Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

kishor zote

Drama

5.0  

kishor zote

Drama

लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती

लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती

3 mins
3.7K


    भूक लागली असताना खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती तर भूक लागलेली असताना आपल्या ताटातील दुसऱ्यास देणे ही संस्कृती. हीच आपली संस्कृती होय.

    भारत हा जेंव्हा जंबूद्वीप म्हणून प्रसिध्द होता, अगदी तेंव्हा पासून एक प्राचिन संस्कृती या देशात होती. बौध्द काळ हा तर या संस्कृती मधील सुवर्ण काळ म्हणता येईल. विविध आक्रमणे परतवली काही पचवली देखील.

    शिक्षण अधिकार सामान्य व्यक्तीला मिळला आणि लिखीत स्वरूपात ज्ञान साठवणे सुरू झाले. पाली भाषा ही ज्ञान भाषा व सर्वसामान्य बोली भाषा होती. मात्र बौध्द संस्कृती नष्ट झाली आणि इतर अनेक परकीय आक्रमणे झाली आहेत; त्यामुळे वेगवेगळी स्थित्यंतरे स्विकारली. बदलाव होत गेले तरी बरेचसे चांगले संस्कार आजही आपणास पाहण्यास मिळतात.

     पाश्चिमात्य सांस्कृतिचा बराचसा पगडा आमच्यावर पडलेला दिसतो, या साठी सर्वस्वी जबाबदार ही आजची प्रसारमाध्यमे व व्यापारीकरण आहे. कॉर्पोरेट सेक्टर मधे सर्वत्र अनैतीकता दिसून येते.

    खाजगीकरण, उदारीकरण, जागतीकरण या गोंडस नावे व विज्ञान तंत्रज्ञान प्रसार माध्यम यातूनही संस्कृती लोप पावत चालली आहे. परंतू या बाबीकडे लक्ष नाही. एक स्लो पॉईझन म्हणता येईल असे घडत आहे. शहरीकरणातून गावे ओस पडली त्यातून गावचे व एकत्र कुटुंब पध्दतीचे संस्कार दूर राहीले, तर ग्रामिण भागात डिजीटल इंडिया च्या गैरवापरातून तेथील संस्कार देखील थिजलेले दिसत आहेत.

          भौतिकता व यांत्रीकता या मधे आज प्रत्येक गुरफटत चालला आहे. घरात एक व बाहेर एक असे दुहेरी कोष प्रत्येक व्यक्ती स्वतःभोवती तयार करत आहे आणि त्या कोषात राहणे त्याला आवडत आहे. निती, आचार, विचार सर्वत्र आज भेसळ होत आहे. मी व मला दुसऱ्याचे काही घेणे देणे नाही. अनैतिकता तर किती माजली आहे. दररोज दैनिकात खून, दरोडा, आत्महत्या , बलात्कार , विवाहबाह्य संबंध अशा बातम्या वाचतो. सर्व वातावरण गढूळ झालं आहे असे वाटते. यास सर्वाधीक जबाबदार टेलिविजन म्हणता येईल. डीशचा शोध लागला आणि अधोगती होत गेली. स्मार्ट फोन ही दुसरी कारण असलेली वस्तू म्हणता येईल. अर्थात काय पहावे हे जरी आपल्या हातात असले तरी ते ही सहज उपलब्ध होत असल्याने तसलं पाहणं जास्त पसंद केले जाते. पुन्हा एकदा येतो आपण ते संयुक्त कुटुंब पद्धतीकडे तेंव्हा एवढया समस्या  नव्हत्या . संस्कार आपोआप होत होते.

    माणसं सोडून आपण वस्तूंना किंमत दयायला लागलो. त्यामुळे संस्कृतीची किंमत आपणास वाटेनाशी झाली. स्वार्थ प्रवृत्ती वाढत चालली आहे. हम दो हमारे दो हे फॅमिली प्लॅनिंग बाबतीत ठीक पण संयुक्त कुटुंबापासून दूर जाणे हा मतलबी अर्थ आपण घेतला आहे.

          यांत्रिकतेचा जास्त वापर केल्याने भावना संवेदना गोठत आहेत व आपल्यापणाच्या भावना संपत आहेत. जीवनातील खरा आनंद आपण विसरत चाललो आहे. अखेर जेंव्हा जाग येते तेंव्हा हातून सर्व निसटलेले असते.आपला देश जसा महान तशी आपली संस्कृती महान आहे. मातृसत्ताक पध्दतीचे पाईक आपण. प्राणीमात्रावर देखील प्रेम करणारे आपण आज मात्र पशूप्रमाणे वागत आहोत.

      संस्कृती म्हणजेच संस्कार अन् त्याचे एकच उदाहरण देतो, एका शेतकऱ्याला आपली बैल जोडी विकायची असते. बरेच गी-हाईक येतात. तो शेतकरी एकच प्रश्न विचारतो तुम्हाला काही व्यसन, सवय आहे का? उत्तर नकारार्थी येत होते तो बैल जोडी विकत नव्हता. एक व्यक्ती येतो व मला तंबाकू खायची सवय आहे, असे सांगतो तो शेतकरी त्या व्यक्तीला बैलजोडी विकतो.

     त्याचा मित्र विचारतो का रे चांगली किंमत येत असून आधी चा सौदा मोडलास आणि कमी पैशात या तंबाकू खाणाऱ्याला का दिसील बैलजोडी? त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले, तो म्हणाला अरे बाबा इतर कोणाला व्यसन नव्हते. म्हणजे ते माझ्या ह्या बैलजोडी कडून  दिवसभर न थांबता काम करुन घेतलं असतं, आता हयो तंबाखू खायला थोडा वेळ तरी थांबल ना? तेवढाच माझ्या बैल जोडीला आराम मिळल, शेतकरी डोळं पुसत म्हणाला. मित्राच्या डोळ्यात ही पाणी आले. केवढा हा जिव्हाळा व प्रेम. त्यामुळे येणारे डोळ्यात पाणी आणि हेच डोळ्यात पाणी येणे आमचे संस्कार व त्यातूनच आमची संस्कृती सुदृढ होत होती.

       पण आज प्राणीमात्रांबद्दल तर सोडाच आमच्या जवळच्या व्यक्ती बद्दल देखील डोळ्यात पाणी येत नाही. हे पाणी येणे जेंव्हा बंद झाले आहे तेंव्हाच आमची संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे. असे मला तरी वाटते.

 


Rate this content
Log in