Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Asmita prashant Pushpanjali

Romance


5.0  

Asmita prashant Pushpanjali

Romance


कथा तिची व त्याची

कथा तिची व त्याची

7 mins 804 7 mins 804

प्रत्येक प्रेमकहानीचा अंत सुखद असतो असे नाही, व प्रत्येक प्रेमकहानीचा अंत दुःखद असतो, असेही नाही. तसेच प्रत्येक प्रेमकहानीत प्रियकर व प्रेयसीचे मिलन होवून, एकत्र येतीलच असेही काही नाही. किंवा मिलन न झाल्यास, ते कायमचे दुरावतील असेही नाही. अशीच काहीशी कथा तिची व त्याची.


अश्विनी खिडकीत उभी राहून, बाहेर धो धो बरसणाऱ्या सरी, कपातील चहाचे गरमगरम घोट, घशाखाली उतरवीत बघत होती. खिडकीतून तिची नजर, समोरच्या डबक्यात साचत असलेल्या पाण्यात स्थिरावली. 

"थोडे बाजूला होता का?" छत्री बंद करीत, रौनक रमनला उद्देशून बोलली.

तिचा आवाज कानावर पडताच, तो काही न बोलता बाजूला झाला.

रमनचा कार्यालयातील तो पहिलाच दिवस होता. रौनक मात्र वर्षापासून कार्यालयात कार्यरत होती. गोऱ्यागोमट्या रंगाची, उंचपुरी रौनक विवाहीत होती. सुरवातीला कार्यालयात रमनचा फारसा परिचय नसल्यामुळे, तो जास्त कुणाशी जवळीक न करता, कार्यालयीन काम शिकून घेताना, त्याला ज्याच्याशी जे काम पडत असे, त्याच्याशी तसा सलोख्याने बोली. अधामधात रौनकसोबतही त्याचा संवाद होत असे.

"सर", "मॅडम"पासून दोघांचा सुरू झालेला संवाद, चार वर्षांत,"रौनक", "रमन"पर्यंत येवून पोहचला.


"रमन, तुम्ही जेवले नाही अजून." रौनक ऑफिसच्या एका वार्षिक कार्यक्रमात, जेवणाचे आपले ताट घेवून, आतमध्ये आली, व रमन टेबलवर तसेच ताट ठेवून बसलेला आहे, हे बघितले. ती सुद्धा त्याच्या शेजारील खुर्चीवर, ताट समोर ठेवून बसली.

"नाही, तुझीच वाट बघत होतो." रमन

रौनकने बॅगमधून पाण्याची बाॅटल काढून दोघांच्या मधात ठेवली.

रमन गोडीत येवू लागला.

"आहा हा। काय मस्त दिवस आहे आज." रमन

"काय विशेष आहे आज." रौनक

"अरे विशेषच आहे आज. आपण एकत्र जेवतोय." रमन

"त्यात काय? रोजच जेवतो दुपारी एकत्र." रौनक

"हो, पण ते आपल्या आपल्या टिफीनमधलं. डिशमध्ये नाही जेवत ऑफिसमध्ये आणि महत्वाचं म्हणजे, स्वीट नसते आपल्या जेवणात." रमन

"अच्छा, असं होय. स्वीट नसते रोज." रौनकही त्याला उपहासात्मक दुजोरा देत होती.

"हो. आणि ती स्वीट, मी आज तुला माझ्या हाताने भरवणार आहे." रमन 

"आ!! काहीतरीच काय! कार्यालयात आहोत आपण."

"असू दे की मग. त्यात काय होते." रमन

"अरे कुणी बघतील." रौनक

"बघू देत." रमन

"काय म्हणतील?" रौनक

"काय म्हणणार? स्वीट भरवत आहे म्हणतील. कुणाची भिती पडली का?" रमन, जरा जास्तच रंगतदार होत म्हणाला.

रौनकचे हो... नाही... सुरूच होते. आणि रमनने कसलाही किंतू परंतू न ठेवता, बालूशाही उचलली व अख्खी तिच्या तोंडात कोंबली.

"अरे... उ...." म्हणत रौनकने ती कशीतरी गिळण्याचा प्रयत्न केला. आणि गिळतागिळता दुसरी बालूशाही उचलून, तिने त्याला भरवली. त्याने मात्र एक तुकडा दाताने तोडून, 

"उरलेली तू खा," तिला म्हटले.ऑफिस स्टाफ तसा लहान. रमन आणि रौनक दोघांनाही कार्यालयातील काम. त्यांना वगळता इतर कर्मचाऱ्यांना फिल्डवर्क. त्यामुळे दिवसभर कार्यालयात इतर कर्मचारी फारसे थांबत नसले, तरी कुणी ना कुणी अधामधात जात येत रहायचे.

रौनक व रमनचा नित्याचा दिनक्रम ठरलेला. कार्यालयात येताच, जे ही कर्मचारी उपस्थित असतील, त्यांच्या सोबत गरमागरम चहा घेवून, कामाला सुरवात करायची. कधीकधी तर दोघेच ऑफिसच्या शेजारी असलेल्या टपरीवर चहा पिण्यासाठी जात. रमन आणि रौनक, ऑफिसच्या परिसरातील इतर लोक आपल्याबद्दल काय म्हणताय, याचा कधी कानोसाही घेत नव्हते. विचारही करीत नव्हते. दोघेही मनमस्तमौला होवून, आपल्याच विश्वात वावरत. कार्यालयात येताना, जाताना एकत्र येणे- जाणे, कोणत्याही इव्हेंटमध्ये सोबत जाणे, एवढेच काय ऑफिसच्या व ऑफिसव्यतिरीक्त इतर सहलीतही दोघ सोबत जात. लक्ष न देणाऱ्यांसाठी त्यांचा हा बेधुंदपणा, म्हणजे कामकाजी स्त्री-पुरूषांची मुक्त विचारातून झालेली मैत्री. पण, ज्यांना स्त्री-पुरूष मैत्री हे मुक्तविचार वाटत नव्हते, त्यांच्यासाठी मात्र, हा "गडबड घोटाळा" वाटत होता.

"काय गं आसू, आजकाल तर दोघेही खूप फिरताना दिसत आहेत. एकत्र चहा प्यायला येतात. ऑफिसमध्येही एकत्रच येतात आणि सोबतच जातात." पन्नाशी उलटलेल्या, बाजूच्या विभागातील नाडकर्णी मॅडम, रौनकसोबत अधामधात बोलत दिसणाऱ्या अश्विनीला विचारू लागल्या.

"दोघं? कोण दोघं?" तिला त्यांच्या इशाऱ्याची सुई समजली नाही.

"अगं तुला माहित नाही। एक नवीनच लवबर्ड जन्माला आला आहे, आपल्या शेजारच्या विभागात." परत त्या कोड्यात बोलल्या.

"लवबर्ड? मला नाही माहित बा।" आशू

"काय तू!" थोडा वेळ त्या डोक्याला हात मारीत बसल्या.

"अहो मॅडम, खरंच मला नाही माहित." आशू

मग त्यांनी इकडेतिकडे मान फिरवून, कुणी बघतंय का? बघत तर नाही, याची शहानिशा करून, तिला कान जवळ करण्याचा इशारा केला.

"ती रौनक।" 

"रौनक।।।"

"हो रौनक आणि तो रमन। काय बाई बघावं तेव्हा दोघंच सोबत दिसतात. तिसरा कुणीच नसतो त्यांच्यासोबत आणि तो व ती दोघंही दुसऱ्या कुणासोबत राहत नाही, ती फक्त त्याच्यासोबत व तो फक्त तिच्यासोबत. चहा, नास्ता एवढंच काय, जर बाइकने आला तर ती पण सोबतच असते."

हे ऐकून आशूला प्रथम आश्चर्य वाटलं. तिला काय बोलावं ते कळेना. 

"हो का! मी कधी लक्ष नाही दिलं." आणि ती तिथून उठून गेली.

नाडकर्णी मॅडमजवळून आलेल्या आशूचे मन, कामात लागेना. तिला सारखे रौनक व रमनचे विचार येत होते.

"हे दोघेही एकत्र दिसतात, हे तर खरे आहे. पण मैत्रीव्यतिरीक्त इतर भावना असू शकतील का? रौनकच्या विवाहाला बारा-तेरा वर्षे झाली असतील. तिचा पती समंजस व नोकरीवर असून, दोघांचं ट्युनिंगही किती छान असतं. फॅमिलीतही चांगलंच आहे, आणि दोघांच्या संमतीने एकच बाळही ठेवलंय त्यांनी. ती पारिवारीक बाबतीत नेहमीच समाधानी असते. कधीकधी नवऱ्याचा वेंधळेपणा सांगते, पण तो तेवढ्याच वेळापुरता. नंतर मात्र हॅप्पी हॅप्पी आणि रमन, तो तर याही पलीकडे दोन पावले पुढे आहे. मामाच्या गावाला शिकायला गेला, तिथं श्रीमंत बापाची फक्त सुंदरच नाही, तर परजातीय मुलगी पटवून, प्रेमविवाह करून घरी घेवून आला. घरच्यांशी तिचं जुळलं नाही, तर तिच्या हट्टावरून बाहेर भाड्याचे घर घेवून, शिफ्ट झाला. हळूहळू त्याच्या या सुखाच्या संसारवेलीवर दोन फुलं... एक मुलगा व एक मुलगी म्हणून उमलली. तो सुद्धा मॅरेज लाइफपासून हॅप्पी हॅप्पीच दाखवतो. मग सगळे हे जे काय म्हणतात ते काय असेल. आज नाडकर्णी बोलल्या, दोन दिवसांपूर्वी क्षीरसागर व कावळे ही बोलत होते."

आशू तिच्या खुर्चीवर या विचारात गढली असतानाच, "हॅलो। कुठं हरवलीस।" रौनक बोटाची टिचकी वाजवून तिचे लक्ष वेधत होती.

"अरे तू।"

"हो मी। पण तू कुठं।" रौनक

"काही नाही गं, सहजच, एक विचार येत होता डोक्यात." 

"कसला गं." रौनक तिच्या शेजारी खुर्ची ओढत बसली.

"काही नाही. जावू दे, तू सांग. तू कशी काय या वेळी."

"अरे यार माझं तुझ्याकडे एक काम होतं. मला थोड्या वेळासाठी पेनड्राइव देते का, मी लगेच परत आणते."

"हो." म्हणत आशूने पर्समधला पेनड्राइव काढून दिला.

"थँक यू. मी लगेच घेवून येते. हो पण नंतर तू काय विचार करत होती, ते सांग. आपण चहा घेवू." आणि रौनक भर्रकन आली तशी गेली.

"हिला काय सांगू? काय विचार चालले होते माझ्या डोक्यात ते." आशू मान हलवून खाली बघू लागली.

"चल गं. बाहेर बसू चहा घेत." परत हवेच्या झुळकीप्रमाणे रौनक आली आणि तिच्या हातात पेनड्राइव देत बोलली.

"नाही। इथेच बैस. इथेच बोलवू चहा." आणि तिने फोनवर चहा बोलवला.

चहाचे गरमगरम घोट घेत, "हूं..... सांग! कुठं हरवली होती मगाशी." रौनक

आशू व रौनक अधामधात अशी चहा व गप्पांची मैफील जमवत असत. त्या नेहमीच एखाद्या विषयावर भरपूर वेळ चर्चा करीत असत.

"स्त्री पुरूषाच्या मैत्रीबद्दल तुझं काय मत आहे." आशू

"तू हा विचार करीत होतीस का?" रौनक

"हो, हा सुद्धा आणि इतरही."आशू

"मी नक्की असं काही सांगू शकत नाही, पण यार एक आहे. हे पुरूष ना मैत्री असो की प्रेम, त्याला निकोप राहू देत नाहीत. पुरूषांना फिजिकल अटॅचमेंट होतं. विश्वास ठेवून यांच्यासोबत कुठं जायचं म्हटलं, की यांच्या डोक्यात पहिला प्रश्न फिजीकल रिलेशनचा येतो." रौनक सहज बोलली,

पण आशूला वाटले, "हिच्यासोबतही असं झालं असेल का?"

