Asmita prashant Pushpanjali

Inspirational

3  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

स्मित वेदना

स्मित वेदना

4 mins
213


अंकाच्या विमोचनाचे समारंभ आटोपून, सई नुकतीच घरी परतली होती. ग्लासभर थंड पाणी पित डोळे मिटून बसली असतांनाच, उत्सुकतेपोटी मोबाइल मधे काढलेल्या कार्यक्रमाच्या फोटो बघू लागली. अस्थिर चित्त हळूहळू शांत होत गेले. निवांत बसून समारंभाच्या फोटो ती बघू लागली. फोटो बघताना नकळत तिचे लक्ष फोटोतील तिच्याच मुखावर स्थिरावले, ती पुस्तकं हातात घेवून खळखळून हसत होती. 

त्या क्षणीच तिला मृणाल चे शब्द आठवले.

"ताई मला तुमचं व्यक्तिमत्व खूप आवडलं. तुमचा हसतमुख आणि सदाबहार व्यक्तिमत्व मला प्रभावित करून गेला"

 आजच् कार्यक्रमात पहिल्यांदा भेटलेल्या मॄणाल चे ते शब्द आठवताच सईच्या मुखावर परत खोल व गंभीर स्मित उमटले. आणि तिने एक दिर्घ सुस्कारा सोडला. विचार करू लागली, 

 "सदाबहार व्यक्तिमत्व भासणाऱ्या माझ्या मुखावर दिसणऱ्या या स्मितामुळे जरी मी हसत मुख वाटत असली, पण या स्मिता मागं दडलेल्या वेदना फक्त मला आणि मलाच माहीत आहेत."

आजचा समारंभ यशस्वी झाला व तिथं उपस्थितांनी तिच्या सह सर्वांचे गोड कौतुक केले, पण मागील पाच महिन्यांपासून आजच्या दिवसासाठी तिने ज्या वेदना सोसल्या होत्या, तिच्या त्या वेदना तिच्या मुखावरील स्मितात कुणाला दिसू शकत नव्हत्या. त्या वेदना अंकासाठी उपसलेल्या कष्टाच्या नव्हत्या, तर त्या अपमानाच्या होत्या, जो तिला भेटत जाणारे करीत गेले. व तिने फक्त आजच्या दिवसासाठी तो अपमान मनात पचवून, पोटात पाणी गिळून घेतले होते.

"सई तू खूप घमंडी, गर्विष्ठ, अहंकारी स्वभावाची,अतेताई पणा करणारी, हुकुम बजावणारी आणि स्वता समोर इतरांना तुच्छ लेखणारी आहेस. म्हणूनच आज तुझ्या सोबत तुझ्या या कार्यात तुझी कोणी मैत्रीण तुझ्या सोबतीला नाही. आणि मला व माझ्या मैत्रिणीला तुझ्या सोबत कोणताच संपर्क ठेवायचा नाही. समाजात आमचा मान-सन्मान, प्रतिष्ठा आहे. तुझ्यामुळे आम्हाला समाजात आमची प्रतिष्ठा खराब करायची नाही", साधारणतः चार महिन्यापूर्वी, तिच्यावर अंकाच्या प्रकाशनाची जबाबदारी असल्यामुळे त्यासंबंधी त्या चार- सात जणींनी आपसात गोळा करणाऱ्या वर्गणीच्या मागणीवरून, ती पैसे खायलाच हे सगळे सोंग उभे करत आहे, असा एकमताने ठाम विश्वास ठेवून, तिच्यावर अविश्वास आणून, असले बिनबुडाचे व कोत्या मनाचे आरोप करून त्या तिघींनी तिच्या ह्दयाला छेद करून जाणाऱ्या शब्दांचे भाले टोचून तिला घायाळ केले होते. हे सगळे‌ बोलत असताना त्या तिघींना हे माहितच नव्हते की , तिच्या मैत्रिणींचा गोतावळा कसा व किती जवळचा आहे. एका फोन वर रात्र भरात अडल्या नडल्यास डोळे झाकून लाख रुपये देणारी तिची सोनी ताई, तिच्या रक्ताच्या नात्यातील नाही. तर फक्त या साहित्यामुळे मागील सात वर्षांपासून जपलेले ते मैत्रीचे नाते. तिची कपू ताई, तिला एक खास शैली ची साडी आवडली म्हणून, किंमतीची पर्वा न करता, तिला सरप्राइज गिफ्ट मुंबई वरून पाठवते व लहान बहिणीचे लाड पुरवते ते फक्त मैत्रीचे स्नेहबंध. तिची महिला वकील मैत्रिण तिच्या संदर्भात नेहमीच दोन इंच छाती गर्वाने फुगवून सांगते ही माझी मैत्रिण. 

 जरी उरात अपमानजनक शब्दांचे काटे टोचून झालेल्या त्या जखमेतून भळभळ रक्त वाहून तिला वेदना होत होत्या, परंतु फक्त त्या एका रात्री पुरत्याच तिने ते सल टोचू दिले. कारण दुसऱ्या दिवसी तिला, हाती घेतलेल्या कामाच्या पुर्ततेसाठी खांद्याचा लोंबकळता पदर कंबरेला खोचून कार्याला सज्ज व्हायचे होते.

सई ला विश्वास होता, जिथं एक द्वार बंद होतो, तिथं नवीन चार द्वार उघडी होतात. बरेचदा तिला वाटून जाते, माणसाने कायमच कोणावर विश्वास ठेवावे वा न ठेवावे, परंतु त्याने समोर ठाकलेल्या परिस्थितीवर मात्र कायम विश्वास ठेवावा. कारण परिस्थितीच मानवाचे जीवन घडवत असते. व माणसं ओळखायला शिकवते.

आणि म्हणून हृदयाला घायाळ करणाऱ्या अपमानाच्या वेदनेवर तिने सोज्वळतेची खिपली ओढून, आपल्या ध्येयाला पूर्णत्वास नेण्यासाठी नवीन प्रयत्न आरंभिले.

वास्तविक पाहता,त्या तिघींनी असूया, इर्षा, द्वेष, मत्सर या भावनांनी तिच्यावर फक्त आरोपच केले नाही, तर त्यातील एकीने जिवाचा आटापिटा-पराकाष्टा करून तिचा अंक पूर्णत्वास जाणार नाही, याची पूर्ण जंगच छेडत तो फिस्कटविण्याची पूर्ण प्लॅनिंगच केली होती. पण फार जुनी एक म्हण आहे "ढोराच्या सरापल्याने वाघ मरत नाही" आणि ध्येय निश्चित, प्रयत्न प्रामाणिक व नितीमत्ता साफ असेल, तर कार्यसिध्दीस कुणीच अडवू शकत नाही.


   सई सोबत देखील तसेच झाले. पुढेही तिला जवळ चे आहोत असे भासवणाऱ्यांमधून, छोट्या मोठ्या अपमानाच्या जहराचे कडू डोस पाजणारे अंकाच्या निर्मितीत भेटत गेले. पण अंक काढण्याचे तिचे स्वप्नच एवढे जबरदस्त होते की ती, निमूटपणे समोर येइल त्या कटू अनुभवाचे घोट पित गेली.

सई कोण होती, कुठली होती, कशी दिसत होती याने काय फरक पडते? कारण ती नेहमी एक वाक्य बोलत असायची, "माणसाचे दिसण्यापेक्षा, त्याचे असणे महत्वाचे. दिसणे आणि असणे या दोन वेगवेगळ्या बाबी. 

कुणी रंगाने गोरा गोमटा, सुंदर आकर्षक, तुकतुकीत त्वचा असलेला असेल, पण मनात कपट असेल, शंकेने, द्वेषाने, मत्सराने भरलेला असेल तर काय कामाचे ते बाह्य शरीर सौंदर्य".

आपल्याच विचारात गुंग असणाऱ्या सईला कार्यक्रमाचे फोटो बघत असतांना वारंवार मॄणाल चे ते शब्द आठवत होते. शेवटी तिने एक लांब सुस्कारा सोडला. "मुखावर खेळणारे स्मित व त्या मागील वेदना....... हेच तर माझे कणखर आयुष्य जगण्याचे बळ आहे".


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational