Kavita Sachin Rohane

Crime

3  

Kavita Sachin Rohane

Crime

दागिना

दागिना

2 mins
208


दागिना म्हणजे स्त्रियांचं आकर्षण. मग तो दागिना कुठलाही असो सोन्या-चांदीचा किंवा इतर कुठल्या धातूचा .स्त्रियांना दागिन्याचं फार आकर्षण असतं त्यांच्या शॉपिंग लिस्टमध्ये दागिना हा असतोच. दागिन्याच्या संदर्भात माझ्या एका मैत्रिणीसोबत घडलेला किस्सा सांगते.नुकतच तिचं लग्न झालं होतं.लग्नाचा दुसरा दिवस होता.ती तीच्या सासरी होती.सकाळी उठली आणि आंघोळीसाठी निघाली.आंघोळीला जायच्या आधी सगळे दागिने तिने तीच्या बॅग मध्ये ठेवले.नववधू असल्यामुळे तिला काही कळले नाही की दागिने एखाद्या ज्येष्ठ व्यक्ती कडे ठेवायला हवे.शेवटी ते त्यांच्या पतीचं घरं होतं.तिच्या ध्यानीमनी पण असा विचार आला नसेल की तिच्या सोबत असं काही घडेल. असो, आंघोळ करून आल्यावर नाश्ता करण्यासाठी ती खाली स्वयंपाक घरात गेली तीच सगळं सामान तीने माडीवरच्या रूममध्ये ठेवल.सगळी पाहुणे मंडळी खालीच होती हॉलमध्ये.नाश्ता झाल्यावर ती वर गेली. तिला तिच्या आईकडे जायची तयारी करायची होती. तिने तीची बॅग ओपन केली आणि बघते तर काय त्यात तिचे सगळे दागिने होते फक्त नेकलेस नव्हता. मग तिची धडपड सुरू झाली ,ती खूप रडायला लागली आणि घरात सगळीकडे गोंधळ उठला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. काही जण म्हणू लागले की ,पोलिस कंप्लेंट करा पण घरातल्या ज्येष्ठ लोकांना ते मान्य नव्हतं कारण घराची बदनामी होऊ शकत होती कारण तिथे कोणीही नव्हतं घरातील माणसं फक्त होती. जास्त माणसं घरात नव्हती, होती ती घरातील होती आणि त्यांच्यावर डाऊट तरी कसा घेणार यामुळे सगळे गप्प बसले पण घरातल्या घरात दागिना कसा गायब होतो हा एक प्रश्नच आहे. दागिन्याची संबंधित ही तिच्या जीवनातील एक अविस्मरणीय घटना होती. आज तिच्याकडे दुसरा नेकलेस तर आहे पण तिच्या मनात अजूनही प्रश्न आहे की लग्नात घेतलेला नेकलेस गेला कुठे आणि चोरणार्‍याने बाकी दागिने चोरले नाही .फक्त नेकलेसस का चोरला असेल?


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime