लग्न
लग्न
आज बारावी परीक्षेचा रिझल्ट होता . प्रशांतच्या मनामध्ये असणारी धाकधूक .भिती होती कारण अभ्यासात मन रमत नव्हते . आणि घरच्यांच्या आग्रहा खातर तो बारावी पर्यंत कॉलेजला जात होता . त्याचे सारे लक्ष इतर अवांतर कामांकडे असल्याने शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला . प्रशांत चा रिझल्ट फेल म्हणून आला . त्यामुळे शिक्षणाचा त्याने नाद सोडला . आणि घरचे रागावल्यामुळे रागात प्रशांत गाव सोडून निघून गेला . आज तीन चार वर्ष होत आली असतील . प्रशांत एका ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागला . व काम करून पैसे कमवू लागला . त्याच ठिकाणी मुक्काम करणे व हॉटेलमध्ये खाणे . प्रशांत चरितार्थ सुरू झाला. हळूहळू मालकाशी जवळूनओळख झाल्याकारणाने साऱ्या ट्रॅक्टरांचे मेंटेनन्स बघणे . साऱ्या ट्रॅक्टर च्या ट्रिपा टिपणे .व हिशोब ठेवणे . हे काम विश्वासू म्हणून त्याच्या कडे दिले . त्याने मालकांचा विश्वास संपादन केल्यामुळे प्रशांतला छोट्या-मोठ्या कामांकडे लक्ष देण्यास सांगू लागला . छोट्या साइटवर प्रशांतला पाढवू लागले . नंतर जेसीबी वर नियंत्रण करण्यासाठी यांची नेमणूक झाली . मजुरांचा खर्च ; ट्रॅक्टर साठी लागणारे डिझेल , जेसीबी चा हिशोब हा सगळा कारभार प्रशांत कडे दिला गेल्यामुळे तो अधिक विश्वासू नोकर झाला होता . त्यामुळे त्याचे मालकाच्या घरी येणे जाणे सुरू झाले . घरी गेला कि जेवण , चहा . पाणी घरच्या व्यक्तीप्रमाणे त्याला वागणूक दिली जात होती . त्यामुळे मालकाच्या घरातील झाला होता. मालकाची दोन लहान मुलं आणि एक मोठी मुलगी , घरामध्ये इतर दोन भावंड व इतर कुटुंबातील व्यक्ती या सर्वांचा प्रशांत एक खात्रीचा माणूस झाला होता . त्यामुळे प्रत्येक जण आपुलकीने व प्रेमाने वागत . मालकाची मुलगी मोठ्या कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत होती . त्यामुळे कधी कधी गाडीने तिला कॉलेजला सोडणे ,आणणे ती जबाबदारी प्रशांत वर होती. प्रशांत चा शांत स्वभाव , प्रेमळ असल्यामुळे आणि दिसण्यास देखणा व सुंदर होता. मात्र मालकाची मुलगी सुंदर असून रंगाने सावळी ! व पायाने अपंग होती. प्रशांत ची ओळख मालकाच्या मुलींची म्हणजेच 'प्रज्ञा ' शी झाली . प्रेमाचे रूपांतर प्रेमात झाले . तारुण्यात प्रेम आंधळ असतं! त्याप्रमाणे ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली. मात्र प्रशांत नोकर माणूस असल्यामुळे त्याच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नोकर म्हणून होता . यामध्ये आजू बाजूला कुजबुज सुरू झाली. कारण प्रशांतचे घरी येण्याचे प्रमाण प्रमाण वाढले . त्यामुळे प्रज्ञाची असणारी सलगी बघून सगळ्यांच्या मनात शंकेला सुरुवात झाली. तेंव्हा मात्र प्रशांत ने आणि प्रज्ञाने निर्णय घेतला .ते आपल्या प्रेमाला घरातून विरोध नक्कीच असणार. कारण दोघेही दोन वेगळ्या जाती तील! असल्यामुळे जात नक्कीच आडवी येणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती एक पदवीधर मोठ्या सुसंस्कृत घरातली मुलगी ! आणि तो एक सामान्य कुटुंबातला ? त्याच्या आई वडीला विषयी त्यांना फारशी माहिती नव्हती . व एक नोकर दुसऱ्या जातीतला ! त्यामुळे प्रेमाला विरोध ? असणार !तेव्हा मात्र दोघांन विषयी चर्चाही वाढत गेली ' त्यामुळे घरात विविध प्रकारचे वाद सुरू झाले . वातावरण बिघडले . परिणामी दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. प्रज्ञाने घरात असलेली दागदागिने , पैसे . आणि तिजोरी मध्ये असणाऱ्या मुबलक प्रमाणात काही ऐवज घेतला .आणि एका रात्री घरातील सर्व कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या . आणि त्याच रात्री मोटरसायकलवर बॅगा घेऊन त्यांनी पलायन केले. दिवस उजाडेपर्यंत एकात जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ! एका ओळखीच्या ठिकाणी . हे दोघं पोचली. तेथे प्रशांतने ओळखीचा फायदा करून झालेली हकीकत सांगितली व प्रज्ञाला राहण्यासाठी सोय केली .जेथे सोय केली त्या मित्राचे दोन वर्षापूर्वीच प्रेम विवाह झाला होता. त्यामुळे त्यांनी यांना यांना राहण्यास परवानगी दिली . मात्र एक अट घातली .आम्ही तेथे रहातो हे कुणाला कळता कामा नये . यामुळे राहण्याची सोय एका बंद खोलीमध्ये झाली . राहणे , खाणे , व दिवसभर बंद खोलीमध्ये वेळ घालवणे .अशी दिनचर्या सुरू झाली.. दिवसा ढवळया मी लग्नाची स्वप्न बघु लागले . प्रेम काय असत . त्यासाठी मी आई वडिलांना सोडून आले होते . ज्यांनी वीस वर्ष सांभाळ केला .केवळ तारुण्याचे आकर्षण कि प्रेम काही कळत नव्हते . तिकडे प्रशांत स्वतःच्या घरी चार ते पाच वर्षाने परत आला होता . त्यामुळे त्याच्या घरातील व्यक्तींचा राग निवळला होता. व घरात मोठ्या भावाच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यामुळे प्रशांतला घरात प्रवेश मिळाला. व चांगल्या शुभ कार्यामध्ये वाद नको . म्हणून त्याला कोणीही काहीही बोलले नाही . तो पूर्वीप्रमाणे घरामध्ये सामील झाला .बबन तुला झालेल्या गोष्टीची त्याने एकांतामध्ये सांगितली .भावाने त्याला आश्वासन दिले . माझे लग्न झाले. कि आपण योग्य पद्धतीने लझेही घडवून आणू . तोपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगू नको. दोन दिवस किंवा वेळ मिळेल तेव्हा प्रशांत मित्राच्या घरी म्हणजे त्याने इथे प्रज्ञाला डांबून ठेवले होते तेथे येत भेटत. व सकाळी दिवस दिवस उजाडला की तो कामावर जात. प्रज्ञाने आई वडिलांच्या घरून भरपूर पैसा आणला होता . त्या पैशाने एक ट्रॅक्टर खरेदी केला. कामाला सुरुवात केली नंतर जुना जेसीबी खरेदी केला .पदरी कामाचा अनुभव असल्यामुळे हळूहळू त्याने व्यवसायामध्ये जम बसवला . घरच्यांचा विश्वास संपादन केला. आणि बंधू च्या सहकार्याने साधारणता दोन महिन्यानंतर घरामध्ये प्रज्ञाचा विषय निघाला. घरामधील वातावरण प्रचंड तापले? इथेही त्या प्रकारचे महाभारत घडून येईल ! असे प्रशांत वाटले. तेव्हा मात्र त्याने टोकाची भूमिका घेतली. रागामध्ये घरामध्ये आणलेल्या औषधात पाणी टाकून आत्महत्या करण्याचे नाटक करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला होता . मात्र नाशिबाने हा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. व त्याला तासाभरात हॉस्पिटल ला ॲडमिट करावे लागले . तेंव्हा मात्र डॉक्टरांनी सांगितले अर्धा एक तास जरी उशीर झाला असता तरी रक्तामध्ये पूर्ण विष पसरल्यामुळे याचा मृत्यु नक्की होता . मात्र मोठ्या प्रयासाने साधारणता एक आठवड्याने प्रशांत ची तब्येत सुधारू लागली. तिकडे प्रज्ञा ला फोनद्वारे सारी हकीगत कळत होती . पण ? मनापासून प्रेम केले .व लग्नाला होणारा अडथळा आणि समाजाची बंधन यामुळे प्रज्ञा ही त्या ' बंद ' खोलीतून बाहेर जाऊ शकत नव्हती . कारण त्यांनी अट घातली होती .उद्या समजा प्रज्ञाच्या वडिलांनी पोलीस कारवाई केली तर? आम्ही सुद्धा बदनाम होऊ व समाजामध्ये आमच्या वर सुद्धा कारवाई होऊ शकते. या भेटीमुळे ती बाहेर पडू शकत नव्हती. व प्रशांतच्या आई-वडिलांच्या मनात राग शांत झाला त्यांच्यात मतपरिवर्तन घडवून आले .वाटले कि प्रशात त्यादिवशी संपला असता तर ? आपण एक मोठ्या पातकाचे धनी झालो असतो . त्यापेक्षा दुसऱ्या जातीची का होईना पण स्वच्छेने ती तयार आहे . ती हि आनंदात . त्यामुळे त्यांनी होकार दिला. प्रशांत ला इतका आनंद झाला कि त्याला असे वाटले आपण केंव्हा जाऊन ही बातमी प्रत्यक्ष प्रज्ञाला सांगू. साधारण एक आठवड्याने त्याची तब्येत बरी झाल्याने प्रशांत मित्राच्या घरी पोहोचला .व त्याच कॉलनीमध्ये आणि आजूबाजूला तेंव्हा कोरोणा ची परिस्थिती असल्यामुळे कार्यक्रमांना परवानगी मिळत नव्हती . व जास्त लोकांना गर्दी करता येत नव्हती . या गोष्टी जणू प्रशांत आणि प्रज्ञा साठी देवाने सोय केल्याप्रमाणे वाटल्या . इकडे प्रशांतच्या घरच्यांना समाजामध्ये बदनामी नको व ती मुलगी घरामध्ये आणली हे कळता कामा नये म्हणून . दहा ते पंधरा लोकांच्या साक्षीने दोन तासामध्ये लग्न विधी पार पडला. 'प्रज्ञा 'ची सुटका त्या बंदी शाळेतून झाली . व माझी सुटका सामाजिक बंधनातून झाली . तेंव्हा मात्र आम्ही आयुष्यात प्रथमता जणू पृथ्वीवरआल्याचा भास झाला आणि समाजामध्ये दोघे एकत्र बाहेर पडू शकलो. तेव्हा आम्हाला जीवणामध्ये अर्थ कळाला .कि ' लग्न' म्हणजे काय असते . व ते करण्याची गरज आणि समाजाची बंधने हेच योग्य आहेत. त्यामुळे जी समाज रचना व विशिष्ट प्रकारचे जीवनाला शिस्त व संस्कृतीची मूल्य जोपासण्यासाठी खरेच उपयोगाचे आहेत. व नाते ; संबंध , कसा असतो तो कसा टिकवावा लागतो . याचे जणू धडे मिळतात . व समाजाचे साक्षीने केलेले कार्यक्रम जग जाहीर होतात . त्यामुळे जगामध्ये जी नाती सहजासहजी तोडता येत नाही . जर हेच 'लग्न ' फक्त दोघांन मध्येच झाले असते व असे कुटुंब समाजामध्ये जस असे नाते तुटले . किंवा तोडले जाते आणि तोडल्यानंतर क्षणामध्ये संपुष्टात येते .त्यामुळे आजही खऱ्या अर्थाने केलेली रचना व प्रजोत्पादना साठी मिळालेली मान्यता म्हणजे 'लग्न ' याचा अर्थ मला कळाला .
