The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Niranjan Salaskar

Action

2.1  

Niranjan Salaskar

Action

"मैथिली"

"मैथिली"

8 mins
9.9K


"शीत ss ल! जरा लवकर कर मला ऑफिसला जायला उशीर होतोय, माझा रुमाल आणी टाय कुठे ठेवलायस?"  पियूष कपाटात शोधताना म्हणाला. "अरे तिथेच आहे बघ कपाटात, लेफ्ट साइडला नीट बघ जरा." शीतल टिफीन भरत होती. "बरं का,  चल लवकर तू पण माझ्यासोबत. काल ठरलय ना आपलं." पियूष शूज घालताना म्हणाला. "हो बाबा, चल ही बघ झालीच माझी तयारी." शीतलने टेबलावरच्या किल्ल्या घेतल्या, घरात सगळं बंद केलय याची खात्री केली व कुलुप लावले.  पियूषने तोपर्यंत पार्किंगमधून गाडी बाहेर काढली व शीतलच्या डोळ्यावर पट्टी बांधत म्हणाला "आज तू खूप खुष होणार आहेस." एवढ्या वर्षांच आपलं स्वप्न आज पूर्ण होणार आहे."

"हो, बघूयाच काय देतोय सरप्राईज तू!"  ती आतुरतेने म्हणाली. पियूषने तिचा हात पकडून तिला गाडीत बसवले. तिच्या डोळ्यांसमोरुन हात फिरवून पट्टी घट्ट बांधल्याची खात्री केली व गाडी सुरू केली. "पियूष मला नेमकं सांगशील तरी तू कुठे घेऊन जातोय ते?" तीची उत्सुकता पराकोटीला पोहोचली. "तिथे पोहोचलो की समजेलच तुला फक्त अर्धा तास वाट बघ."  पियूष समोर बघत बोलला. शीतलला काहीच कल्पना नव्हती की पुढच्या अर्ध्या तासात काय होणार आहे ते,  कारण या आधीही खूप वेळा पियूषने तिला असे सरप्राईजचे सुखद धक्के दिले होते, त्यामुळे तिला थोडीशी कल्पना आलीच होती की पियूष मला लन्चला नाहीतरी एखादी ज्वेलरी घेण्यासाठी घेऊन जात असेल. तिला गाडीचा हळुहळू  ब्रेक दाबण्याचा आवाज आला. पिय़ूष गाडीतून उतरला. दुस-या बाजुस येऊन दरवाजा उघडला, गाडीतून उतरण्यासाठी त्याने तिचा हात पकडला. दरवाजा लावला व हातात हात घालून ती पियूषच्या मागोमाग चालत होती. "पियूष मला सांगशील का आपण कुठे आलोय?"  "सांभाळून चाल, खाली पाय-या सूरू होतील." असं म्हणून त्याने तिचा प्रश्न टाळला. दोन मजले चढल्यावर तिने परत तोच प्रश्न केला. "हे बघ आलोच इथ थांब जरा".  पियूषने खिशातून किल्ली काढली त्याने टाळा उघडला व तिचा हात पकडून तिला आतमध्ये आणलं.  "झालं का तुझ? आता उघडू का पट्टी?"  शीतलला कधी एकदा सरप्राईज पाहतेय अस झालं होतं. "हो उघड"....! शीतलने डोक्यामागे बांधलेली गाठ सोडली व हळुच डोळे उघडले, आणी गोल गिरकी घेत तिने सगळीकडे पाहीलं, तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. लगेचच ती पियूषला बिलगली व ढसाढसा रडायला लागली, कारण या आधी एवढं मोठ सरप्राईज तिला पियूष कडून कधीच मिळाल नव्हतं व तिने कधी अपेक्षाच केली नव्हती. ती दरवाज्याजवळ गेली दरवाजावर सौ. शीतल पियूष देशपांडे. असं लिहलं होतं, तिने हाताने त्या पाटीवरुन हळूच हात फिरवला. तिचे आनंदाश्रू काही थांबत नव्हते. "आता अशीच रडत बसणार आहेस का? जा घर बघून तरी ये आतून" पियूषने हसत शीतलला म्हटलं. तशी ती आतमध्ये शिरली घराच्या प्रत्येक वस्तूवर ती मायेने हात फिरवत होती. शीतलला ते नवीन घर फारच आवडलं रंग, पडदे, झुंबर याची चॉईसपण घराला शोभेल असा केली होता. हे सर्व बघून तिला पियूषचा हेवा वाटत होता. किती कमी वेळात त्याने स्वतःचे आपले घर घेतले. शीतल पूर्ण घर बघून बाहेर आली. "कसं वाटलं आपल नविन घर?"  पियूषने विचारलं. "एकदम मस्त खूप आवडलं, अगदी माझ्या मनासारख आहे, मी खूप सजवेन या घराला!" शीतलच्या बोलण्यात तिचा आनंद दिसत होता. "हो हो ते नंतर, आता निघूया कामाला उशीर होईल नाहीतर!"  पियूष म्हणाला. शीतलने नुसतीच मान हलवली; अस वाटत होतं तिला अजून थोडा वेळ नवीन घरात थांबायचं होतं. ते दोघं बाहेर पडले कुलूप लावलं तोपर्यंत शीतल गाडीत जाऊन बसली होती. आज ती खूप खूप खुष होती. एवढ्या दिवसांपासूनचं तिचं मुंबईत स्वतःचं घर घ्यायच स्वप्न पियूषने पूर्ण केल. पियूष गाडीत येउन बसला गाडी सुरू केली. "आपण कधी शिफ्ट व्हायचं इथे"? शीतलने उत्सुकतेने विचारलं, तिची आतुरता पियूष समजू शकत होता कारण त्या छोट्या भाड्याच्या खोलीत राहून ती कंटाळली होती. "उद्याच शिफ्ट व्हायचं" पियूषने खुष होऊन म्हटलं. "काय?  उद्याच?" शीतलने डोळे विस्फारत म्हटलं. "हो, आज काही माणसं येतील सामान हलवायला, तू आता घरी जाऊन सामान बांधायला घे." "ठीक आहे मी आता फुलदाणी, पडदे, बेडशीट, सगळं बांधून ठेवते." शीतल म्हणाली. तिच्या चेह-यावर वेगळाच हुरूप आलेला होता. काय करु नी काय नाही असं तिला वाटत होतं आणि ते सहाजिकच होते. शेवटी ती तिच्या स्वतःच्या घरात जाणार होती.  पियूषने तिला घराजवळच्या चौकात सोडलं व तो पुढे कामावर निघून गेला. शीतलने घरी आल्या आल्या सामानाची बांधा बांध सुरू केली, अथर्व (शीतल व पियूषचा ६ वर्षांचा मुलगा) नुकताच शाळेतुन आलेला त्याला काही कळलंच नाही आई काय करतेय सगळं सामान काढून. "आई काय करतेयस तू?"  त्याने निरागस चेह-याने विचारलं.  शीतल त्याचा पापा घेत म्हणाली "आपण आता आपल्या घरी जाणार आहोत स्वतःच्या,  तुझ्या पप्पांनी नवीन घर घेतलंय..  तसाच तो "एएएए ssss नविन घर नविन घर!" ओरडत बेडरूममध्ये गेला. त्याच्या निरागसतेचे शीतलला हसूच आले.. पूर्ण सामान शिफ्ट करायला दोन दिवस लागले,  नवीन घरात त्यांचे दोन-तीन दिवस झाले. पियूषला शीतलने आपण वास्तुशांती करुन घेऊया असं सुचवलं पण पियूषचा या सगळ्यावर विश्वासच नव्हता आणी शीतलनेही त्याला जबरदस्ती केली नाही. शेवटी तिला त्याचं मन दुखवायचं नव्हतं

नवीन घर खूप सुसज्ज होतं त्यामुळे अथर्वला खेळायला खूप जागा होती नुसता घरात मस्ती करत असायचा. त्यालाही लगेचच नवीन घराचा लळा लागला होता.

नवीन घरात दिवस कसे पटकन निघून गेले, कळलंच नाही. बघता बघता दोन महिने झाले. त्या सकाळी मी किचनमध्ये डब्याची तयारी करत होते. पियूष हॉलमध्ये टी. व्हि. बघत होता, अथर्वपण शाळेतची तयारी करुन बेडरूममध्ये बसला होता. अचानक मला बेडरूममधून अथर्वाचा जोरजोरात हसण्याचा आवाज आला, मी दुर्लक्ष केल. पण थोड्या वेळाने मला अथर्वाच्या एकटेच बडबडण्याचा आवाज आला. मी त्याला बघण्यासाठी बेडरुमजवळ आली, दरवाज्याच्या फटीतून आत पाहीलं आणी माझ्या अंगावर सरसरुन काटाचं आला! अथर्व बेडवर बसून समोर कोणाशी तरी गप्पा मारत होता. मला काही समजत नव्हतं. अथर्व असं कोणाशी बोलतोय. माझ्या घशाला कोरड पडली. मी धावत हॉलमध्ये  जाऊन पियूषला सांगणार तोच हॉलमध्ये सोफ्यावर पियूष आणी अथर्व बसले होते. अथर्वला हॉलमध्ये बबघताच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली व मी धपकन जमिनीवर कोसळली.

थोड्या वेळाने थंड पाण्याचा भपका कोणीतरी तोंडावर मारुन मला उठून बसवण्याचा प्रयत्न कोणीतरी करत होतं मी डोळे किलकिले करुन पाहिलं पियूष माझ्या डोक्याजवळ व अथर्व पायाजवळ बसला होता. "अगं शीतल अशी कशी पडलीस तू? "तरी तुला मी नेहमी सांगतो, काहीतरी खाऊन कामाला लाग. उपाशी पोटी हे असंच होतं, हे घे नाश्ता करुन ही गोळी घे थोडं बरं वाटेल." पियूष तिचा हात हातात घेऊन म्हणत होता.

तिने पियूषच्या हातातली गोळी घेतली व पियूषला सगळं सांगणार एवढ्यात तिची नजर अथर्ववर गेली व ती गप्प बसली. अथर्व समोर पियूषला सांगणे योग्य नाही म्हणून तिनं त्याला नंतर सांगण्याचे ठरवले.  "आज तू आराम कर मी जमल्यास हाफ डे ने यायचा प्रयत्न करेन..! अथर्वला आज घरीच राहू देत तुझ्यासोबत." पियूष तिला धीर देत म्हणाला. "चल मी निघतो...  "अथर्व आज तू मम्मीकडे लक्ष ठेव. तिला काही हव नको ते बघ; मग मी आल्यावर आपण खुप मज्जा करुया." पियूषने अथर्वला कुशीत घेतले.  "ठीक आहे पप्पा मी आज मम्मीची काळाची घेईन." अथर्व बोबड्या बोलात म्हणाला. हे एकून शीतलच्या पोटात गोळाच आला. तिच्या डोक्यात सकाळचाच विचार चालू होता. तिला विश्वासच बसत नव्हता की सकाळी घडलेलं भास होता की सत्य....?

"आई तुला काही पाहिजे का?"  अथर्वच्या निरागस प्रश्नाने शीतलला खात्री पटली की सकाळी घडलेलं सगळा भासंच होता. "माझा बाबु का असा एकटा बडबडेल..?"  स्वतःशीच प्रश्न विचारत ती सकाळच्या घटनेबद्दल हसली. तिला गोळीने गुंगी यायला लागली व तिचा डोळा लागला. थोड्या वेळाने तिला परत अथर्वाच्या एकट्या खिदळण्याचा आवाज येत होता. ती उठली डोकं थोडं जड झाल्यासारखं वाटतं होतं आवाज बेडरूममधून येत होता ती बेडरुमच्या दिशेने दबकत गेली. एका डोळ्याने बेडरुमचा कानोसा घेतला तर अथर्व जोरजोरात हसत होता, गप्पा मारत होता, खेळत होता. यावेळी मात्र शीतल बर्फासारखी गार पडली तिला समजतच नव्हतं अथर्वला नेमक काय झालय. ती बेडरूममध्ये गेली तेव्हा त्याने भिंतीकडे बोट दाखवत म्हटले "आई ही बघ मैथिली, माझी नवीन मैत्रिण. शीतलच्या पायाखालची जमीनच सरकली कारण अथर्व आणि शीतल सोडून घरात तिसरं कुणीच नव्हतं. तिची भीतीने पूर्ण भबेरी उडाली. अथर्वाला कुशीत घेऊन ती धावत हॉलमध्ये आली व पियूषला कॉल करुन तातडीने घरी बोलवलं. तिने झालेला सगळा प्रकार पियूषला सांगितला पण पियूषने शीतलची समजूत काढली, की "तुला भास झाला असेल." "नाही पियूष, या आधीपण मी त्याला एकटं बोलताना पाहिलयं. त्याची मैथिली नावाची कोणीतरी मैत्रिण आहे म्हणे या घरात, तिच्याशी हा बोलत असतो खेळत असतो...!  मला काहीच कळत नाहीय पियूष तू प्लीज डॉक्टरांना बोलव; प्लीज" शीतल पोटतीडकीने पियूषकडे विनंती करत होती आणि  सहाजिकच होतं . शेवटी आई ती आईच असते. पियूषने शीतलची हालत बघून डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर अथर्वच्या बेडरूममध्ये गेले. मागोमाग पियूष व शीतलही होतेच. अथर्व आताही एकटा बोलत होता आणि यावेळी पियूषने ते पाहिलं त्याचा विश्वासच बसत नव्हता. "डॉक्टर अथर्वला 'मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर' सारखे तर काही नाही ना?" पियूषने चिंतेने विचारले. "मला अथर्वाला काही प्रश्न विचारु द्या" डॉक्टरांनी दोघांना म्हटले. "हाय अथर्व, कसा आहेस बेटा?"  "मी एकदम मस्त आहे डॉक्टर अंकल." "बेटा तू आता कोणाशी गप्पा मारत होता?" "अंकल ती माझी नवीन मैत्रिण आहे, 'मैथिली'. "अच्छा! मग आमची नाही भेट करुन देणार तुझ्या मैत्रिणीशी?"  "अंकल, तिला नाही आवडत मोठी माणसं ती फक्त माझ्याशीच बोलते" अथर्व हसून म्हणाला. "ओके मग केवढी आहे तुझी मैत्रिणी? काय वय काय तिचं?"  ती खूप मोठी आहे माझ्यापेक्षा मी दुसरीत आहे आणि ती बारावीत आहे." "अच्छा, एवढी मोठी मैत्रिण! वा मस्तचं आहे मग." एवढ बोलुन डॉक्टर बेडरूममधून बाहेर निघाले व हॉलमधील सोफ्यावर बसले. त्यांच्यापाठोपाठ दोघही येऊन डॉक्टर जवळ बसले. "काय झालय अथर्वाला डॉक्टर तो असा का करतोय?" पियूषने विचारलं. "पियूष मला अथर्वमध्ये कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली नाहीत, लहान मुले नेहमी मनावर बिंबवलेल्या गोष्टी सारखे बोलत असतात.  अथर्वने पण हे कुठेतरी मैथिली नावाच्या मुलीबद्दल ऐकल असेल कारण त्याने मैथिली बारावीत असल्याचं सांगितलं म्हणजे १८-१९ वर्षांची मुलगी. आणी अथर्व ६ वर्षांचा. तो एकदम ठीक आहे, काहीच काळजी करु नका"...!  हे ऐकताच पियूषने शीतलच्या खांद्यावर हित ठेवत तिला धीर दिला. डॉक्टरांनी झोपेसाठी काही गोळ्या लिहून दिल्या त्याप्रमाणे शीतलने अथर्वला गोळी दिली. गुंगीने अथर्व झोपी गेला.

६-८  दिवस झाले अथर्व एकटा बडबडत नव्हता की खिदळत नव्हता. त्यांच्यामध्ये झालेला बदल बघुन मला फार बरं वाटत होतं. एक दिवस मी सोफ्यावर पडले असताना अथर्व माझ्या कुशीत आला त्याचे शरीर बर्फासारखं थंड होतं. "आई मरणं म्हणजे काय गं?" सहा वर्षांचा मुलगा मला  मरणाबद्दल का विचारतोय?  तिला काही कळलंच नाही "मरणं म्हणजे माणूसं कायमचे हे जग सोडून देवाघरी जातात ना त्याला मरणं म्हणतात, पण तू का विचारतोय हे सगळं....?  अजून तुला खूप मोठ व्हायचंय, शिकायचयं. "कारण मैथिली म्हणाली की ती माझ्या बेडरूममध्ये दोन वर्षांआधीच फास लावुन मेली होती"अथर्व थंडपणे म्हणाला. हे एकताच शीतलच्या अंगावरुन सरकन काटा येतो, तिची दातखिळीचं बसते. "डॉक्टर अंकलच्या गोळ्यांमुळे मला खूप झोप येते तिच्याशी बोलायला मिळतच नाही, म्हणून काल ती मला तिच्यासोबत बोलवत होती मीपण तीच्यासोबत गेलो. तेवढ्यात त्याने शर्टाची कॉलर थोडी बाजुला केली. शीतलने अथर्वच्या मानेवर पाहिलं दोरखंडाचे लालसर काळे व्रण मानेवर उमटले होते ते पाहून तीच्या पायाखालची जमीनच सरकली.

 


Rate this content
Log in

More marathi story from Niranjan Salaskar

Similar marathi story from Action