कर्तव्य
कर्तव्य
लहानपणापासूनच एका डोळ्यानी कमी दिसायचं स्वातीला. शाळेत अनेक मुली तिला एक डोळ्याची म्हणून चिडवायच्या. तिला मिक्स करून घेत नव्हत्या, त्याचं तिला वाईट वाटायचं. तिने खूपदा घरी सांगितलं हे सगळं... पण आई-बाबांनी तिला दुर्लक्ष करायला सांगितलं.
एकदा आई स्वातीला पूर्णतः अंध असलेल्या मुलांच्या शाळेत घेऊन गेली आणि तिला म्हणाली की हे बघ, स्वतःकडे जे नाहीये याचा विचार करत बसू नकोस, जे आहे त्याच्याकडे सकारात्मकतेने बघ... पालकांचं कर्तव्य आहे मुलांना योग्य मार्गाने, योग्य रित्या समजवणं...
