Kavita Sachin Rohane

Tragedy

2  

Kavita Sachin Rohane

Tragedy

नको पाठवू रे वृध्दाश्रमात भाग२

नको पाठवू रे वृध्दाश्रमात भाग२

2 mins
47


 त्या रात्री सीमा खूप विचार करत बसली तिला काही सुचत नव्हतं तिला सारखा विचार येत होता की ज्या मुलांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत आलो त्याच मुलांनी आपल्याशी असं का वागाव पण शेवटी तिने निर्णय घेतला, तिने ठरवले की मुलांसाठी खूप काही केलं मग आता हेही करूया आणि ती वृद्धाश्रमात जायला तयार झाली कारण तिचं तिच्या मुलांवर खूप प्रेम होतं पण यावेळी तिची मुलं चुकत आहेत हे तिच्या लक्षात येत नव्हतं म्हणतात ना प्रेमापोटी माणूस काहीही करू शकतो. आता सीमा वृद्धाश्रमाच्या जीवनात रमू लागली होती अशीच दिवसामागे दिवस गेली. सीमाच्या मुलांनाही मुलं होती तीही आता मोठी झाली होती आणि त्यांचीही लग्न झाली होती हळूहळू सीमा सारखाच तिच्या मुलांसोबत घडत होतं सीमाच्या मुलांचं व तिच्या नातवंड व सुनांची भांडण आता घरात सुरू झाली होती इतिहास पुन्हा घडतो असं म्हणतात ना त्यातलाच हा एक प्रकार. सीमाच्या सुना व तिच्या सुनांच्या सुनांमध्ये आता खटके उडू लागले आणि एक दिवस त्यांच्या नातवंडाने सीमाच्या मुलांना सांगितले की तुम्ही या घरात राहू नका तुमची व्यवस्था आम्ही वृद्धाश्रमात करतो हे ऐकता सीमाच्या दोन्ही मुलांना सीमाची आठवण आली त्यांच्या डोक्यात विचार चक्र सुरू झालं झालेल्या सगळ्या घटना त्यांना आठवू लागल्या आणि तेव्हा त्यांना जाणीव झाली की जे आपण आपल्या आई-वडिलांसोबत केलं तेच आपली मुलं आपल्या सोबत करत आहेत आता सीमाच्या मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव व्हायला सुरुवात झाली आणि त्यांना सगळ्या गोष्टींचे दुःख वाटू लागले पण आता वेळ निघून गेली होती कारण सीमा आता आयुष्याच्या शेवटच्या पायरीवर होती आणि आता तिच्या मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती म्हणून ती सीमाच्या भेटीसाठी वृद्धाश्रमात गेली आणि ढसाढसा रडू लागली सीमा मात्र याचा आनंदत होती की चला उशिरा का होईना मुलांना जाणीव झाली तिच्या मनात मुलांविषयी जराही राग नव्हता एवढी प्रेमळ स्त्रीही असू शकते. सीमाने मोठ्या मनाने तिच्या मुलांना माफ केलं आणि तिच्या जीवनाची उरलेली काही दिवस तिने तिच्या मुलांसोबत घालवली या काळात तिने तिच्या नातवंडांनाही समजवून सांगितलं आणि तिच्या नातवंडांनाही तिचं म्हणणं पटलं आणि शेवटी सगळं कुटुंब एकत्र झालं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy