The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Charumati Ramdas

Drama

3  

Charumati Ramdas

Drama

मास्टर आणि मार्गारीटा ( एक अंश

मास्टर आणि मार्गारीटा ( एक अंश

7 mins
1.5K


क्वार्टर नं. 50 चा अंत


लेखक : मिखाइल बुल्गाकव

भाषांतर : आ. चारुमति रामदास
..........ह्यावेळेस करोव्येव आणि अजाज़ेलो – करोव्येव उत्सवांतल्या काळ्या फ्रॉककोटमधे नसून आपल्य नेहमीच्या पोषाकांत होता – डाइनिंग हॉलमधे टेबलावर ब्रेकफास्ट घेत होते. वोलान्द आपल्या सवयीप्रमाणे, शयनगृहांत होता, आणि बोका कुठे होता, ते आम्हांला माहीत नाही, पण किचनमधून येत असलेल्या भांड्यांच्या खडखडाटाने अंदाज लावता येत होता, की बेगेमोत तिथेच आहे, काही तरी खोड्या करंत, आपल्या सवयीप्रमाणे.

“पाय-यांवर हा पावलांचा कसला आवाज आहे?” करोव्येवने ब्लैक कॉफीच्या प्याल्यांत पडलेल्या चमच्याशी खेळंत विचारलं.

“हे आपल्याला पकडायला येताहेत,” अजाज़ेलोने उत्तर दिलं आणि कोन्याकचा एक पैग पिउन गेला.

“आ..., बरं, बरं! ” करोव्येवने उत्तरादाखल म्हटलं.

आता पर्यंत पाय-या चढणारे तिस-या मजल्यावर पोहोचले होते. तिथे पाण्याचा नळ दुरुस्त करणारे दोन प्लम्बर्स बिल्डिंग गरम करणारा पाइप दुरुस्त करंत होते. येणा-यांने अर्थपूर्ण नजरेने प्लम्बर्सकडे पाहिलं.

“सगळे घरींच आहे,” त्यांच्यापैकी एक प्लम्बर म्हणाला, आणि हातोड्याने पाइपवर खट्खट् करंत राहिला.

तेव्हां येणा-यांपैकी एकाने आपल्या कोटाच्या खिश्यातूंन काळा रिवॉल्वर काढला आणि दुस-याने, जो त्याच्या जवळंच होता, काढली - मास्टर की’. फ्लैट नं. 50मधे प्रवेश करणा-यांजवळ आवश्यक असलेले हत्यार होते. त्यांच्यापैकी दोघांच्या खिशांत होत्या सहजपणे उघडणा-या पातळ, रेशमी जाळ्या, आणि एकाकडे होता – फास असलेला दोरखण्ड, आणखी एकाने घेतला होता – मास्क आणि क्लोरोफॉर्मच्या छोट्या-छोट्या कुप्या.

एका सेकन्दातंच फ्लैट नं. 50चं दार उघडलं आणि आलेले सगळे लोक प्रवेश कक्षांत घुसले. किचनच्या धडाम् करंत बंद झालेल्या दाराने हे सिद्ध केलं, की दुसरी टोळी पण अगदी त्याच वेळेस चोर-दरवाज्याने किचनमधे घुसली आहे.

ह्यावेळेस शंभर टक्के नाही, तरी थोडी फार सफलता मिळाली. हे लोक लगेच सगळ्या खोल्यांमधे पसरले, आणि त्यांना कुठेही कोणीच नाही सापडलं, पण डाइनिंग हॉलमधे आत्ताच अर्धवट सोडलेल्या ब्रेकफास्टच्या खुणा दिसल्या; आणि ड्राइंगरूममधे फायरप्लेसच्या वरच्या स्लैबवर क्रिस्टलच्या सुरईच्या शेजारी एक भव्य काळा बोका बसलेला दिसला. त्याने आपल्या पंजांमधे स्टोव पकडलेला होता.

अगदी शांत राहून, बराच वेळ, आलेले लोक लक्ष देऊन ह्या बोक्याकडे बघंत राहिले.

“हो...हो...खरंच कमालीची वस्तू आहे,” आगंतुकांपैकी एक कुजबुजला.

“मी गडबड करंत नाहीये, कोणालाही हातपण लावंत नाहीये, फक्त स्टोव्ह दुरुस्त करतोय,” बोक्याने तोंड वेंगाडंत म्हटलं, “आणि हे सांगण माझ कर्तव्य आहे, की बोका फार प्राचीन आणि परम पवित्र प्राणी आहे.”

“एकदम उत्कृष्ट काम आहे,” आगंतुकांपैकी एक कुजबुजला आणि दुसरा जो-याने आणि स्पष्टपणे म्हणाला, “तर, परम पवित्र गारुडवाणी (पोटबोला – तोंड न हलवता बोलणारा – अनु.) बोके साहेब, कृपा करून इकडे या.”

रेशमी जाळी उघडली, ती बोक्याकडे उसळणारंच होती, की फेकणारा, सगळ्यांना विस्मित करंत अडखळला आणि फक्त सुरईच धरू शकला, जी छन् करंत तिथेच फुटली.

“हरले,” बोका गरजला, “हुर्रे!” आणि त्याने स्टोव्ह सरकावून पाठीमागून पिस्तौल काढली. त्याने लगेच जवळ उभ्या असलेल्या आगंतुकावर पिस्तौल ताणली, पण बोक्याच्या पिस्तौल चालवण्यापूर्वीच त्याच्या हातांत जणु वीज चमकली आणि पिस्तौल चालतांच बोकापण उल्टा होऊन फायरप्लेसच्या स्लैबवरून खाली पडूं लागला, त्याच्या हातांतून पिस्तौल सुटून दूर जाऊन पडली आणि स्टोव्हपण दूर जाऊन पडला.

“सगळं संपलं,” क्षीण आवाजांत बोका म्हणाला आणि धप्पकन् रक्ताच्या थारोळ्यांत पडला, “एका सेकंदसाठी माझ्यापासून दूर व्हा, मला धरणीमातेचा निरोप घेऊं द्या. आह, माझ्या मित्रा, अजाज़ेलो!” बोका कण्हल, तू कुठे आहेस?” बोक्याने निस्तेज होत चाललेल्या डोळ्यांनी ड्राइंगरूमच्या दाराकडे बघितलं, “तू माझ्या मदतीला नाही आला, ह्या असमान युद्धांत तू मला एकटं सोडून दिलंस. तू गरीब बेगेमोतला सोडून दिलं, एका प्याल्यासाठी सोडून दिलं – खरंच, कोन्याकच्या एका सुरेख प्याल्यासाठी! चला, जाऊं द्या, माझी मृत्यु तुला शांति नाही लाभू देणार; तुझ्या आत्म्यावर ओझ्यासारखी राहील; मी आपली पिस्तौल तुझ्यासाठी सोडून जातोय...”

“जाळी, जाळी, जाळी,” बोक्याच्या चारीकडे कुजबुज ऐकूं येत होती. पण जाळी, सैतानंच जाणे कां, कोणच्यातरी खिशांत अडकून गेली होती आणि बाहेरंच नाही निघाली.

“एकचं वस्तू, जी एका गंभीरपणे घायाळ झालेल्या बोक्याला वाचवूं शकते,” बोका म्हणाला, “ती म्हणजे बेंज़ीनचा एक घोट...” आणि आजूबाजूला होत असलेल्या गडबडीचा फायदा घेत तो स्टोव्हच्या गोल झाकणाकडे सरकून तेल पिऊन गेला. तेव्हां समोरच्या डाव्या पंजाच्या खालून निघंत असलेला रक्ताचा फवारा बंद झाला. बोक्याच्या जीवांत जीव आला, त्याने बेधडक स्टोव्ह बगलेंत दाबला, पुन्हां उडी मारून फायरप्लेसच्या वरच्या स्लैबवर बसून गेला. तिथून भिंतीवर लावलेला वॉलपेपर फाडंत वर रांगून गेला आणि दोनंच सेकंदांत आगंतुकांपासून खूप वर चढून लोखण्डाच्या कार्निसवर बसून गेला.

क्षणभरांतच त्याचे हात पडद्याला बिलगले आणि कार्निसबरोबर त्याला पण फाडंत गेले, ज्यामुळे खोलींत सूर्य घुसून आला, पण ना तर चलाखीने बरा झालेला बोका, ना ही स्टोव्ह खाली पडले. स्टोव्हला न सोडतां बोक्याने हवेंत हात हालवला आणि उडी मारून झुम्बरावर बसला, जे खोलीच्या मधोमध लटकंत होतं.

“शिडी!” खालून लोक ओरडले.

“मी द्वन्द-युद्धां साठी बोलावतोय!” झुम्बरावर बसून झोके घेत खाली उभ्या असलेल्या लोकांवर बोका गरजला, आणि त्याच्या हातांत पुन्हां पिस्तौल दिसली. स्टोव्हला त्याने झुम्बराच्या फांद्यांमधे अडकवलं होतं. बोक्याने घड्याळाच्या पेंडुलमसारखे झोके घेत खाली उभ्या असलेल्या लोकांवर गोळ्यांचा अंधाधुंध वर्षाव सुरू केला. गोळ्यांच्या आवाजाने फ्लैट हादरला. झुम्बरांतून पडलेले काचेचे तुकडे फरशीवर विखुरले, फायरप्लेसच्या वरती लावलेला आरसा ता-यांच्या आकारांत चटकला. प्लास्टरची धूळ उडूं लागली. रिकामे कारतूस फरशीवर उडू लागले, खिडक्यांचे काच फुटून खाली पडले, लटकंत असलेल्या स्टोव्हमधून तेल खाली पडू लागलं. आता बोक्याला जिवन्त पकडण्याचा प्रश्नंच नव्हता, आणि आगंतुकांनी रागाने आपल्या पिस्तुलांनी नेम धरंत त्याच्या डोक्यावर, पोटावर, छातीवर आणि पाठीवर दनादन गोळ्यांचा वर्षाव केला. ह्या गोळीबारीने बिल्डिंगच्या बाहेरच्या कम्पाउण्डमधे दहशत पसरली.

पण ही गोळीबारी जास्त वेळ नाही चालू शकली आणि आपणहून कमी झाली. कारण हे होतं, की ह्याने ना तर बोका, ना ही कोणी आगंतुक जखमी झाला. बोक्यासमेत कोणालांच काहीही इजा नाही झाली. ह्याची पुष्टी करण्यासाठी आगंतुकांपैकी एकाने ह्या धृष्ठ जानवरावर लागोपाठ पाच गोळ्या चालवल्या आणि ह्याच्या उत्तरांत बोक्यानेपण गोळ्यांची झडीच लावली, आणि पुन्हां तेच – कोणावरही जरासासुद्धां असर नाही झाला. बोका झुम्बरावर झोके घेत राहिला, ज्याचा आयाम हळू-हळू कमी होत गेला. माहीत नाही कां, पिस्तौलच्या मुठीवर फूक मारंत तो घडी-घडी आपल्या पंजावर थुंकत होता. खाली उभ्या असलेल्या लोकांच्या चेह-यांवर न जाणे कां अविश्वासाचा भाव पसरला. ही एक अद्भुत, अभूतपूर्व घटना होती, जेव्हां गोळीबारीचा कोणावरही, काहीही असर नव्हता झाला. असं वाटू शकतं की बोक्याची पिस्तौल खेळणं होती, पण आगंतुकांच्या पिस्तुलींबद्दल असं म्हणता येत नव्हतं. पहिलीच जखम, जी बोक्याला झाली होती, तीसुद्धां एक नाटकंच होती, ह्यांत काही शंका नाही, की ती लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा फक्त बहाना होती; अगदी तसाच, जसं बेंज़ीन पिणं.

बोक्याला पकडण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यांत आला. फास असलेला दोरखण्ड फेकला गेला, जो एका मेणबत्तीत अडकला, झुम्बर खाली पडलं. त्याच्या झणझणाटाने सम्पूर्ण बिल्डिंग हादरली, पण ह्याने काही फायदा झाला नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर काचेच्या तुकड्यांचा वर्षाव झाला, आणि बोका हवेंत उडून फायरप्लेसच्या वरती लावलेल्या आरश्याच्या सोनेरी फ्रेमच्या वरच्या भागावर जाऊन बसला. तो कुठेच जायला तयार नव्हता आणि उलंट आरामांत बसून आणखी एक भाषण देऊं लागला : “मला कळंत नाहीये...” तो वरून बोलला, “की माझ्याबरोबर होत असलेल्या ह्या खतरनाक व्यवहाराचं कारण काय आहे?”

तेवढ्यांत भाषणाच्या मधे टपकला एक जाड, खालच्या सुरातला आवाज, “फ्लैटमधे हे काय चाललंय? मला त्रास होतोय.”

आणखी एक अप्रिय, कर्कश आवाज म्हणाला, “नक्कीच हा बेगेमोत आहे, सैतान त्याला घेऊन जावो!”

तिसरा गडगडीत आवाज बोलला, “महाशय! शनिवारचा सूर्य अस्त होतोय. आपली जाण्याची वेळ झालीये.”

“माफ़ करा मी तुमच्याशी आणखी नाही बोलूं शकणार,” बोका आरशाच्या वरून म्हणाला, “आम्हांला जायचंय.” त्याने आपली पिस्तौल फेकून खिडकीचे दोन्ही काच फोडून टाकले. मग त्याने तेल खाली सांडलं, आणि हे तेल आपणहून भडकलं. त्याच्या लपटा छतापर्यंत जाऊ लागल्या.

सगळं काही अत्यंत विचित्रपणाने जळंत होतं, अत्यंत शीघ्रतेने आणि सम्पूर्ण ताकदीनिशी, जसं कधी तेलाबरोबर होत नसतं. बघतां-बघतां वॉल पेपर जळून गेला, फाटलेला पडदा जळून गेला जो फरशीवर पडला होता आणि तुटलेल्या खिडक्यांच्या चौकटी वितळूं लागल्या. बोका उड्या मारंत होता, म्याँऊ-म्याँऊ करंत होता. मग तो आरशावरून उडी मारून खिडकीच्या चौकटीवर गेला आणि आपल्या स्टोव्हसकट तिच्यामागे लपून गेला. बाहेरून गोळ्यांचे आवाज घुमूं लागले. समोरून, जवाहि-याच्या बायकोच्या फ्लैटच्या ठीक समोरून, लोखण्डाच्या शिडीवर बसलेल्या माणसाने बोक्यावर गोळ्या झाडल्या, जेव्हां तो एका खिडकी वरून दुसरी खिडकी पार करंत बिल्डिंगच्या पाण्याच्या पाइपकडे जात होता, ह्या पाइपने बोका छतावर पोहोचला.

इथेपण त्याच्यावर पाइप्सजवळ असलेल्या निगराणी दलाने तसाच, बिनपरिणामाचा गोळीबार केला आणि बोका शहराला न्हाऊ घालणा-या अस्त होत असलेल्या सूर्याच्या प्रकाशांत चिंब झाला.

आतापर्यंत फ्लैटच्या आत असलेल्या लोकांच्या पायाखालची फरशी धू-धू करंत जळूं लागली होती, आणि तिथे, जिथे खोट्या जखमेने आहत होऊन बोका पडला होता, आता शीघ्रतेने आकुंचित होत असलेलं भूतपूर्व सामत मायकेलचं प्रेत दिसंत होतं, थिजलेले डोळे आणि वर खेचलेल्या हनुवटीसकट. त्याला खेचून बाहेर काढणं आता अशक्य होतं. फरशीच्या जळत्या स्लैब्सवर उड्या मारंत, हातांनी धुराने वेढलेले खांदे आणि छातीवर थपथप करंत, ड्राइंगरूममधे असलेले लोक आता स्टडीरूम आणि प्रवेशकक्षाकडे धावले. ते, जे शयनकक्ष आणि डाइनिंगरूममधे होते, ते कॉरीडोरमकडे पळाले. तेसुद्धां धावले जे किचनमधे होते. सगळे प्रवेशकक्षाकडे धावले. ड्राइंगरूम पूर्णपणे धुराने भरून गेला होता. धावतां-धावतां कोणीतरी अग्निशामक दलाचा नंबर फिरवून दिला आणि म्हणाला:

सादोवाया स्ट्रीट, तीनशे दोन बी!

आणखी थांबणं शक्य नव्हतं. ज्वाळा प्रवेशकक्षापर्यंत येऊं लागल्या. श्वास घेणं कठीण झालं होतं.

जसंच त्या जादुई फ्लैटच्या खिडक्यांमधून धुराचं पहिलं वादळ निघालं, अंगणांत लोकांच्या घाबरलेल्या किंकाळ्या ऐकूं आल्या:

“आग, आग, जळतोय!”

बिल्डिंगच्या इतर फ्लैट्समधून लोक टेलिफोन्सवर ओरडंत होते, “सादोवाया, सादोवाया, तीनशे दोन-बी!”

त्या वेळेस जेव्हां शहराच्या सगळ्या भागांत लाम्ब-लाम्ब लाल गाड्यांच्या घाबरवणा-या घंट्या ऐकू येऊ लागल्या, अंगणांत थांबलेल्या लोकांनी बघितलं, की धुराबरोबर पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पुरुषाची आकृती असलेल्या तीन सावल्या तरंगंत बाहेर आल्या, त्यांच्याबरोबर एक सावली नग्न महिलेच्या आकृतीचीपण होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama