लाल बत्ती
लाल बत्ती
शिंदे कमांडो स्कूल ची शाळा अतिशय प्रचंड जागेवरती पसरलेली होती. सुरुवातीला फक्त मुलेच शाळेमध्ये दाखल होत.
विविध प्रकारचे खेळ, शिवाजी महाराजांच्या काळचे हत्यारांचे खेळ, सैन्यात भरती होण्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता कमवण्यासाठी बरेच पालक आपल्या मुलांना शिंदे कमांडो स्कूलमध्ये पाठवत.
शिक्षणाबरोबरच अतिरिक्त शिक्षण विषयांमध्ये देखील मुले अतिशय तयार होत होती.
राजमाता वसुंधराराजे या शिंदे कमांडो स्कूलच्या सर्वेसर्वा.
एकदा एका मीटिंगमध्ये त्यांनी ठरवलं मुलांबरोबर मुलींना देखील शाळेमध्ये प्रवेश द्यावा. मुलगा मुलगी भेद हा नाहीसा करून दोघांना पण सध्याच्या परिस्थितीनुसार तयार करावे.
बहुतेक सारे विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या तरी सैन्यदलात दाखल व्हायचे,शिंदे कमांडो स्कूल मध्ये एक प्रकारचा जुनून होता, एक प्रकारची समर्पणाची भावना, आणि सगळे विद्यार्थी मुले असल्यामुळे, बाकी कुठल्या आकर्षणाचे तिथे काहीच स्थान नव्हते.
शरीर संपदा कमावणे, हत्यारे चालवणे, मोकळ्या वेळामध्ये सैन्यदल चित्रफिती बघणे, सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये चर्चा करणे, असले अतिशय सशक्त विषय शिंदे कमांडो स्कूल मध्ये शिकवले जात होते.
मुलांच्या खाण्यापिण्याकडे, नवीन सवयींकडे, उठण्या बसण्या झोपण्या कडे, होस्टेलच्या वॉर्डन चे बारीक लक्ष असायचे. खरंच सगळी मुले होस्टेल मध्येच राहायची.
खेळांच्या बरोबर, घोडा स्वारी, भालाफेक, गोळा फेक, पोलो, इत्यादी खेळांमध्ये पण मुलं प्राविण्य मिळवत..
वसुंधराराजे यांचा निर्णय बऱ्याच लोकांना आवडला नाही, त्या म्हणजे बाकीचे पण काही प्रश्न उपस्थित होणार, मुली आल्या म्हणजे , त्यांच्या राहण्याची जेवणाची त्यांच्या शिक्षणाची जरा वेगळी व्यवस्था करावी लागेल. सध्याच बेफिकर वातावरण बदलून जाईल. त्यांच्यासाठी वेगळा तरणतलाव करावा लागेल, वेगळे मैदान, वेगळे घोडे ,सगळे फार खर्चिक होणार म्हणून, मॅनेजमेंटने मुलींच्या येण्याकडे संमती दर्शवली नाही.
दोन-तीन वर्ष गेले, परत वसुंधराराजे यांनी तोच विषय काढला, “प्रवेश देऊया मुलींना. झालं, किती वेळ तुम्ही विरोध करणार?”
शेवटी मुलींना प्रवेश देण्याचे ठरले, आठवीपासून मुली शाळेत येतील आणि टप्प्याटप्प्याने लहान मुली शाळेत येतील असे ठरले. म्हणजे कसे थोड्या मोठ्या मुली स्वतःला सांभाळू शकतील आणि अभ्यास करु शकतील ,खेळ खेळू शकतील त्यांचे पण व्यवस्थित रित्या ट्रेनिंग आणि मार्गदर्शन होईल.
वसुंधरा राजे यांची कल्पना खूपच चांगली होती पण प्रत्यक्षात येण्यामध्ये बऱ्याच अडचणी होत्या.
पालक मुलींना कमांडो स्कूल मध्ये पाठवण्यास फारसे काही तयार नव्हते त्यांना माहिती होते की इथली मुलं फार दांडगट आहेत. तरीपण वसुंधराराजे वरती विश्वास ठेवून आणि मुजुमदार मॅडमवरती विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मुली पाठवण्यास होकार दिला. मुजुमदार मॅडम मुलींच्या होस्टेलच्या वॉर्डन म्हणून काम करणार होत्या. त्यांचे मिस्टर, मुजुमदार सर हे कमांडो स्कूल चे मुख्याध्यापक होते.
प्रथम सत्र मध्ये पाच मुली प्रवेश करत्या झाल्या.
आशा देशपांडे, जानकी पटेल, सायली कुलकर्णी, मारिया फर्नांडिस, आणि रुची राजगोपाल.
पाचही मुली अतिशय उत्तम खेळाडू होत्या, त्यांच्या शाळेमध्ये खेळामुळे त्या अभ्यासामध्ये मागे पडल्या होत्या, कमांडो स्कूलमध्ये खेळाबरोबरच अभ्यासही उत्तम करून घेण्यात येणार होता त्याच्यामुळे त्यांचे पालक अगदी बिनधास्त होते.
आठवी ब मध्ये आज मुलींनी प्रवेश घेतला. पहिला आठवडा तर अख्खी शाळा आठवी ब च्या मजल्यावरची जमायची, कारण कोणी शाळेमध्ये मुली बघितल्याच नव्हत्या ना, सगळी शिक्षक मुलींची विशेष काळजी घेत, त्या पण पाच जणी आपल्यामध्ये कंपू तयार करून हिंडत. बरीच मुले त्यांना मदत करण्यासाठी पुढे येत.
नववीचे फुटबॉल प्लेयर मुलींमध्ये जास्त रस घेत होते, बऱ्याच वेळेला सुट्टीच्या वेळेला आठवी ब चा भोवताली घोटाळत.
सवड मिळेल तेव्हा मुलींची बोलायचा प्रयत्न करत, मॅच बघण्यासाठी त्यांना आमंत्रण देत, मुलींच्या घोडसवारी च्या तासाला, जणू अख्खी शाळा मैदानावरति जमे.
मुजुमदार सरांनी मुलींचे घोडसवारी पहाटेच्या वेळेस ठेवायचा निर्णय घेतला, काय आश्चर्य, सात सात पर्यंत लोळणारे लोळणारे मुल आता चक्क पाच वाजता उठून मैदाना वरती वरती हजर राहत, त्यांच्या येण्यामुळे मुलींच्या शिक्षणामध्ये हे काही खंड पडत नव्हता, बर्याच वेळेला घोडे मात्र पिसाळून जात. फुटबॉल चे खेळाडू तर पहाटेच उठून आता मैदानावर ती सराव करायला लागले, फुटबॉल पेक्षा त्यांचं लक्ष मुली बसलेल्या घोड्याकडे जास्त असायचं. कमांडो स्कूल ला जणू नवचैतन्य प्राप्त झाले होत.
फक्त पालकांच्या सूचनेनुसार, तरण तलावात मात्र फक्त मुलीच उतरत, कुणालाही तिथे जाण्याची अनुमती नव्हती.
मुलांच्या कडून मुलींना धोका काहीही नव्हता, फक्त कुतुहूल. त्या रांगड्या शाळेमध्ये, कसलेल्या खेळाडूंची भर पडल्यामुळे, शाळेचे दिवस फार भराभर आणि मजेत जाऊ लागले. प्रश्न एकच होता, कुठलाही खेळ खेळताना पाच जणी अपुऱ्या पडायचा, त्यामुळे नाईलाजास्तव काही मुलांना त्यांच्याबरोबर खेळण्यास अनुमती मिळे. ज्या मुलास खेळण्याची अनुमती मिळायची त्याची वट शाळेमध्ये फारच वाढायला लागली.
अभिजीत फुटबॉल प्लेअर होता, अनिकेत कबड्डी खो-खो या मैदानी खेळावर वर्चस्व गाजवणारा. अजिंक्य ,आर्यन, हर्षद सगळीच गुणी मुलं आपापल्या खेळांमध्ये वर्चस्व दाखवणारी होते. अजिंक्य आणि हर्षद बास्केट बॉल मध्ये अतिशय नावाजलेले खेळाडू होते, त्यांची मजल थेट नॅशनल लेव्हल पर्यंत होती. आर्यन आणि हर्षदला मुलींच्या बरोबर खेळण्याची भरपूर संधी मिळायची. त्यांचं वागणं बोलणं अतिशय मार्दवशील नरम, आणि आदबीच असल्यामुळे मुलींना देखील त्यांच्याबरोबर फार मोकळेपणा वाटे वाटे. आठवीतल्या मुली लहानच होत्या, कुठे त्यांनी एवढी दुनिया बघितली होती, भाबड्या मुलींना बाकीच्या मुलांची बदमाशी कळायची नाही.
अभिजीत जरी फुटबॉल प्लेअर होता तरी तो बाकीच्या मैदानी खेळांमध्ये पण खूपच उत्तम रीतीने खेळायचा, फक्त त्याच्यामध्ये एक दुर्गुण होता, त्याचा त्याच्या जिभेवरती अजिबात ताबा नव्हता, घाणेरड्या शिव्या, घाणेरडे शब्द, शिव्या, अगदी सहज बोलत असे. यामुळे जरी तो कमांडोज कॅप्टन असला तरीही मुलींच्या बरोबर खेळण्यास मात्र त्याला परवानगी नव्हती. अजिंक्य, आर्यन ,हर्शदीप, हर्षद, रणवीर, ही मुले मुलींच्या बरोबर फारच मार्दवाने वागत, त्यामुळे पि.टी. सर देखील निर्धास्त असत.
अभिजीतला पण मुलीं बरोबर खेळण्यांमध्ये काही रस नव्हता पण त्याला खेळू न दिल्यामुळे जणुकाही त्याचा भयंकर मोठा अपमान झाला. फुटबॉल टीम मध्ये त्याला ह्या गोष्टीवरून बरेचसे खोचक शब्द ऐकून घ्यावे लागत.
काही मुले तर असे पण म्हणत," अभिजीत च्या घाणेरड्या तोंडामुळे त्याच्या कोणी नादी लागत नाही."
स्वतःच्या वयापेक्षा मोठ्या मुलांमध्ये खेळण्या मुळे अभिजीत च्या तोंडात घाणेरड्या शिव्या बसल्या होत्या, फुटबॉलला किक मारताना , प्रतिस्पर्धी खेळाडूंचा फुटबॉल अडवताना, त्याच्या तोंडातून जणू आगीचे लोळ बाहेर पडत. संपूर्ण टीम वरती त्याचा एक वेगळाच धाक होता, अतिशय रांगड्या पद्धतीने तो फुटबॉल खेळत असे. पण त्याच्या मधले फुटबॉलचे गुण बघून, खेळ शिक्षक देखील त्याच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करत. नववीमध्ये असून देखील, अभिजीत ची उंची सहा फूट झाली होती, मैदानी खेळ खेळून त्याच्या स्नायूंमध्ये भरपूर ताकद आली होती. त्याचा आहारही जबरदस्त असे, पण त्याचे सगळे शिक्षक त्याला अतिशय प्रेमाने वागवत. पुढे मिलिटरी मध्ये जाऊन अभिजीत नक्कीच नाव कमावणार होता. मुले कधी कधी त्याला रागाने रावणाचा भाऊ म्हणत. पण कोणाची हिंमत नव्हती की त्याच्या समोर येऊन त्याला काही लागेल असे बोलण्याची.
एके दिवशी कॅन्टीनमध्ये जेवणाच्या वेळी सगळे टेबल भरले असल्यामुळे फक्त मुलींच्या टेबल वरती जागा होती कारण एका टेबलवर ते आठ मुलं जेवण्यासाठी बसत. अभिजीत आपल्या ताट घेऊन मुलींच्या टेबल वरती जाऊन मुकाट्याने जेवायला लागला.
त्याचं हे वर्तन बघून सगळ्या मुलांनी तोंडात बोट घातले. त्यांना वाटले अभिजीत फारच आगाऊपणा करतोय.
अभिजीतने शांतपणे आपले जेवण संपवलं आणि तो ताट उचलून बाहेर आला. त्याने ना मुलींकडे बघितलं ना त्यांच्याशी बोलला.
असं जवळजवळ दोन-तीन दिवस झालं. अभिजीत सगळ्यात शेवटी जेवायला यायचा आणि जागा नाही म्हणून तो मुलींच्या टेबलावरती जाऊन बसायचा. आता मुलींची आणि त्याची चांगलीच ओळख झाली होती, सगळे मस्त गप्पा मारत जेवायचे, अभिजीतन मुलींना पुढच्या फुटबॉल मॅच च्या वेळेला येण्याचा देखील आमंत्रण केलं होतं. अभिजीतन त्यांना घोडेस्वारी करताना कसे बसायचं याच्या देखील काही छोट्या छोट्या टिप्स दिल्या होत्या. मुलींना आता अभिजीत विषयी आदर वाटायला लागला. आणि इथेच माशी शिंकली.
तिखट मीठ लावून सगळ्या शाळा भर ही बातमी झाली की अभिजीत मुलींच्या टेबल वरती बसून जेवतो. खरं म्हणजे त्याच्यामध्ये गैर काहीच नव्हतं.
अभिजीत च वर्तन पण व्यवस्थित असे. पण! पण झाले काय की आठवीच्या मुलांना, मुली म्हणजे त्यांची जबाबदारी वाटत असे. त्यांचा घोर अपमान झाला, आज अभिजीत चक्क मुलींबरोबर बसून जेवला. जणू काही या पाच मुली आठवीची मक्तेदारी होती अस सगळ्या आठवीच्या मुलांचं वागणं होत.
संध्याकाळचं मैदानावरचा रोजचा कार्यक्रम उरकून सर्व मुले होस्टेल कडे चालली होती. अभिजित आणि त्याचे काही मित्र हे फुटबॉलच्या मैदानावर आवरा-आवरी करत होते. कॅप्टन म्हणून अभिजीत वर भरपूर जबाबदारी होती. सगळे फुटबॉल मोजून ठेवणे, सगळ्या नेट गुंडाळून ठेवणे, वगैरे वगैरे.
फुटबॉल्स मैदानावरून होस्टेल कडे येण्यासाठी एक लहानशी पायवाट होती. भरपूर झाडी असल्यामुळे नक्की तिथे काय चाललंय हे ऑफिस रूम मधून दिसत नसे.
नेहमीप्रमाणे अभिजित सगळ्यात शेवटी सावकाशपणे त्या पायवाटेने हॉस्टेल कडे निघाला होता. अचानक झाडीतून काही दबा धरून बसलेली मुले पुढे आली, त्यांनी अभिजीतच्या डोक्यावरती एक पिशवी टाकली., एका मुलांनी त्याच्या गुडघ्या वरती मागच्या बाजूने जोरदार लाथ मारली त्यामुळे अभिजित खाली पडला, पडता पडता त्यांनी स्वतःला सावरले तोपर्यंत बाकी च्या मुलांनी त्याचे हात पकडले आणि उरलेल्यांनी त्याला ठोकायला सुरुवात केली.
अभिजीत एक कसलेला खेळाडू होता व्यायाम करून त्याचे शरीर पण बलदंड झालेलं होतं , झटक्यात वळून त्यांनी स्वतःच्या कमरेचा बेल्ट काढला आणि गोल गोल फिरवायला सुरुवात केली बेल्ट चे तडाखे बाकीच्या मुलांना बसायला लागले पण तरीपण ती मुले त्याला दिसेल तिथे मारायला लागली होती.संध्याकाळच्या अंधारामध्ये अभिजीतला काही समजले नाही, त्याच्यामध्ये भरपूर ताकद असल्यामुळ त्यांनी हात पाय मारून स्वतःला सोडवण्याची भरपूर सोडविण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण दहा पंधरा मुलेदहा-पंधरा मुलांच्या समोर अभिजित चा
जोर कमीच पडत होता. एक तर त्याचा चेहरा झाकला होता, आणि मुलांच्या हाताने पायाने त्याला तुडवून काढले.
त्याला मारताना ते म्हणत होते की ,"परत जर मुलींच्या कडे नजर वर करून बघितला तर , तर तू मेलास म्हणून समज."
अभिजितला काही कळतच नव्हते, त्यांचा मार मात्र भरपूर बसत होता. शेवटी त्यांनी ताकदीच्या जोरावर, आपल्या डोक्यावर ची पिशवी उपसून काढली आणि मुलांचे चेहरे बघण्याचा प्रयत्न केला. सगळ्या मुलांनी तोंडाला माकड टोपी घालून, काळे फासले होते, त्याच्यामुळे त्याला कोणीच ओळखू आले नाही. पण त्यांची शरीरयष्टी त्याला व्यवस्थित समजली. ही मुले बहुतेक सातवी किंवा आठवीतली असतील. एकदोन मुलांच्या हातावरती त्यांनी भरपूर ओरबाडुन काढले. दोघा-तिघांची लाथा घालून पार वाट लावून टाकली. अंधारात सगळी मुले पळून गेली. अभिजीतला बरंच लागलं होतं, तो तसाच वॉर्डांनच्या रूममध्ये गेला, झालेला प्रकार सांगितला.
देशमुख सरांनी ताबडतोब सगळे वॉचमनला बोलवून आठवीच्या सगळ्या मुलांना हॉलमध्ये येण्यास सांगितले.
मुलांना तोंड धुण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. अभिजीत चे सगळे मित्र देखील पिसाळून उठले.
त्यांच्या कॅप्टनला कोणीतरी मारलेले होते. अशी गुंडागर्दी शिंदे कमांडो स्कूलमध्ये थोड्याफार प्रमाणात चालायची, पण एकट्याला गाठून कधीच नाही.
काळे तोंड केलेल्या आठवीच्या सगळ्या मुलांना मुजुमदार सरांनी स्टेजवरती उभे केले, अभिजीत ने सांगितल्याप्रमाणे त्यांचे हात पाय तपासले. ज्यांच्या हातावरती ओरबाडले याच्या खुणा होत्या, त्यांना या खुणा कशा आल्या यांच्यासंबंधी खुलासा करण्यास सांगितले. आठवीची लहान मुलं होते, त्यांना भितीने दरदरून घाम सुटला. जवळजवळ वीस मुलांनी मिळून अभिजीतला बडवून काढण्याचा प्रयत्न केला होता, पण अभिजीत शक्तीमुळे तो वाचला होता, एखादा कमजोर विद्यार्थी असता तर तो मेला असता. ज्यांच्या पाठीमध्ये अभिजीत ने लाथा घातल्या होत्या त्यांना तर चालता पण येत नव्हतं.
डोक्यावरती पिशवी घालून, एखाद्याला ठोकून काढणे, याला म्हणतात लालबत्ती.
पण एखाद्याच्या जीवावर उठणार असेल तर असे प्रकार एखाद्या स्कूलमध्ये कसे चालू देणार?
त्या मुलांना मुजुमदार सरांनी समजावले, आणि सगळ्यांना मेडिकल तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले.
नको नको म्हणत असताना पण अभिजीत ला हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवून दिले.
ज्या मुलांनी गुन्हा केला होता, त्यांना महिनाभर खोल्या झाडण्याचे आणि बाथरूम साफ करण्याचे काम देण्यात आले. अभिजीत ची आई डॉक्टर सुहासिनी, आणि त्याचे ब्रिगेडियर बाबा, सुहास पेडणेकर, हे त्याला भेटण्यास शिंदे कमांडो स्कूल मध्ये आले. मारामारीचे वृत्त कळताच दोघेही फार अस्वस्थ झाले. मिलिटरी सर्व्हिसेस मध्ये असलेले ब्रिगेडियर पेडणेकर म्हणाले ही आमची मुले जर देशांमध्ये सुरक्षित नसतील तर आम्ही सीमेवरती कोणासाठी लढणार?
लाल बत्ती जरी एक पोरकटपणा होता, तरीपण तो कोणाच्या जीवावर बेतू शकतो.
अभिजीत चे आईबाबा त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले.
अभिजीत शाळेतून गेल्यावर ती शाळा जणूकाही एकदम सुनी सुनी झाली. ते त्याचे फुटबॉल मैदानावर ती वर्चस्व गाजवणं, त्याचा कुठलाही खेळ अतिशय उत्कृष्टपणे खेळणं, त्याचं वागणं त्याचं बोलणं, सगळं काही आठवून शिक्षक वर्ग फारच नाराज झाला. मॅनेजमेंटच्या लोकांनी ही संधी सोडली नाही, त्यांनी वसुंधराराजे वरती सरळ आरोप केला, की मुली नसताना आपली संस्था उत्कृष्टपणे चालत होती, मुली आल्या आणि बघा आपण एका अत्युत्कृष्ट खेळाडूला गमावून बसलो. हा एक डाग आपल्या वरती लागलेला आहे. मॅनेजमेंटला पण कळेना की आता काय करावे.
त्या सर्व मुलांचे पालक डेहराडूनला गेले. त्यांनी हात जोडून अभिजीत च्या आई-वडिलां ची क्षमा मागितली.
ब्रिगेडियर साहेब म्हणाले," अहो वाद आपल्यामध्ये थोडी आहे? मुलांची चूक आहे, त्यांना जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत काही उपयोग नाही."
मॅनेजमेंट, सारे शिक्षक, मुले, पालक, सर्वजण अभिजीतला परत शाळेमध्ये आणण्यासाठी काहीही करायला तयार होते.
मुलींना त्या प्रकाराबद्दल फारच वाईट वाटलं. एक तर त्यांना कुठल्याही मुलाबद्दल काहीही तक्रार नव्हती. आणि त्यांच्या वर्गातल्या चक्क वीस मुलांनी, फुटबॉल कॅप्टन ला ठोकून काढले होते.
एक महिना असाच गेला, अभिजीतला पण शाळे वाचून काही करमत नव्हतं. अभिच्या वडिलांनी त्याला डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं होतं. तिथे त्याला अजिबातच करमत नव्हतं.
राहून राहून त्याला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं, आपल्यामध्ये काहीही चूक नसताना आठवीच्या मुलांनी का मारलं?
परत एकदा मॅनेजमेंट पालक आणि शिक्षकांची सभा झाली, परत एकदा सगळे नियम तपासून बघितले गेले, शाळेला एक् समुपदेशक नेमण्यात आला, ज्या मुलांनी लालबत्ती केली होती त्यांना सगळ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. अभिजीत च्या आई-वडिलांना विनंती करण्यात आली त्यांनी अभिजीतला शिंदे कमांडो स्कूल मध्ये परत पाठवावे.
अभिजीतला तेच पाहिजे होतं, आई-वडिलां पाशी हट्ट करून अभिजीत परत शिंदे कमांडो स्कूलमध्ये दाखल झाला. त्यानी मॅनेजमेंटला विनंती केले ती कोणालाही शाळेतून काढू नका.
मुलींनी जाऊन अभिजीतला सॉरी म्हटलं.
मॅनेजमेंट आणि सगळ्यांनी मिळून मुलांना माफ केले, आणि नीटपणे समजावून सांगितले.
काही चहाटळ मुलांनी मैदानाच्या रस्त्याचे " लालबत्ती रस्ता" नामकरण केले.
मॅनेजमेंट कडून अजून दोन वॉचमन लालबत्ती रस्त्यावर दिवस आणि रात्रीचा पहारा करायला ठेवले, तसेच तिथे भरपूर स्वच्छ प्रकाशाचे दिवे लावण्यात आल
शिंदे कमांडो स्कूल आता शांततेत आहे. कारण मुलींचा मित्रच सगळ्यात दांडगा अभिजीत आहे.
शाळा अतिशय मजेत चालू आहे.
