Kavita Rohane

Classics Others

3  

Kavita Rohane

Classics Others

मे महीना आणि आंबा

मे महीना आणि आंबा

3 mins
245


मे महिना आणि आंबा,," इट इज अ बेस्ट कॉम्बिनेशन". उन्हाळा म्हटलं की सगळ्यात पहिले आठवण येते ती आंब्याची कारण मे महिना हा आंब्या शिवाय अपूर्णच आहे, उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याची किंमत जरा जास्तच असते खास करून रत्नागिरी हापूस असेल तर. पण नंतर त्याची किंमत कमी होते पण जेव्हा त्याची किंमत जास्त असते तेव्हाच आंबा खाण्याची मजा येते. खास करून मे महिन्यात ,देवाने खूप विचारपूर्वक आंबा आणि उन्हाळा ही जुळवणूक केलेली असेल कारण याच महिन्यात किंवा उन्हाळ्यातच आंबा खायची मजा येते बाकी ऋतूंमध्ये ती मजा येत नाही आणि आंबा हा उन्हाळ्यातच बघायला मिळतो त्यामुळे कदाचित याच ऋतूमध्ये तो खावा.

आंबा आणि मी आमचे फार जवळचे नाते .घरी शेती असल्यामुळे शेतीच्या कडेला नुसती आंब्याची झाडे तसेच ज्या गावात माझा जन्म झाला त्या गावात सुद्धा आंब्याची झाडे खूप होती त्यामुळे मे महिना आला की आंबा खायची मजाच .आमच्या आजीचे गाव सुद्धा आमच्या गावाच्या जवळच होते आणि आजीकडे सुद्धा आंब्याची झाडे खूप होती त्यामुळे अजूनच मजा. आमच्या बालपणी हापूस ,देवगड हे प्रकार फार लांब होते .त्याकाळी होता साधा आंबा म्हणजे गावाकडील लोक त्याला गावरानी आंबा असे म्हणायचे .चवीला एक नंबर ,पाण्याने स्वच्छ धुतला की खायचा, मस्त टेस्ट आंब्याची गूही आणि साल त्याला काहीच शिल्लक राहत नव्हतं पूर्ण रस सफाचट.

मी लहान असताना जेव्हा आजी कडे जायचे ,खास करून मे महिन्यात तेव्हा आंबा खायची खुप मजा असायची. आजीकडे माडीचे घर होते .माडीवर नुसते आंबे पसरवलेले असायचे ,संपूर्ण घरात आंब्याचा सुगंध ,माडीवर आंबे ही पिकवायला पसरवलेली असायची. जो आंबा पिकला त्याला वेगळं काढायचं तो नुसता माचवून खायचा किंवा जर जास्त आंबे पिकले असेल तर त्याचा रस करायचा आणि तळलेल्या पापड ,कुरवडी सोबत खायचा एक नंबर वाटत होता रस पापड कुरवडी सोबत .तसेच आमची आजी सरगुंडे करायची गव्हाच्या पिठापासून ते तयार करतात ते रसासोबत खूप छान वाटत होते. आमरस खाण्याची मजाच काही वेगळी होती तेव्हा. आता सुद्धा ती परंपरा कायम आहे .शहरात हापूस ,देवगड हा आंब्याचा प्रकार जास्त चालतो पण खास करून हापूस आंब्याची चवच निराळी अप्रतिम .आंबा कितीही महाग असला तरी माणूस तो खातोच कारण त्याची चव खूप सुंदर असते. एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी त्याची चाहूल लागते मग मे महिन्यात खास करून अक्षय तृतीया या मुहूर्तावर लोक आंबा घरी आणतात .आंब्या पासून बनलेला कुठलाही पदार्थ हा चविष्ट वाटतो .मे महिन्यात कच्च्या कैऱ्या यापासून गुळांबा ,साखरांबा बनवला जातो तो चवीला खूप छान वाटतो .

खरंच मे महिना आला की आंबे खायची खुप मजा असते .खास करून तेव्हा ,जेव्हा पाहुणे घरी येतात पाहुणे आले की स्वीट डिश म्हणून आमरस केला जातो .खास करून मे महिन्यात त्यामुळे मे महिना आणि आंबा यांचा खूप चांगला संबंध आहे. मे महिना आणि आंबा यावर मी लिहिलेली एक कविता प्रस्तुत आहे

मे महिना आणि आंबे ..

घट्ट नाते आमचे..

दिवस असतात सुट्टीचे..

आमरस पापड खाण्याचे..

कच्चा असता लागतो आंबट.. पिकल्यानंतर मात्र होतो गोड ..

चव त्याची रेंगाळत राहते ..

सतत आपल्या जिभेवर..

काहीजणांसाठी असतो..

त्यांचा जीव की प्राण ..

दर मे महिन्यात असतो ..

खास मान..


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics