Niranjan Salaskar

Romance

3.4  

Niranjan Salaskar

Romance

प्रेमाची व्याख्या!

प्रेमाची व्याख्या!

3 mins
7.1K


प्रेम ही या जगातील अशी एक गोष्ट आहे जी साध्य करायला काहींनी आपलं अख्ख आयुष्य वेचून टाकलं तर काहींना ते एकदम सहजा-सहजी मिळालं. अर्थात प्रेम मुद्दाम मिळवलं जात नाही आणी कोणी मुद्दाम प्रेमात पडत नाही. ते नकळतच होत जातं आणी त्याची जाणीव दोघांनाही नसते. एका ठराविक वेळेनंतर त्यांना लक्षात येतं की ते एकमेकांच्या प्रेमात पडलेयत. अशा या प्रेमाचे खूप सारे पैलू आहेत. कोणी बस स्टॉपवर प्रेमात पडले तर कोणी फ्लाईट मध्ये कोणी अगदी शाळेपासून प्रेमात आहेत तर कोणाला लग्नानंतर प्रेम होतं. असं म्हणतात प्रेमात पडलेलं जोडपं एका वेगळ्याच दुनियेत असतात त्या दुनियेत त्या लोकलची गर्दी नसते वा त्या तिकिटं काढण्यासाठीची लगबग, त्यांच एकदम निवांत चाललं असतं जणु ते दोघच त्या दुनियेत अगदी राजा राणी असल्या सारखं त्यांना वाटतं. आता या वेड्या प्रेमाचे प्रकार पण तेवढेच गमतीदार असतात बर का..! काही जणं फक्त सहवास म्हणुन प्रेम करतात काही आकर्षण म्हणुन तर काहींचं तर ते जीवनचं बनलं असतं अर्थात ते प्रत्येकावर अवलंबून असतं की त्यांना कशा त-हेच्या प्रेम रंगात डुंबायचय ते.
काही लेखकांनी याला रोगाची (प्रेम रोग) उपमा दिलीय तर काहींनी रंगाची (प्रेम रंग). कारण काहींच्या आयुष्यात प्रेमाची लागण एखाद्या रोगासारखी झाली तर काहींच्या आयुष्यात लालसर गुलाबी प्रेम रंगाची उधळण झाली. अर्थात या जगातला कोणीही त्याची (प्रेमाची) लागण वा त्याची स्वतःच्या आयुष्यात उधळण झाल्या वाचुन राहीला नाहीय त्यात मीही आहेच. मला अस वाटतं जी व्यक्ती प्रेमात आहे ती जगातील सगळ्यात सुखी व्यक्ती आहे. आणी प्रेम म्हणजे फक्त व्यक्तीवरच मर्यादित नसाव ते कुठल्याही गोष्टीवर असल तरी ते तितकेच निखळ आणी नितळ असलं पाहिजे मग ते एखाद्या कलेवर, साहित्यावर, छंदावर किंवा आवडीच्या कामावर. प्रेमात नितळता हवी पारदर्शकता हवी विश्वास, समजुतदारपणा हवा, मजा हवी मस्ती हवी वेळ आल्यास एकमेकांना जवळ घेणं, भविष्याबद्दल भरभरून गप्पा मारण, मुलाबाळांबद्दल विचार करण हे सगळचं हवं प्रेमात. अत्यांतिक प्रेमाची मी खुप उदाहरणं पाहीली ज्यात रोमीओ- जुलिएट, हिर- रांझा अाणी असे कित्येक आहेत ज्यांची नावे या समाजाने दडपुन टाकली आणी त्याची कारणेही खुप आहेत पण त्यातल्या त्यात आंतर-जातीय प्रेम हे मुख्य कारण असतं. जाऊद्या त्यावर बोलणेच नको.अशाच एका प्रेमाची छोटी कहाणी मी तुम्हाला सांगु इच्छितो कारण प्रेमाची व्याख्या करण्याइतपत मी त्यापेक्षा मोठा नाहीय त्यामुळे लहान तोंडी मोठा घास घोतोय.

मी एकदा फिरण्यासाठी म्हणुन निघालो असताना एका स्टेशनवर उतरलो (काही कारणास्तव नाव सांगत नाहीय) कारण तिथुन मला पुढच्या प्रवासासाठी बस पकडायची होती. बसला खुप उशिर होणार होता म्हणुन मी स्टेशनवरच थाबणे पसंत केले. तेवढ्यात मी स्टेशनच्या शेवटच्या टोकावर पाहीलं एक लग्न झालेलं जोडपं तीथल्या एका चौथ-यावर बसले होते कदाचित ते ट्रेनची वाट पाहत होते. ते जोडपं एकमेकांत एवढ रमलं होतं की त्यांना आपण स्टेशनवर आहे याच भानच नव्हतं. त्याने जेवणाचा डबा आणलेला आणी तो तीला एक एक घास भरवत होता. आणी ते हसत खळखळत स्टेशनवरचं जेवण करत होते. हा असेल तुमच्या दोघांमध्ये अस्मानाएवढं प्रेम पण ते कोणत्या ठिकाणी करतोय याचं थोडतरी भान असायला तरी हवं ना...? मला त्या क्षणी त्यांचा राग येत होता मनात दोन चार शिव्यापण हासडल्या पण त्या निरुपयोगी होत्या. आजकाल प्रेम कमी आणी प्रेमचाळेज जास्त असतात. माझं मनात पुटपटणं चालुच होतं. आता त्यांच्याकडे बहुतेक माणसं बघुन आपापसात काहीतरी कुजबुजत होती कदाचित त्यांनापण ते विचित्र वाटत असावं. त्यांच जेवण करुन झालं त्यानं तीचं तोंडही पाण्याने पुसुन घेतलं. माणसांचं कुजबूजणं वाढलं तरी त्या जोडप्यांनी त्याचे ते प्रेमचाळे थांबवले नाहीत.

तेवढ्यात ट्रेन आली मी त्या जोडप्यांबद्दल ज्या अर्थी विचार करत होतो त्याबद्दल मला माझीच लाज वाटली.त्या क्षणी माझा मलाच राग आला. मी मनाला प्रश्न केला की त्या जोडप्यांना बघुन माझ्या विचारांची पातळी इतकी खालावली.? कारण त्या तरुणाने तीला उचलुन मागे असलेल्या अपंग खुर्चीवर बसवले. त्यांच्या मागे असलेल्या त्या खुर्चीवर माझी नजरचं गेली नव्हती. तो तर प्रेमाने तीला जेवण भरवत होता, त्यांच्यामधल्या गहि-या प्रेमाला पाहुन मला नव्याने प्रेमाची व्याख्या समजली ती म्हणजे कितीही वाईट परिस्थितीत आपल्या जोडीदाराला जीवानीशी साथ देणे हापण एक प्रेमाचाच भाग आहे. जसे डी. पी बदलतात तसे प्रेम बदलणा-या आजच्या या सोशल मिडियाच्या विश्वात अजुनही जीव तोडुन प्रेम करणारे प्रेमी पाहुन मला खुप बरे वाटले. खरच ते जोडप जिथं कुठे असतील त्यांना असच एकत्र एकमेकांचा सहारा बनवुन आयुष्य जगण्याची ताकद देवो हिच माझी इच्छा. खरच जस दिसत तस नसतं आणी म्हणुन जग फसतं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance