Akshay Yadav

Horror Crime

3.7  

Akshay Yadav

Horror Crime

कर्मचक्र

कर्मचक्र

63 mins
602


  स्वार्थ म्हणजे काय? स्वतः कडे आहे तरी अजून हवे आहे अशी अपेक्षा करणे म्हणजे स्वार्थ का? तसे सर्व जिवंत प्राणी स्वार्थी असतात .पण माझे मत आहे मनुष्य प्राणी सर्वात जास्त स्वार्थी आहे या भू तलावर, प्रेम, सत्ता आणि पैसा या गोष्टी साठी माणूस पहिल्या पासून स्वार्थी आहे आणि त्याचा हा स्वार्थ त्याला कोणत्या पातळीवर नेऊन ठेवेल याचा काही नेम नाही. सादर कथा हि अशीच स्वार्थी लोकांनी भरलेली आहे.

   टेबलवर फोन वाजतो, फोन उचलला जातो तसा पलीकडून आवाज येतो. साहेब आज पुन्हा गावात बळी गेला आहे आजचा हा दहावा बळी आहे, हे दृष्ट चक्रातून आम्हाला वाचावा. काही तरी करा साहेब असेच सुरु राहिले तर गावात कोणीच जिवंत राहणार नाही. आवाज रडवेला होतो काही तरी करा साहेब इकडून कॉल कट केला जातो.


    साधारण २० वर्षा नंतर मुंबई मध्ये, ये जास्त हुशारी करू नकोस समजले ना मी रोज रिक्षा ने प्रवास करते आणि तू काय मला सांगतोस किती भाडे झाले. रोज मी २० रुपयात घाटकोपर स्टेशन वरून इथं पर्यंत येते आणि तू काय २५ सांगतोस, मुलगी पाहून लूट करता काय? तेवढ्यात तो रिक्षा चालक म्हणतो मॅडम मीटर पहा ना मीटर २५ दाखवतो आहे आणि नेहमीच रस्ता घेतला असता तर तुम्हाला उशीर झाला असता कारण तिकडे गाडी बंद पडून ट्राफिक झाले होते म्ह्णून थोडं फिरून आलो आणि ५ रुपये साठी तुम्ही एवढे सुनावत आहात. हे बघ मी मानसी शिंदे या कीर्ती ग्रुप मध्ये अकाउंट मध्ये काम करते आणि तू मला पैस्यान बद्दल सांगतोस तुझा मीटर खराब असेल. मानसी आणि रिक्षा वाला यांचा होणारा वाद निशी ने पहिला, निशी प्रधान कीर्ती ग्रुप ऑफ कंपनी मध्ये स्टॉक मॅनेजर म्हणून कामाला त्याने गाडी लावली आणि जिकडे भांडण सुरु होते तिकडे गेला. काय झाले मानसी? निशी ने विचारले. अरे हा बघ ना ५ रुपये जास्त मागतो आहे मानसी नाराजी च्या स्वरात म्हणाली. साहेब २०रुपये भाडे होते मान्य पण आज नेहमीच्या रस्त्यावर गाडी बंद पडली मॅडम ला उशीर होईल म्हणून मी थोडा वळसा घालून आलो म्ह्णून ५ रुपये जास्त पडले तर मॅडम वाद घालत आहे त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधी हो घालणार वाद मी नाही देणार जास्त पैसे हवे ते कर मानसी रागाने म्हणाली. निशी ने खिश्यात हात घालून ५ चा कॉइन काढून त्या रिक्षा वाल्याला दिला. अरे हे काय करतोस मानसी बोले पर्यंत रिक्षा वाला घेऊन निघून गेला. मानसी ने चिडून निशी कडे पहिले आणि म्हणाली, तू का दिले पैसे माझ्या कडे पण होते पण नियम त्याने मोडला फिरून आला तरी २ रुपये झाले असते ५ म्हणजे जरा जास्त बोला. त्यावर निशी ने तिला शांत करत म्हणाला, तू शांत हो माझी आई आधीच आपल्या उशीर झाला आहे आणि त्यात हा वाद वाढला असता तर त्याला काही नाही पण आपला लेट मार्क लागला असता. तेवढयात मानसी घड्याळ पाहते, शिट्ट फक्त ५ मिन आहे म्हणत दोघे धावत लिफ्ट जवळ जातात लिफ्ट येते आणि दोघे आत जातात आज पडणार वाटत निशी बोलतो. पंच करून दोघे पण आपल्या जागेवर बसतात तेवढयात त्यांचा जवळ शिव येतो. आलात या अरे तुम्ही कधी सुधारणार तुमच्या साठी तिकडे बॉस ला रोज नवीन कारण द्यावे लागते जरा तरी वेळेचे भान ठेवा शिव म्हणाला. शिव कंपनी मध्ये मशीन चा हिशोब ठेवत असे तसेच कामगारांचे किती दिवस भरले आणि किती सुट्टी याची यादी पण त्याचा कडे होती. हेय गाईज एक मधुर आवाज कानावर पडला तसे तिघे पण शांत आणि भीती ने पाहत उभे होते. काय काम नाही का गप्पा मारायला उभे राहायला हे काय तुमचे कॉलेज नाही समजले का चला कामाला लागा कीर्ती कंपनी च्या मालक गोरखनाथ यांची एककूलती एक मुलगी कीर्ती त्यांचा समोर उभी होती. त्या तिघांची पडलेली तोंडे पाहून कीर्ती हसू लागते. अरे मी मस्करी करत होते एवढे सिरीयस का झालात कीर्ती हसत म्हणाली. कीर्ती तू पण ना कधी कशी वागशील सांगता येत नाही निशी म्हणाला. अरे काय करू आहे तर मी मालकीण मग म्हंटल बघू जमत का ते, पण जमले रे कीर्ती हसत म्हणाली, हा आणि आमची भीती ने वाट लागली शिव म्हणाला. तू भेट नंतर मी बघते आता ऑफिस मध्ये आहे नंतर बाहेर भेट मानसी म्हणाली. निशी, मानसी, शिव आणि कीर्ती चौघे पण एकच कॉलेज मध्ये शिक्षण घेतले नंतर कीर्ती ने त्याची नोकरी तिच्या कंपनी मध्ये लावली होती. गाईस तुम्ही अंगद ला पहिले का? कीर्ती ने इकडे तिकडे पाहत विचारले. नाही बुआ का? तुझे काही महत्वाचे काम आहे का अंगद कडे? शिव ने लाडिक पणे विचारले. त्यावर कीर्ती थोडे लाजून म्हणाली नाही काही नाही. तिचे असे लाजणे पाहून मानसी म्हणाली तुला अंगद आवडतो तर तू त्याला विचारून का नाही टाकत. मी काय आता विचारेन पण तो समोर आला ना कि माझ्या तोंडातून शब्द फुटत नाही. मग मी विचारतो? हसत निशी म्हणाला. काही गरज नाही मी विचारेन योग्य वेळ आल्यावर सध्या चला काम करा बोलून ती तिच्या केबिन मध्ये जाते आणि इकडे अंगद येतो. सहा फूट उंच, पिळदार शरीरयष्टी त्यावर पिळदार मिश्या अगदी चित्रपटामध्ये कोणी हसत हिरो म्हणून घेऊन असा आणि त्याच्यावर कोणती हि ललना पाहताच प्रेमात पडेल. प्रोजेक्ट मॅनेजर पोस्ट ला होता कमी बोलायचा. निशी, अंगद,शिव ,मानसी यांचा मोबाईलवर एक मॅसेज येतो. मीटिंग संद्याकाळी ०४ वाजता हा मॅसेज कंपनी चे मालक गोरखनाथ यांनी पाठवलेला असतो.


  हॅलो टीम, गोरखनाथ त्या चार जणांकडे पाहत म्हणाले. आज मी खुप खुश आहे, आज आपल्या कंपनीचे शेअर खुप जास्त प्रमाणात मार्केट मध्ये विकले गेले आणि आपल्याला आत आपला कारभार वाढवायला हवा आणि त्या साठी आजची हि मीटिंग ठेवली आहे. शिरोळे पुणे जवळ एक छोटे गाव आहे तिकडे एक कपड्याची मिल आहे पण काही कारणाने ती मिल बंद झाली होती आणि आता मार्केट मध्ये आपले स्थान आणि आपले काम पाहता मी ती मिल पुन्हा सुरु करायचा विचार करतो आहे. गाव छोटे आहे आणि तिकडे लोकांना मिल मुळे आर्थिक हातभार लागेल.वाह्ह काय छान विचार आहे बाबाचे कीर्ती मनात म्हणाली. बाबा हि तर खरंच चांगली बातमी आहे म्हणजे मला आठवत नाही पण लहानपणी मी ते नाव ऐकले होते कीर्ती म्हणाली. गोरखनाथ ने एक स्मित करत पुन्हा सर्वांकडे पहिले आणि म्हणाले. मला या कामासाठी अत्यंत हुशार, मेहनती आणि विश्वासू माणसे हवी आहेतआणि म्हणून तुम्ही सर्व इकडे आहात ना कि तुम्ही कीर्ती चे मित्र आहात. तुमचे काम आणि काम करण्याची पद्धत पाहून मी तुमची निवड त्या प्रोजेक्ट साठी केली आहे. हि कंपनी कीर्ती एकटी स्वतंत्र पणे सांभाळणार तुम्ही चौघे तिला रिपोर्ट करणार परवा तुम्ही शिरोळ ला जाणार आणि तिकडे मशीन तिकडे काही लागले ते सर्व तुम्ही कीर्ती ला सांगून घेणार आता ती तुमची बॉस बोलून गोरखनाथ हसू लागले आणि त्यांना पाहून सर्व हसू लागले. तुमची राहण्याची सोय तिकडे कंपनी चा बंगलो आहे तिकडे केली आहे तुम्ही परवा निघायची तयारी करा गोरखनाथ म्हणाले. त्यावर कीर्ती आनंदानं ओरडली आणि जोरात म्हणाली मी पण येणार तुमच्या सोबत तिचे वाक्य पूर्ण होई पर्यंत नाही तू नाही जायचे तिकडे गोरखनाथ बोला. पण का? कीर्ती ने आश्चर्याने विचारले. कारण, कारण मला इकडे तुझी मदत लागणार म्हणून तू इकडे हवी आहे गोरखनाथ विचार करत म्हणाला. कीर्ती ने त्यावर फक्त मान डोलावली. मीटिंग संपली तसे सर्व बाहेर पडले आणि शिव, मानसी आणि निशी तिघे पण जिन्याकडे गेले तिकडे तिघांनी पण सिग्रेट शिलगावली आणि झुरके घेत निशी म्हणाला,अचानक बॉस ला काय झाले, कीर्ती येत होती तर अचानक तिला नाही का बोले? काय माहित नक्की काय झाले? नाही तर बॉस कधी नाही बोलत नाही कसला मानसी धूर सोडत म्हणाली.तेवढयात कीर्ती येताना दिसली.


   कीर्ती, काय झाले बॉस ला असे अचानक नाही का बोले आणि कारण जे दिले ते पण विचार करून दिले असे वाटत आहे शिव म्हणाला. काय माहित यार? मला पण एक दे, डोकं जड झाले आहे. म्हंटलं मस्त चान्स आहे अंगद सोबत राहण्याचा तर त्यात पण आमचा बाप मध्ये आला. बघते काय काम आहे नाही तर मधेच जॉईन कारेन तुम्हाला तिकडे चला जाऊ म्हणून कीर्ती आणि सर्वानी सिगरेट विझवली.


   दुसऱ्या दिवशी तयारी साठी चौघे पण सुट्टी वर होते, इकडे कीर्ती ला करमत नव्हते. वेळ साधून कीर्ती ने मेरी जी गोरखनाथ यांचे मीटिंग सांभाळत होती तिला कॉल केला. मेरी मला सांग या ८-१० दिवसात बाबांची अशी कोणती मीटिंग आहे का जिकडे मी असणे गरजचे आहे किंवा माझी काही गरज असेल मुंबई मध्ये कीर्ती ने विचारले. मेरी ने डायरी पाहून पाच मिन मध्ये उत्तर दिले सरानी अशी कोणती मीटिंग नाही ठेवली जिकडे तुम्ही हवे आहात आणि सर उद्या गुजरात ला जाणार आहेत मेरी ने उत्तर दिले आणि कीर्ती चा चेहरा उतरला. पुन्हा कधी येणार आहे कीर्ती ने विचारले. पुन्हा मेरी ने डायरी पाहून म्हणाली उद्या जाऊन दुसऱ्या दिवशी पहाटे माघारी येणार हे ऐकताच कीर्तीच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तिने फोन ठेऊन दिला. तिने लगेच एक मेसेज आपल्या मित्राच्या ग्रुप वर टाकला कि उद्या मी पण येत आहे आणि या बाबत अंगद ला कोणी सांगू नये. ग्रुप मध्ये ख़ुशी चे स्टिकर पाठवले. ठरल्या प्रमाणे गोरखनाथ आवश्यकत्या सूचना कीर्तीला देऊन गुजरात साठी निघाले. इकडे गोरखनाथ बाहेर पडले आणि तिकडे कीर्ती त्यांचा मागून स्वतःची गाडी घेऊन निघाली. तिने शिव, मानसी आणि निशी ला पिकअप केले आणि वाटेत तिने अंगद ला पिकअप केले. तू इकडे कशी कीर्तीला पाहून अंगद ने आश्चर्याने विचारले. बाबा सकाळी लवकर गुजरात ला गेले आणि मी निघले आता ते येतील उद्या आणि त्यांना मी दिसली नाही तर ते थोडे चिडतील किंवा ओरडतील समोर मी नसेन तर कॉल करून मी त्यांना शांत करू शकेन कीर्ती म्ह्णणाली. हो, म्हणजे आणि तिला कोना सोबत तरी वेळ घालवायला मिळेल ना हसत मानसी म्हणाली जे अंगद ला काही समजले नाही. गाणी, गप्पा आणि मस्ती करत ते शिरोळे ला साधारण ४ पर्यंत पोचले. 


    शिरोळे, पुणे जवळ असेलेले एक छोटे खेडेगाव होते मुंबई पासून साधारण १४५ किलोमीटर वर गावात साधारण ४०० घरे आणि सर्व मिळून मिसळून राहत होते. गावच्या वेशी बाहेर गावकऱ्यांची शेती आणि तिकडे एक सफेद बंगलो आणि एक बंद पडलेली मिल, त्या मिल कडे पाहून असे वाटत नव्हते कि त्या मिल मध्ये एक तागा पण तयार झाला असेल.


   इकडे गप्पा आणि गाणी म्हणत कीर्ती आणि टीम गावाकडे जात असताना त्यांना एक गाई घेऊन जाणारा तरुण दिसतो. अरे मित्र हे शिरोळे गाव किती लांब आहे अजून निशी ने विचारले. त्यावर तो तरुण हसत म्हणाला. हे काय साहेब इकडे एक वळण घेऊन ५ मिन पुढे गेले कि आले शिरोळे गाव, तिकडे कोणती मिल आहे ना तिकडे जायचे आहे निशी म्हणाला तसे त्या तरुणाचा हसरा चेहरा एकदम पडला आणि तो भीती ने त्यांचा कडे पाहू लागला. हॅलो काय रे काय झाले नाही माहित तर काही प्रॉब्लेम नाही असे भूत पहिल्या सारखा चेहरा का केला आहेस निशी म्हणाला तसे सर्व हसू लागतात. साहेब पत्ता माहित आहे पण ती जागा चांगली नाही तो तरुण म्हणाला. म्हणजे का रे काय आहे तिकडे? शिव ने हसत विचारले. तिकडे, तिकडे अवदसा आहे अवदसा तो तरुण भयाने कापत म्हणतो. त्या जागेत जो कोणी गेला तो परत कधी आला नाही. अवदसा म्हणजे काय? मानसी विचारते. अवदसा म्हणजे स्त्री भूत किंवा हडळ म्हणू आपण अंगद म्हणतो. हो का, तुला बरीच माहिती आहे भूताची निशी म्हणतो आणि हसू लागतो हो रे मला पण पाहायचे आहे कशी दिसते ते शिव म्हणाला आणि सर्व हसू लागतात. साहेब हसू नका, हे सर्व हसण्यावारी घेऊन जाऊ नका तिकडे जे आहे ते तुमच्या आमच्या समजण्या पलीकडे आहे. गावाच्या वेशीवर ते घर आणि ती मिल आहे तुम्ही शहराकडे राहणारे तुम्हाला काय माहित गावी काय असते? जपून जा आणि सांभाळून राहा तो तरुण बोलतो आणि त्याचा कडे एक विचित्र नजर टाकून कीर्ती गाडी सुरु करून ते तिकडून निघतात.


  काय माणसे आहेत, काय तर म्हणे अवदसा अरे कोणत्या शतकात जगतात काय माहित हे लोक निशी म्हणतो. शिरोळे गावात आपले स्वागत अशी पाटी तिकडे लावलेली असते पाटी जुनी झाली होती आणि खराब पण ते गावाच्या वेशीमध्ये प्रवेश करतात आणि त्यांना एक सफेद बंगलो दिसतो त्याचा शेजारी मिल सारखे काही तरी असते. बंगलो बाहेरून अगदी विचित्र वाटत होता म्हणजे आजूबाजूला कुंपण होते, त्याचा कलर गेला होता बाहेरून अगदी भेसूर वाटत होता त्याचा बरोबर शेजारी ती मिल होती जिच्या बाहेर पण कुंपण होते आणि आजूबाजूला झाडी वाढली होती. कीर्ती गाडी पार्क करते, आई शपत हा तर भूत बंगलो वाटत आहे शिव म्हणाला. इकडे कोणी रामू काका आहे का जो आपले कंदील घेऊन स्वागत करेल मानसी बोली आणि सर्व हसू लागले. नाही इकडे रामू काका नाही पण शेवन्ता काकी आहेत कीर्ती म्हणाली.म्हणजे? मानसीने विचारले आणि कीर्ती ने दारावरची बेल वाजवली. मानसी चे उत्तर तिचा समोर होते, साधारण ५०-५५ वर्ष असलेल्या स्त्री ने दरवाजा उघडला. कीर्ती ताई तुम्हीच का? त्या काकी ने विचारलेल्या प्रश्नावर कीर्ती ने मानेने होकार दिला.कीर्ती ने आत प्रवेश केला आणि तिचा मागे सर्व आत आले. तुमच्या फोन आला आणि मी कामाला लागले. सर्व घर स्वच्छ केले आहे वरती ३ रूम पण तयार करून ठेवल्या आहेत. जेवण करून ठेवले आहे. मी सकाळी येईन आणि नास्ता दुपारचे आणि संध्याकालचे जेवण करून जाईन.या भागात तसे फारसे कोणी येत नाही पण तरी देखील जमलं तर घरी थांबा बाहेर रात्री पडू नका आणि तिकडे मिल कडे जायचा रात्री प्रयन्त करू नका नाही म्हणजे खुप झाडी वाढली आहे त्या मुळे जनावर असेल म्ह्णून म्हंटले हसत शेवंता म्हणाली. काकी त्या मिल कडे सफाई साठी कोणी असले तर पहा जरा कीर्ती म्हणाली तसे शेवंता चा चेहरा एकदम उतरला. हो ताईसाहेब बघते आता मी घरी जाते मला उशीर होतो आहे. सर्व माहिती भराभर सांगून शेवंता निघाली. काय सॉलिड आहे हि सर्व सूचना भरभर सांगून निघून पण गेली शेवंता च्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून अंगद म्हणाला.


   सर्वानी आपले रूम निवडून घेतले. निशी आणि शिव एका रूम मध्ये, मानसी आणि कीर्ती एका रूम मध्ये तर अंगदने शेवटची छोटी रूम एकट्या साठी घेतली. सर्व रूम च्या खिडकी मधून मिल चा गेट दिसत होता. संध्याकाळी जेऊन सर्व जण आपल्या रूम मध्ये झोपले. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाटाने कीर्ती ला जाग आली आणि तिने स्वतःचा मोबाईल पहिला ९ वाजले होते आणि गोरखनाथ यांचे १२ मिस कॉल होते सोबत काही टेक्स्ट पण होते. तिला माहित होते काय होणार आहे तिने झोपतेतच कॉल केला. हॅलो गुड मॉर्निंग बाबा कीर्ती म्हणाली, खड्यात घाल तुझे गुड मॉर्निंग तुला सांगितलं होते ना तिकडे जाऊ नको म्हणून तरी तू का गेलीस? गोरखनाथ यांनी चिडून विचारले. बाबा एवढे का रागवत आहेत, तुम्ही तर म्हणता ना कि माझ्या नंतर तुलाच सर्व सांभाळायचे आहे मग मला माझ्या कंपनी चे पाहायला नको का? आणि तसे पण हा प्रोजेक्ट तुम्ही मला दिला आहे मी याचे सर्व पाहणार आहे आणि ते मला मुंबई मध्ये बसून बघणे शक्य नाही कीर्ती थोडी रागात बोली. म्हणजे तू माझे काही ऐकणार नाही का? ते एक गाव आहे आणि तिकडे तू कशी राहणार गोरखनाथ काळजीच्या स्वरात विचारले. बाबा तुम्ही माझी काळजी नका करू इकडे आपले एवढे मोठे घर आहे शेवन्ता काकू आहेत शिवाय माझे मित्र आहेत मी माझी काळजी घेईन आणि आज नाही तरी उद्या मला इकडे यावे लागले असते ना? चला मी नंतर बोलते मला भूक लागली आहे ब्रेकफास्ट कार्याला जाते बाय बाबा लव्ह यू बोलून पुढचे काही न ऐकता ती कॉल ठेऊन देते. गोरखनाथ यांच्याकडे फक्त हॅलो, हॅलो करण्याशिवाय काहीच उरले नव्हते. त्यांना माहित होते कि कीर्ती हट्टी आहे आणि तिला जे हवे ते करणार.


नास्ताच्या टेबले वर सर्व तयारी शेवन्ता काकू ने करून ठेवली होती तिकडे आता फक्त एकटा अंगद बसला होता.कीर्ती त्याचा शेजारी जाऊन बसली. झोप झाली का नीट? कीर्ती ने विचारले. त्या वर अंगद ने तिच्या कडे न पाहता मानेने होकार दिला. तू रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करतोस कीर्ती ने विचारले,तसे अंगद ने पुन्हा मानाने होकार दिला. हा बोलत का नाही मुका झाला आहे का? कि मी याला मारणार आहे, बोल मेल्या काही तरी बोल इकडे कोणी नाही तो पर्यंत तरी बोल आपला वेळ आहे बोल ना? मंद कुठला कीर्ती मनातून अंगद ला बोलत होती. हि माझ्या बाजूला का बसली आहे? आणि एवढे का विचारते आहे? काही प्रॉब्लम तर झाला नाही ना? विचारू का? बोलू का हिच्या सोबत नाही तरी एक मैत्रीण म्हणून बोलत आहे. कसा सांगू ती मला आवडते. अंगद पण मनात विचार करत होता. तेवढयात निशी आणि शिव आले, हे काय सुरु केला पण तुम्ही शिव ने विचारले. अरे तू काय आंधळा आहेस का? अजून सुरु केला ते दिसते का? आम्ही गप्पा मारत होतो कीर्ती म्हणाली. आंम्ही म्हणजे तू आणि अंगद निशी ने विचारले आणि तो हसू लागला. हसतोस काय? खरच आम्ही बोलत होतो कीर्ती म्हणाली. त्यावर अंगद म्हणाला हो आम्ही बोलत होतो. सॉरी आम्ही काही व्यत्यय नाही ना आणला बोलून पुन्हा शिव आणि निशी हसू लागतात त्यांना पाहून कीर्ती आणि अंगद पण हसू लागतात सर्वाना माहित होते कीर्ती चे अंगद वर प्रेम आहे पण कोणाला हे माहित नव्हते कि अंगद चे पण प्रेम आहे कीर्तीवर पण मालकाची मुलगी म्ह्णून त्याने कधी उघड केले नव्हते. मानसी येते आणि विचारते गाईस आज चा काय प्लॅन आहे? आज काय करूया? तेवढयात शेवंता येते, काकू काल मी काही माणसे सांगितली होती मिल च्या सफाई साठी त्याचे काही झाले कीर्ती ने विचारले, तसे शेवंता चा चेहरा एकदम भीती ने पांढरा पडला. माफ करा, इकडे कोणी येत नाही मी विचारले पण कोणी नाही येणार म्हणाले आणि ताट घेऊन आत निघून जाते. तिच्या चमत्कारी वागण्याचे आश्चर्य वाटून अशी काय हि, मिल मध्ये काय भूत आहे काय? एवढे काय घाबरायचे मानसी म्हणाली. आणि खरचं भूत असेल तर ते तुला पाहून पळून जाईल निशी म्हणाला आणि सर्व हसू लागतात. मिल जुनी आहे आणि आजूबाजूला झाडी पण आहे सुरु करायच्या आधी तिला नीट साफ केली पाहिजे अंगद म्हणाला.एक काम करा, अंगद तू आणि शिव तुम्ही दोघे गावात जा आणि तिकडे कोणी भेटते का पहा. तो पर्यंत मी, निशी आणि मानसी आज आजूबाजूचं तरी साफ करून घेऊ आणि तुमचे झाले कि आम्हाला जॉईन करा ठीक आहे कीर्ती म्हणाली त्याला सर्वानी दुजोरा दिला.


   ठरल्याप्रमाणे शिव आणि अंगद दोघे पण मिल च्या सफाई साठी कोणी भेटत आहे का पाहायला गावात आले. गाव तसे मोठे होते पण सुखसुविधा हव्या तेवढ्या नव्हत्या, घरी काही मातीची होती तर काही फक्त विटांची मोठे घर असे कोणते नव्हते. थोडे पुढे गेल्यावर एका पारावर तरुण मुलाचा एक घोळका बसला होता. शिव त्याचा कडे गेला आणि त्याने विचारले. काम हवे आहे का? त्यातला एक जण म्हणाला कसले काम आहे? गावाबाहेर जी मिल आहे तिची सफाई करायची आहे त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधी मुले तिकडून निघाली. एका जाणाऱ्या मुलाला अंगद ने हटकले, काय रे पैसे देऊ ना चांगले, त्यावर तो मुलगा म्हणाला, साहेब पैसे घेऊन काय करणार जर जीव नाही राहिला तर त्याचे ते वाक्य दोघाना पण नाही समजले. म्हणजे ?शिव ने विचारले. म्हणजे त्या मिल मध्ये अवदसा आहे तुम्ही पण ती उघडण्याचा प्रयन्त करू नका नाही तर कोणी वाचणार नाही त्याचे वाक्य ऐकून ते दोघे एकमेकांकडे पाहत होते तो पर्यंत तो मुलगा तिकडून निघून गेला होता. त्या नंतर त्यांनी अजून ४-५ लोकांना विचारले पण कोणी तयार झाले नाही. तेवढयात त्याचा समोरून एक मळके कपडे घातलेला आणि स्वतःशी काही तरी बडबडणारा माणूस येत होता. सुरुवातीला वाटले तो भिकारी आहे म्हणून अंगद ने त्याला हटकले. ये अंगद ने आवाज दिला तसे त्या माणसाने मागे वळून पहिले हा तू अंगद म्हणाला. अंगद त्याचा जवळ गेला आणि त्याला विचारले पैसे हवे का? त्याने हसून मान डोलावली. माझ्या जवळ एक काम आहे करशील तर मी तुला पैसे देईन अंगद त्याला नोटा दाखवत म्हणाला. तो माणूस हसत म्हणाला काय काम आहे? गावाबाहेर जी मिल आहे, ना तिला साफ करायची आहे अंगद बोला तसे तो माणूस जोरात हसू लागला आणि म्हणाला साहेब ती मिल नाही मृत्यू आहे त्यात जो गेला तो परत नाही आला तुम्ही पण जाऊ नका नाही तर मराल तिकडे अवदसा आहे अवदसा कोणाला नाही सोडणार आणि हसत हसत तो तिकडून निघून गेला. जातांना शिव आणि अंगद त्याचा कडे आश्चर्याने पाहत होते.मला नाही वाटत आपली कोणी मदत करेल इकडे शिव निराश स्वरात म्हणाला त्याला अंगद ने दुजोरा दिला. खेडेगाव आहे ना त्या मुळे इकडे कोणाला बोलावता पण येत नाही चला परत फिरू आणि सांगू कीर्ती मॅडम ला अंगद म्हणाला आणि काही पावले चालले असतील तसे शिव जोरात ओरडला आयडिया त्याचा अश्या ओरडण्याने अंगद दचकला. शिव ने कोणाला तरी कॉल केला आणि बोलणे झाले आणि फोन ठेऊन अंगद झाले आपले काम खुशीत शिव म्हणाला. म्हणजे झाले काय? अंगद ने विचारले. अरे माझा एक मित्र आहे तो सफाई साठी माणसे पुरवतो मी त्याला बोलो तो उद्या आपल्या साठी २ माणसे पाठवतो आहे, खर्च होईल थोडा पण काम होईल आपले आहे कि नाही चांगली बातमी शिव ने हसत विचारले. हो यार, खरचं बरे झाले नाही तर कसे झाले असते आणि कीर्ती मॅडम ना नाही बोलावे लागले असते अंगद म्हणाला. अंगद मला सांग तुला कीर्ती आवडते ना? खरे सांग शिव ने विचारले तसे अंगद लाजला आणि गालात हसून म्हणाला असे काही नाही. शिव काय समजायचे होते ते समजला, एक सल्ला देऊ विचारून टाक कदाचित तिचा होकार असेल शिव म्हणाला तसे लाजून अंगद म्हणाला, अरे कुठे काय कुठे ते गुलाब आणि कुठे मी धोतरच फुल माझी लायलकी नाही रे तिच्या पर्यंत जायची आणि बॉस ला समजले तर नोकरी पण गेली आणि छोकरी पण गेली त्या पेक्षा जे चालूं आहे ते बरे आहे बोलत बोलत ते मिल जवळ आले.


तिकडे कारभार पूर्ण थंड होता शेवंता ने आणलेलं सरबत पीत सर्व बसले होते. काम अजून निम्मे पण झाले नव्हते. काय रे काय झाले? मानसी ने विचारले.काही नाही आपले काम झाले आहे शिव म्हणाला. पण तुम्ही अजून मिल पण नाही उघडली अंगद ने आश्चर्याने विचारले. नाही रे इकडे काम करताना अर्धे झालो निशी म्हणाला. ठीक आहे, उद्या २ माणसे येतील कामाला त्यांना थोडे जास्त पैसे लागतील पण काम व्यवस्तीत करणार शिव म्हणाला. कोण रे गावातले आहेत का? कीर्ती ने विचारले. नाही, मुंबई वरून येणार आहे शिव चा मित्र आहे त्याचे कामगार आहेत अंगद म्हणाला. हुश्श, सुटलो बुआ एकदाचे बोलून मानसी तिकडे बसते. का रे गावातले कोणी नाही येत आहेत का? निशी ने विचारले. नाही आणि तिकडे जे झाले ते सर्व शिव ने त्यांना सांगिले. अवदसा आहेच का? असे काही नसते कधी समजणार या लोकांना काय माहित? मानसी म्हणाली. तेवढयात शिव म्हणाला चला मिल पण उद्या ओपन करू आता जेऊन थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी नदीवर जाऊ आणि तिकडे जर कोणाला मनातले काही सांगायचे असेल तर त्याने सांगा बरं का ? शिव म्हणाला आणि त्याने कीर्ती आणि अंगद कडे नजर टाकली तसे कीर्ती पळत बंगलो कडे गेली. त्याचे बोलणे ऐकून शेवन्ता मनात म्हणाली देवा याना मिल न उघडणायची सुबुद्धी दे आणि ती पण बंगलो कडे जाते.


