माझ्या आजीजवळील गोष्टींचा खजिना
माझ्या आजीजवळील गोष्टींचा खजिना


लहानपणी माझी आजी मला खूप सार्या गोष्टी सांगायची. त्यातीलच एक मला आवडलेली एक गमतीदार गोष्ट तुम्हा सर्वांसाठी शेअर करीत आहे.
एका गावात एक आजी राहत होती आणि तिला दोन मुले होती. त्या आजींना गुलाबजामून खूप आवडायचे. तिची मुले तिचे लाड रोज पुरवायची, तिला गुलाबजामून आणून द्यायची. ती सर्व जामून खायची, मुलांना एकपण खायला देत नव्हती. त्या आजींचं समाधानच होत नसे.
एके दिवशी मुलांना ती म्हातारी म्हणते कशी, मी मेल्यावर मला तुम्ही गुलाबजामूनचा हार घालायचा. तिची मागणी मुलं मान्य करतात. म्हातारी मात्र खोडसाळ असते. ती मेल्याचं सोंग करते. तिची मुलं खूप रडतात पण आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करतात. तिला गुलाबजामूनचा हार घालतात. त्यानंतर तिला स्मशानात जाळण्यासाठी नेतात. वाटेत लोक म्हणतात "राम नाम सत्य है। म्हातारी हारातला एकएक गुलाबजामून काढून म्हणते कशी, गुलाबजामून मस्त है।... हे चाललेलं असताना लोक पाहतात आणि त्या म्हातारीला टाकून पळून जातात. त्यांना वाटतं म्हातारीचं भूत झालं म्हणून ते घाबरून पळून जातात.