"विवाहीत असले तरी का गं।" आशू

"हो, उलट विवाहीतांमध्येच जास्त ओढ असते." रौनक

"बट यार, विवाहीत जोडप्याला का वैवाहिक संबंधाव्यतिरीक्त, मैत्री असावे वाटते. ओके, ठिक आहे जर ते मॅरेज लाइफमधे हॅप्पी नाहीत, तर समजू शकतो. बट मॅरेज लाइफ मधे हॅप्पी असतानाही." आशूला या प्रश्नातून रौनकचे मन उकलायचे होते.

"कशी गोष्ट करते यार तू आशू. अगं काही वर्षांचे मॅरेज लाइफ झाल्यावर, जर जाणवू लागत असेल, की आपला पार्टनर आपल्याला समजून घेत नाही. विचार जुळत नाही, आणि एक खालीखालीपण वाटत असेल, तर काय करणार बिचारे. 

आणि खरं सांगू, पतीला काय हवं असते गं पत्नीकडून? केवळ त्याची सेवा. सकाळ सायंकाळचं जेवण बनवून दे. त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण कर, त्याला आर्थिक हातभार पण लाव आणि परत, तुझी इच्छा असो की नसो, तू कितीही थकली असू दे, रात्री बेडवर त्याला ते हवंच. अगदी दोन मिनिटांसाठी का होइना। मग भलेही स्त्रीची तृप्ती हो की नको आणि खरंच सांग एवढं करूनही तिची तृप्ती होते का? एकतर तीला कधी मुड नसतोच आणि जर ती रंगात आली, तर हा थंडा. बरं पुरूष तरी हॅप्पी असतातच का मॅरेज लाइफमध्ये. अगं कित्येत फॅमिलीत, स्त्रियासुद्धा पतीला समजून घेत नाही. कधी त्याला मेंटली टाॅर्चर करतील, तर कधी इमोशनली ब्लॅकमेल. त्याच्याही जिवाची हालमेल होतेच की? त्यालाही वाटतं, त्याला समजून घेवून समजवणारी असावी आणि म्हणून, विवाहोत्तर मैत्री किंवा संबंधाचा प्रपंच होतो." रौनक जे बोलत होती, ते सत्य होते.

"चल यार निघते मी. लंच टाइम संपला."रौनकने चहाचा कप केव्हाचाच खाली ठेवला होता.


"आज जेवण नाही केलं तू." अश्विनी

"आज नाही आणला डबा." रौनक

"का गं।"

"अग ऑफिसमध्ये मी एकटीच आहे. लवकर जाणार आहे आज." रौनक

"एकटीच। रमन सर।" 

"त्यांची मीटींग आहे, जिल्हा कार्यालयाला. उद्या सुट्टी आहे, मी आज आईकडे जाणार आहे, म्हणून डबा नाही आणला. एकटीला नाही खावंस वाटत यार." रौनक खुर्चीवरून उठत, "चल निघते बाय!"

आणि ती निघून गेली.

आज रौनक व रमन सात वर्षांपासून तसेच एकत्र आहेत. एकाच कार्यालयात. तसेच एकत्र येणे-जाणे, एकत्र फिरणे आणि दोघंही आपलेआपले घर-परिवार जपून, सांभाळून आनंदी आहेत.

"काही असो. मात्र रमन व रौनकने बोजड झालेल्या जीवनाला दूर सारत, आनंदी जीवन जगण्याची कला अवगत केलेली आहे."


अश्विनी चहाचे घोट संपवत, खिडकीतून नजर हटवत, स्वतःशीच मिश्कील हसत बोलली....


प्रेमाची रूपं किती?

प्रेमाची रूपं अनेक।

भासे कधी सुरेख,

तर दिसे कधी धुकेर।


Rate this content
Log in

More marathi story from Asmita prashant Pushpanjali

Similar marathi story from Romance