लेक चालली सासूरवाशीन.
लेक चालली सासूरवाशीन.
सनई चौघड्याच्या सूरात
लगीनघाई चालली जोरात
गहिवरला हा मंडप सारा
अश्रूंनी भिजल्या काया
लेक चालली...
सोडूनी जिवाभावाच्या मैत्रिणी
लेक लाडकी निघाली सासरी
बालपणीच्या आठवणींची शिदोरी
आवरूनी हुंद्के अनं अश्रूधारा
लेक चालली...
ज्या अंगणी हसलो, खेळलो
त्या उंब-याला पारखे होवूनी
क्षणात आपले परके अन्
अनोळख्यांना सर्वस्व अर्पण?
लेक चालली...
आईची वेडी माया अन्
वडीलांची आश्वासक छाया
प्रेमळ राजस भाऊराया
सगे सोयरे जमले सारे आशीर्वाद द्यावया
लेक चालली...
थोरा मोठ्यांच्या पडता पाया, सुखी राहा
दोन्ही घराण्यांचं नाव उज्वल कर पोरी,
जिवाभावाची नातीगोती जप -ह्दयाच्या पलिकडं
लेक म्हणजे परकं धन, सुखी राहा, नांदा सौख्यभरे
लेक चालली सासूरवाशीन व्हावया