुरू होता. रात्री चौघांनी खोलीत झोपायला यायच. पहाटेस उठून रनिंग ला जायच.
पावसाळा चांगलाच जोम धरू लागला होता. सचिन नेहमीच्या जाँबवर गेला, सायंकाळ पासून पाण्याची रिपरिप सुरू झाली आणि नऊ वाजे कामावरून सुटनारा सचिन पावसामुळे 10 वाजेपर्यंत अडकून बसला.
परतला तेव्हा घरी न जाता, सरळ खोलीकडे वळला. आधीच उशीर झाले होते. साडे दहाच्या सुमारास तो परतला पण पावसामुळे लाइट गेली होती व रात्रीचा अंधाराचे सावट तर सर्वत्र पसरलेच होते.
खोलीला समोरील दारा सोबतच, मागे ही एक दार होता, जो मागे मुत्रीघराकडे खुलत होता.
सचिन खोलीत जाण्या अगोदर, बाहेरच् बाहेर आटोपून घेण्याचा विचार करीत, मागच्या बाजूस मुत्रीघराकडे गेला. आणि क्रिया आटोपून माग वळणार, तोच माग् मिलींद अंधारात त्यास आपटून,
"ब् ब्।।भु....भुत।।।।भुत।।"
जोरात ओरडत खोलीत पळाला.
"बे ... लेका थांब..." त्याच्या माग सचिन पळत खोलीत आला.
"मुर्ख आहे का वेड्या. माणसांना सारखा सारखा भुत समजतोस. काय झाल काय तुला."
आत मधे प्रकाशने,बाहेर काय झाल असेल याचा अंदाज बांधत, त्याच्या डोक्यावर चापट मारली.
तो पर्यंत सचिनही आत आला होता.
त्या तिघांनी पाहिल, या वेळेस मिलींद खुप घाबरला होता. खुप। येवढा की तो भिंतीच्या एका कोपऱ्यात, जमिनीवर दोन्ही गुडघ्यात मान खुपसून,डोळे झाकून बसला. ते डोळे उघडायचा नावच घेइना. व जेव्हा डोळे उघडले, तेव्हा भितीची आग त्याच्या डोळ्यात धगधगत होती.
आणि बाकीचे त्याला बघत तसेच उभे होते, विचार करित, "याला कशाची भिती? याच्या डोळ्यात भितीची ही आग का?"