   सकाळी दारावरची बेल वाजते तशी शेवंता काकू दरवाजा उघडतात, समोर २ माणसे उभी असतात त्यांचा हातात सामान असते. कोण पाहिजे? शेवंता काकू विचारतात. शिव सर यांनी बोलावले होते सफाई साठी एक जण हातातले सामान खाली ठेवत बोलतो. शेवंता त्यांना आत घेते आणि बसायला सांगून शिव ला उठवायला त्याचा रूम कडे जाते. दारावरची टकटक ऐकून शिव जागा होतो आणि जांभळी देत तो दरवाजा उडतो. शिव साहेब ते २ माणसे आले आहेत तुम्हाला भेटायचे आहे बोलत आहे शेवंता निरोप देते तसे शिव ची झोप उडते आणि तो म्हणतो काकू त्याच्या चहा आणि नास्ता चे पहा मी येतो यावरून बोलून शिव दार लावून घेतो. साधारण ३० मिन मध्ये शिव खाली येतो तर ते अंगद सोबत बोलत असतात. शिव आणि अंगद त्यांना कामाचे स्वरूप सांगतात आणि त्यांना मिल कडे घेऊन जातात. गेट जवळ पोचल्यावर शिव सांगतो हि काही झाडी आहे ती साफ करून घ्या आणि पुढे जातात मिल च्या दरवाजावर एक कुलूप असते त्यावर अनेक गंडे दोरे बांधलेले असता, ते शिव तोडतो आणि म्हणतो हे गावकरी पण ना असली अंधश्रद्धा पळून बसतात काय माहित? बोलून शिव टाळे उघडतो तसे आतून गरम हवा आणि एक घाण दर्प येतो. बहुतेक जास्त वर्ष बंद असल्या मुळे असेल शिव मनात विचार करतो आणि आत जातो. मिल जास्त मोठी नव्हती पण एका दिवसात काम पूर्ण होईल असे पण नव्हते कमीत कमी त्या दोघांना ५ दिवस तरी लागले असते. शिव, अंगद आणि ते दोघे मिल पाहत हो ते. हे बघा इकडे मॅनेजर केबिन आहे तिकडे तुमची राहायची सोय होईल बाथरूम आहे बाजूला नदी पण आहे त्या मुळे अंघोळीची सोय पण झाली आणि जेवण आणि ब्रेकफास्ट बंगलो मधून मिळेल.लाईट ची सोय आहे दिवा मी आणून देतो. सर्व सूचना देताना शिव ला जाणवत होते कि तो एकटा नाही आहे त्याचा सोबत अजून कोणी तरी आहे जे दिसत नाही आहे. शिव ने त्यांना काम समजावले तसे ते बाहेर गेले आणि बाहेरचे काम करू लागले. इकडे तो आणि अंगद मिल मध्ये फेरफटका मारू लागले.अंगद मशीन खुप जुन्या आहेत आणि ४-५ मशीन यातून किती माल निघणार, बॉस ला पण का सुरु करायचे आहे काय माहित? शिव म्हणाला. एवढा मोठा कारखाना आहे करोडो चे उत्पन्न आहे मग या छोट्या मिल मध्ये आहे काय? जे त्यांना सुरु करायची आहे? अंगद सोबत बोलत असताना शिवला कोणी तरी मागे असल्याचा भास होतो तो झटकन मागे वळून पाहतो तर मागे कोणी नसते. अंगद तुला पण जाणवले का कि आपल्या दोघांशिवा अजून कोणी आहे इकडे म्हणून शिव ने अंगद ला विचारले. त्यावर अंगद ने मानेने नकार दिला. ते दोघे परत बंगलो मध्ये आले.


ब्रेकफास्ट करून सर्व मिल वर येतात. वाह्ह काय मिल आहे म्हणजे मोठी नाही पण छान आहे कीर्ती मिल पाहून म्हणते.अरे पण कीर्ती मिल खुप जुनी आहे मशीन पण जुन्या आहेत चालू होऊन १ महिना फक्त सुरु असतील अश्या आहेत आणि बॉस ला स्वतः चा एवढा मोठा कारभार असताना हि मिल का सुरु करायची आहे शिव ने विचारले. मानसी ने शिव ला दुजोरा दिला आणि म्हणाली या मिल मध्ये आहे काय एवढे जे बॉस ला सुरु करायचे आहे? गाईज हि मिल सुरु करायचे कारण म्हणजे लोकांना काम मिळेल इकडे हि मिल सुरु झाली आणि बंद झाली पण आता मी व्यवसाय करणार त्या आधी काही अनुभव असावा म्हणून बहुतेक बाबानी मला हि मिल सुरु करायला सांगिले असेल कारण छोटी मिल हाताळून मी मोठा व्यवसाय सांभाळू शकेन आणि इकडे जे लोक आहेत त्यांना पण हाताला काम आणि पैसे मिळतील. वाह्ह काय छान विचार आहेत अंगद च्या सासऱ्याचे निशी बोलतो आणि ते ऐकून अंगद त्याला मारायला धावतो. पळता पळता तो एका दरवाजा समोर थांबतो. दरवाजा बंद होता आणि त्याचे कुलूप पण गंजलेले दिसत होते. इतक्यात अंगद त्याचा मागे पळत असतो तो त्याला असा थांबलेला पाहून तो पण थांबतो. काय रे काय झाले, असे काय बघतो दरवाजा कडे अंगदने आपल्या श्वासावर नियंत्रण आणत निशी ला विचारले. अरे हि खोली मिलचा मागे आहे आणि दरवजा पण बंद आहे आणि टाळा पण गंजला आहे का आहे यात निशी ने शिव ला आवाज दिला तसे सर्व धावत आवाजाच्या दिशने आले. शिव या टाळायची चावी आहे का बघ जरा? निशी ने शिव आणि दरवाजा कडे पाहत म्हणाला. थांब बघतो म्ह्णून त्याने खिश्यातुन एक चावी चा जुडगा बाहेर काढला आणि त्यातली प्रत्येक चावी ते लावून पाहू लागले. पण कोणती चावी लागत नव्हती म्हणून मग कीर्ती ने टाळा तोडायला एक दगड घेऊन आली गाईज बाजूला व्हा, आणि तिने तो दगड टाळयावर मारला तसे टाळा तुटला आणि मानसी म्हणाली, वाह्ह शोभतेस बरं का अंगद ला तो पहेलवान आणि तू त्याची पहेलवान तसे कीर्तीने लाजून खाली पहिले. शिव ने दरवाजा ढकलण्याचा प्रयन्त केला पण जाम झाला होता तेव्हा अंगद ने दारावर जोरात लाथ मारून दार उघडले. वाह्ह काय जोडी है, एक टाळा तोडते तर दुसरा दरवजा भगवान ये जोडी हमेशा सलामत रहे निशी च्या या वाक्यावर सर्व दिल खुलासा हसतात. 


  दरवाजा उघडला तसे आतून तशीच गरम हवा आणि तसाच कुजका वास बाहेर येतो. आत मध्ये गुप्प अंधार असतो समोरच काही दिसत नसते.सर्व आपले मोबाईल मधील लाईट सुरु करतात तर तिकडे कोणता तरी विधी झाल्या प्रमाणे काही जळकी लाकडे पडलेली असतात आणि बरच सामान तसेच पडलेले होते. असा वाटत होते कि इकडे कोणी तरी होम केला आहे आणि सर्व सामुग्री इकडे टाकून ते दार बंद केले आहे मानसी म्हणाली. पण कशाला कोणी असे करेल म्हणजे होम केला तरी असे दार नंतर बंद का करेल?निशी म्हणाला. गाईज आपल्याला काय करायचे आहे वस्तू करून बंद केला असेल रूम शिव एक काम कर ते जे काम करत आहेत ना त्यांना मॅनेजर केबिन पेक्षा इकडे झोपायला सांग म्हणजे त्याची गैरसोय होणार नाही आणि तसे पण दिवे अंगद घेऊन येईल गावातून ते घेऊन येईल. सर्व बाहेर आले आणि शिव ने त्या दोघांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि तो पण बाहेर आला आणि म्हणाला चला गावात फेर फटका मारून येऊ, तसा पण मिल सुरु झाली कि आपल्यला गावात जावे लागेल मिल सुरु झाली हे सांगायला. एकदा का काम सुरु झाले कि मग मात्र वेळ कसा जाईल काही सांगू शकत नाही निशी म्हणाला. आता दुपार झाली आहे आपण जेऊन निघू अंगद ने सुचवले आणि सर्वानी ते मान्य केले.

   

गावात फिरत असताना एक लहान मुलगा त्याचा जवळ आला आणि त्याने सांगितलं कि सरपंचानी तुम्हाला बोलावले आहे. आम्हाला आणि का?कीर्ती ने विचारले. ते काय माहित नाही पण मला म्हणाले ते पावणे दिसले तर माझ्या घरी घेऊन ये. चल तर पाहून बघू कशाला बोलावले आहे शिव म्हणाला आणि त्या मुलाच्या मागे ते चालू लागले. थोडे अंतर गेल्यानंतर तिकडे एक मोठे दुमजली घर होते. प्रशस्त असे आणि तिकडे बरीच माणसे बसून बोलत होती. कीर्ती आणि सर्व त्या मुलाच्या मागोमाग त्या घरात गेले. सरपंच ते मुंबई चे पाहुणे बोलून मुलगा पळून गेला. या बसा, एक भारदस्त आवाज आला, समोरचे सरपंच पण भारदस्त होते, सफेद केस, वय साधारण ६०-६५ च्या आसपास असेल, सफेद शर्ट आणि सफेद विजार, चेहरा अगदी गंभीर आणि त्यावर पिळदार मिश्या या वयात पण करसातीची आवड दिसत होती त्याचा घरात त्याचे अनेक फोटो होते ज्या मध्ये ते लंगोट आणि हातात गदा घेऊन होते म्हणजे ते तरुण पणी पहिलवान असावे असा सर्वानी अंदाज बांधला. मंडळी आपण उद्या बोलू आता मला जरा पाहुण्या सोबत एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे सरपंच बोले तसे तिकडे असलेले सर्व हळू हळू निघून गेले. नाव काय आपले सरपंच ने विचारले. मी कीर्ती आणि बाकी सर्वानी आपली ओळख करून दिली. अंगद कडे पाहून सरपंच म्हणाले वाह्ह पोरा शरीर तर भारी कमावले आहे. मी माझी ओळख करून देतो मी विलासराव सांगळे या गावचा सरपंच आणि तुम्हाला इकडे बोलावले आहे कारण तुम्ही जे ती मिल सुरु करायचा विचार करत आहात तो आधी मनातून काढून टाका कारण ती जागा चांगली नाही आहे तिकडे भयानक अवदसा आहे एकदा आम्ही तिला पहिले आहे आणि तिला बंद केले आहे आता परत तिला मोकळे करू नका सरपंच म्हणाले.पण आम्ही तर इकडे लोकांना काम भेटेल या हिशोबाने ती मिल सुरु करतोय कीर्ती म्हणाली. हे बघ मुली काही गोष्टी ह्या पैस्या पेक्षा मोठ्या नसतात त्या मुळे बंद करा. त्यावर वाद नको म्हणून अंगद ने ठीक आहे बोलून तिकडून सर्वानी काढता पाय घेतला. परमेश्वर याना ती बंद ठेवायची सुबुद्धी दे मनात सरपंच म्हणाले. अंगद का तू बोलू दिला नाही, इकडे मी गावचे भले कसे होईल लोकांना काम कसे भेटेल याचा विचार करते आहे आणि हे मला ती अवदसा आणि तिची गोष्ट सांगत आहे मी त्यांना गप्प केले असते पण बोल तू दिला नाहीस कीर्ती रागात म्हणाली. हे बघ पाहिले म्हणजे हे वेळ वाद घालायची नाही आणि दुसरे म्हणजे ते या गावचे सरपंच आहे त्या मुळे उद्या जर त्यांनी ठरवले तर ते आपल्याला गावात येऊ देणार नाही अंगद म्हणाला. का नाही येऊ देणार गाव चे काय राजा आहे तो? मानसी म्हणाली. हे बघ मानसी अंगद ने जे केले आणि जे बोलतो आहे ते एकदम बरोबर आहे कारण सरपंच हा गावचा राजा असतो आणि गाव त्याचा पुढे काही बोलणार नाही उलट तो जे सांगेल ते ऐकेल आणि पूर्ण गावासमोर आपण काही करू शकणार नाही त्या मुळे त्याने जे केले ते बरोबर आहे शिव म्हणाला. हा आणि एकदा का मिल सुरु झाली कि मग आपण त्यांना सांगू त्याची अवदसा आणि सर्व खोटे होते निशी म्हणाला तशी कीर्ती शांत झाली आणि अंगद ला सॉरी बोली. यार मला ना एक काम आठवले आहे तुम्ही एक काम करा अंगद आणि कीर्ती तुम्ही पुढे जा आम्ही जरा गावातून ते लाईट चे पाहून येतो निशी ने बाकीच्यांना डोळा मारत म्हणाला तसे बाकी दोघांनी पण निशी ला साथ देत त्याचा हो ला हो केले. आणि अंगद आणि कीर्ती दोघे गप्पा मारत माघारी आले.


        दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे अंगद जॉगिंग करून येत होता तेव्हा त्याची नजर मिल च्या उघड्या गेट कडे गेली. त्याने विचार केला कामगार उठले असतील आणि बाकी राहिलेले काम करायला सुरुवात केली असेल, काल दोघांनी मिळून बाहेरच सर्व आवरून घेतले होते. त्याने आत डोकावून पाहायचे ठरवले, तो आत गेला तर आत मध्ये अंधार होता अजून पूर्ण उजाडले नव्हते. आत मध्ये जाऊन त्याने आवाज दिला पण काहीच उत्तर मिळाले नाही. त्याने मिल च्या मागे जायचे ठरवले. आवाज देत तो मिल च्या मागे जी त्यांना राहायला जागा करून दिली होती तिकडे पोहचला दरवाजा पुढे ढकलून पहिले तर दरवाजा उघडा होता. त्याने मोबाईल मधील लाईट लावली समोर जे त्याने पहिले त्याने त्याचा अंगावर काटा आला. समोर त्या दोघांचे प्रेत पडले होते , जमिनीवर रक्त होते ते पाहून त्याचे रक्त गोठले आणि तिकडे त्याला असे जाणवले कि कोणी तरी त्याच्या मागे अंधारात उभे राहून त्याचा कडे पाहत आहे तो तसाच स्वतः ला सावरत बंगलो च्या दिशेने पळाला आणि सर्वाना उठवून त्या दोन कामगाराचा खून झाला आहे ते सांगितले. त्याचा ह्या बोलण्यावर सर्वांची झोप उडाली. काय? काय बोलतोस ते समजत आहे ना तुला, हे बघ हि वेळ मस्करी करायची नाही शिव थोडा चिडून अंगद ला म्हणाला. अरे मी मस्करी नाही करत आहे तुम्हाला खरे वाटत नसेल तर चला माझ्या सोबत आणि पहा आपल्या डोळ्यांनी अंगद बोलतो आणि सर्व त्याचा सोबत बाहेर पडतात तेवढयात शेवंता येते आणि ते ती पण सोबत जाते. या माझ्या सोबत बोलून शिव मिल मध्ये प्रवेश करतो आणि लाईट लावतो,समोरची प्रेत पाहून मानसी उलटी करते. गाईज आपल्यला पोलिसाना कळवावे लागेल निशी म्हणतो. बरोबर आहे,पण हा खून कोणी आणि का केला यांची आणि आपली ओळख तर कालची आहे ते पण कामासाठी झाली होती. मग याना असे कोणी मारले असेल? कीर्ती च्या ह्या प्रश्नावर कोणाकडे उत्तर नव्हते.निशी पोलीस याना फोन करतो. साधारण अर्धातास मध्ये पोलीस आणि गावचे सरपंच घटना स्थळी दाखल होतात. घटना स्थळ आणि प्रेत यांची पाहणी करताना त्यांचा हे लक्षात येते कि दोन्ही प्रेतामधून हृदय गायब आहे. नमस्कार मी इन्स्पेक्टर राजे मला सांगा तुमचा पैकी पहिले प्रेत कोणी पहिले. अंगद पुढे येऊन सर्व सांगतो. बरं आणि हि मिल कोणाच्या मालकीची आहे त्यावर कीर्ती पुढे येते आणि सांगते आमच्या म्हणजे कीर्ती इंडस्ट्रीएस चे मालक गोरखनाथ यांची आहे. आणि तुम्ही कोण? राजे पुन्हा विचारतात. मी त्याची मुलगी कीर्ती.ह्या प्रेत आणि तुमचा काय संबंध ? राजे विचारात. त्यावर शिव सांगतो मिल ची सफाई साठी मी माझ्या मित्राच्या कंपनी मधून २ माणसे मागवली होती ते हेच आहेत. तुमच्या मित्राचे नाव, नंबर आणि पत्ता द्या राजे म्हणले.साहेब तरी मी याना बोलो होतो कि इकडे मिल सुरु करू नका पण यांनी माझे ऐकले नाही सरपंच म्हणाले. सरपंच तुम्ही शांत राहा आणि आम्हाला आमचे काम करू द्या राजे म्हणाले. दोन्ही प्रेत मधून हृदय गायब आहे राजे सर्वांकडे पाहत म्हणाले. रात्री तुम्ही सर्व कुठे होता? राजे विचारतात. आम्ही सर्व बंगलो मध्ये होतो जेऊन मग थोड्या गप्पा आणि मग ड्रिंक्स झाले मग आम्ही आपल्या खोलीत जाऊन झोपलो आणि आम्ही का मारू त्यांना आम्ही तर त्यांना नीट ओळखत पण नाही मानसी म्हणाली. मानसी मॅडम ते ओळख आणि बाकी सर्व नंतर पाहू आपण सध्या कारवाही पूर्ण होई पर्यंत तुमच्या पैकी कोणी हे गाव सोडून जात काम नये. शिंदे बॉडी पोस्ट मॉर्टेम ला घ्या आणि पंचनामा करून जागा सील करून टाका आदेश देऊन राजे निघाले. कीर्ती ने तिच्या वडिलांना म्हणजे गोरखनाथ ला कॉल केला. हॅलो, बाबा इकडे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि तिने सर्व हकीगत त्यांना सांगितली. त्यावर गोरखनाथ म्हणाले बेटा तू काळजी करू नकोस मी तुला तिकडून निघणायची व्यवस्था करतो नाव काय इन्स्पेक्टर चे राजे, ठीक आहे बघतो मी तू काळजी करू नको. इकडे गोरखनाथ ने कॉल ठेवला आणि तिकडे लगेच वरिष्ठ पोलीस अधिकारी ला कॉल केला. हॅलो मी गोरखनाथ बोलतो आहे कीर्ती इंडस्ट्रीएस मधून, हा सर बोला तुम्हाला कोण नाही ओळखत, आज आमची आठवण कशी आली, पलीकडून आवाज आला.हे पहा सावंत शिरोळे मध्ये माझी एक जागा आहे तिकडे एक जुनी मिल आहे तिथे एक खून झाला आहे आणि माझे काही कर्मचारी आणि माझी मुलगी तिकडे अडकले आहेत तिकडे कोणी राजे म्हणून आहेत त्यांनी त्याना ते गाव तपास सुरु असे पर्यंत सोडून जाऊ शकत नाही असे सांगितले आहे. तुम्ही काही तरी करा आणि त्यांना समजावा कोणी इन्स्पेक्टर राजे म्ह्णून आहे गोरखनाथ बोले तसा पलीकडून आवाज आला, साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका मी बघतो काही होते का? आणि कॉल कट होतो. हॅलो इन्स्पेक्टर राजे बोलतो आहे, हॅलो राजे मी सावंत बोलतो आहे, सर राजे कडक आवाजात बोलतो. राजे तिकडे एक खून झाला आहे त्या खूणा मध्ये कीर्ती इंडस्ट्रीएस चे काही कर्मचारी आणि त्याची मुलगी तिकडे आहेत. हो साहेब राजे ने सावंत याना उत्तर दिले. ती केस काय आहे? सावंत ने विचारले तसे संपूर्ण केस राजे यांनी समजून सांगितली. हे पहा राजे तिच्या वडिलांचा मला कॉल आला होता तिला जाऊ द्या म्ह्णून पण कायद्या ला कोणी मोठे नाही तुम्ही तुमचा तपास पूर्ण होई पर्यंत त्यांना जाऊ देऊ नका आणि दोषी असतील तर शासन करा आणि त्यात जर तुमच्यावर कोणी दबाव आणला तर मला कॉल करायला सांगा ठीक आहे सावंत म्हणाले तसे राजे थँक यू म्हणून कॉल ठेऊन दिला. इकडे कीर्ती ला कॉल करू गोरखनाथ ने आपण पोलीस यांचा शी बोलून तुला सोडायला सांगितले आहे असे सांगितले. त्यावर कीर्ती म्हणाली, नको बाबा आता पूर्ण तपास लागल्या शिवाय मी जाणार नाही कारण मला वाटत आहे हे काम गावातल्या कोणी तरी केले आहे तसे पण इकडे मिल सुरु करू देत नव्हते. आणि याचा तपास लागे पर्यंत मी कुठे जाणार नाही. तिचे कॉल वरचे बोलणे ऐकून शेवंता ने तिला किचन मध्ये बोलावले. काय झाले काकू आता तू का किचन मध्ये बोलवले आहे थोडे वैतागून कीर्ती म्हणाली. ताई साब हे पहिले प्रकरण नाही या आधी असे १० माणसे मारली गेली आहेत पण कोणी काही करू शकले नाही, सर्वाना माहित आहे हे काम त्या अवदसेचे आहे.त्या मुळे तुम्ही कोणी पण तिकडे परत फिरकू नका. कीर्ती फक्त तिच्याकडे पाहत होती आणि मनात विचार करत होती हे अवदसा आहे तरी कोण आणि ती ह्या सर्व हत्या का करते आहे? 


   त्या रात्री खबरदारी म्हणून सर्वानी दारे खिडक्या लावून घेतल्या होत्या, सर्वजण आपल्या रूम मध्ये शांत पाने झोपले होते. साधारण रात्री एक च्या सुमारास कसल्या तरी विचित्र आवाजानं शिव ची झोप मोड होते. शिव उठून बाथरूम ला जाऊन येतो तर त्याला पुन्हा तोच आवाज येतो तो आवाज कोणी तरी गेट वाजवत आहे असा होता म्ह्णून शिव खिडकीतून बाहेर पाहतो, मिल च्या गेट जवळ कोणी तरी उभे आहे असे शिव ला जाणवते पण अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नाही. तो शेजारी झोपलेल्या निशी ला हलवतो आणि त्याला उठवतो. निशी, ये निशी बाहेर बघ ना मिल जवळ कोणी तरी आहे गेट वाजवत आहे निशी अरे उठ ना. काय रे शिव काय झाले कशाला उठवतो आहे झोपू दे ना निशी झोपेत बोलतो. अरे तिकडे गेट जवळ कोणी तरी आहे मला वाटत आहे खूनी किंवा कोणी चोर असेल बघ ना जरा शिव म्हणाला तसे निशी नाईलाजाने उठला आणि खिडकीतून बाहेर पहिले तर बाहेर कोणी नव्हते. काय शिव काय फालतूपणा आहे ? कोणी नाही आहे तिकडे झोप मोड केली माझी आता परत उठवू नकोस समजले ना नाही तर मी जीव घेईन तुझा झोप आता चिडून निशी बोला आणि झोपला. शिव ने पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पहिले पण बाहेर कोणी नव्हते मग तो पण झोपला.


    दुसऱ्या दिवशी सकाळी इन्स्पेक्टर राजे आणि एक लेडी हवालदार ला घेऊन बंगलो वर जातात, तिकडे सर्व नास्ता करत असतात. या साहेब समजले का खूनी कोण आणि कशा साठी खून झाला ते? निशी ने विचारले. त्यावर मानेने नकार देत राजे म्हणाले, खून कधी आणि कसा झाला हे समजले आहे आणि खूनी पण सापडेल लवकरच पण आता मी इकडे आलो आहे ते पोस्ट मॉर्टम रिपोर्ट घेऊन त्यात असे आहे कि खून हा एक ते अडीज या दरम्यान झाला आहे आणि त्याचा खून नख असलेल्या हत्याराने झाला आहे, भीती ने त्याचे डोळे सफेद झाले होते आणि त्यांचे हृदय गायब केले गेले होते. मला शंका आहे कि हा खून कोणी एकटा नाही तर गॅंग ने केला असेल. तुमचे मोबाईल लोकेशन रूम चे दाखवत असले तरी पण तुम्ही रूम मध्ये होतात याची मला खात्री नाही आहे.सध्या तरी तुमच्या बद्दल माझा कडे कोणता पुरावा नाही त्या मुळे खूनी सापडे पर्यंत तुम्ही संशयित आहात. या बंगलो च्या बाहेर जाण्याचा प्रयन्त करू नका कदाचित तुमच्या जीवाला पण धोका असू शकतो. रात्री दार खिडकी नीट लावा आणि झोपा आणि कोणासाठी रात्री दरवाजा उघडू नका येतो मी बोलून राजे निघाले.


  शिट्ट यार काय करायला आलो आणि काय होऊन बसले निशी रागात टेबल वर मूठ आपटत म्हणाला. निशी शांत हो आपल्या जीवाला पण धोका आहे त्या मुळे आपण पण आपली काळजी घेतली पाहिजे मानसी म्हणाली. तो पूर्ण दिवस त्यांनी बंगलो मध्ये घालवला आणि रात्री थोडी ड्रिंक घेऊन ते झोपायला गेले.कालच्या रात्री सारखा आज पण गेट च्या आवाजाने शिव ला जाग येते तो घड्याळ पाहतो तर रात्रीचे ठीक एक वाजला होता. शिव हळूच खिडकीतून पाहतो तर कोणी तरी गेट जवळ उभे राहून त्यांच्या बंगलो कडे पाहत होते असे त्याला वाटत असते म्हणून तो निशी ला उठवणायचा प्रयन्त करतो, निशी ये निशी उठ ना ते बघ आज पण कोणी तरी आहे तिकडे निशी पण निशी उठत नाही नशेचा अमल आणि झोप त्या मुळे निशी उठत नाही. निशी अरे उठ ना तिकडे कोणी तरी आहे बघ तरी पण निशी हालत पण नाही शिव ला समजते कि दारू चा अमल आहे त्या मुळे तो उठू शकत नाही. बहुतेक मला जाऊन पाहायला हवे जर कोणी चोर असेल तर उद्या राजे ना सांगून तिकडे काही पोलीस बोलावून त्यांना अटक करता येईल शिव मनात विचार करतो आणि टॉर्च घेऊन निघतो. हॉल चा दरवाजा उघडतो तसे बाहेर रातकिड्या चा आवाज आणि त्यात कुत्रे भुंकत असतात. शिव बाहेर पडून बाहेरून दाराला कडी घालतो. थंडी आणि धुके या मध्ये शिव टॉर्च घेऊन त्या आकृतीच्या दिशने पुढे सरकत असतो. हळू हळू ती आकृती आत मध्ये जाते तसे शिव तिचा मागे आत जातो त्याला जवळ येताना पाहून ती आकृती पळू लागते तसे शिव तिच्या मागे कोण आहे थांब अरे थांब म्हणतो ना म्ह्णून पळू लागतो. ती आकृती त्या खोलीकडे जाते जिकडे आधी दोन खून झाले होते. आकृती खोलीत जाते आणि शिव तिच्या मागे त्या खोलीत जातो आणि एक आर्त किंकाळी गगन भेदून टाकते नंतर सर्वत्र पुन्हा शांतता पसरते.


   सकाळी निशी ला जाग येते ते अंगद च्या उठवण्याने निशी, निशी उठ निशी अंगद आवाज देतो. तसे निशी झोपेतून खडबडून जागा होतो. निशी शिव कुठे आहे? अंगद विचारतो. शिव हा काय शेजारी म्हणून तो बाजूला पाहतो तर तिकडे शिव नसतो. बाथरूम मध्ये असेल निशी जाम्भळी देत म्हणतो. नाही, बाथरूम मध्ये पण नाही हॉल किचन कुठे नाही आहे आणि बाहेरून कडी आहे मेन दरवाजाला त्या मुळे तो आत नाही आहे अंगद म्हणाला. गेला असले येईल परत तू नको काळजी करू बोलून निशी बाथरूम मध्ये जातो आणि अंगद खाली जातो. तसे बाहेरून कडी खोलण्याचा आवाज येतो आणि अंगद दरवाजा जवळ येतो तर दारात शेवन्ता काकू असतात. काय झाले असे बाहेरून कडी का लावली आहे? काकू ने विचारले. माहित नाही, शिव आत नाही तो बाहेर गेला त्याने लावली असेल अंगद म्हणाला. एवढया सकाळी गेले कुठे? शेवंता काकू म्हणतात आणि तेवढद्यात मानसी आणि कीर्ती खाली येतात. काय झाले अंगद? कीर्ती ने विचारले. अगं शिव नाही आहे रूम मध्ये म्हणजे इकडे कुठे नाही आहे आणि बाहेरून कडी लावली होती ते काकू ने उघडली. तेवढयात निशी आला आणि म्हणाला असेल इकडे कुठे तरी कसला काळजी करत आहात. नाही असे नाही एकतर इकडे खून होत आहे आणि हा असा ना सांगता कसा गेला त्याला कॉल कर मानसी म्हणाली. काही उपयोग नाही मोबाईल रूम मध्ये आहे निशी म्हणाला. मग हा गेला कुठे? अंगद म्हणाला. एक काम करू आपण आसपास पाहू कुठे आहे का? कीर्ती म्हणाली तसे सर्व तयार झाले. बाहेर पडले तसे त्यांना गेट उघडा दिसला तो बंद करायला निशी पुढे गेला आणि त्याने बाकी सर्वाना आवाज दिला गाईज इकडे या तसे सर्व पळत तिकडे गेले. निशी ने बोटाने त्यांना मिल चा दरवाजा उघडा आहे ते दाखवले तसे सर्व आत पळाले. शिव ला आवाज देत ते आत मध्ये जातात. एक काम करा कीर्ती तू आणि निशी पुढे पहा मी आणि मानसी आम्ही मागे बघतो म्ह्णून अंगद आणि मानसी शिव ला आवाज देत मागे जातात. जो दरवाजा पोलीस यांनी बंद केला होता तो उघडा पाहून मानसी आत जाते. आत मध्ये अंधार असतो आणि पुढे सरकत असताना ती कसला तरी अडकून पडते तिच्या हाताला काही तरी ओले आणि चिकट लागते म्हणून ती मोबाईल टॉर्च मध्ये पाहते तर ते लाल रक्त असते ती घाबरून मोबाईल खाली टाकते तर त्या प्रकाशात तिला शिव चे प्रेत दिसते जे तिला पाहत असते.मानसी जोरात किंचाळते ते ऐकून बाकी सर्व धावत तिकडे येतात पाहतात तर मानसी बेशुद्ध पडली होती तिच्या कपड्यावर रक्त होते आणि शिव चे प्रेत तिकडे बाजूला पडले होते. खून त्याच प्रकारे झाला होता जसा पहिले झाले होते.अंगद राजे ना कॉल करतो आणि ते ताबडतोब घटनास्तळी दाखल होतात.


 पंचनामा सुरु होतो आणि राजे याचे प्रश्न पण, प्रेत पहिले कोणी पहिले? आणि मानसी च्या कपड्यावर रक्त आले कुठून? त्यावर अंगद आणि निशी जे काही घडले होते ते सांगतात. तीन दिवसात तीन खून आणि तिघांची पण हृदय गायब संशय पूर्ण पणे त्या चौघांवर जातो कारण त्याचा शिवाय तिकडे कोणी नव्हते शेवंता ची पण चैकशी केली जाते पण तिचा कडून खून होईल असे वाटत नव्हते. हे खून झाले आणि याचे हृदय काढून नेले आहे म्हणजे हे सर्व खून पैसा या साठी झाले नाहीत तर यांचे उद्दिष्ट काही तरी वेगळे पण असू शकते म्हणजे जी मिल आणि तिची जागा पण मग एवढे वर्ष मिल बंद होती जर कोणाला हवी असती तर त्याने पहिलेच त्या मिल चा ताबा मिळवला असता पण तसे पण काही नव्हते. शेवंता च्या बोलण्या प्रमाणे हे सर्व अवदसेचे काम तर नसेल कारण इकडे या सर्व आणि मारणारे याशिवाय कोणाच्या बोटाचे ठसे पण नव्हते. पण खून करायचा उद्देश तरी काय? राजे यांच्या डोक्यात विचार सुरु होते.


    बंगलो मध्ये सर्व काळजी मध्ये बसलेले असतात मानसी आणि कीर्ती ने रडून डोळे सुजलेले असतात. तेवढयात राजे येतात, मला सांगा तुम्ही मुलं एकत्र झोपला होतात. त्यावर निशी म्हणाला नाही साहेब मी आणि शिव एकत्र होतो आणि अंगद एकटा एका रूम मध्ये होता. काल रात्री काय झाले होते का? म्हणजे काही विचित्र असे राजे यांनी विचारले. काल च माहित नाही कारण मला ड्रिंक जास्त झाली होती आणि मी हॉल मध्ये झोपलो होतो मग मला कदाचित शिव ने बेडरूम मध्ये घेऊन गेला असेल, हा पण त्याचा आधल्या रात्री शिव ने मला एकच्या सुमारास उठवले होते आणि गेट जवळ कोणी आहे म्ह्णून बोलत होता पण मी पहिले तर तिकडे कोणी नव्हते निशी म्हणाला. याचा अर्थ शिव ने खूनी ला पहिले होते आणि काल पण तो खुनी आला होता आणि त्याला पुन्हा शिव ने पहिले होते. शिव ने त्याचा पाठलाग केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.ठीक आहे काही लागले तर कॉल करा आणि एकटे बाहेर पडू नका तसे मी २ पोलीस हवालदार पाठवून देईन पण तुम्ही तुमची काळजी घ्या बोलून राजे निघाले. तू आम्हाला का नाही सांगितले शिव ने जे तुला सांगितले ते मानसी ने रडत विचारले. मला पण नव्हते माहित कारण जेव्हा मी पहिले तेव्हा तिकडे कोणी नव्हते आणि मला वाटले दारू मुळे शिव ला तसे भास होत असतील म्हणून मी पण लक्ष नाही दिले. जे झाले ते झाले आपण आपला चांगला मित्र गमावला आहे, या पुढे कुठे एकटे जायचे नाही सर्व सोबत जाऊ निशी म्हणाला. बंगलो मध्ये बसून कंटाळा आला होता शिवाय शिव ची पण आठवण येत होती त्याचे ते प्रेत ते भीतीने उघडे डोळे सर्व डोळ्यासमोर येत होते. संध्याकाळी सर्व नदीवर गेले पण पहिल्या सारखी मस्ती न करता सर्व शांत बसून होते. हवालदार आले होते पण अचानक रात्री १० च्या सुमारास त्यांना भीती वाटू लागली. सारखी नजर त्या मिल कडे जात होती आणि गावात प्रसिद्ध असलेली अवदसेची कहाणी याने अजून त्यांना भीती वाटू लागली, त्यांनी घराची बेल वाजवली तसे अंगद ने दरवाजा उघडला. साहेब आम्हाला इकडे भीती वाटत आहे ती मिल चांगली नाही अशी गावात चर्चा आहे आणि म्हणून आम्हाला घरी जायचे आहे तर तुम्ही साहेबाना काही सांगू नका आम्ही सकाळी पुन्हा येऊ आणि हो बाहेर काही झाले तरी पडू नका. हवालदार म्हणाले आणि पळत तिकडून निघाले त्याचा कडे पाहत हसत अंगद ने दरवाजा बंद केला.


    शिव चा खून झाल्या मुळे निशी ला एकटे राहायला भीती वाटत होती म्हणून तो अंगद च्या रूम मध्ये गेला होता. त्या रात्री गर्मी होत असल्याने मानसी ने खिडकी थोडी उघडी ठेवली होती. साधारण एक वाजता पुन्हा जोरात गेट वाजत होता आणि त्याचा आवाज मानसीच्या कानावर पडला तशी ती ताडकन उठून बसली आणि ती घाबरत घाबरत खिडकी जवळ आली. तिला मिल च्या गेट जवळ कोणी तरी उभे दिसत होते. तिने हळूच बाजूला झोपलेल्या कीर्ती ला हलवले तसे कीर्ती दचकून जागी झाली. कीर्ती बाहेर गेट जवळ कोणी तरी आहे आणि ते आपल्या कडे पाहत आहे मानसी घाबरत म्हणाली. काय? कसे शक्य आहे खाली तर पोलीस आहेत ना? कीर्ती ने विचारले. ते काही माहित नाही पण कोणी तरी आहे काळे कपडे घातले आहे कि अंधार जास्त आहे म्हणून वाटत आहे काहीच समजत नाही पण आहे कोणी तरी एवढे नक्की मानसी घाबरत म्हणाली.थांब मी पाहते म्ह्णून कीर्ती ने हळूच डोकावून पहिले तर तिकडे कोणी तरी उभे होते. चल माझ्या सोबत कीर्ती म्हणाली आणि तिने बॅग उघडली पण कुठे आणि आपण दोघी जायचे मानसी घाबरत म्हणाली. तू काळजी करू नको माझ्यावर विश्वास ठेव आणि चल कीर्ती म्हणाली तिला कीर्ती ने तिच्याकडचे रिव्हॉल्वर दाखवले. खाली उतरली मानसी तिच्या मागे मागे येत होती. कीर्ती ने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर पहिले तर बाहेर दोन्ही पोलीस नव्हते. याचा अर्थ एक तर त्यांना गायब केले असेल किंवा त्यांचा पण खून झाला असेल. कीर्ती हळू हळू पुढे चालू लागली आणि तिच्या मागे मानसी दबकत दबकत चालत होती. त्या दोघी रात्रीच्या अंधारातून हळू हळू पुढे सरकत होत्या, कुत्रे भुंकत होते आणि गेट चा आवाज अजून येत होता. त्या पुढे आल्या तसे कोणी तरी आत पळताना दिसले. त्या दोघी पण हळू हळू आत गेल्या आणि त्यांनी टॉर्च सुरु केली. आत ,मध्ये गेल्यावर कोणाचा तरी हसण्याचा आवाज आला. आता मात्र दोघी घाबरल्या का का का कोण आहे? मानसी ने घाबरत विचारले. तसे अगदी तिचा कानाजवळ कोणी तरी भसाड्या आवाजात म्हंटले मी आहे. मानसी ने दचकून मागे पहिले तर तिकडे कोणी नव्हते. मानसी का का काय झाले? कीर्ती ने विचारले. मला इकडे काही ठीक नाही वाटत चल आपण जाऊ बोलून मानसी ने कीर्तीचा हात पकडला आणि ती पळू लागली तशी एका मजबूत हाताने त्या दोघीना धक्का दिला आणि आत ढकलले. त्या दोघी पण जोरात आपटल्या आता त्याचा भोवती कोणी तरी घिरट्या घालत होते. अंधारात पण दिसत होते ते त्याचे लाल डोळे जे त्यांचा रोखाने पाहत होते.मानसी ने त्यावर टॉर्च मारली तसे त्याचा चेहरा स्पस्ट दिसला. केस मोकळे सोडले होते, लाल चमकणारे डोळे, सडलेला चेहरा आणि तोंडातून हातभार लांब बाहेर आलेली लाल जीभ जणू आताच कोणाचे रक्त पिली असेल, हाताची बोटे लांब होती त्यावर लांब नखे आणि त्यातून रक्त गळत असले पाहिजे,दात पण लाल होते आणि तिच्या हातात काही तरी होते जे ती तोडून खात होती ते साधारण हृदय सारखे काही तरी दिसत होते. काळे कपडे आणि पाय पण उलटे होते आणि ते जमिनीच्या वर तरंगत होते. ते रूप पाहून दोघी पण जोरात ओरडल्या आणि कीर्ती ने ती तिच्यावर लागोपाठ ५ गोळ्या झाडल्या आता दोघी उठून पळू लागल्या तसे कशात तरी पाय अडकून मानसी पडली आणि तिने तिच्यावर झडप घातली आणि तिला फरफटत मिल च्या मागे घेऊन जाऊ लागली. ती ओरडत होती कीर्ती कडे मदत मागत होती पण कीर्ती भीती ने पूर्ण गोठून गेली होती तिला काय करावे ते समजत नव्हते.कीर्ती तिला तिकडे सोडून पळत बाहेर आली आणि तिला मानसीची शेवटी किंकाळी ऐकू आली. कीर्ती रडत आणि पळत हॉल मध्ये आली आणि बेशुद्ध पडते.


     सकाळी जेव्हा अंगद फिरायला जायला उठला तेव्हा त्याला कीर्ती दिसली आणि ती हॉल मध्ये बेशुद्ध अवस्थे मध्ये पडली होती. अंगद ने तिला उचलून सोफ्यावर झोपले आणि निशी ला आवाज दिला तसे निशी झोपतेतून खडबडून जागा झाला आणि खाली आला. काय रे काय झाले हिला? आणि हि अशी सोफ्यावर का झोपली आहे? निशी ने विचारले.माहित नाही पण झोपली नाही बेशुद्ध झाली आहे एक काम कर आतून पाणी घेऊन ये अंगद म्हणाला आणि निशी आत गेला आणि पाणी घेऊन आला. अंगद ने तिच्या चेहऱ्यावर पाणी मारले तसे तिला हळू हळू शुद्ध येऊ लागली. अंगद ने हळू हळू तिला आधार दिला आणि उठवले, तशी ती अंगद ला समोर पाहून त्याच गळ्यात पडून रडू लागली. निशी आणि अंगद दोघांना पण समजत नव्हते काय झाले आहे? अंगद ने तिला शांत केले आणि तिला विचारले काय झाले? तू इकडे कशी आणि मानसी कुठे आहे? तसे रडत रडत काल जे झाले आणि पहिले ते सर्व सांगितले. काय? अरे पण तू कशाला एकटी तिला घेऊन गेली शिट्ट यार आता मानसी पण वैतागलेल्या स्वरात अंगद बोला आणि त्याने आपली मूठ जोरात आपटली तशी कीर्ती अजून घाबरली आणि रडू लागली. निशी ने कीर्ती कडे पाहिले आणि अंगद ला म्हणाला अरे आता त्रागा करून काही उपयोग नाही जे झाले त्याचे दुःख मला पण आहे,माझे मानसी वर प्रेम होते जे मी तिला बोलू शकलो नाही आणि आता कधी सांगू शकणार नाही,मला माहित आहे जे झाले ते चांगले नाही पण आत ते बदलता येणार आहे का? आणि तिने प्रयन्त केला होता तिला वाचवण्याचा पण नाही जमलं कदाचित देवाच्या मनात नसेल बोलून निशी पण रडू लागला.अंगद ने दोघांना पण शांत केले आणि राजे याना कॉल करून बोलावले. राजे यांनी येऊन ती बॉडी हस्तगत केली हत्या त्या प्रकारे आणि त्या खोलीत झाली होती. तिचे पण हृदय गायब होते.पंचनामा करून बॉडी पोस्टमोर्टम ला पाठवली. अंगद मला सांग मी इकडे हवालदार उभे केले होते ते कुठे गेले? राजे यांनी विचारले. तसे अंगद ने त्यांना सांगितले कि त्या दोघांना भीती वाटत होती म्ह्णून ते दोघे दहा ला निघून गेले होते. ठीक आहे त्यांना पोलीस स्टेशन मध्ये पाहतो पण मॅडम तुम्हाला यावे लागेल चोकशी साठी राजे कीर्ती ला पाहून म्हणाले. पण मी काय केले आहे इकडे चौकशी करा ना? कीर्ती रडत म्हणाली. मॅडम माफ करा पण तुम्हाला स्टेशन ला यावे लागेल. कीर्ती ना इलाजाने त्याचा सोबत पोलीस स्टेशन ला गेली.


    कीर्ती मला सांगा तुम्ही शिव आणि मानसी ला किती वर्ष झाले ओळखता? राजे यांनी विचारलं. साधारण मी फर्स्ट इयर ला होते तेव्हा पासून म्हणजे आज त्याला आठ वर्ष झाली असतील. मानसी आणि तुमच्या मध्ये काही वाद होते का? राजे यांनी पुन्हा विचारले. वाद, नाही अजिबात नाही ती तर माझी सर्वात चांगली मैत्रीण होती. मला सांगा तुम्ही हवेत जे राउंड फायर केले ते किती होते?राजे ने विचारले त्यावर कीर्ती वैतागून म्हणाली असतील चार पण त्याचा इकडे काय समंध?आहे म्हणून विचारलं कारण तुम्ही चार नाही पाच राऊड फायर केले होते,तुम्हाला माहित होते खाली कोणी पोलीस नाही आहे तुम्ही दार उघडले तेव्हा तुम्हाला समजले होते, तुम्ही एकट्या न जात तुमच्या सोबत तुमच्या मैत्रिणीला घेऊन गेलात तिकडे खतरा होता आणि ते तुम्हाला माहित होते तरी तुम्ही गेलात म्हणजे तुम्हाला माहित होते तिकडे काही होऊ शकते आणि मुद्दाम तुम्ही मानसीला घेऊन गेलात जेणे करून तिचा मृत्यू होईल आणि तुमचे जर काही जुने वैर असेल तर ते संपून जाईल आणि कदाचित तुम्ही पण सामील असला पाहिजे ह्या सर्व मध्ये असे माझे मत आहे राजे म्हणाले आणि कीर्ती जोरात ओरडली थांबा काही पण आरोप करू नका मी माझ्या मैत्रिणीला का मारेन. कारण तुम्ही सांगा? राजे म्हणाले आणि बाहेरून आवाज आला कारण मी सांगतो. आत मध्ये एक सूट घातलेला साधारण पंचावन्न वर्षाचे एक गृहस्थ आले होते त्याचा सोबत त्याचे दोन वकील होते. आवाज ऐकून राजे बाहेर आले. आपण कोण राजे यांनी विचारले. नमस्कार मी गोरखनाथ कीर्ती चा बाबा राजे यांनी त्याला पहिले आणि बसायला सांगितले. आपण स्वतः एवढया दूर आलात राजे मिश्किल पणे म्हणाले. हो काय करणार तुम्ही माझ्या मुलीला गेले चार तास पोलीस स्टेशन मध्ये ठेवले आहे मग मला मुंबई वरून यावे लागले गोरखनाथ म्हणाले. आता माझे वकील बोलतील गोरखनाथ यांनी आपल्या वकिलांकडे हात दाखवत म्हणले. राजे तुम्ही चौकशी कमी आणि आमच्या अशिलावर खूनी असल्याचा दबाव आणत आहेत आणि चौकशी करताना एक लेडी ऑफिसर असावी याचे तुम्हाला ज्ञान नाही वाटते कारण तिकडे कोणती लेडी ऑफिसर दिसत नाही. या साठी आम्ही तुम्हाला कोर्ट मध्ये घेऊ शकतो आणि चौकशी झाली असेल तर आम्ही आमचे अशील याना परत घेऊन जाऊ इच्छितो. त्यावर राजे काही न बोलता एका लेडी हवालदार ला कीर्ती ला बाहेर घेऊन येणास सांगितले. शेवटचे पुरावे असल्या शिवाय माझ्या मुलीला आत टाकू नको ती काय रस्त्यावर चालणारी सामान्य व्यक्ती नाही कीर्ती इंडस्ट्रीएस ची मालकीण आहे गोरखनाथ म्हणाले आणि कीर्ती ला घेऊन परत निघाले, गोरखनाथ साहेब एक मिनिट राजे म्हणाले, आज पुरावा नाही म्हणून नाही तर किती पण वकील घेऊन आलात तरी तिला घेऊन जाता येणार नाही कारण कायदा सर्वाना सारखा असतो मग ते कोणी असू द्या आणि अजून एक गोष्ट केस संपली नाही त्या मुळे ती गाव सोडून जाऊ शकत नाही.


    कीर्ती सोबत ते गाडी मध्ये बसतात, हे बघ बेटा इकडे तू सुरक्षित नाही आहेस तू परत चल त्या राजे चे काय करायचे ते मी पाहतो. तू खून नाही केला माहित आहे मला आणि जर तू इकडे राहिली तर मी तुला पण गमावेन म्हणून सांगतो आहे चल सोबत समजत आहे ना मी काय बोलतो आहे ते? गोरखनाथ म्हणाला आणि कीर्ती ने पण शांत पणे ऐकून म्हणाली, बाबा त्या अवदसे ला मी पहिले आहे आपल्या डोळ्यांनी तिने माझ्या मित्राचा जीव घेतला तिला हरवल्याशिवाय मी या गावातून बाहेर जाणार नाही त्या साठी काही झाले तरी चालेल. तुला वेड लागले आहे का? हे दिसते तेवढे सरळ नाही आहे?ती माणूस नाही अवदसा आहे, तिच्या सोबत टक्कर आपण नाही देऊ शकत समजून घे बेटा समजावणीच्या सुरात गोरखनाथ म्हणले.बाबा हि जागा सुरक्षित नाही, मला बंगलो वर सोडा आणि तुम्ही घरी जा, माझी काळजी मी घेईन कीर्ती च्या चेहऱ्यावर कोणते भाव नव्हते. तुम्हाला कोणी सांगितले कि मला पोलीस स्टेशन ला घेऊन गेले आहेत कीर्ती ने विचारले. मला अंगद चा कॉल आला आणि मी ताबडतोब निघालो आणि त्याने मला हे पण सांगितले कि तुम्ही तिला घेऊन जा इकडे मी बाकी सर्व बघतो गोरखनाथ म्हणाले. बाबा तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही इकडे थांबू नका मी अंगद सोबत याच्या मुळाशी जाते तुम्ही काळजी घ्या. गाडी बंगलो जवळ अजून थांबते आणि कीर्ती उतरते. बेटा अजून बघ विचार कर चल परत मुंबई ला गोरखनाथ म्हणतात त्या वर कीर्ती फक्त बाय बाबा काळजी घ्या बोलून बंगलो कडे चालू लागते. तिला गेट कडे जाताना पाहून गोरखनाथ गाडी सुरु करायला सांगतो.


   कीर्ती ला गेट मधून येताना अंगद पाहतो आणि तिला धावत जाऊन बिलगतो, कीर्ती त्याला कसलाच प्रतिसाद देत नाही ते पाहून तो बाजूला होतो आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. कीर्ती तू ठीक आहेस ना?अंगद तिला पाहून विचारतो. हो मी ठीक आहे पण हे बोलताना कीर्ती च्या चेहऱ्यावर कोणते भाव नव्हते. आत जाऊन ती शेवन्ता ला आवाज देते तशी शेवंता बाहेर येते. काय झाले ताई साहेब? शेवंता घाबरत विचारते. मला त्या अवदसे बद्दल सर्व ऐक्यचे आहे सर्व म्हणजे सर्व ती कधी आली तेव्हा पासून तिला कसे रोखले तुला माहित असलेले सर्व मला जाणून घायचे आहे कीर्ती म्हणाली तसे निशी आणि अंगद यांची आश्चर्याने भरलेली नजर तिच्यावर पडली. सांगते ताईसाहेब सर्व सांगते जे मला माहित आहे ते सर्व सांगते तुम्हाला बोलून शेवंता बोलू लागली.


   साधारण २० वर्ष झाली असतील त्या गोष्टीला गावात एक माणूस आला रामनाथ नाव त्याचे त्याला गावात एक कपड्यची मिल सुरु करायची होती, गावाने त्याला हि माळावरची जमीन दिली कारण त्याने गावाला वचन दिले होते कि मिल साठी लागणार कच्चा माल तो गावातून घेणार आणि गावात जे तरुण आहेत त्यांना मिल वर कामाला ठेवणार जेणे करून गावात राहणार तरुण नोकरी साठी बाहेर जात काम नये आणि जे शेतकरी आहेत त्यांना पण गावात आपला काही माल विकत येईल आणि त्या साठी योग्य तो मोबदला ते देणार होते. गिरणी आणि बंगलो याचे बांधकाम एकत्र सुरु झाले होते एकदा एक मजूर काम करताना पडला तर त्याला स्वतः च्या मोटारीने त्यानी डॉक्टर कडे नेला आणि त्याचा सर्व खर्च पण केला शिवाय तो कामाला नव्हता पण त्याचा रोज त्याला त्याची घरी जात होता असा देव माणूस होता. गावकरी तर त्याला देव म्हणून पूजा करायचे. मिल सुरु झाली गावात लोकांना काम मिळाले हा तोच बंगलो आहे ज्याला बांधायला मी पण आले होते. पण नियतीला काही तरी वेगळे मंजूर होते गिरणी सुरु झाली आणि साधारण १५ दिवसात त्या देव माणसाच्या पत्नीचा अपघातमध्ये मृत्यू झाला पण नशीब बलवत्तर म्हणून त्याची ५ वर्षाची मुलगी वाचली. निराश आणि हताश झाले होते असेच एक महिना गेला आणि त्याच्या वर पण हल्ला झाला असाच रात्री आणि त्याचे प्रेत पण तिकडे सापडले तसेच जसे आता सापडत आहे.पोलीस याना पण काहीच सुगावा लागला नाही . त्या नंतर मिल जास्तीत जास्त तीन महिने सुरु राहिली पण त्या तीन महिन्यात असे दहा प्रेत मिळाले. त्या नंतर सर्वानी इकडे येणे बंद केले लोक भीतीने कामावर येत नव्हते. कारभार रामनाथ यांचा भाऊ याने हातात घेतला होता पण त्याने हत्या सुरु झाल्यावर मिल बंद केली. त्या अवदसेला बाहेर येत येऊ नये म्ह्णून गावकर्यांनी गावातला पुजारी आहे त्याला घेऊन मंत्राने पवित्र केलेला धागा बांधून तिला आत बंद केले नाही तर आज तिने गाव गिळून टाकला असता.तरी भितीनी ने लोकांनी गाव सोडला.त्या अवदसेला ज्याने पहिले तो मेला फक्त एक जिवंत वाचला तो म्हणजे माझा मुलगा तो वेडा झाला आहे त्याने तिला समोरून पहिले आहे आणि वाचला हाये पण तो वेडा झाला आहे. अंगद च्या नजरेसमोर तो गावात फिरणारा वेडा आला. एकमेव नाही मी पण तिला पहिले आहे, पण तिला आणले कोणी आणि का? आणि जर सुरुवात आहे तर शेवट पण असणार तिचा कीर्ती म्हणाली. तिचा अंत आता आपल्याला शोधावा लागणार आहे आणि तो आपण शोधू बोलून कीर्ती वरती गेली. सर्व कीर्ती असे बोलून कुठे गेली याचा विचार करत होते तेवढया कीर्ती कपडे बदलून खाली आली. मी त्या अवदसेचा अंत करणार ज्यांनी माझ्या मित्रांना ना माझा पासून हिरावून घेतले जिच्या मुळे आज मला आणि माझ्या बाबा ना त्रास झाला तिला मी संपवणार आणि जर कोणाला साथ देण्याची असेल तर त्याने घरी जावे मी काही बोलणार नाही. एकदा का माझ्या सोबत आला तर जीवन किंवा मरण काही होऊ शकते कीर्ती म्हणाली. तसे अंगद ने तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला आता काही झाले तरी तुझी साथ नाही सोडणार. माझे पण प्रेम त्या अवदसे ने हिरावून घेतले मानसीचा बदला मी घेणार. ताई साहेब मी पण आहे तुमचा सोबत माझा पोरगा पण तिने वेडा केला तुम्ही सांगा काय करायचे शेवंता म्हणाली. आता आपण त्या पुजारी कडे जाऊ ज्यांनी तिला कैद केले होते. सर्व बाहेर पडतात आणि गावाच्या वाटेल लागतात.


   गावात महादेवाचं खुप जुने मंदिर होते, त्या मंदिराच्या शेजारी त्या पुजारी चे घर होते. शेवंता दरवाजा वाजवते तसे एक आतून एक कापरा आवाज येतो कोण आहे?, मी शेवन्ता पुजारी बाबा दार उघडा शेवंता बोलते आणि साधारण ५ सेक मध्ये दरवाजा उघडला जातो. घरात एक वृद्ध साधारण ७५-८० वय असलेले आजोबा असतात त्यांना नीट दिसत पण नसते आणि चालता पण येत नसते कुबडीच्या साहाय्याने ते चालत असतात. पुजारी बाबा हि कीर्ती आहे यांनी ती मिल उघडली आहे शेवंता च्या त्या वाक्यावर पुजारी एकदम गंभीर होतात आणि त्याचा चेहऱ्यावर भीतीची छाया दिसू लागते. पुजारी बाबा ना अजून तिकडे काय झाले ते सर्व शेवंता सांगते. शेवंता तुला माहित आहे ना ती मिल किती भयानक आहे? मग तू का नाही अडवले याना? पुजारी कापऱ्या आवाजात बोलतात. पुजारी बाबा माफ करा त्यांनी सांगितले होते पण आम्ही त्यांचे ऐकले नाही आम्हाला वाटले तसले काही नसेल तिकडे म्ह्णून मग आम्ही उघडली कीर्ती म्हणाली. तुमच्या तरुण आणि शहराकडे राहणाऱ्या मुलाचे हेच समजत नाही मला म्हणजे एखादी गोष्ट नको सांगितलं तर तुम्ही ती जास्त करता. आता काय हवं आहे तुम्हाला इकडे? पुजारी रागात म्हणाले आणि त्यांना खोकल्याची उबळ आली तसे अंगद ने त्यांना पाणी दिले. मला माहित आहे आम्ही मूर्ख पणा केला आहे पण आता यातून बाहेर कसे पडायचे कारण आम्हाला तिला कायमचे संपवायचे आहे आणि तिने आमच्या मित्रांचा खून केला आहे निशी रागात म्हणाला. पुजारी बाबा मदती साठी तुमचा कडे आले आहेत काही तरी उपाय सांगा शेवंता म्हणाली. उपाय सांगू , काय उपाय सांगू म्ह्णून पुजारी हसतात.तिचा बंदोबस्त करणे माझ्या हातात नाही असते तर मी तिला बंद केले नसते तेव्हाच तिचा नाश केला असता आणि आता तिला बंद करणे माझ्या हातात नाही कारण मी आता तरुण नाही आणि माझी प्रकृती माझी साथ देत नाही. तिला मारणारे कोणी तरी असेल ना या जगात कारण तिला कोणी तरी घेऊन आले आहे म्हणजे ती कोणाचे तरी आदेश मानते आहे कीर्ती चिंते च्या स्वरात म्हणाली. हे बघ मुली या अवदसा म्हणजे डाकिनी असतात त्यांना कोणी तरी घेऊन येते ज्याचा नाश करायचा असतो त्याचा जवळ सोडते पण त्या बदल्यात ती काही तरी अटी ठेवते आणि त्या पूर्ण झाल्याशिवाय ती स्वतः कधी जात नाही आता हिच्या अटी काय आहेत हे ज्याने आणली आहे त्याला माहित आहे आणि तिला हरवणे शक्य नाही पुजारी म्हणतात. पण पुजारी बाबा असे कोणी तरी असेल या पृथीवर जो तिचा सामना करेल. तो कुठे हि असला तरी मी त्याला शोधून घेऊन येईन कीर्ती म्हणाली. थोडा विचार करून पुजारी म्हणतात अश्या विद्या चे नाश फक्त एकच माणूस करू शकतो तो म्हणजे भैरव. भैरव हा कोण आहे पुजारी काका निशी ने विचारले. भैरव हा सामान्य पुरुष नाही तो अघोरी आहे तो एका जागी कधीच थांबत नाही त्याला स्वयंम महादेव प्रसन्न आहेत आणि सिद्धी प्राप्त करून तो अश्या विद्या सोबत लढतो तोच या अवदसेचा नाश करू शकतो तो सर्व जाणतो भूत भविष्य वर्तमान सर्वांचे त्याला ज्ञान आहे पुजारी आनंदाने म्हणले.पण पुजारी बाबा हे भैरव आम्हाला सापडणार कुठे आणि ते आमचे काम करतील अंगद ने विचारले. त्यावर हसून पुजारी म्हणाले, पोरा भैरव आपल्या मर्जीने काम करतो तो एका जागेवर कधीच राहत नाही, पण तो दर अमावसेला गावाबाहेर जे पडके शिव मंदिर आहे तिकडे पूजा करायला येतो आणि जर पूजा करून झाल्यावर जर कोणी त्या मंदिरात महादेव समोर त्याचा कडे मदत मागितली तर तो नाही म्हणत नाही. अजून दोन दिवसानी अमावस्या आहे तिकडे जे मंदिर आहे त्याचा रस्ता जंगल मधून जातो आणि तिकडे लांडगे पण आहेत त्या मुळे सावधान आणि हो त्या अवदसे पासून वाचण्यासाठी मी काही तरी तुम्हाला देतो म्हणून पुजारी उठले आणि आपल्या घरातील छोट्या मंदिरात काही काळे दोरे ठेवले होते ते चौघांच्या मनगटावर बांधले. हे दोरे महादेवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे याना काढू नका साधारण तीन दिवस हे तुमचे रक्षण करतील पण एक लक्षात ठेवा हे काढू नका. पुजारी बाबा मला एक विचारायचे? होते कीर्ती म्हणाली. ती अवदसा गावात किंवा बंगलो मध्ये का येत नाही? त्यावर पुजारी हसले आणि म्हणाले बेटा गावात येण्यासाठी तिला हे महादेवाचे मंदिर पार करावे लागेल जे तिला शक्य नाही आणि बंगलो मध्ये येत नाही असे नाही तिने प्रयन्त केला असेल पण तिला ते जमले नाही कारण दारावर एक नारळ आणि सिद्ध यंत्र आहे त्याने ती आत येऊ शकली नाही म्हणून ती गेट वाजून तुम्हाला आकर्षित करत राहिली आणि शिकार करत राहिली. सर्वानी पुजारी बाबाच्या पाय पडले आणि निघाले.


    शेवंता आपले काम आटपून निघत होती, तेवढयात कीर्ती ने तिला आवाज दिला आणि तिच्या हातावर काही पैसे ठेवले. अहो ताई साहेब हे काय करतंय पैसे कसला. त्यावर कीर्ती हसून म्हणाली राहू दे तू आज आमची एवढी मदत केली म्ह्णून तुला ठेव. पैसे नको ताई साहेब आणि मदत म्हणाल तर माझा पण स्वार्थ आहे कि त्यात माझ्या पोराला जिने वेडे केले तिच्यावर सुड घेण्याची संधी मिळाली आहे, तुम्ही काय पण काळजी करू नका मी आहे तुमचा सोबत मी दाखवेन तुम्हाला पोचवेन त्या मंदिरा जवळ बोलून शेवन्ता निघते. त्या रात्री तिघांना पण झोप आली नाही,ते तिघे पण हॉल मध्ये बसले होते. आपण आलो कशासाठी आणि काय होऊन बसले होते. सर्व जुन्या आठवणी त्या तिघांच्या डोळ्यासमोर येत असतात आणि अचानक एक च्या सुमारास हा आवाज तसाच होता जसा शिव आणि मानसी ने ऐकला होता.सर्व जण दरवाजा च्या दिशने धावतात आणि दरवाजा उघडता आणि पाहतात कि तीच काली आकृती त्याचा समोर उभी राहून त्याचा कडे पाहून हसत होती. आता मात्र कीर्ती चा राग अनावर झाला आणि ती बाहेर पडू लागली तसे अंगद ने तिला पकडले आणि पुन्हा घरात घेऊन आला. कीर्ती ओरडत होती मला जाऊ दे मी तिला नाही सोडणार तिने माझे मित्र माझ्या पासून हिरावून घेतले आहेत मला जाऊ दे कीर्ती रागात ओरडत होती. अंगद ने तिला मिठी मारली आणि तिला शांत केले आणि म्हणाला, कीर्ती हे ती वेळ नाही आपण तिचा मुकाबला करू शकत नाही तिला पण हेच पाहिजे कि तू रागात तिकडे जावे म्हणजे ती तुला पण शिव आणि मानसी सारखी मारून टाकेल, तिच्या समोर तुझा निभाव लागणार नाही ऐक माझे, आपण तिला मात देणारा भैरव ला घेऊन येणार आहे फक्त दोन दिवस थांब मला पण राग येतो आहे पण मला माहित आहे मी तिचे काही वाकडे करू शकनार नाही थांब आपण करू तिचा बंदोबस्त अंगद म्हणाला आणि रडू लागला त्याला पाहून कीर्ती पण रडू लागली त्या दोघाना पण निशी ने मिठी मारली.पुढचे दोन दिवस उदास गेले जेवणात कोणाचे मन लागत नव्हते, त्या वेळी गोरखनाथ यांनी पण कीर्तीला कॉल करून परत येणास सांगितले पण कीर्ती ने त्याला नकार दिला होता. पोलिसानी आपला तपास सुरु ठेवला होता पण त्याचा हाताला काही लागत नव्हते. दोन रात्री ती अवदसा येऊन गेट वाजून त्यांना पाहून हसून जायची त्याचा कडे इलाज नव्हता म्हणून ते गप्प होते. शेवटी तो दिवस आला जेव्हा ते पहिल्यांदा भैरव ला भेटणार होते. ताई साहेब आपण एक काम करू आपण चार ला निघू म्हणजे उजेड असताना तिकडे पोहचू आणि जनावराची भीती अंधारात जास्त असते शेवंता म्हणाली. तसे सर्व गाडी ने जंगल जवळ पोचले तिकडे त्याना साधारण त्यांना पाच वाजले होते अजून आत मध्ये साधारण आठ किलोमीटर जायचे होते. रस्ता सरळ नव्हता झाडी तुन वाट होती मधेच कुठे तरी पक्षाचा विचित्र आवाज कानावर पडत होता. साधारण साडेसात च्या आसपास ते मंदिर च्या जवळ आले तिकडे दोन मंदिरे होती एक होते शिवाचे आणि दुसरे मारुतीचे दोन्ही मंदिरे बाजूला होती. बाहेर गुप्प अंधार होता मधेच कोणते तरी जनावर आवाज करत होते वातावरण गूढ झाले होते. शेवंता, निशी आणि कीर्ती झोपले होते अंगद एकटा जागा होता. साधारण मध्य रात्री जेव्हा अमावस्या सुरु झाली शिव मंदिरातून कोणाचे तरी स्वर कानावर पडले तसे अंगद ने सर्वाना उठवले. सर्व सावध होते. पूजा संपन्न झाली आणि शेवट चा हर हर महादेव चा जयघोष कानावर आला तसे ते सर्व हळू हळू शिव मंदिरात प्रवेश करता झाले. मशालीच्या उजेड पसरला होता, समोर त्याचा कडे पाठ करून एक जटा धारी अंगावर वाघाचे चर्म परिधान केलेला हातात त्रिशुळ असलेला आणि दुसऱ्या हातात थाळी होती ज्यात भस्म होते. काय हवे आहे तुम्हाला? त्यांचा कडे न पाहता एका भारदस्त आवाजात भैरव ने विचारले. महाराज एक अडचण आहे त्याचे निवारण करायचे होते कीर्ती घाबरत म्हणाली. तुम्हाला कोणी सांगिले मी तुमच्या अडचणी चे निवारण करेन भैरव ने विचारले. महाराज ते शिरोळे गाव चे पुजारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितले निशी बोला तसे भैरव ने पलटून त्याचा कडे पहिले. त्याचे ते रूप पाहून कीर्ती घाबरून दोन पावले मागे सरकली. चेहरा आणि शरीर पूर्ण भस्माने रंगले होते.कपाळावर कुंकवाचा मळवट भरला होता आणि मध्ये एक हळदीचा गोल होता. डोळे आग ओकत होते एवढे लाल होते.दाढी आणि मिशी भरदार होती. हर हर महादेव चा जयघोष करून ते कीर्ती जवळ आले आणि म्हणाले जाणले मी तुम्ही का आला आहात. कीर्ती पुन्हा घाबरून मागे सरकली. त्यानी तिच्या कपाळावर भस्म लावले. तुमचे दोन मित्र आणि त्या आधी दोन माणसे मारली गेली आहेत ना? बोलताना त्यांनी अंगद च्या कपाळावर पण भस्म लावले आणि त्या आधी दोन माणसे आता ते शेवन्ता कडे गेले आणि म्हणले तुझा मुलगा वेडा झाला आहे तिच्या मुळे, शेवंताने त्याचे पाय धरले आणि म्हणाली महाराज काही तरी करा पण तिला शिक्षा करा. आता ते निशी समोर उभे राहिले आणि म्हणले काही माणसे हि आपल्याला जवळची वाटतात पण ती नसतात काही माणसे पाठी मध्ये खंजीर खुपसतात. ते पुन्हा कीर्ती जवळ आले आणि म्हणाले बेटा तुझ्यावर जो खूनाचा आरोप आहे तो खोटा आहे.त्या पुजारी ने तुम्हाला सांगितले कि माझ्याकडे या मी पूजा करताना मी कोणाला नाही म्हणत नाही पण त्याने हे नाही सांगितलं कि मी काही लपवत पण नाही. म्हणजे काही समजले नाही महाराज अंगद ने विचारले. त्या पुजारी ने ती अवदसा तिकडे पाठवली आहे भैरव चे हे वाक्य ऐकून सर्वाना आश्चर्यचा धक्का बसला. भैरव कधी खोटे बोलत नाही, जाऊन त्या पुजारी ला विचारा त्याने कोणाच्या सांगण्यावरून त्या अवदसा तिकडे पाठवले आहे आणि त्याने निशी कडे एक कटाक्ष टाकला.मी उद्या रात्री तिकडे येईन एक अनुष्ठान करायला तेव्हा तिकडे पोलीस इन्स्पेक्टर राजे याना पण बोलून घ्या त्यांना पण समजू द्या कशी असते अवदसा त्याने त्या दोन हवालदाराना नोकरी वरून काढायला लावले होते कारण ते रात्री थांबले नाही. अंगद च्या लक्षात आले महाराज कशाबद्दल बोलत आहेत. तुम्हा सर्वाना मी उद्या अकरा वाजता त्या गेट जवळ भेटेन तेव्हा तयार राहा आणि हो तू तुझ्या आयुष्यात अत्यंत जवळ आणि विश्वासू माणूस गमावणार आहे ज्याचा ज्याच्यावर तुझे प्रेम आहे पण त्याचे तुझा संपत्तीवर हर हर महादेव बोलून भैरव तिकडून निघून जातो. त्याचा पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत कीर्ती विचार करत बसते.सकाळ पर्यंत ते तिकडे थांबतात आणि मग ते पुजारी चे घर गाठतात.


   पुजारी बाहेर बसलेले असतात, कीर्ती आणि सर्वाना पाहून ते आंनदाने उठतात आणि त्यांना हसून विचारतात झाले का काम पोरांनो मिळाला का भैरव? त्यावर अंगद म्हणतो बाबा थोडे बोलायचे होते आत जाऊया का? आणि सर्व आत जातात. बाबा तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगिले कि त्या अवदसेला तिकडे तुम्ही घेऊन आलात म्ह्णून आम्हाला भैरव ने सर्व सांगिले आहे पण तेच आता तुमचा तोंडून ऐकायचे आहे कीर्ती रागात म्हणाली. त्यावर पुजारी रडत म्हणाले माफ कर मला पोरी मला सांगण्याची हिम्मत नाही झाली बघ आणि मला माहित होते भैरव तुम्हाला सर्व सांगणार आणि तुम्ही परत येणार माझ्याकडे मी सर्व सांगतो पहिल्या पासून बसा इकडे पुजारी म्हणले.


  रामनाथ नाव सारखा राम होता,या भागात दुष्काळ होता आणि कपाशीला भाव पण मिळत नव्हता. एकदा एका कार्यक्रमात आमचे सरपंच यांनी त्यांना अडचण बोलून दाखवली आधीच श्रीमंत आणि त्यात समाजसेवक त्यांनी सरपंचांना शब्द दिला कि ते गावासाठी काही तरी करतील. ते गावात आले त्यानी इकडे सारे पहिले आणि त्यांनी एक कापडाची मिल बनवायचे ठरवले त्या साठी गावकऱयांनी त्याना माळावर जमीन पण दिली त्याची पत्नी आणि पाच वर्षाची मुलगी पण आले होते.मिल सुरु झाली गावातले कामगार आणि कच्चा माल घेऊन त्यांनी गावात लोकांना पैसे दिले रोजगार दिले, राहायला तिकडे एक घर बांधले जेणे करून हाताला काम मिळेल. त्यांचे नाव आणि वाढत असलेला व्यापार पाहून त्यांचा भावाच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्याने एक षडयंत्र रचले त्यात त्याने मला आणि गावातली दोन तीन माणसे घेतली. पैसेचे आमिष दाखून रामनाथ आणि त्याचे कुटुंब याचा खून करायचा ठरवलं पण तो खून न वाटता अपघात आहे असे वाटले पाहिजे म्हणून एकदा गाडी ने जाताना त्याने त्याचा अपघात घडवला पण त्यात त्याची पत्नी गेली पण रामनाथ आणि त्याची मुलगी वाचली. साधारण दोन महिने गेले रामनाथ आणि त्याची मुलगी एकत्र राहू लागले पण त्याचा भावाला ते मान्य झाले नाही आणि त्याने मला काळ्या शक्तीचा वापर करायला सांगितलं मी पुजारी आहे पण मला काली विद्या पण येते हे त्याला माहित होते. त्याने मला पैसे दुपटी ने दिले आणि त्या पैसे पायी मी आंधळा झालो. त्या दिवशी रात्री साधारण दीड च्या सुमारास मी आणि त्याने एक अनुष्ठान केले मिल च्या मागचा खोलीत आणि एका अवदसा बोलावली आणि तिला रामनाथ च्या मार्गावर सोडले पण तिने एक अट ठेवली. जर तिने पहिला खून केला तर ती अजून सोळा खून करेल आणि जो सोळावा खून करेल त्याचा शरीराचा ताबा घेईल. मी मजुरी दिली पण मला माहित होते अवदसा आपला शब्द कधी पण फिरवू शकते म्हणून मी तिच्या नकळत तिचा शरीरावरचा कपड्याचा एक तुकडा कापून घेतला आणि त्या अनुष्ठान च्या ठिकाणी गाडून टाकला. ज्या रात्री रामनाथ चा खून झाला तेव्हा पण तिने गेट वाजवून त्यांना बोलावले होते आणि त्याचे हृदय खाले होते जेणे करून तिला शक्ती मिळते आणि त्यांचा खून तिकडे झाला जिकडे अनुष्ठान केले होते. मला फक्त नाव सांगा जायचा मुळे मी माझे मित्र गमावले आणि अजून तो जीवनात आहे का? कीर्ती रागात म्हणाली. कीर्ती रडत होती आणि तिने धागा तोडून टाकला. आहे तो जिवंत आहे आणि आता खुप श्रीमंत झाला आहे बोलून पुजारी ला ठसका लागला. त्याचे नाव खोकत बोलते होते पण समजत नव्हते निशी ने पाणी दिले थोडे पाणी पिऊन पुजारी वारले.बाबा, बाबा अंगद ने त्यांना हलवले पण काहीच उत्तर नाही आले. शिट्ट, डॉक्टर ला बोलावले पण तो पर्यंत उशीर झाला होता डॉक्टर ने त्यांना मृत घोषित केले. यार हा पण दरवाजा बंद झाला निशी म्हणाला. हरकत नाही भैरव आहे ना तो सांगेल नाव आपल्याला बोलून त्यांनी राजे याना कॉल केला आणि पुजारी कडे बोलावले. राजे याना सर्व सांगून बॉडी ताब्यात दिली आणि रात्री ठीक अकरा वाजत यायला सांगितलं.


   रात्री पावणे अकरा वाजता राजे आले, काय मॅडम कोणत्या बाबा च्या नादी लागत आहात तुम्हला काय माहित हे बाबा बुआ सर्व फसवे असतात गेले ते दिवस जेव्हा स्वामी आणि साईबाबा सारखे माणसे होते आता आहेत ते फक्त पैसे कमवण्यासाठी राजे म्हणाले आणि जोरात हर हर महादेव चा जय घोष ऐकू आला. तसे सर्व बाहेर आले गेट जवळ भैरव उभा होता त्याचा खांद्यावर एक छोटी पिशवी होती. राजे मनात विचार करू लागले हा माणूस निर्दोष सिद्ध करणार आहे पण कसा? बेटा त्याची काळजी तू करू नको आणि या जगात अजून अवतारी पुरुष आहेत मी स्वामी किंवा साईबाबा एवढा मोठा नाही पण मी अनेक सामान्य पुरुष पण नाही भैरव म्हणाला. अरे हे तर मी आत बोलो होतो आणि ते पण आता आधी म्हणजे तेव्हा हे आले पण नव्हते मग याना कसे समजले राजे विचार करत असताना भैरव पुन्हा म्हणाला एवढा विचार नको करू तू कधी काही बोला किंवा कधी कोणता विचार केला हे मला तुझ्या आधी समजते राजे त्या मुळे नको विचार करू आता जे होईल ते पहा बोलून भैरव आत गेला आणि त्याचा मागे सर्व आत गेले. तो थेट त्या जागेवर जाऊन थांबला जिकडे खून झाले होते.भैरव ने दरवाजा उघडला तसे परत गरम हवेचा झोत बाहेर आला. भैरव ने पिशवीत हात घातला आणि दोन लिंबे बाहेर काढली आणि हातात घेऊन तो कसले तरी मंत्र पुटपुटू लागला. ते लिंबू घेऊन तो सर्व ठिकाणी फिरू लागला मग एका ठिकाणी तो थांबला आणि त्याने लिंबू पहिले तर ते आधी लाल झाले नंतर ते काळे पडले होते. भैरव ने आता सर्वांकडे एक नजर फिरवली आणि म्हणाला या जागी एक अनुष्ठान झाले होते अवदसा ला इकडे बोलवले गेले होते आणि तिच्या काही अटी होत्या कारण कोणते प्रेत किंवा डाकीण अटी शिवाय कामाला तयार होत नाही. भैरव ने डोळे बंद केले आणि काही वेळ तसाच गेला. एक काम करा तुम्ही बाहेर थांबा मी तुम्हाला बोलावतो. पण बाहेर तर ती आहे ना निशी घाबरत म्हणाला. तिची काळजी तू करू नकोस ती तिला काही करणार नाही बोलून दरवाजा बंद केला. इकडे बाहेर सर्व घाबरले होते, विचित्र आवाज येत होते कोणाचे तरी गरम श्वास मानेवर जाणवत होता, सतत कोणी तरी पाहत आहे असे वाटत होते. प्रत्येक सेकंड हा तास सारखा भासत होता मध्ये कोणी तर हसत आहे असे वाटत होते.साधारण अर्धा तास गेला आणि भैरव ने दरवाजा उघडला. रात्रीचे साधारण साडेबारा वाजले होते. भैरव ने एक कुंकवाचे मोठे रिंगण तयार केले होते, त्यात हळदीची चांदणी बनवली होती त्यावर हवनकुंड ठेवले होते, समिधा आणि काळे उडीद कणकेच्या पिठाची बाहुली जिला कोणता तरी काळा कापड गुंडाळले होते सोबत एक लिंबू मध्ये चिरून त्याला कुंकू लावले होते. आता मी जे काही सांगतो आहे ते नीट लक्ष देऊन ऐका, या रिंगणाच्या बाहेर तुम्ही सुरक्षित राहणार नाही, अवदसा तुम्हाला सर्व प्रकारचे आवाज काढून बोलावेल पण तुम्ही कोणी बाहेर जायचे नाही. विशेष म्हणजे राजे तुम्ही कारण तुमचा अजून या सर्वावर विश्वास नाही आहे. भैरवाने विधी सुरु केले.


   साधारण पावणे एक ला त्याने मंत्र पठाण ला सुरुवात केली. आपल्याला आजूबाजूला कोणी दिसु नये किंवा कोणाचा आवाज येऊ नये म्हणून कीर्ती ने आपले हाताने कान झाकून घेतले आणि डोळे गच्च बंद केले.अचानक कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. सर्व भीती ने कापू लागले. ये गोसाव्या बंद कर तुझी थेरं तुला काय वाटत कि तू हे सर्व करून याना वाचवशील का? पण एक लक्षात ठेव कोणी नाही सुटणार माझ्या पासून आणि हासनायचा आवाज येऊ लागला. त्या आवाजाला भीक न घालता भैरवाने आपले मंत्र सुरु ठेवले.आता त्या अवदसे ने आपला पवित्रा बदलला आता ती शिव चा आवाज काढून त्यांना भुलवणायचा प्रयन्त सुरु केले. अंगद, निशी अरे मला इकडे खुप त्रास होतो आहे रे माझी मदत करा मला सोडवा यातून आणि ती रडू लागली. थोडा वेळ गेला आणि मग मानसी च्या रडण्याचा आवाज येऊ लागला. कीर्ती अगं तू तरी ये माझी मदत कर मी इकडे एकटी आहे तुझ्यासाठी मी माझा जीव घालवला आणि तू तिकडे बसली आहेस तू तरी माझी मदत कर ना आणि मानसी रडू लागली. मागचा पुढचा विचार न करता कीर्ती उभी राहिली आणि मागे वळून जोरात ओरडली जा तू मला माहित आहे माझी मानसी गेली आहे ती पुन्हा नाही येणार तू जा इकडून तू जा आणि कीर्ती रडू लागली तसे अचानक तिला कोणी तरी जोरात धक्का दिला आणि ती वर्तुळाच्या बाहेर पडली. तिने मागे वळून पहिले तर तिच्या मागे निशी हसत उभा होता. निशी तू ?कीर्ती म्हणाली आणि तिला अवदसा घेऊन जाते. रागात अंगद ने निशी ची कॉलर पकडली आणि म्हणाला, निशी हे काय केले तू तुझा डोकं फिरले आहे का? अरे ती आपली कीर्ती होती. निशी त्याचा कडे पाहून फक्त हसत होता. अंगद ने त्याला बाजूला फेकले आणि तो बाहेर पडणार तेवढ्यात त्याला भैरव ने अडवले आणि म्हणाला थांब अंगद तिला आता काही होणार नाही कारण त्या अवदसा ने तिचे कापड पहिले आणि तिला माहित आहे जर तिने कीर्तीला काही केले तर ती पण नाही वाचणार, पण एक शक्यता आहे ती कीर्तीवर हावी होईल आणि तिच्या शरीराचा ताबा घेऊन ती हे कापड मिळवणायचा पर्यन्त करेल जर तू आता बाहेर गेलास तर ती तुझा बळी घेईल. मग महाराज मी करू काय हातावर हात ठेऊन तिला मारताना नाही पाहू शकत मी अंगद म्हणाला त्यावर निशी हसत म्हणाला ते तर तुला करावे लागेल कारण ती परत नाही येणार ती तर मारणार आणि पुन्हा हसू लागला अंगद चा राग अनावर होऊन त्याने निशी ला जोरात ठोसा लगावला तसे निशी जमिनीवर पडला आणि त्याला राजे यांनी पकडून ठेवले. अंगद मला सोडावं अंगद मी इकडे आहे अंगद माझे प्रेम आहे तुझ्यावर मला सोडावं अंधारात उभी राहून कीर्ती अंगद ला आवाज देत होती. अंगद ने भैरव कडे पहिले, भैरव ने त्याला मानेने नकार दिला. अंगद त्याचा कडे काय पाहतो , मला पहा तुझे प्रेम आहे ना माझ्यावर बोलत हळू हळू ती पुढे येऊ लागली. भैरव ने हळूच त्याला एक पूड दिली आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, हि पूड जशी ती जवळ येईल तशी तिच्या अंगावर टाकून दे म्हणजे ती अवदसा तिचा पासून वेगळी होईल आणि जशी ती वेगळी होईल तसे लगेच कीर्तीला या रिंगणात खेचून घे. कीर्ती माझे पण खुप प्रेम आहे तुझ्यावर ये जवळ ये आणि मला घेऊन जा हा गोसावी मला इकडून जाऊ देत नाही मला येऊन घेऊन जा इकडून कीर्ती लवकर ये अंगद म्हणत होता आणि निशी हे सर्व काय होते आहे ते आश्चर्याने पाहत होता. कीर्ती ये आणि मला सोडावं यातून कीर्ती ये ना कीर्ती अंगद प्रेमाने आवाज देत होता. तो थोडा रिंगणा बाहेर आला आणि त्याने कीर्ती कडे हात पसरले कीर्ती ते पाहून त्याचे हात हातात घेण्यासाठी जवळ आली आणि अंगद ने तिच्यावर ती पूड तिच्यावर टाकली तशी ती अवदसा तिचा मधून बाहेर आली आणि संधी साधून अंगद ने कीर्तीला जवळ ओढले आणि दोघे आत गेले. आयते हातात आलेलं शिकार निसटून गेल्या मुळे अवदसा आता जोराने ओरडू लागली. हे सर्व पाहून राजे भीती ने कापू लागले. अरे गोसाव्या तू स्वतःला खुप मोठा समजतोस का? मला हरवणे सोपे नाही समजे का? आणि ती त्याचा भोवती घिरट्या घालू लागते. भैरव ने तिच्याकडे पहिले आणि समिधा टाकत म्हणाला, मी मोठा नाही माझा भूतनाथ मोठा आहे, त्याचे राज्य सर्व ठिकाणी आहे आणि त्याने मला पाठवले आहे तुमचा सारख्या लालसेने भरलेल्या आत्माचा खात्मा करायला. आता पर्यंन्त जेवढे बळी तू घेतले आहेस त्याचे हिशोब तुला महादेव ला द्यावे लागतील. त्याने ती बाहुली आणि काही उडीद हातात घेतले आणि मंत्र म्हणू लागला तसे ती अवदसा जोरात ओरडू लागली. भैरव ने ती बाहुली आणि कापलेले लिंबू आणि काळ्या उडीद सोबत अग्नी मध्ये विसर्जित केले. जस जसे ते जळू लागले तस तसे ती जोरात ओरडू लागली. एक काळा धूर जमिनी मधून आकाशाकडे जाऊ लागला आणि भैरव ने मंत्र पठाण थांबवले. पोरांनो तुमची मिल मुक्त झाली आणि तुमचा आरोपी तुमचा कडे आहे पण हा एकटा नाही आहे ह्याचा मागे अजून कोणी तरी आहे. त्याचे उत्तर तोच देईल बोलून भैरव ने सर्व जागा साफ केली आणि चला माझे काम झाले सुखी रहा आशीर्वाद देऊन हर हर महादेव चा जय घोष करून भैरव तिकडून निघाला.


  राजे आणि अंगद ने आपला मोर्चा निशी कडे वळवला. निशी भीती ने कापत होता.निशी खरं सांग तू असे का वागलास?बोलून अंगद ने त्याला ठोसा लगावला. त्या ठोश्याने निशी जमिनीवर पडला.राजे यांनी त्याला उचलला आणि बाहेर आले आणि त्याला खुर्चीवर बसवला आणि म्हणाले, हे बघ घाबरू नको तू असे का केले खरं सांग नाही तर तुला या मिल मध्ये मारून टाकू आणि नाव अवदसे चे येईल त्या पेक्षा खरे सांग तू असे का केले? आणि हो स्वतः चा जीव वाचवण्यासाठी हे कारण देऊ नको कारण तसे असते तर कोणाला हि ढकललं असते मग कीर्ती ला का? आणि जर तुला वाटत असेल आम्ही इकडे गम्मत करत आहोत तर पोलीस एन्काऊंटर तुला माहित आहेत पण इकडे अवदसा इनकॉउंटर होईल तर पटपट बोल. बोल लवकर राजे जोरात ओरडले तसे निशी दचकला आणि सांगू लागला. माझे नाव निशिकांत गोरखनाथ कारखानीस माझे वडील गोरखनाथ कारखानीस जे कीर्ती इंडस्ट्रीएस मध्ये आहेत ते म्हणजे तू कीर्तीचे, निशी चे वाक्य मधेच तोंडात अंगद म्हणाला. हो मी कीर्तीचा भाऊ पण सखा नाही चुलत कारण तिचे बाबा हे माझे मोठे काका होते त्याचे नाव रामनाथ कारखानीस जशे निशी ने नाव घेतले तसे कीर्ती चा चेहरा उतरला आणि ती जोरात ओरडली नाही हे सर्व खोटे आहे तू खोटे बोलत आहेस बाबा बद्दल तुला माझ्या मनात विष कालवयचे आहे आणि तू फसला आहेस म्हणून तू त्याचे खोटे नाव घेते आहे. त्यांनी तर माझ्यासाठी लग्न पण नाही केले तू खोटे बोलत आहे कीर्ती मोठयाने रडत म्हणाली. मी खोटे बोलत नाही हवे तर शेवन्ता ला विचार कारण तिने माझ्या बाबाना पहिले आहे निशी म्हणाला. तशी कीर्ती शेवंता कडे गेली आणि तिने गोरखनाथ चा फोटो दाखवला शेवंता याना ओळखते का? शेवंताने फोटो नीट पहिला आणि म्हणाली होय हे तर गोरखनाथ साहेब आहेत रामनाथ साहेब यांचे भाऊ आणि शेवन्ताचे हे वाक्य ऐकून कीर्ती च्या पाया खालची जमीन सरकली.कीर्ती तिकडे जमिनीवर बसुन राहिली अंगद ने तिला सहारा दिला . त्या पुजारी ला पण तू मारले ना? त्याची बॉडी घेऊन जाताना त्याची बोटे निळी झाली होती राजे म्हणाले. हो, मी मारले कारण मारले नसते तर त्याने बाबा चे नाव घेतले असते आणि मग सर्व खेळ वाया गेला असता. संपत्ती कीर्ती च्या नावावर होती., तिला २५ वर्ष पूर्ण होत नाही तो पर्यंत बाबा तिचे राखणदार होते जर त्या आधी कीर्ती ला काही झाले असते तर पूर्ण संपत्ती अनाथाश्रम ला दान झाली असती. म्हणून मग मी आणि बाबा ने एक प्लॅन केला आम्हाला माहित होते ह्या मिल मध्ये अवदसा आहे आणि हिच्या बापाला जसे मारले तसे हिला पण मारून टाकायचे. वीस वर्षांपूर्वी पुजारी ने बाबा ला कॉल केला होता अवदसे साठी आणि बाबा ने तिला बंद करायला सांगितले होते. कार अपघात किंवा असा कोणता अपघात आम्ही करू शकत नव्हतो जो समोर दिसेल आणि आमचे नाव त्यात येईल म्हणून मग बाबा ने हा प्लॅन केला आणि आम्ही सर्व आलो आधी शिव गेला तेव्हा मी जागा होतो पण झोपचे सोंग घेतले होते. मग मानसी तिला मारायचे नव्हते कारण ती पण यात सामील होती आणि आम्ही लग्न करणार होतो पण ती पण गेली सर्व ह्या कीर्ती ची चुकी तिच्या जागी मानसी गेली माझी आणि आज हि गेली असती पण माझी संधी वाया गेली. हे त्या भैरव ला माहित होते आणि ते मला मंदिरात समजले होते निशी म्हणाला. कीर्ती रडत होती आणि निशी तिचा कडे पाहून हसत होता. चला आता तुम्हाला तुमचा बंगलो देतो म्ह्णून राजे त्याला पकडून बाहेर आले आणि दोन हवलदारानी त्याला पोलीस जीप मध्ये बसवले. पहाटेचे पाच वाजले होते, कीर्ती ने रडत रडत अंगद कडून फोन घेतला आणि गोरखनाथ ला फोन लावला. हॅलो, काय म्हणू बाबा ,काका कि खूनी मला सर्व समजले आहे, एकदा मागितली असती हसत सर्व संपत्ती दिली असती त्या साठी एवढे करायची काय गरज होती. काही वेळ शांती मध्ये गेला आणि मग एक गोळी चा आवाज फोन मधून आला आणि कॉल कट झाला.


   ह्या घटने नंतर कीर्ती तिकडे राहिली आणि तिने मिल सुरु केली तिकडे गावात लोकांना पुन्हा रोजगार मिळाला आणि त्या मिल चे नाव तिने शिव टेक्सटाईल ठेवले. कीर्ती ने अंगद सोबत लग्न केले आता दोघे मिळून कीर्ती इंडस्ट्रीएस चा सर्व कारभार पाहत आहेत पण अजून त्याचा मनात त्या आठवणी ताज्या आहेत आणि अजून हि ते महिन्यातून एकदा शिरोळे गावी जातात आणि मिल ला भेट देऊन जुन्या आठवणी जगतात.


    मित्रानो लालच बुरी बला है। असे म्हणतात ते उगीच नाही. अहो हाव लोभ कश्याचा पण असू द्या पण तो अती झाला तर त्याचा अंत भयानक होतो. जे आहे त्यात खुश राहा आणि समाधानी राहा आणि आनंदाने जगा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror