Anil Chandak

Horror

1  

Anil Chandak

Horror

लोकशाहीची शक्ती

लोकशाहीची शक्ती

5 mins
1.3K



गुलाबराव पाटील, एक प्रसिध्द वजनदार असामी,बागायतदार जमीनदार,साखर कारखान्याचे अध्यक्ष,लोकल राजकारणावर धाक असलेले सत्ताधारी पक्षाचे नेते.

गांवातील दुधसंघ,तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीवर नियंत्रण होते.

अनेक वर्षे सत्ता भोगल्याने,मी पणा वाढला होता,जवळचे वर्तुळातले सारेच हाजी हाजी करणारे ,त्यामुळे विरोध करणाऱ्याला चिरडणारे.

आपल्या कारकिर्दीत असंख्य उभरत्या युवकांना साम दाम दंड पध्दतीने मुंग्यासारखे चिरडले.


त्यांची मुले सुभानराव,प्रशांत ही ही फार छोटे सरकार यानावाने प्रसिध्द होती,ऐश्वर्य ओसंडुन जात असल्याने,मद्य,मदिराक्षी यांचे शौकिन बनले होते.जवळचे मित्रांचे कोंडाळे तसेच गुंडांचा फौजफाटा, बाळगुन होते.


" सुभानराव,गांवात एक नवे पाखरू आले आहे."सुभानरावांचा मित्र त्याच्या कानांला लागुन बोलला.

"कुठे रे" ,"आपल्याच झेड पी च्या शाळेत,नवी नवीच बदली होऊन आली आहे." मग तो सुभानरावाच्या कानांला लागुन बोलला.त्या दिवसापासुन त्यांचे एकमेव लक्ष्य होते ती शिक्षिका.

ज्योती एक पंचवीस वर्षाची युवती ,तिचे पती ही सरकारी नोकरीत कामाला होते,दोन गोजिरवाणी लहान मुले ही होती.

पंधरा आँगस्टला झेंडा वंदन होते,वर्गावर असतांना,अचानक हेडमास्तरांनी तिला आँफिसात बोलावले.तास झाल्यानंतर ती तेथे गेली." या या बांदेकर आत या." ज्योती तेथे जाऊन बसल्या.

हेडमास्तर बोलु लागले," हे बघा बांदेकर,आठ दिवसांनी पंधरा आँगस्ट येत आहे,मोठमोठे बाहेरचे पाहुणे येत आहेत,मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमाची मी तुझ्यावरती जबाबदारी सोपवित आहे." पण सर मला घर ही सांभाळायचं असतं,मला हे कसं जमणार,अन माझं घर ही खुप लांब आहे." त्याची तुम्ही काळजी करू नका,तुम्हांला जास्तीच्या कामापोटी वेगळा भत्ता दिला जाईल." 

ज्योती द्विधामध्ये पडली,एक तर नवीन नोकरी,काय करू,नकार द्यायचा सवालच नव्हता,नोकरी जायची भिती होती,पण पतीला विचारून सांगते,असं सांगुन बाहेर पडली.घरी जाताच तिने पती अविनाशला त्याबद्दल सांगितले.त्याने परवानगी दिली.


मग रोज रात्री,प्रँक्टिस संपल्यानंतर,रात्री पती अविनाश येईस्तो शाळेतच एकटी थांबायची,मग तो आल्यानंतर,मोटारसायकलने घरी परतायची.

एक दिवस,मोटार सायकलने अविनाश निघाला असता,सुनसान रस्त्यावर खिळ्यावर गाडी गेली असता,टायर पंक्चर झाले.अविनाशने गाडी नाईलाजाने थांबवली.पुढे जाणेच शक्य नव्हते.तो उभाच असतांना,अंधारातुन काळ्या रूमालाने तोंड झाकलेल्या ,हातात लोखंडी सळया असलेल्या ,काही माणसांनी त्याला घेरले.एकजण त्याच्याशी बोलत असता, मागे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या डोक्यावर जोराने प्रहार केला.त्या वाराने,डोक्यातून रक्त येवु लागले. दुसऱ्या साथीदाराने त्याला डोक्यावर फार मारू नको,असे सांगितले तेव्हा बाकीच्या साथीदारांनी त्याच्या हातपाय,छातीवर जबरदस्त मार दिला,साऱ्या अंगातुन रक्ताच्या धारा वाहु लागल्या.

तेव्हां त्यांनी एका शेतात नेऊन टाकले,अन तिथून पळुन गेले.


इकडे ज्योती मँडम,अविनाशची वाट पाहत उभी राहिली,शाळेतले सरे आपापल्या घरी केव्हांच गेली होती.तिला आता काळजी वाटु लागली.मनात भय ही वाटु लागले.ती लगोलग,गांवच्या रस्त्याला लागली.

अचानक पाठीमागच्या अंधारातून बुरखेधारी काही माणसांनी मागुन तिला धरले.अन माँर्फाइन लावलेला रूमाल तिच्या नाकावर दाबुन धरला.ती ते सुंघताच बेशुध्द पडली.मग तिला गाडीवर घालुन तिला एका वस्तीवर नेले.तेथे सुभानराव प्रशांत,अन त्यांचे पाच सहा मित्र तेथेच मद्य घेत बसले होते.तिला आणलेले पाहताच सुभानराव उठला,त्याने सर्वांना बाहेर जायला सांगितले. आता तो एकटाच होता.मद्याच्या धुंदीत त्याने तिच्या अंगावरचे कपडे जवळजवळ फाडलेच.तिचे ते आरसपाणी नग्न शरिर पाहुन उताविळपणे तो बेशुध्द अवस्थेतच तिच्यावर तुटुन पडला.त्याने तिच्या शरिराचे लचके तोडले.त्याची भुख शमल्यावर तो तिला तसेच टाकुन बाहेर पडला,नंतर प्रशांत आत आला,त्यानंतर क्रमाने त्याचे मित्रांनी, मनुष्य रूपातल्या लांडग्यांनी तिच्या कोवळ्या शरिराचे लचके तोडले,तिच्या योनीतुन रक्त आलेले पाहताच,ते घाबरले.त्यांनी तिला उचलुन जवळच्या एका शेतात उसामध्ये टाकले अन ते तिथुन फरार झाले.






पहाट होता होता केव्हांतरी उत्तर रात्री ज्योती शुध्दीवर आली.

तिच्या योनीची, प्रचंड आग होत होती.तिला जाणवले ,आपल्या अंगावर एक ही कपडा नाही,तेव्हां ती आणखी घाबरली.कसेतरी कडुनिंबाची पाने तोडुन,अब्रु झाकत धैर्याने ती घराकडे निघाली,रस्त्यात तिला एक घर लागले,तिथे तिने आवाज दिला.

एका बाईचा आवाज ऐकताच,घरातील माणसे बाहेर आली,तिची अवस्था पाहुन बाप्ये मंडळी मागे सरली.घरातल्या कारभारणीने ताबडतोब परिस्थितीचे गांभीर्य जाणुन तिला ,साडी व कपडे नेसायला दिले.ज्योती मँडम तर ढसाढसा रडत होती.त्या बाईंनी तिला शांत केले.चहा पिल्यानंतर तिला तरतरी आली,जीवांत जीव आला,मग तिने तिला बेशुध्द होईपर्यंत घडलेली गोष्ट सांगितली.तिची आपबिती ऐकतांना ,त्या कुटुंबवत्सल कुटुंबियांच्या डोळ्यात ही पाणी उभे राहिले.

आता ज्योतीला तिच्या लेकरांची व पतीची आठवण येऊ लागली.शेवटी त्या कुटुंबीयांनी बैलगाडी जोडुन तिच्या वस्तीवर तिला सोडले.

पण घरात मुले वाट पाहुन झोपली होती,पती अविनाशचा ही तपास नव्हता.


इकडे त्या दिवशी रात्री,ज्या शेतात अविनाशला टाकलेलं होतं,त्या शेतातली कुत्री भुंकु लागली,त्यांचा तीव्र आवाज ऐकुन माणसे तिथे गेली असता,त्याना एक माणुस जखमी अवस्थेत तेथे पडलेला दिसला.चेहरा पुर्ण रक्ताने माखलेला होता.तेव्हां त्याला घेऊन ते ,सरकारी दवाखान्यात गेले.खिशातील त्याच्या ओळखपत्रावरून पोलिसा पाटलाने तिच्या घरी कळवले.ज्योती तर धावत पळतच आली.अविनाशची अवस्था पाहुन,ती आपले दु:ख ही विसरली.एव्हांना गांवातील सगळ्यांनाच झालेली घटना समजली होती.

ज्योतीने त्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या सांगण्यानुसार पोलिस पाटलाकडे तक्रार केली,पण तिला काळजी, आधी नवऱ्याचीच होती.तो अजुन ही शुध्दीवर आला नव्हता,जवळ जवळ कोमातच होता.

पोलीसपाटलाला,एव्हांना झालेली घटनेचा ,कोणी केला म्हणून अंदाज होताच,पण सुभानरावाच्या दहशतीमुळे,त्यांनी तुर्त गप्प बसणेच पसंत केले.


हळुहळु ज्योतीची सेवा व त्या वस्तीवरील बाईंच्या मदतीने,अविनाशचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाली.ज्योतीला एक दुसरे माहेरच मिळाले.

ज्योती व अविनाशवर खुपच अन्याय झाला होता,अविनाश तर जखमी होऊन पडला होता,तरी शहरात आयुष्य घालवलेली ज्योती,मनाने फार कणखर होती.

तिने या अन्याया विरूध्द, मनोमन लढण्याचे ठरविले.

तिने आता गांवच्या कामात लक्ष घालण्यास सुरवात केली.हळुहळु आपल्या कामसुपणाने,बुध्दीने तिने गांवातील लोकांची मने जिंकली.गांवातील महिला तर तिचंच ऐकून सारं करायच्या,ही सारी कामे ती ,आपली नोकरी सांभाळुनच करायची.

अशात ग्रामपंचायतीच ,इलेक्शन लागलं.

ज्योती अविनाशमुळे शांत होती. तरी शहरात राहणारे ,तिचे भाऊ शांत बसले नव्हते.त्यांनी सीआयडी कडे ज्योती व अविनाशची केस कळवली होती.आता गुप्तपणे तपास ही चालु होता.


सुभानराव हाच सरपंच होता,दर पाच वर्षानी त्यांचच पँनेल निवडुन यायचं.

गावांतल्या लोकांवर त्याची खुप दहशत होती. गांवातल्या बऱ्याच स्रीयां त्या दोन्ही भावांनी व मित्रांनी नासवल्या होत्या.


गांवातल्या महिलांनी हिंमत करून ज्योतीला आपला नेता करून ,सुभानरावा विरूध्द उभे केले.सुभानरावाला आपल्या ताकतीचा गर्व होता,पण ही बाई आपलं काय वाकडं करू शकणार नाही,याची खात्री होती.

त्याने निवडणुक,फारच लाईटली घेतली.

इकडे,ज्योती व तिला मानणाऱ्या स्रीयांनी घरोघरी जाऊन,प्रचार केला.गांवात सुभानरावाबद्दल असंतोषच होता.

मतदानांचा दिवस आला,यापुर्वी कधी झाले नाही,असे अभुतपुर्व मतदान झाले.सुभानरावाला आपणच निवडुन येणार ,याबद्दल खात्री होती.

मतमोजणीचा दिवस उजाडला.मत मोजून झाली ,अन निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्योती व तिचं पँनेल बहुमताने निवडून आले असं जाहिर केले.

आनंदाने एकच जल्लोष महिलांनी केला.महिलांनी गांवात क्रांती घडवुन आणली होती.नारीशक्तीची ती कमाल होती.

याने सुभानराव,त्यांच्या गुंडांचे पित्त खवळले.त्यांनी मागच्या सारखं ज्योतीला परत उचलुन नेण्याचा घाट घातला.

तेवढ्यांत त्यांच्या गुंडात एक वेषांतर करून आलेला सी.आय.डी आँफिसर ही होता.त्याने सुभानरावावर पिस्तुल रोखले.

सुभानरावाने ते पाहिले व दुसऱ्या गुंडाला डोळ्याने त्याने झेप घेऊन त्या आँफिसरला पकडले,आता सुभानरावाच्या ताब्यात त्या गांवातल्या स्रीया ज्योती सर्व ताब्यात होत्या.

तो ज्योतीवर वार करणार,एवढ्यांत गावांतुन तरणी पोरं बाहेर आली,ते सुभानराव ,प्रशांत व गुंडावरती तुटुन पडले.सुभानराव व प्रशांतवर कुऱ्हाडींचे घाव पडले.अन सुभानराव व प्रशांत सारख्या दुष्टांचा अंत झाला.तेवढ्यांत शहरातुन पोलिस ही तेथे पोहोचले,उरलेल्या गुंडांना कैद केले गेले.

काळ जाता अविनाश ही बरा झाला,अन पोलिसांनी प्रशांतकडून सारा गुन्हा कबुलीजबाब घेतला. 

ज्योतीवर झालेल्या अन्यायाचे,लोकशाहीच्या शक्तीने परिमार्जन झाले.सारे गांव,परिसर दहशतीत मुक्त झाला.या घटनेने साऱ्या राज्यांत एकच खळबळ उडाली.गुलाबरावाच्या सहकारी कारखान्याची ही चौकशी झाली.अन त्यांना त्यांच्या पक्षातुन काढुन टाकले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror